ड्युप्लीकेट आयडी प्रकरण का स्पॅम?

आत्ता उपक्रमावर लॉगईन झालो तर मला एकदम चार व्यनि आलेले दिसले. निरोप पहायला गेलो तर, "प्रेत्त्यन्गेल्" (prettyangel) नामक आयडी कडून चार निरोप आलेले पाहीले. विषय हा मराठीतच "हि" असा दिलेला होता. निरोप उघडला तर खालील निरोप दिसला (संक्षिप्त रूपात देत आहे):

Hello
My name is Miss Esther Amadu,iam an africa girl,i read your profile today it was so good to me.... (Remeber the distance or colour does not matter but love matters alot in life)

cares for my future love

Esther

आता हा स्पॅम आहे हे कुणालाही समजेल. या निमित्ताने काही प्रश्न पडले आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेतः

  1. हा स्पॅम निरोप संगणकाने तयार केलेला आहे (ज्या पद्धतीने इमेलवर स्पॅम येतात त्या पद्धतीने) का कोणी ड्युप्लीकेट आयडी तयार करून मुद्दामून पाठवत आहे?
  2. संगणकाने तयार केलेला आयडी आणि मेसेज असला तर संस्थळाच्या सुरक्षेचा थोडाफार विचार करावा लागेल असे वाटते.
  3. मात्र संगणकाने हा आयडी तयार कसा केला ह्याचे कुतुहल नक्कीच आहे, कारण उपक्रमाचे सदस्यत्व घेताना "वापरायचे नाव" आणि "विरोप (इमेल) पत्ता" असे मराठीत लिहीले आहे, जे संगणकाला कसे वाचता आले. शिवाय व्यनि पाठवताना "हि" हे इंग्रजीत लिहायच्या ऐवजी मराठीत कसे लिहीले. (बहुदा "hi" असावे).
  4. काही सदस्यांच्या खरडवह्यांमध्ये देखील हा मेसेज दिसला. परत प्रश्न पडला की संगणकाला "खरडवही" कशी समजली असेल?
  5. असाच मेसेज इतर कुणाकुणाला आणि कसा आला आहे?

हे मी कुणावरही संशय व्यक्त करण्यासाठी म्हणून लिहीत नाही आहे, पण जे प्रश्न पडले त्या संदर्भात सर्वांचीच खात्री व्हावी म्हणून येथे देत आहे. तेंव्हा या चर्चेचा उपयोग व्यक्तीगत वादासाठी होणार नाही अशी आशा करतो... तसेच आशा करतो की सर्वांचे इमेल आयडीज् सुरक्षित आहेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

हाच

हाच निरोप मलाही आला आहे.
धागा उघडल्या बद्दल धन्यवाद. आशा आहे की या संरक्षण तृटीचे निराकरण करता येईल.
-निनाद

निरोप

मलाही दोनदा निरोप आला आहे. उपक्रमावर पुर्वीही असे स्पॅमबॉट्स आले होते. उपक्रम व्यवस्थापनाने हा आयडी प्रतिबंधीत करुन पुन्हा असा आयडी येणार नाही ह्यावर काही उपाययोजना करावी.

प्रिटीएंजल

हा स्पॅम निरोप संगणकाने तयार केलेला आहे (ज्या पद्धतीने इमेलवर स्पॅम येतात त्या पद्धतीने) का कोणी ड्युप्लीकेट आयडी तयार करून मुद्दामून पाठवत आहे?

मुद्दाम केले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, फक्त खरड लिहिण्याशिवाय अजून काही केले नाही ह्याचा अर्थ - तयार केलेल्या प्रणालीचे टेस्टिंग करायचा प्रयत्न देखील असू शकतो. अर्थात ह्या आयडीचे इतर तपशील संपादक मंडळाला कळतील व काही माहिती बाहेर येऊ शकेल.

संगणकाने तयार केलेला आयडी आणि मेसेज असला तर संस्थळाच्या सुरक्षेचा थोडाफार विचार करावा लागेल असे वाटते.

सहमत.

मात्र संगणकाने हा आयडी तयार कसा केला ह्याचे कुतुहल नक्कीच आहे, कारण उपक्रमाचे सदस्यत्व घेताना "वापरायचे नाव" आणि "विरोप (इमेल) पत्ता" असे मराठीत लिहीले आहे, जे संगणकाला कसे वाचता आले. शिवाय व्यनि पाठवताना "हि" हे इंग्रजीत लिहायच्या ऐवजी मराठीत कसे लिहीले. (बहुदा "hi" असावे).

असे करणे शक्य आहे असे वाटते, काहीही लिहिले तरी तिथे मराठीच उमटणार आहे..मूळ नाव prettyngel (एंजल) असे आहे असे दिसते. (जे तुम्ही सांगितले आहेच.)

काही सदस्यांच्या खरडवह्यांमध्ये देखील हा मेसेज दिसला. परत प्रश्न पडला की संगणकाला "खरडवही" कशी समजली असेल?

खरड असली तरी इनपुट दिले जाते अशा सर्व जागेवर प्रयत्न झाला असणार, खरड त्यामानाने "अधिक" असुरक्षित आहे ;)

असाच मेसेज इतर कुणाकुणाला आणि कसा आला आहे

होय मला आला आहे, , एकच आहे.

मला सुद्धा

एकदम चार वेळा (४ निरोप) आला आहे. त्यातला एक पाहून बाकीचे न पाहताच उडवून टाकले. आता या स्थळावर सुद्धा स्पॅमगार्ड लावावे लागणार असे दिसतें

मला हा अनुभव नाही.

उपक्रमवर मागे असे आयडी हजर सदस्यात दिसत होते. अशा सदस्यांकडून मला ना निरोप ना खरड त्यामुळे काळजीचे कारण नाही.

-दिलीप बिरुटे

...

हा स्पॅम निरोप संगणकाने तयार केलेला आहे (ज्या पद्धतीने इमेलवर स्पॅम येतात त्या पद्धतीने) का कोणी ड्युप्लीकेट आयडी तयार करून मुद्दामून पाठवत आहे?

खात्रीने सांगता येणार् नाही. पण नावावरुन तरी स्पॅमबॉट असावा असे वाटते आहे. (पुर्वी उपक्रमावर इंग्रजी सदस्य नाव घेता येत असे, आता येत नाही.)

कारण उपक्रमाचे सदस्यत्व घेताना "वापरायचे नाव" आणि "विरोप (इमेल) पत्ता" असे मराठीत लिहीले आहे, जे संगणकाला कसे वाचता आले.

प्रश्न मला कळला असेल तर, संगणकाला (म्हणजे स्क्रिप्टला) 'दर्शनी नामाची' गरज नसावी. स्किप्ट मध्ये हे अर्थातच युजर नेम, प्राइव्हेटमेसेज् असे काहीतरी असते. ते मिळणे अवघड नाही. तसेच खवचे-स्क्रॅपबुक शोधले असेल. मी तसा तज्ञ नाही पण फारसे अवघड नसावे असे वाटते.

-Nile

+१

स्किप्ट मध्ये हे अर्थातच युजर नेम, प्राइव्हेटमेसेज् असे काहीतरी असते. ते मिळणे अवघड नाही. तसेच खवचे-स्क्रॅपबुक शोधले असेल.

कोणत्याही ड्रुपल संस्थळाच्या यूआरएल्स अशाच असतात या अंदाजाने, एक लॉगिन बनवून त्याचा वापर करणारे स्क्रिप्ट सुरू करून देण्यात आले असावे.

स्किप्ट

>>>प्रश्न मला कळला असेल तर, संगणकाला (म्हणजे स्क्रिप्टला) 'दर्शनी नामाची' गरज नसावी. स्किप्ट मध्ये हे अर्थातच युजर नेम, प्राइव्हेटमेसेज् असे काहीतरी असते. ते मिळणे अवघड नाही. तसेच खवचे-स्क्रॅपबुक शोधले असेल. मी तसा तज्ञ नाही पण फारसे अवघड नसावे असे वाटते.

हेच होऊ नये म्हणून् मी profile_1. profile_2 अश्या प्रकारे खिडक्यांना नावे दिली आहेत् खालील दुव्या मध्ये त्याची माहिती मिळेल (ईमेज आहे)

http://www.mimarathi.net/files/yogayog.JPG

आता मला जरा गोंधळात पडायला होत आहे, कॅपचा क्रॉस करून (रिड करून) एखादा प्रोग्रॉम कसे आत घूसू शकेल ? टेक्निकली ते जर शक्य झाले तर् मग कॅपचा फेल झाला असे समजायला हवे, पण् तशी बोंबाबोंब अजुन कुठे दिसत नाही आहे.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

रिकामटेकडेपणा दिसतो

ह्याचे उत्तर बहुधा १० टक्क्यांच्या नियमाला वाकुल्या दाखविण्याऱ्या श्री. रिकामटेकडा ह्यांच्याकडे असावे :) असो. ह्या आफ्रिकन मुलीने तुम्हाला ३ टक्क्याने पैसे मागितले नाही ना?

हे मी कुणावरही संशय व्यक्त करण्यासाठी म्हणून लिहीत नाही आहे, पण जे प्रश्न पडले त्या संदर्भात सर्वांचीच खात्री व्हावी म्हणून येथे देत आहे. तेंव्हा या चर्चेचा उपयोग व्यक्तीगत वादासाठी होणार नाही अशी आशा करतो.

हाहाहाहाहा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नाही :)

मलाही दोनदा व्यनि आला.

नोंद

ह्या आफ्रिकन मुलीने तुम्हाला ३ टक्क्याने पैसे मागितले नाही ना?

हा प्रश्न मला विचारलेला असल्याने त्याचे उत्तर दिले होते. मात्र हा प्रतिसाद तसाच ठेवत माझे उत्तर काढण्यात आल्याने परत येथे नोंद म्हणून लिहीत आहे:

३% संदर्भातील माफीनाम्यासहीत इतर प्रतिसाद संपादीत केलेले दिसत आहेत. मात्र वरील प्रतिसाद हा इतर कुणाच्या प्रतिसादासंदर्भात नसून मला दिलेला असल्याने आणि तो संपादीत केला गेला नसल्याने, "नाईलाज को क्या इलाज," म्हणत उत्तर देत आहे:

येथे इतर संकेतस्थळांवर झालेल्या कधी काळच्या गोष्टींच्या संदर्भात टोमणे मारले गेल्याचे दिसत आहे...ज्याचा संदर्भ इथल्या अनेक सभासदांना कुत्सित ठरू शकणारा आहे. हे प्रगल्भता राखणार्‍या संकेतस्थळातील जबाबदार व्यक्तींना आणि त्यांच्यामुळे संस्थळाला शोभा देत नाही, अशी या संस्थळाचा एक सुरवातीपासूनचा आणि कायमचा हितचिंतक म्हणून नोंद करत आहे.

जर मूळ प्रतिसाद संपादीत केला तर हा प्रतिसाद देखील अवश्य संपादीत करावा. मात्र नाहीतर त्यातील व्यक्तीगत प्रश्नास दिलेले उत्तर मात्र एकांगीपणे संपादीत करू नये ही विनंती.

धन्यवाद.

या प्रतिसादाखालील इतर सर्व अनावश्यक प्रतिसाद संपादित केले आहेत याची नोंद घ्यावी.

१ व्यनि

१ व्यनि आला आहे, आणि विशेष म्हणजे त्या आयडीवर क्लिक केले तर ऍक्सेस डिनाईडचा एरर येतो. म्हणजे मी त्या आयडीचे प्रोफाईल वाचू शकत नाही??
का बुआ??

||वाछितो विजयी होईबा||

का बुआ बुआ?

विशेष म्हणजे त्या आयडीवर क्लिक केले तर ऍक्सेस डिनाईडचा एरर येतो. म्हणजे मी त्या आयडीचे प्रोफाईल वाचू शकत नाही??
का बुआ??

ऍक्सेस डिनाइड हा संदेश येणे साहजिकच आहे. सदस्यनाम प्रतिबंधित केल्यावर व्यक्तिरेखा वाचता येत नाही. कुठल्याही ड्रूपलस्थळावर प्रतिबंधित सदस्याची व्यक्तिरेखा बघण्याचा प्रयत्न करावा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कॅपचा?

उपक्रमाचे सभासदत्त्व घेताना कॅपचाचा वापर होतो का? असा वापर झाल्यास स्पॅमर्स येण्याची शक्यता कमी होईल.
मलाही अशी खरड आली आहे. अर्थात त्याकडे दुर्लक्ष केलं.

हे

हे .. आणि प्रत्येक खरड पाठवताना रिकॅपचा वापतरावा.
म्हणजे ई-पुस्तक पण तयार होतील आणि स्पॅम चा प्रश्न पण सुटेल

:-)

मलाही तीन निरोप आणि एक खरड आहे. ज्याप्रमाणे निरोप आणि खरडी पाठवल्या आहेत त्यावरून एखादा बॉट कार्यरत असावा असे वाटत नाही. पुढे पैशांची मागणी आली असती असे वाटते.

असो. आयडी उडवला ते बरे झाले.

मला ४ आले होते...

मला असले ४ निरोप आले होते...

मला आठ व्य नि आले होते.

--मनोबा

व्वा! मनोबा

व्वा! मनोबा, तुम्ही जाम फेमस दिसता. ;-)

लोकप्रियतेचा इंडेक्स म्हणून निरोपांची संख्या गणता येईल का? सध्या मनोबा आघाडीवर आहेत. आहे का कुणी त्यांचा रेकॉर्ड ब्रेक करणारे?

ह. घ्या सर्वांनी

प्रत्यक्ष प्रमाण कुठाय?

आता हा स्पॅम आहे हे कुणालाही समजेल.

चर्चाप्रवर्तकांनी किंवा प्रतिसाद देणार्‍यांपैकी कोणीही, प्रत्यक्ष आफ्रिकेत जाऊन तिच्या प्रामाणिकपणाची प्रचिती घेतली आहे काय? किमान, त्या व्यनि/खरडीला/ईमेल पत्त्याला प्रतिसाद देण्याची तसदीतरी कोणी घेतली आहे काय? त्याशिवायच त्याला स्पॅम ठरविणे तुमच्या विज्ञानवादात बसते काय?
त्या संपूर्ण व्यनिमध्ये पैशांचा काहीही उल्लेख नव्हता. तरीही, उगीचच आर्थिक अफरातफरीचे आरोप करून सर्वजण चर्चा भरकटवीत आहेत.
आपण 'आफ्रिकनांवर विश्वास ठेवत नाही' अशी भूमिका publicly maintain करणे उपक्रम्यांना आवश्यक असते असे मी ऐकून आहे.
"My name is Miss Esther Amadu,iam an africa girl,i read your profile today it was so good to me." या काव्यवृत्त मांडणीतील गेयताही सर्वांनी केवळ पूर्वग्रहामुळे नाकारली आहे.

+१

प्रामाणिकपणाची प्रचिती घेण्याचा आदेश लाल विद्यापीठातून आला नसावा...ह्या तथाकथित विज्ञानप्रेमींचा हेतुच मूळात इथल्या संस्कृतीचे खच्चीकरण करण्याचा आहे हे पुन्हा एकदा दिसुन आले.

महत्त्वाचा आधुनिकोत्तर प्रतिसाद

चर्चाप्रवर्तकांनी किंवा प्रतिसाद देणार्‍यांपैकी कोणीही, प्रत्यक्ष आफ्रिकेत जाऊन तिच्या प्रामाणिकपणाची प्रचिती घेतली आहे काय? किमान, त्या व्यनि/खरडीला/ईमेल पत्त्याला प्रतिसाद देण्याची तसदीतरी कोणी घेतली आहे काय? त्याशिवायच त्याला स्पॅम ठरविणे तुमच्या विज्ञानवादात बसते काय?
त्या संपूर्ण व्यनिमध्ये पैशांचा काहीही उल्लेख नव्हता. तरीही, उगीचच आर्थिक अफरातफरीचे आरोप करून सर्वजण चर्चा भरकटवीत आहेत.
आपण 'आफ्रिकनांवर विश्वास ठेवत नाही' अशी भूमिका publicly maintain करणे उपक्रम्यांना आवश्यक असते असे मी ऐकून आहे.
"My name is Miss Esther Amadu,iam an africa girl,i read your profile today it was so good to me." या काव्यवृत्त मांडणीतील गेयताही सर्वांनी केवळ पूर्वग्रहामुळे नाकारली आहे.

तुमच्या प्रतिसादातली गंमत आणि विखंडितपणा सामान्य वाचकांच्या लक्षात आला असण्याची शक्यता जरा कमीच आहे.

नक्की काय घडतं आहे ते स्पष्ट असेल, प्रतिसादांच्या विचार-वर्तनावरून त्यांचा मूल्यात्मक आलेख सुस्पष्टतेनं मांडता येत असेल तर ते प्रतिसादवाङमय आधुनिकोत्तर नाही असं खुशाल समजावं. आणि म्हणूनच तुमचा हा प्रतिसाद प्रतिसादवाङ्मयातला एक मह्त्त्वाचा असा मजकूर आहे. (महत्त्वाचा हा शब्द घातल्याशिवाय लोकांना महत्त्व कळत नाही. महत्त्वाचा कवी, लेखक, कादंबरीकार वगैरे वगैरे.)

थोडा खोलात विचार केला तर खऱ्या अर्थाने ईश आपटे ह्यांचे ह्या संकेतस्थळावरील लेखन आणि प्रतिसाद हे खऱ्या अर्थाने आधुनिकोत्तर म्हणता येईल. (ह्याशिवाय दुसरे कँडिडेट असल्यास सांगावे.) कारण त्यांच्या लेखनात अर्थांचे अनेक आयाम एकाच सत्यापेक्षा अनेक सत्यं अस्तित्वात असल्याचा दावा करतात. त्यामुळे अनेक अर्थ निघणं आणि त्यामुळे नक्की काय म्हणायचं आहे याविषयी संभ्रम निर्माण होणं वगैरे घडतं. जर सत्य सापेक्ष आहे आणि त्यामुळे अर्थ सापेक्ष असेल तर everything is a text and the text is everything या तर्काने एकुणात मानवजातीनं प्रसवलेलं सगळं काही सापेक्षच आहे असं त्यामुळे होऊ लागतं. Everything is a text and the text is everything हे वचन everything is Rajani and Rajni is everything वर आधारित आहे हे लक्षात घेतले तर आधुनिकोत्तरवाद हा मुळात रजनीवादच आहे हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट होते. आणि रजनीवादात काहीच अवांतर नाही हे जाणकारांनी आधीच सांगितलेले आहे.

कानोकानी:
ईश ह्यांचे इतिहासावरील लेखन वाचून खुद्द इतिहास इश्श करतो असे कानावर आले आहे. शेवटी तेही एका प्रकारे थोर रजनीवादीच आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सोकल लफडे

विखंडित, बहुपेडी, परिप्रेक्ष्यातून (तून या प्रत्ययाशिवाय परिप्रेक्ष्य हा शब्द वापरणे फाऊल धरू), मूल्यात्मक आलेख, सापेक्ष, आयाम , इ. शब्द यदृच्छेच्या डबड्यात हलवून त्यांपासून वाक्ये बनविणारे रामोन ल्युल स्क्रिप्ट बनविता येईल काय?

हसून लोळण

हसून लोळण

शंका

तुमचा प्रतिसाद मला कळला म्हणजे हे प्रमाण आहे का अनुमान? बरं मला कळला म्हणजे मज असामान्य योगबलाची सिद्धी प्राप्त आहे अशी प्रचिती आली असे अनुमान् काढु शकतो काय?
-Nile

'महत्वाची' शंका

या प्रश्नांची उत्तरे तुम्ही विज्ञानवाद्यांनीच शोधणे अपेक्षित आहे.

;-)

तुम्ही विज्ञानवाद्यांनीच

हे प्रत्यक्ष प्रमाण की अनुमान? ;-)

-Nile

ढ प्रश्न

नायजेरियन ४१९ प्रकारच्या संदेशांतून काय सांगितले जाते ते तूर्तास बाजूला ठेवून त्यातील काव्याचा आस्वाद - अत्यंत कमी शब्दांचा वापर, तोही काव्यातील प्रास-अनुप्रास आदीचे सर्व संकेत पाळून अर्थपुर्ण रचना करणे, स्क्रिप्ट कष्टपुर्वक लिहिण्य़ाची कला, त्याला लागणारी एकतानता - घ्यायला काय हरकत आहे?
'माय नेम इज खान' पासून 'माय नेम इज शीला' पर्यंत आणि 'माय नेम इज मॅक्सिमस डेसिमस मेरिडिअस' पासून 'माय नेम इज लायमन झर्गा' पर्यंत विविध चालींमध्ये आणि भाषांमध्ये म्हणता येणार्‍या शब्दांना My name is Miss Esther Amadu या शब्दांनी ज्यू आणि आफ्रिकन अशा दोन संस्कृतींच्या सरमिसळीत बसविण्यातील काव्यप्रतिभाशक्तीच्या जागृत आविष्काराची तुलना केवळ 'माय नेम इज बाँड, नाम तो सुना होगा' अशा विधानाशीच करता येईल.

निरीक्षण

निरीक्षणावरुन your name is Miss Esther Amadu असे वाटू लागले आहे, पण योगबल कमी पडत्येय. ;-)

-Nile

खुलासा

तो संदेश किमान २३ महिन्यांपूर्वीपासून जालावर असल्याचा पुरावा येथे असूनही तुम्हाला त्याच्या प्राचीनतेविषयी शंका का वाटावी?

दुसरे कँडिडेट

थोडा खोलात विचार केला तर खऱ्या अर्थाने ईश आपटे ह्यांचे ह्या संकेतस्थळावरील लेखन आणि प्रतिसाद हे खऱ्या अर्थाने आधुनिकोत्तर म्हणता येईल. (ह्याशिवाय दुसरे कँडिडेट असल्यास सांगावे.)

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

सुसंस्कृत समाजाला लागलेली कीड

आज मी बर्‍याच दिवसांनी लॉगइन केले. "अतीप्रिय" या आय.डी. कडून दोन व्यक्तिगत निरोप आले आहेत. त्यातील भाषा व शिव्या इथे कॉपी - पेस्ट केल्या तर सार्वजनिक नियमांचा भंग केल्यासारखे होईल. ह्या व्यक्तिचे युजर-पेज व त्याने इतर ठिकाणी केलेले मतप्रदर्शन संपादित झाल्याचे दिसते आहे. "काढून टाका" यावर टिचकी मारून व्य.नि. काढून टाकता येईल. समाजाला लागलेली कीड काढून टाकण्याची लिंक कुठे उपलब्ध आहे का?

खेद

झाल्या प्रकाराबद्दल खेद वाटला. मराठी सायटींवर जे नानाविध प्रकार चालतात आणि यासाठी लोक जी मेहनत आणि वेळ देतात यामागे हेतू काय असा प्रश्न बरेचदा पडतो. असे प्रकार लोकसभेत केले तर किमान सत्ता, पैसा आणि इतर गोष्टी मिळतात. इथे ती ही शक्यता नाही. बहुधा घर, ऑफीस आणि इतर ठिकाणी होणार्‍या फ्रस्ट्रेशनचा निचरा या मार्गाने होत असावा. किंवा काही बाबतीत न्युनगंडावर मात करण्याचा हा एक मार्ग असावा. शिवाय हे प्रकार कालेजात जाणार्‍या टारगट मुलांनी केले तर वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करता येते. पण बरेचदा असे प्रकार तिशी-चाळीशीत असणार्‍यांकडून झालेले दिसतात.
--
तुम्हाला असे निरोप यावेत याचे आश्चर्य वाटले. एकतर तुम्ही इथे फारच कमी दिसता आणि चर्चांमध्येही तुमचे प्रतिसाद माहितीपूर्ण असतात.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

अतीप्रिय ब्यान झालेला आहे

ह्या व्यक्तिचे युजर-पेज व त्याने इतर ठिकाणी केलेले मतप्रदर्शन संपादित झाल्याचे दिसते आहे.

ह्याचा अर्थ अतीप्रिय ह्या आयडीला ब्यान झालेला आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

निरोप पाठवण्याची परवानगी

माझे सदस्यत्व >> संपादन यात खालील एक पर्याय दिसत आहे.

व्यक्तिगत निरोप पाठवण्याची परवानगी
तुम्हाला व्यक्तिगत निरोप पाठवण्याची इतर सदस्यांना परवानगी देण्यासाठी या चौकटीत टिचकी मारा.

भविष्यात "असे" निरोप येऊ नयेत म्हणून मी याचा उपयोग करून व्यक्तिगत निरोपाची सुविधा रद्द केली.
(मला नुकताच हा शोध लागला!)

 
^ वर