लहानपणीची स्वप्नं

लहानपणी आपण खूप भारी-भारी स्वप्नं पहातो. इंद्रजाल कॉमिक्स आणि वेताळाचा फ्यान असल्यामुळे आफ्रीकेत जाऊन गुर्रन आणि "चालता-बोलता संबंध" ह्यांना भेटून वेताळाची आंगठी मी आणेन अशी स्वप्नं लहानपणी पाहत असे. लहानपणीची स्वप्नं खरं म्हणजे आपण मोठेपणी काय करु ह्याची असतात. त्यामुळे ती तेव्हाच साध्य होणे शक्यच नसते. पण नंतर आपला प्रवास वेगळ्याच वाटेने होत जातो व ही स्वप्ने तशीच राहून जातात.

पण एका "मोठ्या" व्यक्तिने मात्र ही लहानपणीची स्वप्नं अगदी एक-एक करुन साधली आणि त्यातून त्याने खूप आनंद मिळवला व अनेक नव्या-ताज्या गोष्टीही शिकला.
अनेकांना मी कशाबद्दल लिहीणार आहे, ह्याचा अंदाज आलाही असेल.- रॅन्डी पॉश ! ऍलिस नावाचे सॉफ्टवेअर ज्याने जन्माला घातले, विद्यार्थीवर्गाचा अत्यंत लाडका, कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असलेला हा प्रोफेसर, जेव्हा असाध्य कॅन्सरमुळे शेवटचे काही दिवस शिल्लक राहीले असतांना ते दिवस तो कसे जगतो, कुटूंबासाठी काय-काय करतो, हे त्याने त्यांचा अत्यंत प्रसिध्द असलेल्या "रॅन्डी पॉश- लास्ट लेक्चर" मधे सांगितले आहे.

ह्या शेवटच्या अध्यापनानंतर तो एका महिन्यातच गेला. पण असा "जाणे माहिती असलेला" माणूस, उरलेले दिवस अत्यंत समाधानाने व निश्चयाने- काही राहून गेलेले तर काही नंतर ठरवलेले- असे सगळे साकारुन गेला. हे लेक्चर ऐकणे हाच मुळात आनंदाचा भाग आहे. जाता-जाता ह्या माणसाने खूप प्रेरणा दिली आहे- सगळ्याकडे पाहण्याचा योग्य असा दृष्टीकोन दिला आहे.

रॅन्डी पॉशबद्दल थोडक्यातील माहिती येथे आहे. व त्याचे ते जगप्रसिद्ध लेक्चर येथे आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान लेख

लेख आवडला. रॅ न्डी पॉशचा परिचयही आवडला.
प्रत्येकाने लहानपणी जी स्वप्ने बघितलेली असतात, जे करण्याची इच्छा असते ते करण्यासाठी निवृत्त झाल्यावर खास वेळ राखून ठेवणे गरजेचे असते. यामुळे लहानपणच्या इच्छा पण पूर्ण होतात व वेळही चांगला घालवता येतो. फोटोग्राफी, चित्रकला, पर्यटन, मॉडेल मेकिं, लेखन यासारख्या असंख्य गोष्टी करता येणे शक्य आहे.
शाळेत असताना तांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम निवडल्यामुळे इतिहास व भूगोल हे विषय मी कधी शिकलोच नव्हतो. निवृत्तीत आता त्यांचा अभ्यास करताना हे दोन्ही विषय किती रोचक आहेत हे माझ्या लक्षात येते आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

छान

छान.

याबाबत मागे आलेल्या मराठी संस्थळ-लेखाचा दुवा कोणाला सापडला, तर तो त्यांनी जरूर द्यावा.

 
^ वर