गुगल ऑटोपायलट

जगातील सगळ्यात लाडके सर्च इंजीन गुगलने आजपर्यंत अनेक सोयी देऊन वापरकर्त्यांचा चकित केले आहे. गुगल मेल, टॉक, ऑफिस, भाषांतर, नकाशे अश्या अनेक सुविधा मोफत उपलब्ध केल्या आहेत. आता ह्यात भर म्हणजे गुगल ऑटोपायलटची. ज्यांना अनेक इमेल येतात आणि प्रतिसाद देणे महत्वाचे असते अशा बिझी लोकांसाठी ही सुविधा म्हणजे वरदान आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यावर वापरकर्ते आपले अकाउंट ऑटोपायलटवर ठेवून निवांत राहू शकतात. अधिक माहिती साठी हे पान पाहा. इथे गुगलने काही उदाहरणे नमुन्यासाठी दिली आहेत.

उपक्रमींना काय वाटते ह्या नविन सुविधे विषयी हे जाणून घ्यायला आवडेल! (सर्वांना १ एप्रिलच्या शुभेच्छा! हा मजकूर वाचून व्य नि ने पाठवणार्‍यांना खव मधून शाब्बासकी मिळेल)

लेखनविषय: दुवे:

Comments

जीमेल मोशन

कसे आहे?

तुम्ही जीमेल मोशन वापरून पाहिले का? असेल तर अनुभव कसा होता?
इतर कोणी वापरले असल्यास अनुभव सांगावा.

४१९ ईटर

Prince Joe Eboh - http://www.419eater.com/html/joe_eboh.htm
फोटोसकट

हरामखोर लेकाचे...

या जीमेलवाल्यांनी माझं पेटंट चोरलं! नुकतंच मी संस्थळांवरचे प्रतिसाद ऑटोमेट करण्याच्या सॉफ्टवेअरसाठी पेटंट टाकलं होतं. त्यात उपक्रमावर येणारे श्रद्धावंत - विज्ञानवादींचे संवाद ऑटोपायलटवर टाकण्याची सोयही ठेवली होती. (कारण उपक्रमावर दुसऱ्या कुठच्या मोड्यूलची गरजच नाही!) आधीच्या प्रतिसादांच्या शब्दांचं पृथक्करण करून हे करणं अतिशय सोपं आहे. वेगवेगळ्या आयडींची मी मॉडेलं तयार केली होती. नुसता एक लेख टाकला की त्यावर धडाधड प्रतिसाद, उपप्रतिसाद, तिरक्या तिरक्या जाणाऱ्या प्रेमाच्या गप्पा... सगळं सगळं घातलं होतं त्यात! सगळी मेहेनत वाया गेली!

कोट्यवधींनी सदस्यसंख्या असलेल्या या संस्थळांकडे गूगलच्या धनपिपासूंचं लक्ष गेलं नाही तरच आश्चर्य. हाय रे दैवा. मी एकटा कुठे त्या धनदांडग्यांपुढे लढा देणार?
तुम्हालाही एप्रिल फूल मुबारक
राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

असो

तुम्हाला लवकरच खव मधून शाब्बासकी देऊ ;)

हा हा

>>>>नुकतंच मी संस्थळांवरचे प्रतिसाद ऑटोमेट करण्याच्या सॉफ्टवेअरसाठी पेटंट टाकलं होतं.

मराठी संस्थळावरील प्रतिसाद ऑटोमेट करण्याचे सॉफ्टवेअरचे पेटंट मिळाले नाही तरी नाराज होऊ नका. ट्रायल व्हर्जन आणि त्यावरील विदा पाहिला असता असे लक्षात आले की, श्रद्धावंतांच्या बाजूंनी प्रोग्रॅम अजून डेव्हलप करावा लागेल. विज्ञानवाद्यांच्या बाजूने विसंवादी असले तरी भरपूर असे प्रतिसाद पटापट पडतात.

मराठी संस्थळावरील प्रतिसाद ऑटोमेट करण्याचे सॉफ्टवेअर अधिक विकसित करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा....! :)

-दिलीप बिरुटे

भा.पो., पण -

गूगल अस करणार नाही (असा आमचा विश्वास आहे).
एक कल्पना दुस्र्याला सुचने शक्य आहे. जो प्रथम इम्प्लीमेंट करतो (अथवा पेटंट फाइल करून काम सुरू करतो) तोच खरा जनक.

तुमचं नाव झालं नाही ह्याची जरूर खंत आहे पण तुमचा प्रयत्न चालू राहू देत , अनेक शुभेच्छा !

 
^ वर