काही विचार मागवण्यात येत आहेत! ;)

राम राम मंडळी,

आपल्यापैकी अनेक जण निरनिराळ्या संकेतस्थळांवर वावरत असतात. प्रत्येक संकेतस्थळावर तेथे काय लेखन अपेक्षित आहे याबद्दलची ध्येयधोरणे वेगळी असतात/असू शकतात, त्याबद्दलचे नियम वेगळे असतात. ते असू द्यात. त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही.

परंतु संकेतस्थळांवर वावरणार्‍या सभासदांच्या बाबतीत संकेतस्थळ चालकांची काय ध्येयधोरणं काय असावीत याबद्दल सदर चर्चाप्रस्तावातून आम्ही आपल्याकडून विचार, मतं मागवत आहोत. साधारणपणे आम्हाला खालील विषयावर चर्चा अपेक्षित आहे.

१) आपण जर एखाद्या संकेतस्थळाचे चालकमालक असाल तर आपल्या संकेतस्थळावरील सभासदामुळेच आपल्या संकेतस्थळाला शोभा आहे असं आपल्याला वाटेल का?

२) आपल्या संकेतस्थळावर सभासदांनी अधिकाधिक लेखन करावं म्हणून आपण काही प्रोत्साहनपर उपाय कराल का? कराल तर कोणते?

३) इतर कुठल्या संकेतस्थळावर एखादा चांगला लिहिणारा/लिहिणारी असेल तर त्याला/तिला आपण स्वतःहून आपल्या संकेतस्थळावर लिहिण्यासाठी बोलावणं कराल का?

४) संपादक मंडळात कोण कोण मंडळी आहेत त्यांची नांवं आपण जाहीर कराल काय?

४) वेळोवेळी एखाद्या सभासदाला संपादक मंडळात स्थान द्यावे, किंवा संपादक मंडळातील एखाद्याचा संपादकीय दर्जा काढून त्याला पुन्हा साधा सभासद बनवणे असे काही टाईमबेसड् उपाय आपण कराल का?

इत्यादी..इत्यादी..इत्यादी...

तात्या.

संत तात्याबांच्या मनात हवाईसुंदर्‍यांविषयी आदरभावना आहे! ;)
लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

तात्या!
मस्त..!
मी लवकरच या विषयी लिहितो....

गुंड्या

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो आणी आम्हाला संत तात्याबां विषयी आदरभावना आहे!! ;) "

कृपया, (/div) वापरून आपली स्वाक्षरी पूर्ण करावी. - उपसंपादक

ढिंगच्याक!

ढिंगच्याक!
या वेळी माझाच पहिला प्रतिसाद तात्या!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो आणी संत तात्याबां विषयी त्यांच्या हवाई सुदर्‍यांसकट, आम्हाला अजूनही आदरभावना आहे!! ;)!"

कृपया, (/div) वापरून आपली स्वाक्षरी पूर्ण करावी. - उपसंपादक

असे एक स्थळ!

असे एक स्थळ माझ्या पाहण्यात आहे.

आपण जर एखाद्या संकेतस्थळाचे चालकमालक असाल तर आपल्या संकेतस्थळावरील सभासदामुळेच आपल्या संकेतस्थळाला शोभा आहे असं आपल्याला वाटेल का?
हो. या स्थळावर आपण सदस्य झाल्यास तिथे फुलांचा गुच्छ पाठवून स्वागतसमिती स्वागत करते.त्यावरून त्यांना आपल्या येण्याने आनंद झाला हे कळते.

२) आपल्या संकेतस्थळावर सभासदांनी अधिकाधिक लेखन करावं म्हणून आपण काही प्रोत्साहनपर उपाय कराल का? कराल तर कोणते?

वेगवेगळ्या स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या निमित्ताने विशेषांक काढणे असे उपाय केले जावे . आणि कुणीही काहीही म्हणो, सार्‍या सदस्यांना आपलं लिखाण आवडल्यावरही जर संपादकाचा,मालकाचा एखादा कौतुकाचा शब्द आला तर होणारा आनंद अवर्णनीय असतो.
(माझ्या आवडत्या संकेतस्थळावर "संपादकांची निवड" असाही एक प्रकार असतो.)

३) इतर कुठल्या संकेतस्थळावर एखादा चांगला लिहिणारा/लिहिणारी असेल तर त्याला/तिला आपण स्वतःहून आपल्या संकेतस्थळावर लिहिण्यासाठी बोलावणं कराल का?
हो. करायला हरकत नाही. किंवा आपल्या संकेतस्थळाचे वाचनमूल्य वाढवण्यासाठी हे केलेच पाहिजे.(माझे आवडते संकेतस्थळ असे करते की नाही हे माहिती नाही)

४) संपादक मंडळात कोण कोण मंडळी आहेत त्यांची नांवं आपण जाहीर कराल काय?

हो. केलेच पाहिजेत. लपून कसले वार करता. समोर येऊन करा ना!
(माझ्या आवडत्या ठिकाणि हे नाव (आय्.डी.) बर्‍याचदा जाहीर असते.)

४) वेळोवेळी एखाद्या सभासदाला संपादक मंडळात स्थान द्यावे, किंवा संपादक मंडळातील एखाद्याचा संपादकीय दर्जा काढून त्याला पुन्हा साधा सभासद बनवणे असे काही टाईमबेसड् उपाय आपण कराल का?

करायलाच हवे. एखाद्या संपादक, उपसंपादकाच्या धोरणाविषयी तुमच्या बहुसंख्य सदस्यंच्या मनात अढी असेल् आणि ती दूर करण्यासाठी निवेदन् वैगेरे देऊनही दूर होत नसेल तर अशा संपादकांना कामावरून दूर् केलेच पाहिजेत्.
मुळात कामाची विभागणी असली पाहिजे. ठराविक विषयांत ठराविक लोकांना गती असल्यास त्यांना तेच काम दिले पाहिजे. एखाद्याचे लेखन केवळ "आमच्या उद्दिष्टांशी सुसंगत नाही " असे मोघम सांगून काढून टाकण्यापेक्षा त्यातला कोणता भाग सुसंगत नाही का तो लेखनप्रकार सुसंगत नाही हे स्पष्ट केले जावे.

---मी संपादकीय धोरण पारदर्शक असावे असे म्हणणार्‍या वरुण आणि गुंड्याभाऊंचे समर्थन करतो.

मी राव,

सार्‍या सदस्यांना आपलं लिखाण आवडल्यावरही जर संपादकाचा,मालकाचा एखादा कौतुकाचा शब्द आला तर होणारा आनंद अवर्णनीय असतो.

मालकाने त्याच्या संकेतस्थळावर जे लोक चांगले लेखन करत असतात त्यांना दाद द्यायला हरकत नाही. आमच्या माहितीचे एक संकेतस्थळ आहे. तिथेही अनेक मंडळी चांगले लेखन करत असतात. परंतु मालकाची भलावण/भलामण करणार्‍या किंवा जी काही मालकांची खास माणसं आहेत, फक्त त्यांच्याच लेखनाला मालकांनी आवर्जून दाद दिली आहे, असा एक 'मामला' नुकताच आमच्यासमोर आला आहे! ;)

हो. केलेच पाहिजेत. लपून कसले वार करता. समोर येऊन करा ना!

ऐ शाब्बास! ;)

मीराव, आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

तात्या.

संत तात्याबांनी 'उन्हाळ्यात त्वचेची काळजी' या विषयावर हवाईसुंदर्‍यांचे दोन दिवसीय शिबीर घेतले!

मी?

४) संपादक मंडळात कोण कोण मंडळी आहेत त्यांची नांवं आपण जाहीर कराल काय?

हो. केलेच पाहिजेत. लपून कसले वार करता. समोर येऊन करा ना!
(माझ्या आवडत्या ठिकाणि हे नाव (आय्.डी.) बर्‍याचदा जाहीर असते.)
आपण या मताचा हिरिरीने पाठपुरावा करता आहात पण "असे एक स्थळ माझ्या पाहण्यात आहे." हे कोणते स्थळ ते आम्हा इच्छुकांना सांगत नाही.

कदाचित् तुम्ही आडून् आडून ते सांगत आहात..कुणाला घाबरता काय?

माझे मत

१) आपण जर एखाद्या संकेतस्थळाचे चालकमालक असाल तर आपल्या संकेतस्थळावरील सभासदामुळेच आपल्या संकेतस्थळाला शोभा आहे असं आपल्याला वाटेल का?

संस्थळ (संकेतस्थळासाठी उपक्रमवर भेटलेले नवीन नाव) वर जर सदस्यच नसले तर ? हा विचार केला की लगेच कळेल, खरच सदस्यांमुळेच संस्थळाला शोभा आहे.

२) आपल्या संकेतस्थळावर सभासदांनी अधिकाधिक लेखन करावं म्हणून आपण काही प्रोत्साहनपर उपाय कराल का? कराल तर कोणते?
हो ! सदस्यांसाठी लेखन स्पर्धा घेतली होती ह्या महीन्याच्या २० तारखेला दोन्ही विजेत्या सदस्यांना त्यांची माझे शब्द कडून भेत मिळेलच.

३) इतर कुठल्या संकेतस्थळावर एखादा चांगला लिहिणारा/लिहिणारी असेल तर त्याला/तिला आपण स्वतःहून आपल्या संकेतस्थळावर लिहिण्यासाठी बोलावणं कराल का?

बोलवणार नाही पण आपल्या संस्थळाची माहीती जरुर त्यांच्यापर्यंत पोहचवेन , जसे मी मनोगतवर, Orkut वर माझे शब्द ची माहीती प्रसिध्द केली होती / करत आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या संस्थळाची माहीती ही पोहचावयास हवी.

४) संपादक मंडळात कोण कोण मंडळी आहेत त्यांची नांवं आपण जाहीर कराल काय?
जाहीर केले आहे, व जाहीर असावी ह्या मताचा मी आहे.

४) वेळोवेळी एखाद्या सभासदाला संपादक मंडळात स्थान द्यावे, किंवा संपादक मंडळातील एखाद्याचा संपादकीय दर्जा काढून त्याला पुन्हा साधा सभासद बनवणे असे काही टाईमबेसड् उपाय आपण कराल का?
हो नवनवीन सदस्यांना ह्यात प्रवेश दिला जावा ह्या मताचा मी देखील आहे.

राज जैन

धन्यवाद,

राज साहेब,

विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

अरे हे काय?

अरे हे काय रे असं होतंय? प्रतिसाद एकमेकात गुंतत चालले आहेत. गुंड्याभाऊ, तुझ्या सहीला तो टॅग का काय म्हणतात तो लाव पाहू!

तात्या.

काही विचार माझेही.

आपण जर एखाद्या संकेतस्थळाचे चालकमालक असाल तर आपल्या संकेतस्थळावरील सभासदामुळेच आपल्या संकेतस्थळाला शोभा आहे असं आपल्याला वाटेल का?
होय.(मी माझ्या ब्लॉग चा चालक का लेखक आहे http://maaaymarathi.blogspot.com सभासदांच्या मतांची किंमत मला कळली आहे. )
आपल्या संकेतस्थळावर सभासदांनी अधिकाधिक लेखन करावं म्हणून आपण काही प्रोत्साहनपर उपाय कराल का? कराल तर कोणते?
ठराविक विषयांपेक्षा वेगळे लिहिण्यांसाठी माहितीची देवाणघेवाणीची ,कविता,ललित,व्यक्तीचित्रे,स्पर्धा ठेवेन व इतरांनी उत्तम लेख कोणता त्यावर मतदान करावे.व इतरांनीही त्याप्रमाणे लिहावे.या साठी महिन्याला एक शिबिर घेइन.त्याला आम्ही स्नेह मिलन असे म्हणू.त्यात उत्तम लेखकाला वक्ता करु व त्यांना वीस मी.बोलण्याची संधी देऊ. त्याच बरोबर.शंभर रु बक्षीस अन (बूके)फुलांचा गुच्छ देऊ.
इतर कुठल्या संकेतस्थळावर एखादा चांगला लिहिणारा/लिहिणारी असेल तर त्याला/तिला आपण स्वतःहून आपल्या संकेतस्थळावर लिहिण्यासाठी बोलावणं कराल का?
नो कॊमेन्ट्स.
संपादक मंडळात कोण कोण मंडळी आहेत त्यांची नांवं आपण जाहीर कराल काय?
होय.(दर आठवड्याला हे संपादक मंडळ बदलत राहील.)

वेळोवेळी एखाद्या सभासदाला संपादक मंडळात स्थान द्यावे, किंवा संपादक मंडळातील एखाद्याचा संपादकीय दर्जा काढून त्याला पुन्हा साधा सभासद बनवणे असे काही टाईमबेसड् उपाय आपण कराल का?
होय.

लिहिण्यासाठी प्रोत्साहीत केले धन्यवाद.

^ वर