डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया

वरील उल्लेखिलेल्या संग्रहाचा मी (आणि आपण सगळेच) वारंवार उपयोग करत असणार. ह्याशिवाय मी books.google.com, archive.org आणि अनेक विद्यापीठांच्या संग्रहांनाहि मधूनमधून भेट देत असतो. ह्या अन्य संग्रहांच्या तुलनेत भारतीय 'डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया'चे व्यवस्थापन अतिशय ढिसाळ आणि वापरायला अतिशय अवघड आहे (user-unfriendly) असे माझे मत आहे. 'We are not happy till you are not happy' ह्या सरकारमान्य तत्त्वावर तिचे काम चालते काय अशी शंका येण्यासारखा तेथील कारभार आहे.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

माझे संगणकज्ञान फार खोल नसून ते केवळ जुजबी आहे. माझ्या वरील समजुतीत काही चूक असली तर ती दुरुस्त करण्यासाठी मला काही सूचना अनुभवी लोकांकडून मिळाव्यात अशा हेतूने पुढील लिखाण करीत आहे.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

मराठी, संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांमधील जुनी, सहजी न मिळणारी पुस्तके मिळण्यासाठी जिज्ञासू व्यक्तीने खरे पाहता 'डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया' हा प्रमुख स्रोत मानला पाहिजे पण तिच्या ढिसाळ कारभारामुळे त्या पात्रतेस पोहोचण्यासाठी खूपच दूरची मजल मारायला हवी असे माझे मत आहे. तिच्या संस्कृत संग्रहाबाबतहि माझ्या अनेक तक्रारी आहेत पण येथे केवळ मराठीबाबत लिहितो.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

ही लायब्ररी अनेक ठिकाणाहून आपले काम करते असे दिसते पण त्यापैकी केवळ बंगलोर केन्द्रापर्यंत आपण पोहोवचू शकतो. तिचा पत्ता http://202.41.82.144/ असा आहे. बाकी जागी काय चालते कोणास ठाऊक! नॉयडा केन्द्रातहि काही पुस्तके आहेत पण त्यातील कोणतेच उघडता येत नाही.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

आता बंगलोरकडे वळू. गेली कमीतकमी चारपाच वर्षे तरी त्याचे काम चालू आहे पण आजमितीस त्यांच्याकडे फक्त १०२० मराठी पुस्तके आहेत. (मलयालम् तर आणखीनच दुर्दैवी - त्या भाषेची फक्त ७० पुस्तके आहेत!) हजारो मराठी जुनी-नवी पुस्तके छापली गेली आहेत आणि मुम्बई-पुणे-नागपूर सारख्या विद्यापीठांच्या संग्रहामधून उपलब्ध आहेत. जिल्हयाजिल्हयांमधील सरकारी वाचनालयांमधून - त्यांपैकी काही खूप जुनी आहेत, आमच्या सातार्‍याचे नगरवाचनमंदिर १५० वर्षांचे होऊ घातले आहे - हजारो जुने ग्रन्थ कसेबसे तग धरून आहेत पण डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाची नजर त्यांच्यापर्यंत केव्हा पोहोचणार?
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

ह्या उपलब्ध पुस्तकांपैकीहि वाचक सहज पोहोचू शकेल अशी फार थोडी आहेत कारण पुस्तकांची सूचि अतिशय गैरशिस्त आणि गोंधळाची आहे. तिच्यामागे कसलेहि नियम दिसत नाहीत. पुढील उदाहरणे पहा: (उदाहरणादाखल न.चिं.केळकर घेतले आहेत. असेच घोळ अन्य कैक नावांचे सापडतील.)
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

१) शोधपेटीमध्ये Title - Kelkar - असे घातल्यास खालील उतारा मिळेल - येथील vangamaya मधल्या वांग्याचे भरीत करता येईल काय?:
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

samagra kelkar vangamaya vol8 kadambari., 99999990103389. . 2007. marathi. . 1005 pgs.
Samagra Kelkar Vangmay Bhag7., 99999990103390. . 2007. marathi. . 1061 pgs.
Samagra Kelkar Vangmay Vol 10., 99999990103391. . 2007. marathi. . 1008 pgs.
Samagra Kelkar Vangmay Vol 11., 99999990103392. . 2007. marathi. . 1155 pgs.
Samagra Kelkar Vangmay Vol 12., 99999990103393. . 2007. marathi. . 1087 pgs.
Samagra Kelkar Vangmaya Bhag 5., 99999990103395. . 2007. marathi. . 1264 pgs.
Samagra Kelkar Vangmaya Bhag 6., 99999990103396. . 2007. marathi. . 1095 pgs.
samagra kelkar vangmaya bhag4., 99999990103394. . 2007. marathi. . 1028 pgs.
Samagra Kelkar Vyamangya Bhag 3., 99999990103398. . 2007. marathi. . 1014 pgs.
samagra kelkar vyamangya bhag2., 99999990103397. . 2007. marathi. . 1030 pgs.

आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

शोधपेटीमध्ये Author - Kelkar असे घातल्यास खालील उतारा मिळेल:
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

Amatya_madhav., 1999990073545. Kelkar, Narasinha Chintaman. 1915. marathi. Literature. 132 pgs.
Bandharachaya Staphatya shatra., 99999990141993. V. H. Kelkar. 1988. marathi. About Dam. 430 pgs.
Gyaribaldi.., 1999990031705. Kelkar, Narsinhha Chinntaman.. 1901. marathi. History. 270 pgs.
Kalidas chaturya natak., 1999990073600. Kelkar, V. G.. 1889. marathi. Literature. 61 pgs.
Krushnarjuna yudha.., 1999990073611. Kelkar, Narsinha Chintamani. 1915. marathi. Literature. 154 pgs.
Kusum vasant.., 1999990073614. Kelkar, K G.. 1897. Marathi. Literature. 187 pgs.
Lokmanya Tilak yanche Charitra Khanda 2., 1999990082949. Kelkar, Narsinha Chintaman. 1928. marathi. History. 554 pgs.
Lokmanya Tilak yanche Charitra Khanda 3., 1999990082950. Kelkar, Narsinha Chintaman. 1928. marathi. History. 700 pgs.
Ratanamala ani pratapchandra.., 1999990073664. Kelkar, Mahadeo Vinayak.. 1888. Marathi. Literature. 184 pgs.
Tohi me ani hahi micha., 1999990073707. Kelkar, N. C.. 1898. Marathi. Literature. 145 pgs.

आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

ह्यातील अन्य केळकरांची पुस्तके बाजूस ठेऊ पण नचिं ह्यांचीच सर्व पुस्तके एकत्र मिळण्याची येथे काहीच व्यवस्था नाही. पहिल्या गटात ते लेखक म्हणून त्या संग्रहाशी संबंधित असल्याचा काही मागमूस नाही. त्यांचे नाव जेथे आहे तेथेहि कधी नरसिंह चिंतामण, कधी N. C., कधी नरसिंह चिंतामणि अशा वेगवेगळ्या प्रकारात आलेले आहे. त्याचे गॅरिबाल्डीचरित्र वर Gyaribaldi अशा अडाणी नावाने आहे पण तेच चरित्र अन्य एका जागी
Garyaribaldi., 99999990103257. . 2007. marathi. . 271 pgs.
अशा उल्लेखानेहि उपलब्ध आहे. तेथे त्यांचे नाव लेखक म्हणून दिलेच नाही. न.चिं. ह्यांचे पुत्र य.न. ह्यांचे 'इतिहासातील सहली' हे पुस्तक - ज्यातून मी 'झाशीवाले दामोदरपंत' ह्याचा मजकूर घेतला होता - येथे एकेकाळी निश्चित होते पण आजमितीस कसेहि शोधले तरी ते मला सापडत नाही. ते गुप्त झाले आहे.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

२) शोधपेटीमध्ये Title - Itihas असे घातल्यास २६ पुस्तके मिळतात ज्यांच्या नावात हा शब्द आहे. हाच शब्द Itihaas असा घातल्यास २ पुस्तके आणि Itihasa असा घातल्यास ५ पुस्तके मिळतात कारण ह्या शब्दाचे रोमनीकरण करण्याचा कोठलाच सुसूत्र नियम करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

३) माझे खापरपणजोबा महादेव गोविंदशास्त्री कोल्हटकर हे मेजर कँडीच्यामुळे इंग्रजी विद्या घेतलेल्या पहिल्या पिढीतील एक होते. ('मराठीचे उपेक्षित मानकरी' ह्या गं.दे.खानोलकर(?)लिखित पुस्तकात त्यांच्यावर एक लेख आहे.) त्यांनी इंग्रजीमधील रॉबर्टसनलिखित 'हिस्टरी ऑफ अमेरिका' ह्यावरून भाषांतरित केलेले आणि १८४९त छापलेले 'कोलंबसाचे चरित्र' हे पुस्तक ह्या संग्रहात दोन वेळा खालील नोंदींवर उपलब्ध आहे:
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

Kolumbusacha Itihas.., 1999990019515. Robens.. 1849. marathi. History. 180 pgs.
Kolumbusacha Itihas.., 1999990031820. Robens.. 1849. marathi. History. 180 pgs.

आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

येथे लेखकाचे नाव रॉबेन्स(!) असे दिलेले आहे. 'महादेव गोविंद शास्त्री' असा ढळढळीत उल्लेख पहिल्या पानावर असतांनाहि ते नाव ह्या नोंदीत मुळीच नाही. केवळ मला हे पुस्तक माहितीचे असल्याने मी ते मी येथे ओळखू शकलो. अन्य जि़ज्ञासूंना हवे असले तरीहि पुस्तक येथे कसे सापडणार?
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

४) पुढील दोन पुस्तके नावे वेगळी वाटली म्हणून उत्साहाने वाचण्यासाठी निवडली पण दोन्ही वेळा 'परवानगी नाही' अशा अर्थाचा मजकूर पुढे आला. परवानगी का नाही ह्याचे काहीहि स्पष्टीकरण नाही. असे असले तर ही पुस्तके तेथे कशासाठी ठेवली आहेत असा प्रश्न उभा राहतो.
Adhantari - no permission
kase gale divas., 99999990103283. . 2007. marathi. . 116 pgs.no permission
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

५) एल्फिन्स्टनचे पुढील अडाणी स्पेलिंग पहा. एल्फिन्स्टनच्या नावाचे खरे स्पेलिंग तुम्ही वापरले तर ह्या जन्मी तरी तुम्हास त्याचे पुस्तक येथे सापडायचे नाही.
Hindustanacha Itihas. Part-1., 1999990031788. Elifannstan, Moonstuarad.. 1861. marathi. History. 554 pgs.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

६) पुस्तके उतरवून घेण्याचा एक दीर्घसूत्री मार्ग उपलब्ध आहे. pdf, DjVu असे सरळधोपट सोपे मार्ग सोडून येथील सव्यापसव्य वाचकास का करायला लावतात कळत नाही. येथील online वाचनहि असेच अति वेळखाऊ आणि कष्टसाध्य असे आहे. तेथे दिलेल्या ३-४ प्रकारांपैकी केवळ ptiff ह्या एकाच मार्गाने माऊसची टिकटिक करून गोगलगायीच्या गतीने वाचन करता येते. अन्य html, text इ. उल्लेख केवळ शोभेपुरतेच आहेत. तेथे काहीहि सामुग्री उपलब्ध नाही. archive.org ह्या जागी पुस्तक उतरवून घेणे किंवा online वाचणे किती सोपे आहे हे पाहिले म्हणजे आपल्याकडे एव्हढे दारिद्र्य कशासाठी असा प्रश्न उभा राहतो.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

७) ही परिस्थिति अशीच गेले ४-५ वर्षे टिकून आहे. हिचे वाचक काही तक्रारच करत नाहीत का? का एकूणच वाचनसंस्कृतीचा जो र्‍हास आसपास चालू आहे त्याचेच उदाहरण म्हणून ह्या औदासिन्याकडे आपण पाहिले पाहिजे? संगणकक्षेत्रात जागतिक स्तरावर आमचे स्थान आहे अशी बढाई मारणार्‍या देशाची डिजिटल लायब्ररी इतकी भिकारडी का असावी? तिच्याशी संबंधित असलेल्या आय्.आय्.टी., आयुका सारख्या संस्था काय करत आहेत?
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ

(ह्या लेखनाच्या लांबीवरून तुम्हास माझ्या वैतागाची कल्पना आली असेलच.)

लेखनविषय: दुवे:

Comments

ढिसाळ आणि लाल फितीचा कारभार

शासकीय प्रकल्पांबद्दल विचाराल तर सगळा आनंदीआनंद असतो हा अनुभव मला सी-डॅकच्या मराठी भाषा रुपांतरण प्रकल्पाच्यावेळी आला होता आणि त्यामुळे पुढे अशा प्रकल्पांमध्ये काम करण्याची इच्छाच उरत नाही. सगळा ढिसाळ आणि लाल फितीचा कारभार. त्यामुळे त्यात व्यवसायिकपणे काम पूर्ण होईलच याची शाश्वती देता येत नाही. डिजीटल लायब्ररीच्या प्रकल्पातपण हाच घोळ आहे.

- पिंगू

डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया

एक महत्त्वाचा मुद्दा नंतर ध्यानी आला. वर उल्लेखिलेली पुस्तक उतरवून घेण्याच्या दीर्घसूत्री पद्धतीचा डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया
हिच्याशी काही संबंध आहे का हे कळत नाही. त्यासाठीचा DLI Downloader हा अन्य कोणीतरी विकसित केला आहे असे दिसते आणि केवळ गूगलच्या मदतीने तो शोधावा लागतो. मला हे 'ज्ञान' अगदी अलीकडे sanskritdocuments.org ह्या संकेतस्थळावरून मिळाले. डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या स्थानावर ह्याविषयी संपूर्ण आनंदीआनंद आहे.

उत्तम!

उपक्रमावरील प्रमोद हे मराठी पुस्तके डॉट ऑर्गचे काम करतात. त्यांना ही पुस्तके पाठवल्यास वाचकांना एकत्रितपणे पुस्तके मिळू शकतील.
मी नुकतेच आमचा जगाचा प्रवास हे पुस्तक एक एक पान करत उतरवले :( ते मी मराठी पुस्तके डॉट ऑर्ग साठीच उतरवले होते.
DLI Downloader बद्दल अनेक धन्यवाद.
आता वापरून पाहतो!

-निनाद

डीएलआय् डौनलोडर

डीएलआय् डौनलोडर ची माहिती दिल्याबद्दल आभार. मुख्य साइटवर उतरवून घेण्याचा दुवा मला कुठेच दिसलेला नाही, त्यामुळे ती उतरवून घेता येतात हे माहितच नव्हते.
डीएलआय् डौनलोडरच्या आधारे एखादे पुस्तक उतरवून घ्यायचे असले तर ते डीएलआय् डौनलोडर स्वतंत्र उघडून करावे लागते का? मी उत्साहाने माझ्या मॅकबुकवर उतरवून घेतला, पण माझ्या मॅक कंप्यूटरवर "जावा" चे हवे ते वर्शन न मिळाल्यामुळे ते सुरूच होत नाहीय. आणि त्यांनी सांगितलेले वर्शन उतरवून घेतल्यवरही. काय चाललंय कळत नाही - इथे कोणी हा प्रयोग मॅकिंटॉश वर करून पाहिला आहे का?

अनधिकृत सुविधा

डाउनलोडरची सुविधा अनधिकृत आहे. मागे डाऊनलोडरच्या निर्मात्यांकडून अशी सूचना मिळाली होती, की डाऊनलोडरचा (गैर)वापर करून इतकी पुस्तके भराभरा उतरवू नये, की डीएलआयच्या सर्व्हरवर ओझे व्हावे. असे केल्यास भीती आहे, की डीएलआयला ही अनधिकृत सुविधा बंद पाडण्याची वेळ यावी.

संस्कृतडॉक्युमेन्ट्स् संसेतस्थळाच्या चालकांना ईमेलद्वारा विनंती केली, तर ते डाऊनलोडरची प्रत तुम्हाला उपलब्ध करून देतील.

अनधिकृत?

अनधिकृत म्हणजे डी एल् आय वाल्यांना एकूण पुस्तके उतरवून घेतलेलेच पसंतच नाही असे दिसते.

जालावर तरी नीट वाचायची सोय करून द्यायला हवी. अनेक सरकारी स्थळांवर इतकी भडक आणि चमकणारे स्क्रोल करणारे टॅब्स, लहानशी अक्षरे, अगळपगळ पसरलेली माहिती का असते? गूगल सारखेच "मानवी ज्ञानाला आम्ही संग्रहित करत आहोत" असा मोठा दावा या स्थळावर आहे, पण त्यांच्या सारखेच स्वच्छ, छान वापरता येण्यासारखे स्थळ का नाही निर्माण करावे?

असो. मी संस्कृतवाल्यांना डाउनलोडर बद्दल विचारून पाहते.

डाऊनलोड

पहिल्या प्रतिसादात नकारात्मक दृष्टीकोन दाखवल्याबद्दल एक डाव माफी असावी.

बाकी DLI Downloader वापरुन पुस्तके अतिशय चांगल्या पद्धतीने डाऊनलोड करता येताहेत. त्याबद्दल धन्स.

- पिंगू

दिजिटल लायब्ररी

डिजिटल लायब्ररीचे व्यवस्थापन बेंगळूरुच्या विज्ञानसंस्थेत(आय आय एस् सी बंगलोर) असते.

काही वर्षांपूर्वी मी त्यांच्याशी इ-पत्रव्यवहार केला होता. मी त्यांना मराठीतील सर्व पुस्तके सीडी स्वरुपात मागितली होती. ते देण्यास त्यांचा फारसा आक्षेप नव्हता असे मला वाटले. (नाहीतरी ती माहितीच्या अधिकारांन्वये मिळणारच.) त्यानंतर पुस्तकांची वर्गवारी लाऊन, पीडीफ वा अन्य स्वरुपात प्रताधिकार नसलेला सीडी संच प्रकाशित करणे हे एक काम मनाशी ठरवले होते.

या ग्रंथालयात बहुदा १२०० वरची उत्तम पुस्तके आहेत. काही पुस्तकांचे स्कॅनिंग अतिशय गचाळ झाले आहे. निनाद यांनी पाठवलेल्या पुस्तक साधारण ४०० पानाचे आणि ४४ एम्.बी. एवढे भरते. एका सीडीत (डीवीडीत) अशी ७०+ पुस्तके येऊ शकतील (पुस्तकांच्या पानांची संख्या ३०० धरली तर कदाचित १००). १५-२० डीवीडीत हा संग्रह मावू शकतो.

वेबसाइटवर पुस्तके ठेवण्यास अधिक खर्च येईल. (१२०० पुस्तकांना ५० जीबी) शिवाय डाउनलोड ही थोडे कठीण जाते. (पुढील काही वर्षात हे प्रश्न राहणार नाहीत.) पण डीवीडी स्वरुपातील संच विविध ग्रंथालयात ठेवणे फारसे खर्चाचे होणार नाही. (त्यांनी तो बाळगला तर.)

मला असे वाटले की बंगलोरला जाऊन हे काम करणे जरा जास्त सोपे असेल. (पत्रव्यवहारापेक्षा.) कामानिमित्त कधी बंगलोरला जाण्याची तेव्हा वेळ येणार होती. पण हवे तसे झाले नाही.

येथील कोणी बंगलोरवासी असेल तर त्यांना कदाचित हे काम जास्त सहज पणे करता येईल. (स्वयंसेवकांची गरज आहे.)

अशीच (पण याहून जास्त वेळखाऊ) कामे मनात होती. जसे ठाण्याच्या वाचनालयात १९०० सालापूर्वीची काही हजार पुस्तके आहेत. वाचनालयाचा मी सभासद असल्याने (आणि एकदोनदा बोलल्यामुळे) असे वाटते की यांचे कॅमेरातून स्कॅनिंग करण्यास त्यांची हरकत नसावी. (खरे स्कॅनिंग पाने सुटी करून परत बाईंडींग करून व्यवस्थित होते.) तिथली आणि अशाच अनेक वाचनालयातील पुस्तके या पद्धतीने उपलब्ध करून देता येतील. (परत स्वयंसेवक आणि अर्थसहाय्याची गरज.)

हे करण्यास अडचण एवढीच होती की डिजिटल लायब्ररीत असलेली पुस्तके डुप्लिकेट होता कामा नयेत. (नाहीतर वेळ वाया.) तेव्हा आधी डिजिटल लायब्ररी मग इतर ग्रंथालये असा योग्य मार्ग दिसतो.

याच बरोबर कित्येक हस्तलिखिते, पूर्वी कोणी म्हणाल्याप्रमाणे पेशवे दप्तरातील लाखभर मोडीतील कागद इत्यादी एशियाटिक, भांडारकर इत्यादीत उपलब्ध आहेत. नॅशनल आर्काईव्ज (आणि राज्य आर्काविज) मधे देखिल अशीच कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यातील काही पूर्वीच्या तंत्राप्रमाणे मायक्रोफिशे स्वरूपात आहेत. ही कागदपत्रे डिजिटाइज करणे पण महत्वाचे ठरेल.

प्रमोद

मनातले बोललात

अगदी मनातले बोललात. डीएलआयवर जावेसेच वाटत नाही. एकतर ते सामुदायिक संस्थळ नाही. प्रत्येक ठिकाणचे संस्थळ वेगळ्या सर्वरवर आहे असे वाटते. तसेच स्कॅनिंग रिजोल्युशन स्टँडर्ड न पाळल्याने पुस्तके कमीजास्त स्पष्ट दिसतात. एकेक पान उलटत वाचन करणे अतिशय कंटाळवाणे तर आहेच पण पुस्तकाची पाने पालटून मागचेपुढचे संदर्भ पहाणे तर आजिबात शक्य होत नाही.
पुस्तकांच्या सूचीबद्दल आनंदीआनंद आहेच. डीएलआयचा कारभार असाच सुरू राहिला तर फक्त नावाला भारतात डिजिटल लायब्ररी आहे असे म्हणता येईल आणि गूगल बुक्ससारखी पैसेखाऊ संस्थळे फोफावतील. (मला वाटते 'परवानगी नाही' सदरातील पुस्तके गूगल बुक्सने गिळंकृत केलेली असावीत.)

डीएलआय डाऊनलोडरबद्दल धन्यवाद. हा डाऊनलोडर डीएलआय अधिकृतपणे आपल्या संस्थळावर का वापरत नसावे?

+१

अगदी मनातले बोललात. डीएलआयवर जावेसेच वाटत नाही.

संपूर्ण प्रतिसादाला +१. सुरुवातीला मी जात होते पण मग तिथे वेळ घालवाण्यात काही अर्थ नाही हे लवकरच लक्षात आले.

कुणावर अवलंबून राहावे, अशी स्थिती नाही..

अरविंदजी,
पुस्तक, ज्ञानसंपादन याबाबत आपल्याकडील अनास्था पाहाता अभ्यासकाने सिस्टिमवर अवलंबून राहावे, अशी स्थिती नाही. माझ्यापुरता मी एक उपाय योजतो. एखादे दुर्मीळ अथवा पुढे हाती लागणार नाही, अशी शक्यता असलेले पुस्तक मिळाले, की सरळ त्याची छायाप्रत काढून घेतो. मग या पुस्तकाचा सारांश रोजनिशीत नोंदवून ठेवतो.

डॉन क्विक्झोट

"गॅरिबाल्डीचरित्र वर Gyaribaldi अशा अडाणी नावाने आहे"

~ गॅरिबाल्डी हे व्यक्ती बंगलोरस्थित टंककुट्टीकेला माहीत नसेल असे क्षणभर गृहीत धरले तरी तिला 'गौतम बुद्ध' या नावाचे स्पेलिंग Gautam Uddha असे असूच शकणार नाही हे समजले नसेल तर मग डीएलआय चा क्लेरिकल लाईनवरदेखील कसा कारभार चालू असेल याची प्रचिती येते. बाकीच्या उदाहरणाबाबतही असाच आनंदीआनंद आहे जो श्री.कोल्हटकर यानी काही समर्पक उदाहराणातून टिपलेला आहेच.

"तेथे दिलेल्या ३-४ प्रकारांपैकी केवळ ptiff ह्या एकाच मार्गाने माऊसची टिकटिक करून गोगलगायीच्या गतीने वाचन करता येते."

~ पण मी हे [जरी काहीसे कंटाळवाणे असले तरी] केले आहे आणि त्यानुसार तिथून श्री.दा.न.शिखरे अनुवादित "डॉन क्विक्झोट" ही सरव्हॅन्टिसची कादंबरी [नेटाने नेट लावून] वाचली. पाने पलटण्याचे स्पीडही समाधानकारक होते.

(डीएलआयने प्रथम परिचयात अनुवादित कादंबरीचे प्रकाशन साल १८९६ असे दिले जे वस्तुतः १९७४ आहे)

चांगला विषय

माझ्या माहिती प्रमाणे साधारण इ.स. २०००च्या मागे पुढे विशेष करून नॅशनल सायन्स फाउंडेशन (एनएसएफ.जीओव्ही) ने डिजिटल लायब्ररीवर बरेच लक्ष केंद्रीत केले होते. त्या अंतर्गत अनेक डिजीटल लायब्ररीचे प्रकल्प तयार केले गेले होते आणि सॉफ्टवेअर्स तयार केली गेली. पण त्याच सुमारास गुगल नावारूपाला येऊ लागले होते त्यामुळे काही अंशी फोकस बदलत गेला. त्यातच ९/११ नंतर हळू हळू अमेरीकेची आर्थिक घडी बदलत गेली आणि एनएसएफ ने या प्रकल्पाच्या अनुदानावरील लक्ष काढून घेतले. आय आय एस मधील प्रकल्पात पण एन एस एफ ची मदत होती. शेवटी असले प्रकल्प हे इच्छा आणि पैसा या दोन गोष्टींवर चालतात. त्यातील बाहेरील पैसा गेला, भारत सरकारचे फार लक्ष होते असे वाटत नाही आणि एकूण भारतीय मानसाची इच्छा यामुळे एकंदरीत त्यात जास्त लक्ष दिले गेलेले नाही. हे म्हणायचे अजून एक कारण म्हणजे त्या संदर्भात आम्ही देखील भारतीय संस्थांबरोबर तेंव्हा प्रकल्प उभारायचे (त्यांचे पैसे न घेता) प्रयत्न केले होते. पण ज्या पद्धतीचा अनुभव आला त्यातून असे वाटते. असो.

मला वाटते गुगलने नंतर बंगलोर-म्हैसूर कुठेतरी अनेक पुरातन कागदपत्रे स्कॅन करायचे काम मनावर घेतले होते आणि अजूनही ते करत आहे. आपण जे काही बुक्स.गुगल.ऑर्ग वर बघतो ते त्यांचे पूर्ण झालेले काम आहे. जादुगाराची पोतडी खूप मोठी आणि खोल आहे...

वर प्रमोद यांनी जे काही सीडी संदर्भात म्हणले आहे त्यासाठी न्यूझीलंडचे ग्रीनस्टोन नामक एक सॉफ्टवेअर (ओपन सोअर्स) चांगले आहे. अर्थात ते मी ७-८ वर्षांपुर्वू ट्राय केले होते आता त्यात काय बदल झालेत वगैरेची कल्पना नाही. अजूनही अनेक चांगले सॉफ्टवेअर प्रकल्प आहे, ज्यांचा उपयोग होऊ शकतो....

सहमत आहे

>>संगणकक्षेत्रात जागतिक स्तरावर आमचे स्थान आहे अशी बढाई मारणार्‍या देशाची डिजिटल लायब्ररी इतकी भिकारडी का असावी?

सहमत आहे.

तसेच अमेरिकेतही एनएसडीएल ही एनएसएफने तयार केलेली डिजिटल लायब्ररी आज थोडीफार शासनाच्या हट्टाने चालू असली तरी मध्यंतरी एका एनएसएफच्या अधिकार्‍याकडूनच असे ऐकले की तो प्रकल्प फारसा यशस्वी नाही. आणि मी पाहिलेले त्यांचे अधिकारीही त्याबाबतीत फार रस असलेले वाटले नाहीत. आपले प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम गूगल जेवढे चांगले करते तेवढे या लायब्ररीच्या मार्फत झाले नाही असे म्हणणे दिसले. अजून एक असे की काय चूक आहे ती कळली तरी दुरुस्त करण्याची इच्छा दिसली नाही. गूगल करते आहे ना, मग व्हील री-इन्वेंट का करा असा सरळ सरळ हिशेब दिसला.

डिजिटल लायब्ररीचा संदर्भ

डिजिटल लायब्ररीतील दोन वेगवेगळ्या पुस्तकांचा संदर्भ मी काही वर्षांपूर्वी दोन उपक्रमींना दिला होता. त्यांतल्या एकाला पुस्तक उघडताच आले नाही, आणि दुसर्‍याला उघडायला फार कष्ट पडले. त्यामुळे वरील चर्चेत व्यक्त झालेल्या मतांशी मी सहमत आहे.--वाचक्नवी

बघून आलो.

एकंदरीत अनुभव त्रासदायक आहे खरा. नुसती पानं स्कॅन करून टाकण्यापेक्षा ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशनचं सॉफ्टवेअर का लिहीत नाही कोणी?

अवांतर - सहज चाळताना तुकारामाच्या गाथेत इथे येऊन पोचलो. तिथे 'चेंडूफळी' या खेळाचा उल्लेख आहे. विकीवर क्रिकेटचा पहिला उल्लेख १५९८ साली आहे हे वाचल्यावर भारतात तुकारामाला माहीत असलेला चेंडूफळीचा खेळ असावा हे आश्चर्यकारक वाटलं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

तसे

तसे चित्रांकन नावाचे सी डॅक निर्मित सॉफ्ट्वेयर आहे!
हे पाहा
http://en.wikipedia.org/wiki/Chitrankan

पण ते कसे चालते वगैरे या विषयी माहिती नाही.
-निनाद

माझा अनुभव ही चांगला नाही

डीएलआय वापरायचा माझा अनुभव ही चांगला नाही. त्यातील पुस्तके उतरवून घ्यायला संस्कृतडॉक्युमेन्ट्स् च्या चालकांनी मदत केली नसती, तर मला जमलेच नसते.

यू.एस. च्या एनएसएफची डिजिटल लायब्ररी अयशस्वी झाली हे ऐकून आश्चर्य आणि दु:ख वाटले. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनची सर्व संकेतस्थळे इतकी उत्कृष्ट आहेत, की मी नेहमी तिथे पडीक असतो.

क्रिटिसिजम

http://en.wikipedia.org/wiki/National_Science_Digital_Library येथील क्रिटिसिजम हा भाग वाचल्यास मी पाहिलेल्या प्रोग्रॅम ऑफिसरांचे मत याहून वेगळे वाटले नाही. हा प्रकल्प अजूनही चालू आहे पण त्याचा खरोखरच फारसा उपयोग नाही आणि माझ्या माहितीतले युनिवर्सिटीमधले कोणीही मुद्दाम इथे माहितीसाठी जातात असेही दिसत नाही.

त्रागा रास्त असल्याचं

त्रागा रास्त असल्याचं संस्थळाचा काही दिवस अभ्यास करून मलाही पटलं आहे.

तिच्याशी संबंधित असलेल्या आय्.आय्.टी., आयुका सारख्या संस्था काय करत आहेत?

Inter University Centre for Astronomy and Astrophysics उर्फ आयुका या संस्थेचा या प्रकल्पात काही सहभाग असण्याची कल्पना नव्हती.

 
^ वर