करा अक्टींग..
दिवाळीच्या निमित्ताने आम्ही भावंडे एकत्र जमले होतोत. आणि आमचा आवडता खेळ सुरू केला - डम्ब शेरास (मराठीत काय म्हणतात माहित नाही, ह्या खेळात एक् चित्रपटाचे नाव दिले जाते , एक जन न बोलत व लिहिता त्याची अक्टींग करणार आणि बाकीचे तो चित्रपट ओळखणार )
हिंदी /मराठी चित्रपट फक्त असा नियम होता. पहिल्या १०-१२ चित्रपटनंतर सगळे जण सेट झाले होते. त्यानंतर अवघड चित्रपट सुद्धा १/२ - १ मिनीटात ओळखता येऊ लागले. मजा येन्यासाठी आम्ही नियम बदलले - चित्रपटाच्या नावात किती अक्षरं वा शब्द आहेत हे सांगायचे नाही.
पुन्हा थोड्या वेळाने सगळे सेट झाले आणी अवघड चित्रपट सुद्धा लवकर ओळखत येउ लागले. मधेच एकाने डॉन-मुथ्थूस्वामी हा चित्रपट दिला आणि तो ओळखायला नाकी नऊ आले सगळ्यांच्या. त्यानंतर व्हाया-दार्जीलिंग हा चित्रपट दिला आणि तो कुणालाच ओळखता आला नाही.
चित्रपटाच्या नावात जर कुणाचे नाव , जागेचे नाव वगैरे असेल तर आक्टींग करणे अवघड जाते हे कळू लागले.
खाली काही चित्रपटांची नावे देत आहे जी आम्च्या टीम ला जिंकून द्यायला उपयोगी ठरली :
रोड साईड रोमिओ
डॉन-मुथ्थूस्वामी
व्हाया-दार्जीलिंग
नील अंड निक्की
विक्टोरिया नं २०३
अगली और पगली
ड्बल क्रॉस
उन्स
घटोत्कच
हद कर दी आपने
तहजीब
अझान
तुमच्या कडे अशी काही चित्रपट आहेत् का ज्यांची ड्म्ब शेराज मधे धमाल येउ शकेल ? त्याचबरोबर त्यांची तुम्ही कशी अक्टींग करू शकाल हे नमूद केले तर आप्ल्या चर्चेत अधीक मजा येयील.
Comments
ऍक्टिंग
मी महाविद्यालयीन जीवनात हाच खेळ खेळताना ओळखलेला "चानी" हा चित्रपट. ऍक्टिंग करताना बरीच मेहनत पडली होती.. मेहनतीपे़शाही म्हणाल तर काय करु हाच गोंधळ उडाला होता.
- पिंगू
चानी
पहिल्यांदाच हे नाव ऐकतोय.
अशा वेळेस - " चावी " ची ऍक्टींग करा आनी साउन्ड सिमिलर म्हना ... नंतर धोनी ची अक्टींग करा आनी दोन्ही नावे मर्ज करा.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
"खार" प्राण्यासाठी कोकणातला शब्द
"चानी" म्हणजे "खार" या छोट्या प्राण्यासाठी कोकणातला शब्द आहे ना?
हो असे वाटते
चानी ही चिं. त्र्यं. खानोलकरांची कथा आहे. जबरदस्तीतून जन्मलेल्या एका अँग्लोइंडियन मुलीची आणि तिच्या आयुष्याच्या वाताहतीची.
चानी म्हणजे खार असेच वाटते. एखाद्या चटपटीत, आगाऊ मुलीला "चानी" म्हटले जाते.
शहाणीचा अपभ्रंश?
शहाणीचा अपभ्रंश की छानपासून चानी?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
शाणी नाही :-)
नाही तसे नसावे. चानी म्हणजे खारच पण खारीसारख्या चपळ, चटपटीत आणि आगाऊ (आगाऊ म्हणजे खार नेहमी सावध असते. तिला जरा इतरांपेक्षा जास्त माहित असते किंवा संकटाची चाहूल पटकन लागते) अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो.
डम्ब शेरॉडस
या खेळाचे नाव 'डम्ब शेरॉडस' आहे असे वाचल्याचे आठवते. (रसिका जोशीच्या एका मुलाखतीत तिने अक्षयकुमार हा खेळ खेळताना कशी फसवाफसवी करतो त्याविषयी सांगितले होते. त्याआधी मला या खेळाचे नाव 'दमशेरास' असे उर्दूसारखे काही आहे असे वाटत होते.)
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा