माहीतीपुर्ण लेख व त्याची सुची !

उपक्रमवर सापडलेले माहीतीपुर्ण लेख व त्याची सुची !
ह्या नूसार उपक्रमवर माहीतीपुर्ण लेखांची व चर्चेचीच देवाण घेवाण होते हे सिध्द होत आहे , खालील सुची देण्याचा अर्थ देखील हाच आहे की नवीन सदस्यांना कळावे की उपक्रम वर माहीतीपुर्ण लेखच ठेवले जातात.

मला ही माहीतीचीच देवाण-घेवाण करावयाची आहे !

प्रश्न :-

उपक्रमींनो, तुम्हाला खालील सुची मधला कोणता लेख / चर्चा जास्त माहीतीपुर्ण वाटला.

१. वाघ - (उपक्रमरावांच्या नजर चूकीने महत्त्वाचा लेख नष्ट झाला)
२. रेस्टॉरंट-एकमेवाद्वितीय
३. लेख गायब!!!
४. 'उपक्रम' चा पहिला वाढदिवस
५. भाईकाकांची एक लहानशी आठवण!
६. अाता तरी जागे व्हा!
७. वाट्टेल ते...
८. साहिरची आवडलेली गाणी - १ जिंदगी जुल्म सही
९. बंबईकू सलाम
१०. चुपके चुपके चल री पुरवैय्या
११. इष्काची इंगळी डसली - रामभाऊ कदमांची एक आठवण!
१२. कधी रे येशील तू.. प्रत्यक्ष आशाताई गात असतानाचा दुवा!
१३. उपक्रमरावांना सप्रेम भेट! ;)
१४. 'स्वप्नसुंदरी' हजार किलोची...
१५. चित्रपट संगीतातील रागदारी
१६. देश
१७. च्यामारी नक्की कोण कोण? ;)
१८. तू बर्फी, मी पेढा..;)
१९. आम्ही गाणं ऐकतोय! ;)
१८. लगीन ठरलंया

उपक्रमच्या नजरचूकीने काही महत्वाचे लेख हे नष्ट झाले आहेत व मला खेद आहे की मी तुम्हाला त्याची माहीती देऊ शकत नाही.

त्वरा करा !!!! त्वरा करा !!!!!! ही चर्चा नष्ट होण्याआधी आपले बहुमुल्य मत द्या !!!!!

तळटीप :- वर सूची मध्ये असलेल्या लेखाच्या /चर्चेच्या लेखका / लेखिके विषयी माझ्या मनामध्ये कोणती ही असूया नाही आहे फक्त फरक दाखवण्यासाठी त्याच्या लेखनाचा उपयोग करुन घेतला आहे, माफी असावी. तरी कोणाला आपेक्ष असेल तर मला व्यक्तीगत खरडवही वर निरोप पाठवा... ;) सर्वांना समजेल की काय उत्तर दिले आहे.

आपलाच,

साथी

Comments

आमचेही मत..

उपक्रमपंत अनेक वेगवेगळ्या उपक्रमात कार्यरत असल्याने त्यांना सर्वच ठिकाणी लक्ष घालणे शक्य नाही, हेदेखील बघा.

उपक्रम पंताना सर्व ठीकाणी लक्ष घालणे शक्य नसल्यानेच त्यांनी संपादक मंडळाची नेमणूक केली आहे असे वाटते... आणि हे संपादक मंडळ उपक्रमावर चांगलेच डोळ्यात तेल घालून पहारा देते हे आम्हाला राज साहेबांचा एका चर्चेत आलेला उपप्रतिसात काही क्षणात उडवलेला बघून कळले. (त्यातल्याच एकाच्या खरडवहीत आम्हाला काल आपला निरोप देखिल दिसला होता.) तेव्हा एकीकडे एखादा उपप्रतिसाद जर इतक्या तत्परतेने उडवला जातो आणि दुसरीकडे मात्र चक्क अख्खा लेख च्या लेख (आणि तेही एखादा नव्हे) त्यांच्या नजरेतुन सुटतो ह्यावर मात्र ते "इतर कामात व्यग्र आहेत" ह्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का?

मला उपक्रमाची ध्येयधोरणे कळल्यापासून मी भावनेच्या भरात एखादा लेख, एखादा प्रतिसाद लिहून जातो, पण नंतर उपक्रमपंतांना व्यनिने विनंती करून तो लेख काढून टाकण्याचा आग्रह धरतो (टोपणनामांतर हा लेख काढून टाकण्यास मी तशीच विनंती केलेली आहे. अद्याप उपक्रमापंताअंनी तो व्यनि वाचलेला नाही हे स्पष्ट आहे.)

ही ध्येय धोरणे तुम्हाला नुकतीच कळलेली दिसतात.. कारण काल परवा पर्यंत तर आपल्या 'टोपणनावाचे नामांतर' हा लेख धोरणात कसा बसतो हे पटवण्यात व्यग्र होतात असे दिसले. . आपल्याला हा इथल्या धोरणांविषयी झालेला साक्षत्कार इथल्या समस्त सभासद वर्गाला समजून सांगाल का?म्हणजे आम्ही देखिल सुसंगतच लेखन करू.
शुभेच्छा!

मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

सहमत.

आपल्याला हा इथल्या धोरणांविषयी झालेला साक्षत्कार इथल्या समस्त सभासद वर्गाला समजून सांगाल का?म्हणजे आम्ही देखिल सुसंगतच लेखन करू.

याला शालजोडीत म्हणतात का?
-गुंडोपंत

~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!
म्हणजे काय?
म्हणजे 'वय वर्षे १८ अधिक' अशा समूहा चे वावडे उपक्रमाला का असावे बरं? ~

वरुण

एखादा उपप्रतिसाद जर इतक्या तत्परतेने उडवला जातो आणि दुसरीकडे मात्र चक्क अख्खा लेख च्या लेख (आणि तेही एखादा नव्हे) त्यांच्या नजरेतुन सुटतो ह्यावर मात्र ते "इतर कामात व्यग्र आहेत" ह्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का?

व्यग्रता मान्य आहे पण एक अनुक्रमणिका ठरवावयास हवी की ,
प्रथम आलेला प्रतिसाद / लेख / नष्ट केला जावा, तेथे एक संदेश ठेवला जावा की का नष्ट केला गेला.
माझे मत असे आहे
जर दिनांक : ५/५/७ ला एक लेख आला आहे व ६/५ /७ ला एक तर सर्वात प्रथम ५ तारखेचा लेख /प्रतिसाद नष्ट केला जावा.
लेखकास त्याच जागी कळवा (उपप्रतिसाद दिला तर चालेल की अमुक-अमुक वेळाने तुमचा प्रतिसाद नष्ट केला जाईल.) मान्य आहे की वेळ नाही आहे पण ह्यावर काहीतरी मार्ग शोधा वयास हवा ना !

बघा मान्य असेल तर.

राज जैन

एक प्रतिसाद

तुम्ही दिलेला एक प्रतिसाद नाहीसा झालाय म्हणून तुम्ही ही नवीन आघाडी उघडली आहे

नाही, फक्त एक प्रतिसादासाठी नाही, हे तुम्हाला कळावयास हवे होते युयुत्सु महाराज !

उपक्रमाची ध्येयधोरणे
तेच तर माहीती करुन घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

"उपक्रमपंत अनेक वेगवेगळ्या उपक्रमात कार्यरत असल्याने त्यांना सर्वच ठिकाणी लक्ष घालणे शक्य नाही "

उपक्रमचे कार्य असेच वाढत राहो व अशीच प्रगती होत राहो ही ईश्वराचरणी प्रार्थना.

"हे फक्त एक संस्थळ चालवण्याचे कार्य."
कळाले नाही समजवाल का ?
मी माझे संस्थळ ह्याच महिन्यामध्ये दिले आहे (५०%) पण ह्याच्या आधी ८ महीने मीच चालवत होतो. सध्या दोन महीने मीच चालवत आहे, हे तुम्हाला माहीत असावे.

"उपक्रमपंत आणि आम्ही अनेकदा चर्चा करून नवनवीन उपक्रमांची बांधणी करण्याच्या भानगडी करतोय. त्यामुळे त्यांना किती कमी वेळ मिळत असेल, ह्याचा विचार करा."
मग त्या चर्चेमध्ये सर्व सदस्यांना सहभागी करुन घ्या ना आम्हाला ही कळू देत की काय घडामोडी घडत आहेत येथे !

धन्यवाद.
राज जैन

किती वेळा नावे बदलणार? एकदा काय ती भूमिका स्पष्ट करा की राव!

आपण सद्या उपक्रमावर उघडलेली आघाडी बघून करमणूक होतेय. मालक,चालक आणि प्रशासक म्हणून आपण एकीकडे जसे वागताय त्याच्या अगदी उलट इथे एक सदस्य म्हणून वागताय. निदान आपण तरी उपक्रमपंतांना सहकार्य करण्यास पुढे सरसावले पाहिजे.
सद्या मनोगतावरचे जूनेजाणते लोकही इथले सदस्य आहेत आणि त्यांच्याशी जुळवून घेताना त्यांची दमछाक होतेय. आपण त्यांना मदत करण्याऐवजी आगीत तेल ओतता आहात असे वाटते.
आपले नक्की धोरण काय आहे मला तरी कळले नाही. तुम्ही एकतर मालक/प्रशासकाच्या आपल्या भुमिकेतून बाहेर न पडता उपक्रमरावांची साथ द्या नाहीतर एक सदस्य म्हणून इथे जसे वागावेसे वाटतेय तसे वागताना इथल्या प्रशासकांची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न करा. असा दोन दगडांवर उभे राहण्याचा प्रयत्न करू नका.
अजूनही हे संकेतस्थळ जसे चालावे तसे सुरळितपणे चालत नाहीये. त्यात आपण खोडा घालू नये असे वाटते.

अत्यानंद जी

नमस्कार अत्यानंद जी,

" मालक,चालक आणि प्रशासक म्हणून आपण एकीकडे जसे वागताय त्याच्या अगदी उलट इथे एक सदस्य म्हणून वागताय. निदान आपण तरी उपक्रमपंतांना सहकार्य करण्यास पुढे सरसावले पाहिजे. "

बरोबर. कारण राज जैन व माझे शब्द व्यवस्थापक ह्या दोन वेगळ्या व्यक्तीरेखा आहेत असे मी मानतो. येथे राज हा सदस्य आहे व मला जे खटकले त्या बद्दल मी लिहले आहे मी एक व्यवस्थापक ह्या नात्याने नाही.
परवा पर्यंत मी उपक्रमला मदतच करत होतो तुम्ही माझ्या चर्चा व माझे प्रतिसाद हे पाहिल्याच असतील त्या ह्याच बाबतीत जास्त आहे ना ?

"आपण त्यांना मदत करण्याऐवजी आगीत तेल ओतता आहात असे वाटते."
नाही हो ! मी माझे कार्य करित आहे फक्त पाहण्याचा दृष्टीकोण जरा वेगळा आहे :)

"प्रशासकांची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न करा"
हो ! हे महत्वाचे आहे ह्या बाबतीत आपल्याशी सहमत.

धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून मला आपले विचार कळवलेत.

राज जैन

सदस्यांवर अनावश्यक टिप्पणी करणारे प्रतिसाद आणि त्या अनुषंगाने येणारे उपप्रतिसाद चर्चेतून नाईलाजाने काढून टाकले आहेत. उपक्रमावरील आणि उपक्रमाबाहेरील संदर्भ देताना सदस्यांच्या व्यक्तिगत जीवनावर भाष्य करणे कृपया टाळावे. - उपसंपादक.

माहिती आवडली.

माहिती आवडली. इथे कोण कोण माहिती पूर्ण लेखन करतात.कोण कशासाठी येते,माझ्यासारख्या नवसदस्याला ही माहिती अभ्यासपूर्ण वाटली.

-नाना.

धन्यवाद.

धन्यवाद,
मिलिंद साहेब मी राजीव ह्यांना प्रतिसाद म्हणून अजून एक सूची (सदस्य) कार्याची प्रकाशीत केली होती पण शक्यतो ती देखील उपक्रमरावांनी नष्ट केली :(

परत एकदा आपले व उपक्रमचे धन्यवाद.

राज जैन

ही चर्चा संपली आहे

ह्या चर्चेतून काही ही फळ प्राप्त झाले नाही असे वाटत आहे त्या मूळे हा विषय येथे संपला आहे,
ज्या ज्या सदस्यांनी वाचन केले त्यांचे धन्यवाद.
ज्या सदस्यांनी आपले मोलाचे चार शब्द प्रतिसाद म्हणून येथे दिले त्यांचे देखील धन्यवाद.
ज्या सद्स्यांचे अनमोल प्रतिसाद येथून नष्ट झाले त्यांचे देखील धन्यवाद ;)

ही चर्चा जेव्हा पासून चालू झाली तेव्हा पासून उपक्रम व उपक्रमचे व्यवस्थापन मंडळ आपल्या कार्यात व्यस्त झाले व त्यामूळे त्यांच्या कडुन एक ही शब्द लिखित स्वरुपात आला नाही की वरील सूचीतील लेख /चर्चा ह्या नियमामध्ये आहेत की नाहीत.
तरी देखील उपक्रम व उपक्रमवासीयांना धन्यवाद देत आम्ही ही चर्चा थांबवत आहोत.

राज जैन

 
^ वर