उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
इथेनॉल + पेट्रोल
गिरीश
March 14, 2011 - 8:11 am
पेट्रोलमधे ५% इथेनॉल (अधिकृतरीत्या) मिसळले गेले असल्यामुळे, जर त्याचा संपर्क पाण्याबरोबर आल्यास त्या ५% इथेनॉलचे पाणी होते (दोन्ही अर्थाने) असे निवेदन पुण्यातील पेट्रोल पंप असोशिएशनने दिले आहे. ह्या दाव्यात किती तथ्य आहे? नक्की रासायनिक क्रिया कशी होते आणि त्याचे एच२ओ मधे कसे रुपांतर होते ते समजले नाही. (मी केमिस्ट्रीत कच्चा आहे).
ब्रा़झीलमधे १०-१५% (नक्की किती?) इथेनॉल मिसळले जाते तेथे असा प्रोंब्लेम का येत नाही?
दुवे:
Comments
दुवा
असा दावा कोठे केला आहे याचा दुवा द्यावा.
नितिन थत्ते
रविवार सकाळमधील बातमी- १३ मार्च
इसकाळ १३ मार्च पुणे टुडे पान क्र. १०
ह्या संबंधातील अधिक लिंका-
१ हा एक
२. हा दोन
३. हा तीन
४. हा चार
:)
पेट्रोल मधे जर पाणी झाले असेल तर ते वगळे करण्याची एक सोपी आयडीया आहे . पाणीमिश्रीत पेट्रोल एका काचेच्या चंबु मधे घ्यावे. खालुन् जाळ लावावा ... गरम झाल्यावर आतल्या पाण्याचे बाष्पिभवन् होऊन् ते वर् जाइल्. चंबुवर् एक ओला फडका ठेवा , म्हणजे ती वाफ थंड होईल. मग त्याचे पुन्हा पाणी होईल् .. परंतु ते चंबुतल्या एका वेगळ्या नळीच्या सहाय्याने वेगळे करुन घ्या ... खाली प्योर पेट्रोल उरेल्.
- भौतीकी रसायनिस्ट्
पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ?
पेट्रोलमध्ये पाण्याची ५% भेसळ करण्यासाठी हा राजमार्ग निर्माण झाला की काय?
इथेनॉल+पेट्रोल
आकाशमित्र
सरकारी आशिर्वादाने ( आदेशाने) जेव्हा पेट्रोलमध्ये इतर काही ( इथे इथेनॉल ) मिसळले जाते, तेव्हा त्याला मागणी- पुरवठा यातील समन्वयाचा प्रयत्न म्हटले जाते.४० वर्षापूर्वी सरकारी डेअरीतील दुधामध्ये पाणी मिसळून अधिक दूधपुरवठा करण्याच्या योजनेला ' गरीबांसाठी परवडणारे दूध ' असे नाव देवून सरकारी भेसळीला राजमान्यता दिली होती.पूर्णपणे इथेनॉलवरही वाहने चालू शकतात.मग इथेनॉलचे पम्प का असू नयेत.पेट्रोलवाल्यांना चालणार नाहीत म्हणून!
चित्ती असो द्यावे समाधान....
दृष्टी
>>४० वर्षापूर्वी सरकारी डेअरीतील दुधामध्ये पाणी मिसळून अधिक दूधपुरवठा करण्याच्या योजनेला ' गरीबांसाठी परवडणारे दूध ' असे नाव देवून सरकारी भेसळीला राजमान्यता दिली होती.
असे जुन्या जगात झाले की अंतु बर्वा स्टाईल हसायचे असते. नव्या जगात त्याला 'हेल्दी दूध' म्हणून डोक्यावर घ्यायचे असते.
(अजून एक : आम्ही लहानपणी गावाला जात असू तेव्हा गावात शिरून स्टॅण्डवर पोचेपर्यंत एस्टी आपापल्या घरांसमोर ठिकठिकाणी थांबून त्यातून उतारू उतरत असत. तेव्हा या अनधिकृत थांब्यांना लोक नाके मुरडत. आता या दारोदार बस थांबण्यालाच कष्टमर सर्विस म्हटले जाते).
नितिन थत्ते
कृत्रिम दुध
दुधात ९२% पाणीच असल्यामुळे त्यात आणखी पाणी मिसळले तरी ते पाणी जो पर्यंत "शुद्ध" आहे तो पर्यंत ती भेसळ आरोग्याला घातक नाही. पण जेव्हा रासायनिक पदार्थांपासुन कृत्रिम दुध तयार करुन ते मिसळले जाते त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासमान गुन्हा मानण्यात यावा अशी शिफारस नुकतीच झाली आहे असे वाचले.
गमतीदार बातमी
गमतीदार बातमी आहे.
एथॅनॉल (पेट्रोलमध्ये असलेलेसुद्धा) जल-आकर्षक (हायग्रोस्कोपिक) आहे. त्यामुळे एथॅनॉल-मिश्रित पेट्रोल पाण्याचा अंश शोषून घेते. जोवर ते पाणी टाकीत पुन्हा वेगळे होत नाही, तोवर फार मोठी अडचण येत नसावी.
बातमीत गोंधळवून टाकणार्या मुद्द्याचे सत्यबीज हे असावे काय?
जल आकर्षक...
विकीवरील माहीतीप्रमाणे ५% पर्यंत जल आकर्षक असलेले इथेनॉल हे अधुनिक गाड्यांमधे इंधनमिश्रण म्हणून चालू शकते. ब्राझिलमध्ये तसेच वापरले जाते. मात्र ब्राझिलमध्ये २५% पर्यंत जलविरहीत/ जल-अनाकर्षक (अनहायड्रस) इथेनॉल इंधनमिश्रण म्हणून वापरले जाते.
बाकी उरले पुण्यात मिसळले जाणार्या पाण्याचे प्रमाण. ती अर्थातच भेसळ आहे.
माझ्या बाईकमध्ये पाणी सापडले होते
मागील महिन्यात हॉपिसातून घरी निघताना बराच वेळ बाईक चालू होत नव्हती. नाईलाजाने तिथेच बाईक ठेवून घरी आलो व दुसऱ्या दिवशी मेक्यानिकला दाखवले तर त्याने पेट्रोलच्या टाकीतून सुमारे दोन ग्लास भरून पाणी काढून दिले. हे पाणी कुठून आले असावे याबाबत माझ्या मनात संशय होताच. काही हितशत्रू उपक्रमी किंवा मिपाकरांनी हा घातपाताचा प्रकार केला असावा असा कयास मी बांधला होता. मात्र या बातमीमुळे पाण्याचा स्रोत वेगळा असावा याला पुष्टी मिळते.
शंका
तुमच्या पेट्रोलमधील पाणी टाकीतच कसे राहिले ही गंमत आहे. माझ्या किरकोळ माहितीनुसार इंजिनच्या वॉल्वला पाणी आणि पेट्रोलमधला फरक कळत् नाही. पाणी पेट्रोलपेक्षा जड असल्याने ते "पेट्रोल संपुन टाकीत् उरल्याने" वेगळे काढता येणार् नाही. मात्र पाणी आणि पेट्रोल् मिश्रण् बाहेर काढुन वेगळे करता येऊ शकेल असे वाटते. नक्की कसे पाणी काढुन् दाखवले?
-Nile
कसे पाणी काढुन् दाखवले?
मेक्यानिकने पाईप वापरून व हाताने पाणी काढून दाखवले.
फक्त?
पाईपमधुन फक्त पाणीच बाहेर आले?
-Nile
नाही
पाईपमधून पेट्रोल व पाणी दोन्ही बाहेर आले. बाहेर आल्यावर त्याने पाणी बाजूला काढून दाखवले.
पेट्रोलचे पाणी होते काय ?
माझा अनुभव असा की, अनेकदा बाईक धुतल्यावर पेट्रोलच्या टाकीत पाणी जाते. टाकीच्या झाकणाच्या बाजूला एक छिद्र असते त्यातून पाणी खाली पडावे पण ते छिद्र अनेकदा धुळीने बंद होऊन जाते आणि त्यामुळे ब-याचदा पाणी पेट्रोल टाकीत जाते. गाडी स्टार्ट केली की गाडी फुरफुर करते आणि बंद पडायला लागते. गाडी फुरफुर होऊन बंद होण्याची कारणे दुसरी असली तरी मला पेट्रोलमधे पाणी गेल्यामुळेच गाडी बंद पडत असते असे वाटत असते. मी मेक्यानिकडे गाडी घेऊन गेल्यावर मेक्यानिक नळी लावून पेट्रोल एका डब्यात काढतो आणि शेवटी शेवटी स्वच्छ पाणी शिल्लक दिसते. पाणी काढून टाकल्यावर गाडी व्यवस्थित सुरु होते असे वाटते. वरील चर्चा प्रतिसाद सर्वच काही समजले नाही. पण तुम्ही म्हणता तसे इथेनॉलचे पाणी होत असते की काय ? [नै म्हणजे गाडी धुणारा याला जवाबदार नाही असे समजावे काय ]
-दिलीप बिरुटे
टाकीत पेट्रोल
माझी गाडी मी गेल्या दोन वर्षात दसरा, दिवाळी पाडवा व गुढीपाडवा वगळता कधीही धुतलेली नाही. तरीही टाकीत पाणी सापडले. जर गाडी धुताना पाणी पेट्रोल टाकीत जाऊ शकत असेल तर ते आपोआप उडूही शकते हे तुमच्या लक्षात आले नाही का?
मलाही हाच अनुभव आला. Nile यांचे समाधान व्हायला हरकत नसावी.
विशेष
आपण म्हणता ते खरे असेल हि पण हे फारच विशेष आहे, पेट्रोल काढताना पाणी कसे निघत नाही?
असे असल्यास पाण्याचे माहित नाही, गाडीवर धूळ वगैरे नक्कीच निघत असेल :). हळू घेणे.
?
श्री शरद आणि श्री धनंजय यांनी म्हणल्याप्रमाणे इथेनॉलमध्ये पाणी, हवेतले बाष्प, शोषले जाते, पण् एक ग्लास् म्हणजे जरा जास्तच वाटतंय्. (पाण्याची भेसळ केली असेल तर शक्य आहे). सहसा चारचाकीचा टँक उघडा राहिला तर बर्याप्रमाणात् पाणी शोषुन् प्रॉब्लेम होउ शकतो पण् दुचाकीत असे होणे अवघड वाटते आहे.
दुसरी शंका, शोषलेले पाणी इतक्यासहजी वेगळे करता येत नसावे असा माझा अंदाज् आहे. इथेनॉल पासुन् हॅड्रॉक्साईल ग्रुप वेगळा करुन् पाणी मिळवता येउ शकते (पण् तो मेकॅनिक हे करु शकेल् असे वाटत् नाही)
शंकेचे कारण, पाण्याच्या उगमाच्या कोड्याचे निवारण इतकेच आहे.
-Nile
टाक्यांमध्ये पाण्याचा संचय
पेट्रोलपंपावर असलेल्या टाक्यांमध्ये अनेकदा पाण्याचा संचय होतो. यासाठी पाण्याची टाकीत होणारी गळती आणि बाष्प वगैरे इतर कारणे असतात. पेट्रोल वर ओढण्या करता बसवलेल्या पाईपच्या मुखापर्यंत हे पाणी आल्यास पेट्रोल ऐवजी पाणीच ओढले जाते.
हे पाणी टाकीत अजिबात अस्तित्वात नसण्याची स्थिती जवळपास कधीच नसते. मात्र ते जास्त प्रमाणात वाढू नये व पाईपच्या मुखापर्यंत येऊ नये, यासाठी पेट्रोल वितरक कंपन्या काळजी घेतात. या मोजमापीसाठी त्यांच्या कडे एक प्रकारचे मलम असते. टाकीत पेट्रोल मोजायच्या पट्टीच्या खालच्या टोकाला ते मलम लावतात. पाण्याच्या संपर्काने त्याचा रंग बदलतो आणि टाकीत साधारण किती पाणी आहे हे लक्षात येते. असे पाणी वाढल्यास पेट्रोलची टाकी रिकामी करून स्वच्छता करावी लागते.
पण काही वेळा भारतात आणि इतरत्रही या प्रतिबंधाला विलंब लागून हे पाणी पेट्रोलच्या दराने विकत घेतले जाते! अशा वेळी तक्रार करता येते. (पण ती ऐकून घेतली जाईल असे वाटत नाही!)
मात्र गाडीच्या टाकीत पाणी आल्यास ते पाईपने काढून टाकणे गरजेचे ठरते. काही वेळा टाकी रिकामी करून झाकण उघडलेल्या अवस्थेत गाडी कडक उन्हात ठेवल्यास बाष्पीभवनाने पाणी निघून जाते. मात्र अजून इतर काही घाण त्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. यासाठी टाकीच्या तोंडाला एक फडके बांधून ठेवतात.
-निनाद
भेसळीची आयडिया
विसुनानांचेच म्हणणे बरोबर वाटते.
सकाळमधील बातमीस दुजोरा देणारा दुवा जालावर दिसला नाही.
नितिन थत्ते
इथेनॉल व पाणी
इथेनॉलमध्ये सर्व प्रमानात पाणी मिसळता येते. तसेच एथेनॉल हवेतील बाष्प ओढून घेते. पण काहीही केले तरी इथेनॉलचे पाण्यात रुपांतर होवू शकत नाही. बातमी सर्वथ: चुकीची आहे.
अवांतर : सगळ्या प्रकारच्या "दारू" मध्ये इथेनॉल व पाणी असते. पण श्री. दारूवाला यांच्या निवेदनावरून असे दिसते की निदान त्यांच्या दारूमधील इथेनॉलचे पाण्यात रुपांतर झाले नसावे व त्या नशेत त्यांनी असे भंकस निवेदन केले.
शरद
शुद्ध् अल्कोहोल
इथेनॉल हे शुद्ध् अल्कोहोल असते असे वाचले. त्या धर्माने, दारुत पाणी घातले तर सगळ्या गल्लासात पाणीच शिल्लक राहील. मग दारु चढते कशी? उलटपक्षी पाणी का चढत नाही?
साइड क्वश्चन- पाण्यातून इथेनॉल तयार करता येते का?
कदाचीत
मग दारु चढते कशी? उलटपक्षी पाणी का चढत नाही?
कदाचीत तो प्लासिबो इफेक्ट असेल. :-)
साइड क्वश्चन- पाण्यातून इथेनॉल तयार करता येते का? (खरचं विचारत आहात असे गृहीत धरून :-) )
इथेनॉलचा फॉर्म्युला CH3CH2OH or C2H5OH असा आहे. त्यात म्हणले तर पाण्याच्या रेणू सारखे (H20) हायड्रोजन-ऑक्सिजन दिसतात. तरी देखील पाण्यात कार्बन नसतो त्यामुळे ते शक्य नाही...
कार्बोनेटेड् पाणी
"तरी देखील पाण्यात कार्बन नसतो त्यामुळे ते शक्य नाही..."
ओके, म्हणजे कार्ब केले पाहीजेल. मग कार्बोनेटेड् पाणी (सोडा) हा दारुत कन्व्हर्ट् का होत नाही?
उगाच्?
कार्ब्, कार्बोनेट् आणि हायड्रोकार्बन याबद्दल तुम्हाला खरच् काही माहीत् नाही की उगाच् टीपी चालु आहे?
-Nile
दारुवालांची केमिस्ट्री
नायल साहेब, दारुवाला जे म्हणतात त्याप्रमाणे आता सरकारने केमिस्ट्रीला वागायला सांगितले असेल तर काहीही शक्य नाही का?