युलिप पॉलिस्या

एका भुक्कड इंश्युरंन्स कंपनीचे युलिप मी ३ वर्षांपुर्वी घेतले होते. युलिप अत्यंत बकवास पॉलिसी आहे हे खूप नुकसान झाल्यावर कळले.

किस्सा तर पुढेच आहे. ३ वर्षांचा लॉकिंग पिरीयड असल्यामुळे मी पॉलिसी नुकसानीत जात असुनही काही करु शकलो नाही. तीन वर्षाच्या आत जर पॉलिसी सरंडर करायची असेल तर भयंकर कपात केली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे ३ वर्षे पुर्ण होताच, मी सरंडरसाठी अर्ज टाकला. कंपनीच्या अतिहुशार अधिका-यांना वाटले की, हे गि-हाइक अलिबागचे असावे. त्यांनी सांगितले की, मला ३०% रक्कम कापुनच परतावा मिळेल. मी त्यांना पॉलिसी दाखवली त्यात स्पष्ट लिहीलेले होते की, ३ वर्षे पुर्ण झाल्यावर ०% कपात केली जाईल. मग मी म्याटर त्यांच्या "ग्राहकसेवा" च्या इमेल वर पाठवले. तेथील संपर्क अधिकारीणीला वाटले की, हे नेहमीचेच गि-हाइक आहे, टाका ह्याला डीटेलमधे गोंधळवुन. तीने लिहीले की, ५ वर्षे झाल्यानंतरच पॉलिसीच्या परताव्याला ०% कपात लागू होते.

मी आय आर डी ए कडे गेलो व त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरला व नंतरच्या प्रत्येक इंश्युरंन्स कंपनीच्या इमेल रेस्पॉन्समधे आय आर डी ए चा इमेल ऍड्रेस सीसीमधे ठेवला. आता लगेच त्यांना मला जे म्हणायचे आहे, व माझ्या हक्काप्रमाणे आहे ते नीट व सुस्पष्ट दिसायला लागले. "सुताप्रमाणे सरळ होणे" ह्या मराठी म्हणीची आठवण झाली, प्रचिती झाली.

पुण्यातील अतिहुशार अधिकारी मला म्हणाला होता की, आमच्या शिस्टीममधे तुम्हाला मिळणारी रक्कम ३०% कपातीची आहे व तुम्हाला चेक २५ वर्कींग डेज मधे मिळेल. मी त्याला म्हणालो की, रक्कम कपात करुन जर आली तर मी लगेच आय आर डी एला कळवणार. तसे न होता, मला चेक ५ दिवसात मिळाला. पण खूप नुकसान झालेले आहे हे मला विसरता येत नाही म्हणून मी हा अनुभव शेअर केला आहे.

माझा मामा झालेला असल्यामुळे ह्या अनुभवाकडे चेष्टेच्या स्वरुपात न पाहता, त्यातून तुमचे नुकसान टाळता आले तर बघा.

लेखनविषय: दुवे:

Comments

पुढच्यास ठेच मागचा शाहाणा

पुढच्यास ठेच मागचा शाहाणा. अनुभव सांगितला हे चांगले केले.

त्यातल्या त्यात तोटा कमी केल्याचा यशस्वी उपाय सांगितला हेसुद्धा चांगले.

+१

असेच म्हणतो. त्यानिमित्ताने बाकीच्यांनीही युलिपचे अनुभव सांगावेत म्हणजे अजून चित्र स्पष्ट होइल.

+१

+१.

उत्तम माहिती

उत्तम माहिती येथे दिल्या बद्दल धन्यवाद!
-निनाद

धन्यवाद

अनुभव सांगीतल्याबद्दल धन्यवाद.

एकच जातकुळी

लोकांना असे फसवणे काय आणि पेट्रोलमधे भेसळ करुन विकणे काय- एकाच जातकुळीतील हे विचार.

एक भुक्कड कंपनी ?

हा प्रत्यक्ष अनुभव असतांना त्या कंपनीचे नाव देण्यात कसली अडचण आहे? ते समजल्याशिवाय मागचे शहाणे कसे होणार?
युलिप हा प्रकारच एकंदरीत वाईट आहे असे समजणे बरोबर नाही. त्यापासून आपल्याला फायदा झाला असे सांगणारे लोकसुद्धा भेटतात.

क्लॉजेसचे इंटर्प्रीटेशन व दिशाभूल

"ते समजल्याशिवाय मागचे शहाणे कसे होणार?
-- नाव सांगितले नाही तरी माहीतील सत्यता एका शतांशानेही कमी होणार नाही. ह्या अनुभवातील मेसेज काय आहे तर युलिप पॉलिसी घेतांना नीट माहिती तपासुन घेतली तरी, ज्यावेळेस कंपनी कडून पैसे परत घेण्याची वेळ येते तेव्हा -

१. त्यातील क्लॉजेसचे इंटर्प्रीटेशन ते वेगळ्या पद्धेतीने करु शकतात
२. खोटी माहिती पुढे करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु शकतात- जे माझ्याबाबतीत झाले.

अशा वेळेस, आय आर डी ए चा मध्यस्त म्हणून वापर केलात तर बरे.

इतर अनेकांना युलिप मधून फायदा झालाही असेल- त्याने माझा अनुभव खोटा ठरु शकतो का? मी माझी बाजू मांडली- त्यांनी त्यांची मांडावी व ती समांतर असावी- एकमेकांना खोटे ठरवत नव्हे.

होते!

नाव सांगितले नाही तरी माहीतील सत्यता एका शतांशानेही कमी होणार नाही.

थोडी कमी होतेच.
तुम्ही दुधातील भेसळ काढण्याच्या तुमच्या 'आविष्काराची' माहिती सांगितलेली नाही आणि बीफवाल्या चॉकोलेटचे नावसुद्धा!

प्रतिसाद संपादित

प्रतिसाद संपादित.

निषेध

फक्त माझा प्रतिसाद संपादीत केल्याबद्द्ल निषेध.

सत्यता

नाव सांगितले नाही तरी माहीतील सत्यता एका शतांशानेही कमी होणार नाही.

पण नाव लपवुन ठेवायचा हट्ट तरी कशाला? कळू द्या की सगळ्यांना ही 'भुक्कड' कोणती ते.

नाव

युलिप हा प्रकारच एकंदरीत वाईट आहे असे समजणे बरोबर नाही.

कंपनीचे नाव दिले नसल्याने माझाही असाच गैरसमज झाला की युलिप पॉलिस्या घेणेच अहितकारक आहे. भुक्कड कंपनीचे नाव जाहिर करायला काही हरकत नाही.

काहीतरी चुकते आहे

लेखाचा अर्थ कळायला वेळ लागला. या लेखात बरीच अर्धवट माहिती दिली आहे म्हणून गैरसमज होऊ शकतो.

मी असे धरतो की तुम्ही केलेल्या धोशामुळे तुमची रक्कम कुठलीही कपात न करता परत मिळाली. तसे न होता, मला चेक ५ दिवसात मिळाला. या वाक्यावरून तो अर्थबोध होतो.

आता तुम्ही भरलेली रक्कम आणि मिळालेली रक्कम यात तफावत नुकसान असू शकते पण याला जबाबदार कंपनी नाही.
युलिप म्हणजे युनिट-लिंक्ड -पॉलिसी. यातील जे युनिट असतात ते 'म्युच्युअल फंडाचे' असतात. तुम्ही जी रक्कम भरता त्याचे दोन भाग होतात. एक आयुर्विम्याचा हप्ता (हा हप्ता फक्त रिस्क साठी असतो आणि त्याचा परतावा नसतो.) आणि दुसरा म्हणजे गुंतवणूक. (गुंतवणूकीत सहसा २.५ टक्याच्या आसपास वार्षिक फी असते. ) बर्‍याच वेळा ही गुंतवणूक शेअरबाजारात केली असते. तसा तुमचा देकार योजनेतच असतो. अशा वेळी शेअर मार्केटच्या चढावाउतारा प्रमाणे ही गुंतवणूक कमी जास्त होत असते. गुंतवणूक करणार्‍या फंडातील रक्कम शेयर मार्केट पेक्षा स्मार्ट असावी अशी एक अपेक्षा असते. पण ती फार महत्वाची नाही.

तुम्ही एक काळ लोटल्यावर ही गुंतवणूक परत मिळवता. त्यावेळी तिचा जो भाव चालू असेल त्यातून १ टक्याच्या आसपास रक्कम काढून परत मिळते. असे करणे तुमच्या हातात असते. त्यावर फारशी बंधने नसावीत.
सद्य परिस्थितीत तुमची गुंतवणूक घटली असेल आणि त्यामुळे तुमचे नुकसान झाले असेल असे मानण्यास जागा आहे. (तुमचे नुकसान का झाले याबद्दल तुम्ही काहीच लिहीत नाही.) तुम्ही भरलेली रक्कम यातून पहिल्यांदाच विमा हप्ता गेल्याने व शेयरबाजारातील अस्थिरतेने हे झाले असणार.

दुसरी कडे हेच पैसे व्याजावर लावले जातात. त्यामुळे तुमचे नुकसान होत नाही. (विम्याचा हप्ता सोडल्यास) पण फायदाही मर्यादित होतो. तुम्ही या पद्धतीत जास्त फायद्याची अपेक्षा ठेवली आणि त्यातील रिस्क मुळे तुमचे नुकसान झाले असे मला वाटले.

यातही प्राप्तीकरातील सवलतीमुळे तुमची गुंतवणूक काही वर्षे ठेवावी लागते हा नियम पण आला असणार.

प्रमोद

शंका रास्त

तुमच्या शंका रास्त आहेत. मी वरील शंकांना ह्या प्रतिसादात उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकसान पैशाचे झाले ते मी सहन केले कारण पॉलिसीतून बाहेर पडण्याचा माझा निर्णय होता. फसवणूक कुठे झाली असती तर ती क्लॉजप्रमाणे ३ वर्षाच्या लॉकींङ पिरीयड नंतर जी रक्कम त्यांनी देणे आवश्यक होते ती ०% कपात करुन द्यायची होती. तसे न करता त्यांनी दिशाभूल करुन मला सांगितले की, ते ३०% रक्कम कापून घेतील.

जेव्हा मी त्यांच्या कष्टंबर सपोर्ट वाल्या अधिकारीणीला कळवले तेव्हा तिनेही तिच तळी उचलली. आणि वर मला कळवले की, खरे म्हणजे ५ वर्षांनंतर मला ०% कपात लागू आहे. जेव्हा मी हे आय आर डी ए ला कळवले तेव्हा मात्र त्यांना अचानक माझे म्हणणे आणि त्यांचाच क्लॉज नीट समजायला लागला.

पैसे ०% कपात न होताच मिळाले- जे रास्त होते.

नुकसान

पैसे ०% कपात न होताच मिळाले- जे रास्त होते.


शंकांची उत्तरे प्रतिसादात मिळाली नाही. पैसे पूर्ण मिळाले तर नुकसान काय झाले?

प्रमोद

१५% ने कमी

जे मिळाले ते कपात न होता मिळाले तरी ते जेव्ह्ढे इन्व्हेस्ट केले त्यापेक्षा १५% ने कमी होते. कॉस्ट ऑफ मनी, ई विचारात घेतले तर १५% पेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात हे लोक जेव्हा ३०% कपातीचे खेळ खेळायला लागले तेव्हा वरील कृती करावी लागली.

रिसर्च

कष्टाचे पैसे गुंतवण्याआधी पुरेसा अभ्यास करणे आवश्यक आहे. मी सर्वसाधारणपणे खालील वेबसाईट वाचत राहतो. बहुतेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात.

मी माझी युलिप बंद करू का?
युलीप की टॅक्ससेविंग फंड
युलिप आणि बॅलन्स्ड फंड

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

उपयुक्त लिंका

अभिजीत, उपयुक्त लिंका दिल्याबद्दल आभारी.

सहमत

(तुमचा नाव लपवण्याचा हट्ट पाहून) तोच काय तो ह्या धाग्याचा एकमेव उपयोग असे वाटत आहे.

आग्रह नाही

मी दिलेली माहिती घ्यायची तर घ्या नाहीतर सोडून द्या, आग्रह नाही.
तुम्हाला वरील माहिती "लागलेली" दिसतेय...विमा एजंट तर नाही ना तुम्ही?

एजन्सी

तुम्ही अमूल चॉकोलेटचे एजंट असल्याचा संशय नितीन थत्ते यांनी व्यक्त केला होता.

वकील

तुम्ही त्यांचे आणि आनंद घारे ह्यांचे वकील आहात असे वाटतेय. की उपक्रमाने नवा रोल असाइण केला आहे का? किंवा डार्क म्याटर ही आयडी तुमची असावी असेही वाटतेय.

 
^ वर