मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय

मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय

एखादा लेख नाकरल्यावर तो पारदर्शक रितीने नाकारला आहे ही लेखकाला पटावे आणि एकूणच व्यवस्थापन पारदर्शक रितीने व्हावे यासाठी मला खालचे नियम नि मुद्दे सुचले.

सर्व लेख संपादन मंडळाच्या नजरे खालूनच प्रकाशनास जातील.

आवश्यक असल्यास मंडळ लेख संपादित/अप्रकाशित करेल.

लेखाचे संपादन झाल्यास, आपले म्हणणे मांडण्याचा लेखकाला हक्क आणि संधी दिली जाईल. यासाठी लेखकाला लेख कसा योग्य आहे हे मंडळाला पटवून द्यावे लागेल.

मंडळाच निर्णय अमान्य झाल्यास लेखकाला निरीक्षक समितीकडे जाता येईल. यासाठी लेखाच्या समर्थनासहित संपादकांच्या निर्णयाचे खंडन करणाऱ्या लेखासह अर्ज करावा लागेल.

निरीक्षक समितीचाही निर्णय मान्य नसल्यास प्रशासकांकडे जाता येईल. मात्र त्यांचा निर्णय अंतिम असेल.

संपादन मंडळ

मुख्य संपादक, सहसंपादक, लेखनिक, सचिव (आपण नाय बाबा लेखनिक होणार हा)

या मंडळामध्ये मध्ये ३/७/९/११ असे विषम सभासद असावेत.

याच्या ऑनलाईन बैठका व्हायला हरकत नसावी. मंडळाचे कामकाज सदस्यांना बैठका झाल्यावर खुले असेल.

संपादन मंडळाचे सदस्य होण्यासाठी पात्रता-

किमान ३ महिने सदस्यत्वाचे झालेले असावेत.

७५० शब्दांचे किमान ५ लेख प्रसिद्ध केलेले असावेत.

किमान १० चर्चां मध्ये साधक बाधक असा सहभाग दिसावा.

मंडळाचा कार्यकाळ ६ महिने (की एक वर्ष?) असा असावा. (किती असावा बरं?)

संपादना साठी वेळ देण्याची तयारी असावी. (कसा म्हणे?)

संगणकीय लिखाणाची सवय असावी. (हे कसे सिद्ध करणार बुवा?)

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही ग्राहक सौजन्याचे नियम माहीत असणे आवश्यक. (पाहू का रे गुंड्या तुझ्याकडे आं?)

या संपादक मंडळाच्या वर निरीक्षक समिती असावी.

संपादक मंडळात वाद झाल्यास किंवा लेखकांस संपादक मंडळाचा निर्णय मान्य नसल्यास निरीक्षक समिती काम सुरू करेल. तोवर हस्तक्षेप करणार नाही. (म्हणजे तोवर मुकाट गंमत पाहावी)

यात किती सदस्य असावेत?

निरीक्षक समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी पात्रता

किमान ३ महिने सदस्यत्वाचे झालेले असावेत.

१००० शब्दांचे किमान ५ लेख "संदर्भांसहित" प्रसिद्ध केलेले असावेत.

किमान १० चर्चां मध्ये साधक बाधक असा सहभाग दिसावा.

संपादना साठी वेळ देण्याची तयारी असावी.

संगणकीय लिखाणाची सवय असावी.

यांनाही ग्राहक सौजन्याचे नियम माहीत असणे आवश्यक आहे. (परत तेच?)

सर्व लेखनावर अंतिम निर्णय प्रशासकांचा राहील. (झालं! हे आहेच का वर अजून?)

सर्व मंडळांची निवड निवडणूकीने व्हावी. (हे ठीक आहे)

निवडणूकीचा जाहीरनामा आपापल्या खरडवही वर लावता येईल.सभासदाच्या सहमतीशिवाय व्यनिचा वापर करत येणार नाही. (किंवा करता येईल अशी सोय सभासदस्यत्व देतानाच करता येईल का?)

याविषयी आपल्याला काय वाटते?

यातून पारदर्शकता साधली जाईल का?

यात काय भर घालणी आवश्यक राहील?

(हे अती होते आहे का? पण मग इतर मार्ग काय?)

आपला
(नियमीत)
गुंडोपंत

Comments

आप्ल्याला म्हाईत

आपण सुचवलेले नियम विचार करण्यासारखे आहेत, पण एकाच अटीवर. हे सर्व नियम पाळण्यासाठी आज्ञावली बनल्या तरच.

हे कसं ते नाही बुवा आप्ल्याला म्हाईत

अन्यथा संकेतस्थळावरची ब्युरोक्रसी (नोकरशाही म्हणता येणार नाही, कारण ह्यात नोकर कुणीही नसतील) वाढण्याशिवाय यातून काहीही साध्य होणार नाही.

याची तर मला हे लिहितांनाच भीती वाटत होती...

गुंडोपंत

संपादक मंडळ

संकेतस्थळासाठी संपादक मंडळाची काहीही गरज नाही. वाचकांपेक्षा संपादक अधिक शहाणे असतात असे नसते. ते वाचकांपैकीच (व बर्‍याच वेळा वाचकांपेक्षा (वाचकांपेक्षा हे महत्त्वाचे, आमच्यापेक्षा असे म्हटलेले नाही!) कमी बुद्ध्यांक असलेले )असतात. वाचकांना जे हवे ते वाचक वाचतील, नाही आवडले तर शिव्या घालतील. मात्र वाचकांनी काय वाचावे व काय वाचू नये याचा निर्णय संपादकांनी घेऊ नये.

(सेन्सॉरशिप विरोधी) योगेश



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

नियम बाह्य लिखाणासाठी

स्थळाचे नियम प्रकाशित असून त्या नियमांत लेखन बसते की नाही हे पाहण्याचे काम संपादकांचे असेल.
(हे नियम सुटसुटीतपणे शब्दांत बसवेल का?)

(योगेशराव दुसर्‍याबाजूला पण डोकावून पहा हो.)
आणी मंडळ निवडणूकीने यावे असा मुद्दा आहे म्हणजेच सदस्यच संपादन करणार आहेत असा अर्थ नाही का होत?

"मात्र वाचकांनी काय वाचावे व काय वाचू नये याचा निर्णय संपादकांनी घेऊ नये. "

असं कूठे म्हंटले आहे बुवा?
हे तर फक्त विवाद्या लेखांना गायब न करता एक संधी लेखकाला पण मिळावी याठी आहे! सेंसॉरशिपसाठी नाही!!!
आपला
गुंडोपंत

दळण

लेखनासाठी नियम की नियमासाठी लेखन हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
उद्या अमुकतमुक लेख नियमात बसत नाही म्हणून उडवला तर परत तीच चर्चा, तीच उदाहरणे, तेच उबग आणणारे प्रतिसाद येत राहतील. आज चालू आहे तेच दळण रोज सुरु राहील. त्यापेक्षा खुले धोरण स्वीकारुन लोकांना लिहू द्यावे. आम्हाला लिहू देत नाहीत, लेखन माहितीपूर्ण म्हणजे कळत नाही वगैरे प्रश्न उपस्थित करणारे आमच्यासारखे लोक येथे लेखन करण्याबाबत कितपत गंभीर आहेत ते तरी कळेल.

निवडणूक वगैरे म्हणाल तर उपक्रमाच्या मूळ उद्देशापेक्षा मग मतदार जमवणे, व्होट बँक तयार करणे वगैरे हालचाली जास्त सुरु होतील.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मग तुम्ही सांगा

तुम्ही सांगा कशी आणायची पारदर्शकता ते...
काहीच नियम नसले तर उपक्रमाचा 'रवांडा' व्हायला वेळ लागणार नाही.

माझ्या लिखाणाचा अर्थ आहे की लिखाण जाण्या आधी लेखकालाही एकसंधी मिळावी. आणी हे संवाद योग्यरितीने घडावेत.

आणी कोणत्याही स्थळाला काही नियम असणारच. फक्त ते "पार्दर्शक आणी सगळ्यांसाठी समान" असावेत या साठी हा खटाटोप.

(खटाटोपी)
गुंडोपंत

सदस्य तर हवेत ना तयार?

नोंदणी केलेल्या वाचकांपैकी रोज सात जणांची रँडमली निवड
रोज कसं काय जमणार? आणी त्यासाठी सदस्य तर हवेत ना तयार?
म्हणूनच एका काळासाठी निवड होणे योग्य वाटते.
पण ५-५ गुणांची कल्पना उत्तम आहे.

(निवडक)
गुंडोपंत

स्लॅशडॉट

स्लॅशडॉट पाहीले,
त्यानी काय प्रयोग केला असावा तेथे वरील सुविधा देण्यासाठी, जर साध्य झाले तर जे सदस्य पीचपी मध्ये कार्य करतात त्यांनी अशी एक प्रणाली ड्रुपल साठी बनवावी अशी अपेक्षा कारण प्रायोगिक तत्वावर वापरुन पाहणे महत्वाचे आहे !

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

त्याऐवजी ...

हे व यातील चालकशाही अती होते आहे असे मला वाटते. खालील पर्यायाचा विचार करून पहावा -

(शेवटी संस्थळाचे मालक जो निर्णय घेतील तो मान्य करावाच लागणार ही पार्श्वभूमी मनात धरून)
लेख अप्रकाशित करण्यासाठी "नरक" नावाचे एक जोडीचे संस्थळ ठेवावे, तिथे तो लेख मूळ अवस्थेत (वाटल्यास मर्यादित काळासाठी) साठवलेला असावा. येथील (म्ह. मूळ संस्थळावरील) काही किमान वयाच्या (समजा २-३-४ महिने) सदस्यांना तेथे नोंदणी व आणखी एक (कदाचित मर्यादित आयुष्याचा) परवलीचा शब्द यांच्या सहाय्याने मर्यादित वेळापुरता "नरका"त प्रवेश देऊन तो लेख पाहण्याची मुभा दिली जावी.
तो लेख "नरका"त किती काळ साठवलेला असावा याचा निर्णय चालकांनी घ्यायचा आहे, पण असा निर्णय सदस्यांना समजेल अशा पद्धतीने नरकाच्या द्वारावर लावून ठेवावा. चालकांना असुरक्षिततेची भावना नसेल तर ते असे सर्व लेख कायमचेही साठवून ठेवू शकतील. फारच विद्रोही किंवा संस्थळाच्या अहिताचा लेख असल्यास तो तशी नोंद ठेवून त्वरित काढून टाकता येणे हे चालकांना कधीही शक्य असेलच.
येथे तो लेख पूर्णपणे गायब करण्याऐवजी त्याचा स्टब व संस्थळचालकांनी तो अप्रकाशित/संपादित करण्यासाठी दिलेली कारणे यासह तो काही किमान काळ असू द्यावा.
प्रतिसादरूपाने (फक्त?) मूळ लेखकाला सर्व आक्षेपांची उत्तरे त्याखाली लिहू द्यावीत. चालक व लेखक यांचा काय वाद, ऊहापोह, व्हायचा तो त्या स्टबखाली प्रकाशित होऊ द्यावा. लेख संपूर्णपणे अप्रकाशित केला गेलेला असेल तर वरील सर्व लिखाण नियत काळानंतर गायब केले तरी चालेल.
म्हणजे सर्व सदस्यांना निदान काही काळ तरी या सगळ्याची तपासणी करण्याची संधी मिळेल. ज्यांना रस नसेल ते अर्थात् दुर्लक्ष करतील, करूदेत.
या सर्वातून यथावकाश संस्थळचालकांचे धोरण, त्यांची नीयत, सदस्यांना कळून चुकेल व तिथे रहावे किंवा न रहावे याचा निर्णय तेही घेऊ शकतील.

- दिगम्भा

चांगदेवावस्थेत

वा!

वा हापण चांगला उपाय आहे!
पण २ स्थळे म्हणजे जास्त खर्च असे घडेल का? शिवाय या मध्ये 'सदस्यांचा संपादनात सहभाग' याला कात्री लागते ना!

(रौरव नरकात ये जा असणारा)
गुंडोपंत

असुरक्षिततेची भावना

चालकांना असुरक्षिततेची भावना
सध्याच्या प्रशासनात याचा मात्र नक्कीच खोलवर संबध असला पाहिजे असे वारंवार लेख गायब होण्यामुळे जाणवते.

(निर्धास्त)
गुंडोपंत

शेखी

तसेच नरकातला लेख पृथ्वीवर आणणे देखील साध्य होईल.

खरंच! याच विचारच आला नाही डोक्यात हो!

हे चांगले आहे. काही खास लोक तर आपला लेख किती वेळा नरकातून बाहेर आला आहे याची शेखी (हा शब्द उर्दूत पण याच अर्थाने आहे का हो?) पण मिरवू शकतील नाही का?

काहीही असो, हे झाले तर मजा येणार!

(तात्यांच्या विचारांची वाट पाहणारा)
गुंडोपंत

विचाराधीन!

चित्तरंजन यांनी त्यांच्या www.sureshbhat.in इथे केलेल्या प्रयोगाप्रमाणे काही (विवादास्पद) लेख "विचाराधीन" या नावाखाली साठवून सदस्यांना आणि व्यवस्थापकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात यावी. हा लेख साधारणतः एक ते दोन दिवस तेथे असावा आणि नंतरच त्याचे भवितव्य ठरवावे. या कालावधीत मूळ लेखकालाही 'हा लेख उडू शकतो त्यामुळे दुसरीकडे जपून ठेवावा' याची कपल्पना येईल.
दिगंभांच्या नरकाप्रमाणेच ही कल्पना आहे.

हे छान!

आपण दिलेला दुवा पाहिला.
खरंच चांगला पर्याय आहे वाटते.
याला खरा परस्पर संवाद म्हणायचे!

गुंडोपंत

"सध्या वैतागले आहेत!"

विचाराधीन आणि उणे गुण.

नमस्कार,
चर्चेचा हा विषय खरेच गरजेचा आहे .
उडववून टाकण्यास लायक अशा लेखनाचे (लिख आणि प्रतिसाद ) मला दोन उपप्रकार जाणवतात.
१. माहितीप्रधान लेख असावेत अशी अपेक्षा असलेल्या या स्थळावर माहितीप्रधान नसलेला लेख. मग तो लेख चांगला, साहित्यमूल्य असलेला असला तरीही.
यावर दिगम्भांनी सुचविलेले उपाय मला चांगले वाटले. लेख विचाराधीन (वर साती सुचवतात तसे अथवा नरकात धाडून) ठेवून सभासदांनी त्याला गुण द्यावेत. आणि लेख काढला असेल तर तेथे लेखाचे शीर्षक आणि त्याखाली त्याला मिळालेले गुण आणि संपादकांना वाटलेली कारणे असावीत.

२. वाद उत्पन करून वातावरण गढूळ करणारे लेख अथवा प्रतिसाद.
सभासदांना उणे गुण देण्याचा अधिकार असावा. म्हणजे एखादा प्रतिसाद अथवा लेख सभासदच उणे गुण देवून सांगतील की आम्हाला हे असले लेखन येथे रुचत नाही. (हा उपाय सर्किट यांनी कोठेतरी सुचवलेला आहे असे स्मरते. तो मी येथे पुन्हा लिहित आहे.)

आपला,
-- (मृत्युभूमीवर सुखाने नांदणारा) लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

नरका पेक्षा

जर दुर्लक्ष असा किंवा व्यवस्थापनाकडे पाठवा अशी सोय देता येते व माझ्या प्रयोगाप्रमाणे हा प्रकार जरा चांगलाच आहे कारण एखादा लेख, प्रतिसाद किवा सदस्य जर संस्थळाच्या नियमाबाहेरील असेल तर सदस्य तो व्यवस्थापनाकडे पाठवू शकतात (जेव्हा पासून ही सुविधा मी चालू केली तेव्हा पासून आम्ही एकही लेख/ चर्चा / प्रतिसाद नष्ट केला नाही सदस्यांनाच बदल करण्याचे आधिकार दिले आहेत जर एखादा लेख व्यवस्थापनाकडे आलाच तर सद्स्यास त्याची सुचना दिली जाते व बदल करण्यासाठी सांगितले जाते सध्यातरी हाच उपाय् आहे असे वाटत आहे.

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

व्यवस्थापन

आक्षेपार्ह वाटणारा मजकूर व्यवस्थापकांच्या नजरेस आणून दिल्यास व्यवस्थापकाने तो मजकूर काढून टाकावा.. सदर लेखकाला त्यावर अपील करण्याची संधी असावी ..हे अपील समस्त संपादक मंडळीनी वाचून आपापला निर्णय कळवावा.. आणि बहुमताच्या कलाप्रमाणे सदर मजकूर परत आणावा अथवा कायमस्वरूपी रद्द करावा.
सदर मजकूर संपादक मंडळाच्या मतानुसार अश्लिल,धमकीवजा अथवा बेकायदेशीर ठरला तर सदर लेखकाच्या वाटचाली मध्ये तशी नोंद करून ठेवावी जी सगळ्या सभासदांना बघता येईल अश्या नोंदी विशिष्ठ संख्येच्या वर गेल्यास सदर सदस्याचे सदस्यत्व रद्द करावे.

मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

किमान प्रतिक्रिया देण्यायेवढाही महत्त्वाचा वाटत नाही का?

मंडळी पाहा.
इतके लेख झाले, पर्याय सुचवून झाले.
पण उपक्रमाकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.
जणू काही या सगळ्या उहापोहाचा नि उपक्रमाचा काही संबंधच नाहीये.
(या गुंडोपंतावर उपकार म्हणून त्यांनी हा लेख नि चर्चा तरी राहु दिली आहे इतकेच!)

थोडक्यात यायचे तर या, जायचे तर जा पण आम्हाला अक्कल शिकवू नका!

सदस्यांना संवादाच्या परिघात राखणे नि कधी आपणही त्यात सामील होणे हे उपक्रमाच्या नियमांत बसत नाही का?
फक्त त्रोटक निरोप आणी प्रतिक्रिया या पुरतेच आपण आहात?

हे गुंडोपंत विचाताहेत या सगळ्यातला एकही पर्याय, किमान प्रतिक्रिया देण्यायेवढाही महत्त्वाचा वाटत नाही का?

(निराशामय विचारात गुंतलेला)

गुंडोपंत

हवा

मनोगत ची हवा लागली आहे ! हे च म्हणावे लागेल...

उपक्रमरावांनी हे संस्थळ सदस्यांसाठी न चालू करता ...आपल्या खास म मित्रांसाठी चालू केले आहे, असे वाटावे असे ह्यांचे वागणे आहे असे मला वाटत आहे ;)

प्रती उपक्रम राव,
तुम्हाला नवीन नियम जाहीर करावेच लागतील असे मला वाटत आहे लवकरच तुमचा प्रतिसाद येथे येईल अशी अपेक्षा नाहीतर तुम्ही माझा हा प्रतिसाद जो उपप्रतिसाद आहे तो देखील उडवालच ह्यात शंका नाही !

सदस्यांचा मान नाहीतर कमीत कमी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे तरी तुम्ही अथवा तुमचे ५-६-७ जणांचे जे उपव्यवस्थापक मंडळ आहे त्यांनी द्यावे ही तुमच्या चरणी साष्टांग दंडवत घालून विनंती करत आहे !
उफ्फ् !
ईतके केल्यावर जर त्यांचा प्रतिसाद आलाच तर आमचे परम भाग्य !

क्ष-सदस्य होता होता सात दिवसांसाठी थांबलेला उपक्रमी (? शक्यतो)

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता ! ----------------- ह्यासाठीच आम्ही राजीनामा दिला आहे उपक्रमचा....उपक्रम आम्हाला काही करुच देत नाही आहे काय करावे.....राज जैन

तळ टिप : सध्या आम्ही

चांगलाच झोंबला असला पाहिजे

मनोगत ची हवा लागली आहे ! हे च म्हणावे लागेल...

म्हणजे काय हो?

उपक्रमरावांनी हे संस्थळ सदस्यांसाठी न चालू करता ...आपल्या खास म मित्रांसाठी चालू केले आहे, असे वाटावे असे ह्यांचे वागणे आहे असे मला वाटत आहे ;)

हे तर आम्ही मागेच पल्लवी ला उत्तर देताना म्हणालो आहोत. (गाळीव नि पाळीव ;) )
आमचा प्रतिसाद ज्या त्वरेने उडवला गेला ते पाहिल्यावर तो चांगलाच झोंबला असला पाहिजे हे ही लक्षात आले होते ;)
पण प्रतिसाद उडवल्यावर काय करतो बापुडा गुंडोपंत? ही काय त्याची व्यायाम शाळा आहे त्याचे ऐकले जायला?

(गाळणीत अडकलेला)
गुंडोपंत

~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!
म्हणजे काय?
म्हणजे 'वय वर्षे १८ अधिक' अशा समूहा चे वावडे उपक्रमाला का असावे बरं? ~

विचार करण्यासारखे

गुंडोपंत, तुम्ही आणि या चर्चेच्या अनुषंगाने इतर सदस्यांनी मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.

"कारणे दाखवा", प्रतिवाद, निरीक्षक समिती या सर्वामुळे मिलिंदरावांनी म्हटल्याप्रमाणे ब्यूरॉक्रसीचा प्रादुर्भाव होईल. संपादन समितीत संकेतस्थळाचेच अनुभवी सदस्य असल्याने संपादन समितीने सर्वानुमते घेतलेला निर्णय बहुसंख्य वेळेस योग्य असेल असे मानण्यास हरकत नसावी. १००% योग्य निर्णय हे उद्देश्य म्हणून ठीक आहे पण (योग्य-अयोग्य च्या संकल्पना व्यक्तिपरत्वे आणि प्रसंगपरत्वे भिन्न असल्याने) प्रत्यक्षात येणे अवघड आहे.

सर्व मंडळांची निवड निवडणूकीने व्हावी

हे तितकेसे व्यावहारिक नाही. योगेशरावांनी दिलेली कारणे पटण्यासारखी आहेत.

(हे अती होते आहे का? पण मग इतर मार्ग काय?)

:) माझ्यामते ३ किंवा ५ सदस्यांची एक "संचालन समिती" असावी. संचालन समितीत जाळ्यावर आणि विविध संस्थळांवर वावरण्याचा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या सदस्यांचा समावेश असावा. संस्थळाचे सर्व धोरणात्मक निर्णय या समितीने विचारांती आणि सर्वानुमते घ्यावेत. ५ ते ७ सदस्यांचे "संपादन मंडळ" असावे. यात जाळ्यावर आणि विविध संस्थळांवर वावरण्याचा अनुभव असलेले (शक्यतो वेगवेगळ्या टाइमझोन मधील) सदस्य असावेत. (संपादनासाठी वेळ, इच्छा आणि जाळ्याची जोडणी या गोष्टी गृहीत धरल्या आहेत.) दोन्ही समित्यांतील लोकांनी संपादनाचे धोरण निश्चित करावे. संपादनाचे सर्वाधिकार संपादन समितीकडे असतील आणि संचालन समिती त्यात हस्तक्षेप करणार नाही. आता हे मोठे चित्र ("बिग पिक्चर":)) झाले. पण काही प्रश्न अनुत्तरित आहेत. उपरोल्लिखित सदस्यांची नेमणूक कशी करावी? (मराठी संस्थळांवर वावरणारे आणि ह्या जबाबदार्‍या पार पाडू शकणारे लोक संख्येने मर्यादित असल्याने ही निवड फारशी अवघड असणार नाही पण तरीही) संपादन मंडळाच्या सदस्यांनी (जे वेगवेगळ्या ठिकाणी आणि टाइमझोनमध्ये आहेत) परस्पर संवाद कसा साधावा आणि निर्णय कसे घ्यावेत? इ. इ. (अर्थात ही फक्त कल्पना आहे यावर अधिक विचार होणे आवश्यक आहे.)

हे सर्व झाले संस्थळ चालवणार्‍यांसाठी, सदस्यांनी काय करावे? मला वाटते, आपण सदस्यांनी तारत्म्याने आणि स्वयंस्फूर्तीने कोणत्या संकेतस्थळावर कोणत्या स्वरूपाचे लेखन प्रकाशित करावे याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे वागणे हा योग्य उपाय आहे. अमुक एक लेखनप्रकार 'क' संस्थळाच्या धोरणाशी सुसंगत नाही पण 'ख' संस्थळावर प्रकाशित करता येतो हे माहीत असेल तर असे लेखन 'ख' संस्थळावरच प्रकाशित केले तर 'नरका'ची गरज भासणार नाही. तसेच लेख, चर्चाविषय आणि प्रतिसादात व्यक्तिगत संदर्भ, टीका इ. येणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेतल्यास 'आपापसात'ची गरज भासणार नाही. असे झाल्यास योगेशरावांनी म्हटल्याप्रमाणे कालांतराने संपादन मंडळाचीच गरज राहणार नाही :)

अवांतर - बराच विचार करूनही 'गुंडोपाय' सारखा शब्द सुचला नाही म्हणून प्रतिसादाला "विचार करण्यासारखे" असे म्हणावे लागले :)

शशांक

वा ! शशांक साहेब,
तुमचे मत पटले ! अगदी २०० %

१००% माझे व १००% तुमचे = २००% :)))

राज जैन

बुजगावणे

लोकशाहीचा देखावा करण्याची आवश्यकता मला समजलेली नाही पण ती आवश्यक वाटत असल्यास ही व्यवस्था चांगली वाटते.
जाहीरनाम्याची आवश्यकता असलेल्या व्यक्ती चांगल्या संपादक बनू शकणार नाहीत असेही वाटते.
मिसळपाववरील एका चर्चेमुळे मी या जुन्या धाग्याकडे आलो.

सहमत

लोकशाहीचा देखावा करण्याची आवश्यकता मला समजलेली नाही

सहमत आहे. मलाही समजलेली नाही. चर्चा रोचक आहे. :)

 
^ वर