उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मागच्या जन्माच रहस्य काय?
मधुलेखा
February 9, 2011 - 9:31 am
कोणी म्हणत आम्ही मागचा जन्म मानत नाही कोणी म्हणत हो आम्ही मानतो.म्हणुन शेवटी एक्सपेरिमेंट करायच म्हणुन माझ्याच ओळखीतली एक मुलगी एका डॉक्टरांकडे गेली होती, मागच्या जन्माच रहस्य जाणुन घ्यायच म्हणुन आणि तिला तिचे मागचे पाच जन्म दिसले.ह्यात किती तथ्य माहित नाही,पण तेव्हापासुन माझ्या मनातही एक सुप्त इच्छा आहे की आपणही जाणुन घ्यायला हवेत.तर त्यात किती धोका आहे किंवा असे आपण मागचे जन्म जाणुन घेऊ शकतो ह्यात तथ्य आहे का आणि असलच तर ह्याचा योग्य शास्त्रीय रितीने कोणी करणार्यांची काहि माहिती किंवा फोन नं. मिळू शकतॉ का?प्लिज मला जरा सांगा.........
दुवे:
Comments
?
>>माझ्या मनातही एक सुप्त इच्छा आहे की आपणही जाणुन घ्यायला हवेत
तुम्हीपण जा त्याच डॉक्टरांकडे
>>त्यात किती धोका आहे
ती मुलगी आहे ना अजून? की पुढच्या जन्मात गेली?
तिला पाच जन्म जाणून घेतल्याबद्दल पश्चात्ताप झाला का?
डॉक्टर लोक मागच्या जन्माचे रहस्य सांगतात/शोधून काढतात ही नवीनच माहिती कळली.
इकडे एक दोन आयडी आहेत जे नेहमी स्वतः अनुभव घेण्याविषयी आग्रही असतात. तुम्हीही स्वतः अनुभव घेऊन आम्हालाही सांगा.
नितिन थत्ते
पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत
+ १ सहमत
पुढील भागात अधिक मनोरंजक भाग येईल या अपेक्षेत.
बाकी मैत्रिणीचा अनुभव थोडा विस्तारपूर्वक मिळाला तरी चालेल.
प्रमोद
त्या योग्य डॉक्टरच्या शोधात आहे मी.....
त्याला पास्ट रिग्रेशन थिअरी म्हणतात.आणि तुमचे मागचे जन्म जाणुन घेण्यासाठी तुमची एकाग्रता असण महत्त्वाच आहे,अस मी जमवलेल्या माहिती मधुन कळलं.पण त्यात तथ्य किती आहे ह्याची मला खात्री नाहि.आणि अशा डॉक्टरकडे एका मुलीने जाण हे कितपत योग्य आहे हे ही मला माहित नाहि,म्हणुन मी विचारल की ह्या गोष्टीचा कुणाला अनुभव असेल तर तो शेअर करता येईल.माझा बा़की काही हेतु नाही.
राज़ पिछले जनमका
मागे तुम्हीच विचारला होता का हा प्रश्न उपक्रमावर? मला उत्तर दिल्याचे आठवते.
पण हल्ली ते च्यानेल आमच्या प्याकमध्ये येऊ लागल्यापासून एखाद-दोन कार्यक्रम मी पाहिले होते. त्यातून एक निश्चित झाले की प्रत्येक टिव्ही कलाकाराला पुनर्जन्म असतो. त्यातल्या त्या डॉ. तृप्ती जैन यांना जाऊन भेटा. कदाचित तुम्हाला पूर्वजन्मही असतील आणि तुम्ही टिव्हीस्टारही व्हाल. ;-)
शिक्षण
हा लेख वाचून मधुलेखा काहीतरी गेम टाकत आहेत असे राहून राहून वाटते आहे. उपक्रमवर असा लेख टाकणे म्हणजे आगीत तेल टाकण्यासारखे आहे याची त्यांना कल्पना असणारच. मग बाजूला उभे राहून गम्मत बघावी असा बेत दिसतो आहे. त्यामुळे मी कोणताही प्रतिसाद देण्याचे टाळले आहे. परंतु हा लेख शिक्षण या विभागात टाकणे म्हणजे अल्टिमेट आहे हे मात्र नक्की. मधुलेखा मॅडम एनजॉय!
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
मी ब्रिटिश नाही.
नावाप्रमाणे तुम्ही मागच्या जन्मी क्रांतिकारी होता वाटत!पण हा गेम नाही फक्त मनात एक उत्सुकता होती आणि कोणाला ह्या गोष्टीचा अनुभव असेल् किंवा कोणी स्वतः ही पास्ट रिग्रेशन थिअरी करत असेल् तर त्या बद्दल थोडी माहिती मिळेल.पण इथे मला काहिच माहिती मिळाली नाहि,मायबोली सारख्या अशाच साईट वर मला ती माहिती तो डॉक्टर त्याचे चार्जेस आणि तो प्रकार ह्या बद्दल कळल.इथे फक्त बंडखोरी एवढाच प्रयत्न दिसतोय.
पुनर्जन्म
चार्वाक म्हणतो
यावत जीवेत सुखेनैव जीवेत
भस्मिभूतस्य देहे च पुनर्जन्म: कुतः
जन्माचं रहस्य...
आथवले साहेब, चार्वाक पुनर्जन्माबद्दल काय म्हणतो जरा तपशिलवार सांगा राव....!
विज्ञानयुगात पुनर्जन्माबद्दल विश्वास ठेवणे वेडेपणाचे ठरेल. पण मला उगाच वाटतं या चराचर सृष्टीत इतके
चमत्कार घडतात तेव्हा काय सांगता येते पुनर्जन्म नावाची नियमित किंवा अनियमित घडणारी गोष्टही असू शकते....!
एक मुलगी एका डॉक्टरांकडे गेली होती, मागच्या जन्माच रहस्य जाणुन घ्यायच म्हणुन आणि तिला तिचे मागचे पाच जन्म दिसले.
च्यायला, वरील वाक्य वाचून माझ्या मनात कै च्या कैच विचार आला. पण ते जाऊ द्या. डॉक्टरने मागच्या जन्माची सफर कशी घडवली ?
-दिलीप बिरुटे
शंका
च्यायला, वरील वाक्य वाचून माझ्या मनात कै च्या कैच विचार आला. पण ते जाऊ द्या. डॉक्टरने मागच्या जन्माची सफर कशी घडवली ?
हाहाहा. शंका. प्रतिसादक दिलीप बिरुटे हे डॉक्टर आहेत म्हणून कदाचित हा प्रश्न त्यांना विचारावासा वाटला आहे की काय? त्यांना बहुधा कुणाला सफर घडवायची इच्छा होत असावी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
शक्यता
किंवा suffer करविण्याची?
+ १ नंबर
:-) हा हा हा! ते डॉ फिलीप नाहीत.
चार्वाक
बिरुटेसाहेब,
चार्वाकने उपरोधीक प्रश्न विचारला आहे.
तो म्हणतो
देह जळुन राख झाल्यावर त्याचा पूर्नजन्म कसा शक्य आहे?
ही कोणती पॅथी ?
डॉक्टरी मधल्या ह्या स्पेशलायाझेशन ला काय म्हणतात
तथ्य
तुम्ही सांगता त्या गोष्टींत तथ्य नसावे. त्यापेक्षा तुमच्या ओळखीतल्या त्या मुलीला मानसिक उपचारांची गरज (जमल्यास त्या डॉक्टरांनाही) आहे का ते तपासायला हवे.
बाकी, पुनर्जन्म, डॉक्टर, शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र वगैरे एका धाग्यात पाहून ड्वाळे पाणावले. धागा शतक गाठेल असा आशीर्वाद देते. ;-)
विनोद खन्ना
शेवटी एक्सपेरिमेंट करायच म्हणुन माझ्याच ओळखीतली एक मुलगी एका डॉक्टरांकडे गेली होती,
तो डॉक्टर विनोद खन्ना तर नव्हता ना? कारण कुद्रत चित्रपटात त्याच्या मदतीने हेमा मालीनीस आधीचा जन्म आठवतो. :-)
मागच्या जन्माबद्दल माहीत नाही. "आपण मेलो जग बुडालं" अशी देखील एक म्हण आठवते.
बाकी आंतर्जालीय पुर्नजन्म मात्र डॉक्टरच्या मदतीवीना देखील लक्षात राहू शकतात असे वाटते. ;)
मैत्रिणी
म्हणजे हेमामालीनी मधुलेखा आज्जीच्या मैत्रिण आहे हे कळवण्याकरता यांनी धागा काढला आहे काय? ;-)
-Nile
हेमामालिनी
कुदरतमध्ये हेमामालिनीचे दोन रोल आहेत. एक ब्रिटिशांच्या काळी असते आणि मग दुसरी नंतर. त्यापैकी नक्की कोण ते ठरवा आणि या हिशेबाने आजी का पणजी तेही ठरवा. ;-)
शतकाकरिता फूल ना फुलाची पाकळी
फॉर गेटिंग टु अ सेंच्युरी धिस इज् माय कॉन्ट्रिब्यूशन - "इफ नॉट फूल, व्होर्ल ऑफ फूल".
दुरुस्ती
'पेटल' हा शब्द सुचवून शतकपूर्तीच्या वाटचालीत सहभागी होऊ दिल्याबद्दल आभारी आहे.
पेटल
आमच्या बायोलॉजीच्या क्लासमधे एकाने 'पेटल्स आर ऍट्रॅक्टीव' हे विधान 'पटेल्स आर ऍट्रेक्टीव' असे लिहिल्याचे आठवले. गुरुजींनी हे सगळ्यांसमोर वाचून दाखवल्यावर वर्गातल्या दोन पटेल भगिनी हुरळून गेल्या.
पेटलही आणि विझलही
आधी पेटलही आणि मग विझलही.
- - -
ऑल अराउंड द बर्निंग बुश
मिथिंक्स इट्स् लाइक ए वीझल
जंप इन् फॉर् अनादर बर्थ!
पॉप! गोज् द वीझल
- - -
नाडी पुरस्कारासाठी
नाडी पुरस्कारासाठी मी हा चर्चाप्रस्ताव नॉमिनेट करतो आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अग्रेषित
म्हणजे हा प्रस्ताव ओकांकडे अग्रेषित करावा असे सुचवायचे आहे का?
प्रकाश घाटपांडे
पाटी
"येथे मागचे जन्म अठवून मिळतील."
अशी काही पाटी निदान पुण्यात पाहिल्याचे स्मरणात नाही, तेंव्हा इतरस्त्र चवकशी करावी.
स्वप्ने
स्वप्नात स्वप्न पडलं तर स्वप्नातल्या स्वप्नासाठी पहिलं स्वप्न हा मागचा जन्म असतो. आणि पहिल्या स्वप्नासाठी आपला सध्याचा जन्म हा मागचा जन्म असतो. म्हणजे ३ जन्माची स्टोरी तर सहज कळू शकते डॉक्टरकडे न जाताही. स्वतः अनुभव घ्या. आपले अनुभव लिहून ठेवा आणि पुढच्या जन्मात पोहोचाल तेव्हा पडताळून पहा.
मागच्या जन्मात तुम्हाला हा सल्ला मिळाला असता तर या जन्मी तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माबद्दल नकी समजून घेता आलं असतं.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
स्वप्नात स्वप्न
नुकताच इनसेप्शन पाहिलेला दिसतो. :)
इनस्वप्नेशन
इन्सेप्शनने सगळ्या स्वप्नाशी रिलेटेड आयड्या हायजॅक केल्या आहेत :( बॅड बॅड नो डोनटस् फॉर मी.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
पण कळणार कसं?
पुढच्या जन्मात गेल्यावर कळणार कस की हो मी च हे अनुभव लिहुन ठेवलेत.मला ती क्युरासिटी आहे,कारण जरका असे जन्म कळले असते तर त्या गोष्टीच स्तोम माजल असत.आणि ही ओढ फक्त आपलीच नसावी ती आधीही असेलच की पण मग आत्तापर्यत ते मोठ्या प्रमाणावर प्रचारित का झालं नाही.म्हणुन त्यात तथ्यता किती हे जाणुन घेण्यासाठी मला स्वतःवर प्रयोग करुन घेण्याची इच्छा आहे.बाकी काहि नाही.
करा करा
करा..करा आणि मग याच जन्मी इथे येऊन अनुभव लिहा.
पुर्ण विश्वास
माझा पुनर्जन्मावर पुर्ण विश्वास आहे. पुण्यात अशी एक व्यक्ति मला माहिती आहे, जीचा पुनर्जन्म झाला आहे. मागील जन्मीचे तिला ७-८ वर्षाची होइपर्यंत आठवत असे. तिचे मागील जन्मीचे घर नारायण पेठेत होते व तिच्या वडीलांनी तिच्या सांगण्यानुसार त्या घराचा तपशील काढून तेथील वडीलधा-या माणासाशी भेट घेतली असता, त्यांनी सांगितले की, त्यांची लहान मुलगी ७-८ वर्षांची असतांना गेली होती.
व्हॉट्
व्हॉट् इज् हिअरसे ?
तेच से!
आय काय नाय, तेच से.
दुवा द्या
काहीतरी रेफ्रन्स द्या.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
गुप्तता
नाही देता येणार, कारण, त्या व्यक्तिने मला त्याबद्द्ल गुप्तता पाळण्यास बजावले आहे.
हॅहॅहॅ
बीफवाल्या दुकानदारानेही गुप्तता पाळण्यास बजावले आहे का?
विश्वास
ह्याचा अर्थ तुमचा पुनर्जन्मावर विश्वास नसून, त्या व्यक्तिवर विश्वास आहे.
काय उपयोग??????????
इथे लिहिणार्यांची आणि प्रतिसाद पाठवणार्यांची फक्त टिंगल टवाळी करणे एवढाच प्रतिसाद पाठवणार्यांचा उद्देश दिसतोय.
धन्य तो उपक्रम आणि धन्य त्याचे ते मेंमबर्स...............
.
मधुलेखा
खाजगीवाले
स्नेहल राव
ह्म्म्म्म्म्म्म्
नितिन थत्ते
हे कोण
प्रतिसादात बाकी लिंक लागली फक्त मधले "ह्म्म्म्म्म्म्म्" हे आयडी नवीनच कळले! ;)
अवांतरः राज़ ये ही जनमका
खाजगीवाले
स्नेहल राव
तसं राज़ वगैरे काही नाही. ;-) सर्व पत्ते उघड आहेत पण चालायचेच.
ह्म्म्म्म्म् थत्ते उघड आहेत
ह्म्म्म्म्म् थत्ते उघड आहेत पण चालायचेच असेच वाचले गेले चुकून.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"