एच पी च्या थर्डक्लास सेवेपासुन जीव कसा वाचवावा?

सुमारे महिना भरापूर्वी पुण्यातल्या टिळक रस्त्यावरील बाबा लॅपटॉप वाल्याकडुन H P चा ल्यापट्वाप घेतला. त्यासोबत windows7 home basic मिळालं. मात्र त्यावेळेस त्याची दुकान बंद करायची वेळ असल्यामुळं आणि नंतर मीही व्यस्त असल्यामुळं, काही दुय्यम(ज्यांच्या विना काम चालु शकतं अशा) गोष्टी नंतर करायच्या ठरल्या.
काल बाबावाल्याकडे गेलो. आणि windows ची recovery disc (installable) जी बनवायची राहिली होती, ती करुन दे म्हणलं. नेमकं ते करताना प्रॉब्लेम आला. "रिकव्हरी डिस्क आधीच बनलेली आहे" असा काहिसा तो संदेश होता. वस्तुस्थिती तशी नव्हती. मी कधीही अशी बन्वलेली नाही. बाबा वाला म्हटला की HP चं मुख्य सेवा केंद्र पौड रस्त्याला सुझुकी शोरूमच्यावर आहे. तिथं संपर्क करुन त्यांना हा प्रॉब्लेम सांगितल्यास ते नवीन डिस्क उपलब्ध करुन देतील.

ताबडतोब तिथे गेलो. त्यांनी नम्रपणे सांगितलं की ग्राहकांच्या "सोयीसाठी" ह्या सर्व सेवा त्यांच्या कॉल सेंटर वरील ग्राहक सेवा केंद्राला(टेलेफोनिक कस्टमर केअर) ला सांगितल्यास, घरपोच डिस्क पोचती केल्या जाइल.

काल सतत घंटाभर प्रयत्न करत होतो. पण बोंब. "सर्व प्रतिनिधी व्यस्त आहेत" ह्या आशराष्ट्रभाषाआंग्लभाषेतुन येत होता.

आज पुन्हा ग्राहक सेवा केंद्राला कॉल लावला तेव्हा मात्र चक्क "आम्ही केवळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ ह्या वेळेतच सेवा देतो" असा संदेश आंग्ल भाषेत येउन चक्क फोन कट होउ लागला. मला कळेना कुठल्या देशातले ६ ते. घड्याळ पाहिलं तर चक्क दुपारचे ३ वाजलेले. ६ वाजायला भरपुर अवकाश.

पुन्हा पौड रस्त्यावर जाउन हुज्जत घातली. त्यांचं म्हणणं एकचः- "आम्ही काहीही करण्यास असमर्थ आहोत. तुमच्या तक्रारे फोन करुन कॉल सेंटर लाच कळवा." डोकं तापलं. त्याला म्हणलं की बाबा रे, तुझी ती फोन वाली मंडळी ६ वाजुन गेलेत असं म्हणताहेत. तर त्याचं उत्तर तयार. "शिश्टिम बिघडली असेल. मी काहिही करु शकत नाही. पुन्हा सोमवारी संपर्क करुन बघा."

दळभद्री तिच्याय्ला.

तर माझ्या आंतरजालिय बंधु भगिनींनो कृपया तुम्ही ह्या नाडाल्या गेलेल्या , दीनवाण्या, केविलवाण्या ग्राहकाची काही मदत करु शकता काय?
१. ग्राहक तक्रार मंचात कसे जाउ?(consumer forum)
2.तक्रारीपूर्वी कुठल्या फॉर्मॅलिटीज् आहेत?
३. लेखी अर्ज मी HP सर्विस सेंटरला देउ केला, त्यांनी तोही घेण्यास नकार दिलाय.
सध्या माझ्या कडे भरभक्कम पावती आहे, मशिन घेउन नुकताच महिना झालाय.

मी काय काय करु शकतो किंवा करायला हवं , उपलब्ध पर्याय कुठले ते कृपया सांगा.

आपलाच
वैतागलेला मनोबा.

लेखनविषय: दुवे:

Comments

राग आवरा

भरपूर रागवून हे लिहिले गेले आहे. राग येणे साहजिक असले तरी इथे व्यक्त करणे चुकीचे.

ग्राहक न्यायालयात याविरुद्ध तक्रार करता येते. कुठल्याही वकिलाशिवाय.
माझ्या एका मित्राला मोबाईल बिल भरले असून देखील वारंवार लोक त्रास द्यायला यायचे. दरवेळेला रिसीट बघून परत जायचे. एकदा तर तो हॉस्पिटल मधे असताना आले होते.
याचा राग येऊन त्या त्रासाबद्दल तो मोबाईल कंपनीच्या विरोधात ग्राहक न्यायालयात गेला. नाहक त्रास दिल्याबद्दल ५००० रु. मागितले.
तक्रार करताना महत्वाची कागदपत्रे हातात लागतात. जसे रिसीट, वॉरंटी कार्ड वगैरे.
तक्रार दुकानदार आणि कंपनी दोघांविरुद्धही करता येते.
तक्रार केल्यावर फक्त ३ सुनावणीत हा अर्ज निकाली काढला जाण्याची तरतूद आहे. तुम्हाला वा तुमच्या प्रतिनिधीला या सुनावण्या दरम्यान जावे लागते. माझ्या मित्राला बहुतेक वेळी उगाचच जाऊन यावे लागले. (विरुद्ध पक्षाने चालढकल केली. ) तिसर्‍या सुनावणीनंतर माझ्या मित्राच्या बाजूने निकाल लागला. पण सगळ्याच केसेस अशा सुटत नाही. तिनही सुनावणी दरम्यान त्याला सुटी घेऊन जावे लागले. (ते नुकसान तुम्ही मागू शकता पण मंजूर होईल की नाही सांगता येत नाही.) अजून त्याला पैसे मिळाले की नाही माहिती नाही.

बराचश्या मोठ्या कंपन्या याप्रकाराला घाबरतात. त्यामुळे पहिल्या नोटीसीत समेट होऊ शकतो. दुकानदाराला प्रतिवादी केले तर तोही घाबरतो कारण वकिल ताफा तो बाळगू शकत नाही.

तुमची तक्रार स्वीकारत नसेल तर गुमच्यापाशी दोन मार्ग आहेत. एकीत तक्रार कोरियर रजिस्टर्ड पोस्टाने पाठवायची. ग्राहक कायद्याचे उल्लंघन नमूद करायचे. तक्रार पूर्ण न झाल्यास ग्राहक कोर्टात जाऊ असे सांगायचे.
हेच पत्र इमेल वा अन्य मार्गाने सर्वांना पाठवायचे. (अगदी एचपीच्या डायरेक्टरला देखील.)
दुसरा मार्ग म्हणजे साक्षिदारासमक्ष हे पत्र द्यायचे. आणि तिथेच हे पत्र न घेतल्याचा पुरावा म्हणून त्याची सही घ्यायची. दुकानात आवाज चढवून बोलायचे. (हे सगळ्यांना जमते असे नाही.) पण काम बरेचदा होते.

प्रमोद

माहिती बद्दल् आभार्...पण....

ग्राहक तक्रार मंचाच्या कार्यालयात् जाउन् आता थेट् तक्रार करु की....
आधी विरोपानं तक्रार करु?
(सोबत साक्षिदार् नेणं वगैरे तर् आता सोमवारीच करावं लागेल. अहो अत्यंत् महत्वाची कामं तुंबली आहेत त्या डिस्क शिवाय. खुपच महत्वाचा वेळ वाया जातोय आणि उगिचच् आर्थिक भुर्दंड झेलावा लागतोय म्हणुन त्रस्त आहे. फारच खाजगी असल्यामुळं सांगताही येत नाहिये. )
सध्या त्याशिवायही काय काय् करता येइल हे बघतोच आहे, पण अशी वागणुक मिळाल्यामुळं परेशान् मात्र झालो.
मी माझ्या क्लायंटला असं वागवलं, तर् माझ्या आस्थापनात क्षणभरही मला कामावर ठेवलं जाणार नाही. मी माझ्या ग्राहकाला जशी सेवा देतो, तशीच सेवा मला ग्राहक म्हणुन मार्कॅटमध्ये मिळावी अशी अपेक्षा आहे. बहुदा तशी/तितकी ठेउ नये असं वाटतय.

--मनोबा

तक्रार

तक्रारीपूर्वी नोडीस दिलेली बरी असते. त्याचा तक्रारीत फायदा होतो. आम्ही प्रयत्न केले याचा तो पुरावा असतो.
विरोपाने तक्रार ताबडतोब करा.
ग्राहक न्यायालयात केस दाखल करावी लागते. हा दुवा बघु शकता.
प्रमोद

अरेरे!

मन यांना झालेला त्रास बघून वाईट वाटले. त्यांनी संगणक घेण्याआधी हा विषय चर्चेस आणला असता तर मी त्यांना स्वानुभवाने सल्ला दिला असता की डेल, कॉम्पॅक व एचपी यांचे लॅपटॉप चित्रात सुद्धा बघू नयेत. ब्रॅन्डच्या नावाखाली जास्त पैसे उकळणे, सर्व्हिस न देणे व ग्राहक तक्रार घेऊन आला की त्याला टोलवाटोलवी करून उत्तरे देणे याबाबत या कंपन्यांचा कोणीही हात धरू शकणार नाही. काही वर्षांपूर्वी मी डेल चा असाच एक संगणक घेतला होता. त्याची क्रॅश डिस्क मला कधीच मिळाली नाही. एका वर्षापूर्वी सिस्टीम फेल झाल्यावर मला आता नवीन ओएस घ्या असा सल्ला त्यांनी दिला होता. सुदैवाने माझ्या एका मित्राकडे ओएस ची मूळ प्रत असल्याने माझा संगणक दुरूस्त झाला.
अर्थात आता तो पूर्ण मोडला असल्याने भंगारात टाकण्याच्या मी मार्गावर आहे. अमेरिकेत असे संगणक एक सहस्त्र डॉलरच्या आसापास मिळत असल्याने तिकडच्या मंडळींना 3/4 वर्षांनी ते भंगारात टाकणे जमते. भारतात तीस किंवा पस्तीस सहस्त्र रूपयाचा संगणक दर 3/4 वर्षांनी भंगारात टाकणे शक्य नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सहमत, तरीही...

"सर्व प्रतिनिधी व्यस्त आहेत" ह्या आशराष्ट्रभाषाआंग्लभाषेतुन येत होता.

एचपीच्या शाईसोबतच्या बक्षिसांबाबत मला तक्रार करायची होती तेव्हाही मलाही त्यांच्या कॉल सेंटरकडून असाच अनुभव आला.
--
तरीही, मुळात, रिकवरी डिस्क शिवाय काम चालविता येते. किंबहुना, ते एकचएक सी ड्राईव देतात ते मला आवडत नाही. त्यांनी दिलेली सिस्टिम पूर्ण फॉर्मॅट करून हवे तसे पार्टिशन टेबल बनवावे आणि बॅकप स्वतःच इतर कोणत्यातरी पार्टिशनवर ठेवावा. संगणकाने कधीही काही त्रास दिला तर ओएसला फॉर्मॅट करावे किंवा ओएसची इमेजही (एखाद्या सॉफ्टवेअरने घेतलेली) बॅकपमध्येच असेल तर तिला पूर्ववत करावे.

शक्यतो

शक्यतो बाबा लॅपटॉप वाला किंवा तत्स्म दुकानातुन मशीन घेवुच नये, नंतर वात आणतात.

रिकव्हरी डिस्क् कशाला?

हवी आहे ते समजले तर त्याप्रमाणे मदत करुन तुमची एक अडचण दूर् करता येउ शकेल. बर्याच वेळेला नविन लॅपटॉप मधेच् एक् छुपे पार्टीशन असते त्यावरुन ओ एस् परत टाकता येते. F12 or F8 अशा कळा वापरुन ह्या पार्टीशन मधे जाता येते.
तसेच अजून् वॉरंटी असेल तर् त्याचाही उपयोग होउ शकेल.

सर्वांचे आभार्.

तूर्तास जो विदा हवा होता, तो महत् प्रयासाने माझ्या मूळ गावकडुन इथे पुण्यात मागवला आहे. काम् होण्याच्या मार्गावर् आहे.
@प्रमोद :- राग आवरतोय, पण भलताच परेशान झालो होतो.(कारण अशी सर्विस् बर्‍यापैकी अनपेक्षित होती.)

@चंद्रशेखर् :- डेल्, एच् पी, कॉम्पॅक नको म्हणताय, पण मग इतर शिल्लक राहतातच कुठले? फक्त सोनी , लिनोवो वगैरेच उरतील ना.
आणि एच् पी ची सेवा केंद्रे जास्त आहेत हेही एक कारण होतं एच् पी घेण्यामध्ये.

@रीटे :- तशी इमेज मिळवलिये हो आता. पण अधिकृत कॉपी हवी आहे.

@आनंद :- ह्यात बाबा वाल्याचा दोष नसावा असं वाटतय.
@वाचक :- हो. वॉरंटी आहे. म्हणुन तर हक्काची , मूळ् विंडोज् ची प्रत मागतोय.(जी आधीच मिळणं आवश्यक होतं, आणि मी भाबडेपणामुळं उशीर केला.)

--मनोबा

शंका

तुम्हाला रिकवरी डिस्क बनवून हवी होती की हक्काची, मूळ, विंडोज ची प्रत?
मूळ प्रत खोक्यातच नव्हती काय?
मुळात, खोके दुकानात उघडावेच कशाला?
'हक्काची प्रत' असे काही आवश्यक नसते. (शक्यतो त्याच मॉडेलच्या) इतर कोणत्याही लॅपटॉपची डिस्क तुमच्या हक्काच्या सिरीयल नंबर सोबत (की हाही मिळाला नाही?) वापरता येईल. त्या डिस्कची कॉपी करून तिच्यावर तुमच्या हक्काचा सिरीयल नंबर लिहिलात की तुमच्या हक्काची, मूळ, विंडोज ची प्रत तयार करता येईल असे वाटते.

+१

हक्काच्या सिरीयल नंबर सोबत (की हाही मिळाला नाही?)

रीकव्हरीची गरज् पडू नये. लॅपटॉपच्या खाली विंडोजचा की असेलच. जमल्यास तुमच्या मॉडेलची विंडोज ओईएम इन्स्टॉल करुन घ्या. अन्यथा कुठलीही विंडोज ओईएम करुन् मॅन्युअल ड्राईव्हर्स् इन्स्टॉल करुन् काम् भागावे.

(माझ्या माहितीनुसार, सद्ध्या लॅपटॉपवरच रिकव्हरी ड्राईव्ह असतो, त्यातच रीकव्हरी डिस्क बनवण्याचा ऑप्शनही असतो. असे नाही आहे का?)

-Nile

लॅपटॉप

लॅपटॉप मधले खरे दादा लोक जपानी आहेत. टोशिबा, फुजित्सू यापैकी कोणताही निवडावा. नवीन तैवानी ब्रॅ न्ड एसुस चा रिपोर्ट सुद्धा चांगला आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

लॅपटॉप

लॅपटॉप मधले खरे दादा लोक जपानी आहेत. टोशिबा, फुजित्सू यापैकी कोणताही निवडावा. नवीन तैवानी ब्रॅ न्ड एसुस चा रिपोर्ट सुद्धा चांगला आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

टेंशन नका घेऊ

सोमवार ते शूक्रवार या दरम्यान केव्हांही त्यांच्या ऑफीशीअल वेळेत कॉल सेंटरला फोन लावा, काम् होइलच. नाही झाले तर मग् त्यांच्या वेबसाइटवरून इमेल शोधा व तेथे तक्रार नोंदवा साधारण् अधीक्रूत रीस्पॉन्स टाइम हा २४ तासांचा असतो, जर ऊत्तर आले नाही तर अजून् एक इमेल. तरीही फरक पडला नाही तर सेंट इमेल्च्या प्रींटाऊट्स मारा व कोर्ट गाठा आणी तेथे मनस्ताप व व्यावसायीक् नूकसान सेवेमधे दीरंगाइ वगैरे गोश्टीचा खटला बीन्धास्त दाखल करा अरामात जींकाल. पण मला वाटत नाही ती वेळ येइल कारण वीकेंड असल्याने तूम्हाला असा अनूभव आला असावा. सोमवारी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करून बघा.

राग जिवंत ठेवा

माझ्याकडेही एचपीचा लॅपटॉप आहे. मला असा त्रास झालेला नसला तरी सेवादात्यांच्या मग्रूरीला आळा घातलाच पाहिजे या मताचा मी आहे. तेंव्हा आपला प्रश्न सुटला की झाले, असा दृष्टीकोन कृपया ठेवू नका. काळ सोकावतो. राग जिवंत ठेवा. समाजातले बरेचसे बदल रागावलेल्या लोकांनी घडवून आणले आहेत.

सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

आऊटडेटेड

ह्या मोठ्या संगणक कंपन्या अमेरीका व इतर विकसीत देशात वितरीत केलेले संगणक ६ ते ८ महिन्याने तेथे आऊटडेटेड झाले की, भारतात लाँच करतात. तेथे ६०० ते १८०० डॉलरला मिळणारे मॉडेल पुन्हा तेव्हढ्याच किंमतीला येथे लाँच होते पण त्याच वेळी त्याची अमेरीकेतील किंमत ४०% कमी झालेली असते.

कॉल सेंटर

>>आज पुन्हा ग्राहक सेवा केंद्राला कॉल लावला तेव्हा मात्र चक्क "आम्ही केवळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ ह्या वेळेतच सेवा देतो"

बहुदा तुम्ही जो नंबर फिरवला त्यावर सोमवार ते शुक्रवार सेवा उपलब्ध असणार. सोमवारी पुन्हा प्रयत्न करा, कदाचित तुमचे काम होउन जाईल. भारतातील अफाट कार्यक्षमतेच्या ऐतीहासीक पार्श्वभूमीवर केवळ शुक्रवार ते शनिवार या कालावधीत प्रकरण पार न्यायालयात नेणे तुम्हाला पटते आहे का?

एच पी, डेल इ. कंपन्यांची नेक्स्ट बिझनेस डे ऑनसाईट / ३६५ दिवस प्रिमीयम फोन सेवा असा पर्याय उपलब्ध असल्यास त्याचा फायदा घ्या. हो पैसे जास्त लागू शकतात.

सहमत

सहमत.

मी स्वतः डेल कंपनीच्या ह्या असल्या प्रकारातून गेलो आहे. ३ वेळा फोन वर ४५ मिनिटे फक्त होल्ड वर होतो. असे ७ दिवस गेले, शेवटी एक भला माणूस फोन वर सापडला त्याने बरीच मदत केली व माझा त्रास दूर झाला. (तपशिल दिला तर तो वेगळा धागा होइल, म्हणून एव्हढेच).

मात्र त्यावेळेस त्याची दुकान बंद करायची वेळ असल्यामुळं आणि नंतर मीही व्यस्त असल्यामुळं, काही दुय्यम(ज्यांच्या विना काम चालु शकतं अशा) गोष्टी नंतर करायच्या ठरल्या

हे सर्वात वाईट, पुण्यात असे फक्त "जीव जाणार" असेल तरच करावे, अन्यथा सख्खा भाऊ जरी असला, आणि "नंतर करून देतो" हे वाक्य एकाल्याक्षणी बाहेर पडावे. तरी डीसीसी नामक संस्थेमध्ये ह्यापेक्षा बरी सेवा मिळते हा माझा अनुभव आहे, बाकी पुण्यात "सेवा" मिळणे म्हणजे "सेवा आत्ता नाहीये, कधी येईल माहित नाही" असे काहीतरी वाटते.

आता तुमच्या प्रश्नांबद्दल -

मी काय काय करु शकतो किंवा करायला हवं , उपलब्ध पर्याय कुठले ते कृपया सांगा.
१. धीर धरा आणि सतत पाठपुरावा करा, तुमच्या पेशन्स ची परीक्षा झाली पाहिजे. पण कन्झ्युमर कोर्ट वगैरे मध्ये वेळ जाऊ शकतो, तो संयम तुमच्याकडे हवा.
२. एचपी च्या व्यवस्थापना पैकी कोणाचा इमेल पत्ता मिळाला तर त्यावर सरळ तक्रार नोंदवा, काही वेळा त्याने देखील काम होऊ शकते.
३. किंवा डीसीसी,पुणे येथे सोय होते का हे विचारून बघा. (हि जाहिरात नाही, केवळ सल्ला आहे.)

माझा अनुभव

माझ्याकडे सुद्धा एचपीचा लॅपटॉप आहे. पण मला अनुभव कधी आला नाही. मी नेहमी विन्टेक कडून सेवा घेतो. आजवर तरी त्रासदायक अनुभव नाही.






 
^ वर