जैतापूर अणु वीज प्रकल्प

भूकंपामुळे जपानच्या अणुवीज केंद्राची जी अवस्था झाली आहे ते पाहता जैतापूर प्रकल्पा बद्दल नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. जैतापूर बाबत सरकार आणि माध्यमांनी घेतलेली निषेधार्ह भूमिका लक्षात घेता मी माझ्या www.marathimanoos.com या वेब साईट वर या संदर्भातल्या आंदोलनाबद्दल सर्व माहिती देऊ इच्छितो. कृपया अशी कुठलीही माहिती, लेख, व्हिदिओ, ओदिओ अशा स्वरूपात असल्यास मला जरूर कळवावे.
marathimanoos@hotmail.com

लेखनविषय: दुवे:

Comments

जैतापूर आणि जपान

जपान हे आत्यंतिक भूकंपप्रवण पट्ट्यात येते.दर आठ-दहा वर्षांनी तेथे एखादा महाकाय शक्तीचा भूकंप होत असतो. तसा तो अधून मधून होणार हे जपान्यांनी गृहीत धरले आहे.त्यानुसार जपान ( व उर्वरित जगही) अशा धोकादायक आणि अतिविशाल प्रकल्पाची आखणी/बांधणी भूकंपनिरोध आणि इतर अनेक सुरक्षा तत्त्वे लक्षात घेऊनच करत असते. भूकंपाच्या भीतीने त्यांनी अणुऊर्जा किंवा इतरही प्रकल्पांची उभारणी थांबवलेली नाही. जैतापूर प्रकल्पाचे क्षेत्र हे जपान इतके भूकंपप्रवण नाही. तेव्हा विशेष काळजी घेऊन तो उभारणे ही योग्य भूमिका ठरेल असे वाटते. तशी काळजी प्रकल्पाच्या आराखड्यात बहुधा घेतलेली असावी. नक्की माहिती नाही.

भूकंपप्रवण क्षेत्र

जैतापूर प्रकल्पाचे क्षेत्र हे जपान इतके भूकंपप्रवण नाही.

वरील नकाशा हा विकीवरून घेतलेला आहे. त्यात बघितल्यास लक्षात येईल की हा भाग किमान "मॉडरेट" आणि कमाल "हाय" अशा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो.

जैतापूरचा प्रकल्प महाराष्ट्रासाठी कल्याणकारी

जैतापूरचा प्रकल्प महाराष्ट्रासाठी कल्याणकारी आहे. रात्रीच्या वेळी ह्या प्रकल्पातून तयार होणा-या वीजेची मागणी कमी असेल व अशी अतिरीक्त वीज इतर पाणी-उर्जाकेंद्रातील पाणी कोकणातून पुन्हा वरील तलावात आणण्यासाठी करता येणे शक्य आहे. असे झाल्यास ३०००० मेगावॉट पॉवर तयार होइल अशी धारणा आहे.

आढावा

भारतातील सर्व अणुशक्ती केंद्रांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

चिंता

सध्या तरी चिंता करण्याजोगी परिस्थिती आहे असे वाटते आहे. शिवाय तयार झालेला अणुकचरा हा पुढील काही वर्षे तरी सांभाळावाच लागतो असेही आहे. पण या पर्याया शिवाय पर्यावरणाला प्रदूषित न करणारी तयार तरी कशी करणार?
लाटा, सौर आणि वारा यातून अणूउर्जे इतकी उर्जा निर्माण होत नाही हे सत्य उरतेच!

-निनाद

अवांतरः
युरेनियमचे शेयर्स या भानगडीत गडगडले.

इफिशियन्सी

कमीत-कमी उर्जेत जास्तीतजास्त विद्युत शक्ति तयार करणे व त्या जास्तीतजास्त तयार झालेल्या विजेचा न्यानो तंत्रद्न्यानाचा वापर करुन तयार केलेली उपकरणे वापरणे हे मात्र शक्य आहे.

सिस्मिक झोन

सिस्मिक झोन चा नकाशा पहिला. आता या पुढील सर्व भूकंप या झोन नुसार त्या त्या तीव्रतेचेच घडवून आणण्याची जबाबदारी संपूर्णपणे निसर्गाची आहे.
मराठीमाणूस

म.टा. मधील बातमीप्रमाणे...

जैतापूरला २० वर्षांत ९२ धक्के

...जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या नोंदणीत १९८५ ते २००५ या कालावधीत जैतापूरमध्ये ९२ भूकंप झाल्याची नोंद आहे. या पैकी सगळ्यात मोठा भूकंप ६.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. ... (अधिक बातमी)

 
^ वर