प्रमाणदंड

परवा झालेला अजय-अतुल "लाइव्ह-इन-कॉन्सर्ट" कार्यक्रम ज्यांनी पाहिला असेल ते ५०००० ++ लोकं, एका ठिकाणी येऊन एका अतिभव्य अशा नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहून, श्रवणीय संगीतानंद घेणे म्हणजे काय असते ह्याची चर्चा येते काही दिवस नक्कीच करत राहतील.

अजय-अतुलच्या चाली, त्यांचा ऑर्केस्ट्रा, हे सगळं सगळ्यांना माहिती आहेच पण मला खासकरुन आवडले ते म्हणजे, ह्या कार्यक्रमाची आखणी, सामुहीक इंप्लिमेंटेशन, नियोजनपुर्वक केलेल्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी, हे सगळं-सगळं अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाच्या आखणीसाठी आदर्शवत होतं. काही ग्लिचेस् आले पण ते फार विषेश नव्हते. एकंदरीत कार्यक्रम कायमचा आठवणीत राहील असाच झाला.

ह्या जोडगोळीला ट्रेंड-सेटलर्स अशी पदवी तर मिळालीच आहे; ती सार्थच आहे!

लेखनविषय: दुवे:

Comments

कुठे ?

कुठे झाला हा कार्यक्रम

पुण्यनगरी

पुणे!

प्रयोजन?

परवा झालेला अजय-अतुल "लाइव्ह-इन-कॉन्सर्ट" कार्यक्रम ज्यांनी पाहिला असेल ते ५०००० ++ लोकं, एका ठिकाणी येऊन एका अतिभव्य अशा नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहून, श्रवणीय संगीतानंद घेणे म्हणजे काय असते ह्याची चर्चा येते काही दिवस नक्कीच करत राहतील.

त्यापैकी नेमके किती लोक उपक्रमावर आहेत हे कळले नाही. मी तरी हा कार्यक्रम पाहिला नाही त्यामुळे तेथे नेमके काय झाले याची सविस्तर माहिती आवडली असती.

अजय-अतुलच्या चाली, त्यांचा ऑर्केस्ट्रा, हे सगळं सगळ्यांना माहिती आहेच पण मला खासकरुन आवडले ते म्हणजे, ह्या कार्यक्रमाची आखणी, सामुहीक इंप्लिमेंटेशन, नियोजनपुर्वक केलेल्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी, हे सगळं-सगळं अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाच्या आखणीसाठी आदर्शवत होतं.

म्हणजे कसे ते सविस्तर लिहावे. असे त्रोटक लेख उपक्रमावर टाकण्याचे प्रयोजन कळत नाही.

खरे आहे

सहमत आहे. तुमच्या प्रतिसादामुळे मी पुण्या-मुंबईबाहेरच्या जगाचा विचार करणे सोडून दिले आहे की काय असे वाटले. वाचकांनी अधिक माहिती साठी खालील बातमी वाचावी.-
पुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही !

हेच बोल्तो.

>>>>मी तरी हा कार्यक्रम पाहिला नाही त्यामुळे तेथे नेमके काय झाले याची सविस्तर माहिती आवडली असती.

-दिलीप बिरुटे

पुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही !

पुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही ! - ह्या वरील लिंकेवर माहिती आहे

+१

तेच् तेच्... मी पण् मी पण्... हा का. ब. ना.
________________________________________________
गॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे
त्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.

व्यवस्थापनाचे पैलू

पार्कींग, वाहतूक, प्रसाधनगृह, स्टॉल्स, रांगा असे नानाविध पैलू या व्यवस्थापनाच्या मागे असणार. जमल्यास कृपया त्यांवर प्रकाश टाकावा. मी जालावर शोधायचा प्रयत्न केला पण सापडले नाही.
पी एम टी ने जादा बसेस सोडल्या का?
रांगेने कसे सोडले, किती प्रवेशद्वारे होती?

पैलू

पार्कींगवरच मी पहील्यांदा खुश झालो. प्रत्येक तिकीट किंमतीनुसार त्यांनी पार्कींग लॉट दिले होते. ठिकठिकाणी पाट्या, मार्गदर्शक लावले होते. रस्त्यावर अनेक व्हॉलंटीयर्स उभे राहून येणा-या प्रत्येक गाडीला मार्गदर्शन करत होते.

ऑनलाइन तिकीट घेतल्यानंतर त्या तिकीटाची रीसीट प्रिंट करुन बरोबर आणण्यास सांगितले होते. ती प्रिंट दाखवुन मला बालेवाडीत तिकीट मिळणार होते. माझ्या नावाचे तिकीट तेथे तयार होते. ओळखपत्र दाखवुन त्यांनी १ मिनिटात तिकीट हवाली केले. मी तासभर आधी गेलो होतो. त्यामुळे मला खूप पुढची सीट मिळाली.

प्रसाधन्गृहे योग्य त्या संखेत स्त्री-पुरुषांसाठी होती. स्टॉल्सवर जंक फुड होते व ते वाटायला - विकायला विक्रेते ठेवले होते, जे जागेवर येऊन माल विकत होते. किंमती अर्थातच ४ पट जास्त होत्या.

सिक्युरीटीसाठी बॉऊन्सर्स होते, पोलिस बंदोबस्त होता, व शेकडो व्हॉलंटीयर्स होते. त्यांना ते काय काम करणे आवश्यक आहे ते नीट माहीती होते. कार्यक्र्म फुटबॉल ग्राऊंडावर झाला. सगळ्या ग्राऊंडावर लाइट लावले होते त्यामुळे श्रवणेक्षक (श्रोते + प्रेक्षक) अंधारात नव्हते, जे सिक्युरीटीच्या दृष्टीने घातक ठरले असते.

प्रवेशव्दारे जितके तिकीटप्रकार होते, तितक्याप्रमाणात होते. कमी किंमतीच्या तिकीटांना लाइनी होत्या असे कळते- पाहीले नाही. पीएमटीने असे काही कार्य करावे असे तुम्हाला का वाटले?

वरील प्रतिसादात सकाळमधील बातमीचा दुवा दिला आहे.

धन्यवाद

विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मला माहीत नव्हते शो केव्हा होता. म्हणून बससेवा होती का विचारले. पण सहसा असे शो संध्याकाळी असतात म्हणा.
वरील बातमीचा दुवा पाहीला. परंतु त्यात डोळसपणाने व्यवस्थापनाविषयी कमी माहीती दिली आहे. जास्त कव्हरेज मनोरंजनविषयक आहे असे मला वाटले. आपण या समारंभाकडे व्यवस्थापन (एव्हेन्ट मॅनेजमेन्ट) या वेगळ्याच दृष्टीकोनातून पहात आहात त्याबद्दल कौतुक वाटले.

पी यम् पी यम् यल्

पी एम् पी एम् एल्... पुणे महानगरपालिका परीवहन् महमंडळ लिमिटेड्
________________________________________________
गॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे
त्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.

टू-पीस

हा टू-पीस उपक्रमावर चुकून टाकला गेला आहे की काय! प्रयोजन कळले नाही. ललितही नाही आणि माहितीप्रधानही. असो. ट्रेंड सेटलर्ज़ म्हणजे काय ते कळले नाही. ट्रेंड सेटर्ज़ म्हणायचे असावे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ट्रेंड सेटर्ज़

--" ट्रेंड सेटलर्ज़ म्हणजे काय ते कळले नाही. ट्रेंड सेटर्ज़ म्हणायचे असावे."--

खरे आहे तुमचे म्हणणे. ट्रेंड सेटर्ज़ म्हणायचे होते.
--प्रयोजन कळले नाही. --
माहिती देणे.

मफलिश धागा

माहिती देणे.

हो, हो, हो. पण माहिती कशाची दिली आहे, किती दिली आहे, आणि ती कशी दिली आहे ते बघायला हवे ना. फारच मफलिश आहे हो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

खूप माहिती

--पण माहिती कशाची दिली आहे, किती दिली आहे, आणि ती कशी दिली --
खूप माहिती दिली की धागे मफलिश (का काय्) होत नसतात का?

किती म्हणजे किती?
कशी म्हणजे कशी?
कशाची म्हणजे कशाची?

वा - अधिक वर्णन करा ही विनंती

वा - अधिक वर्णन करावे, ही विनंती.

पुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही !

पुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही ! - ह्या वरील लिंकेवर माहिती आहे
येथे- लिंक- "पुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही !">

पकाऊ

मजकूर संपादित.

On 30-01-2011 10:36 PM ramesh g said:
ढिसाळ आयोजनाचा चांगलाच फटका बसला , बर्याच वेळेला अजय अतुल ना प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागत होते.

On 30/01/2011 08:39 AM अमोल said:
...
Stage खूपच खाली होते.तेच जर १० ft वर आणि sloping असतं तर मागच्या लोकांना नीट दिसले असते. ३-४ toilets आणखी हवे होते. नको ते मोठे halogens लावले होते ज्यामुळे screen नीट दिसत न्हवते. आणि हो बर्याच वेळेला screen बंदच होत्या. Anchor चांगला असायला हवा होता.

असे प्रतिसाद तेथे आहेत. त्यावर तुमचे काय मत आहे?

तृटी

मला वाटलेच, अजुन कसे लोकांना त्यातील तृटी दिसत नाहीत. ती कोणत्या कार्यक्रमात नसते? आणि मी ही "काही ग्लिचेस होते" असे वर म्हणालोच आहे. लगेच् त्यास पकावुअ म्हणून त्याचे महत्व कमी करण्याचा का प्रय्त्न केला जातोय समजले नाही.

महत्व

मी चर्चेलाच पकाऊ म्हटले.
तुम्ही ज्या मुद्यांवर स्तुती केली त्या मुद्यांवरही संदेह आहे, उदा. प्रसाधनगृहे कमी होती असे काहींचे मत दिसले. इतर काही अतिरिक्त ग्लिचेस असो/नसोत, पण तुमच्या निरीक्षणांविषयीच शंका आहे. (कदाचित, केवळ अधिक पैसेवाल्या खुर्च्यांसाठीच चांगली व्यवस्था असेल.)

शंका?

--पण तुमच्या निरीक्षणांविषयीच शंका आहे-
कायकाय शंका आहेत?

मलाही

--तुम्ही ज्या मुद्यांवर स्तुती केली त्या मुद्यांवरही संदेह आहे,--

तुम्ही ज्या पद्ध्तीने प्रतिसाद देताय त्यावरुन मला तुमच्या प्रतिसादातील हेतूंविषयी संदेह आहे.

अभिनंदन

ह्या कार्यक्रमाची आखणी, सामुहीक इंप्लिमेंटेशन, नियोजनपुर्वक केलेल्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी, हे सगळं-सगळं अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाच्या आखणीसाठी आदर्शवत होतं.

मागे तुम्ही आयोजन नियोजन संबर्धात् धागा काढला होता त्याचा फायदा झालेला दिसतो. अभिनंदन. ;-)

-Nile

नस पकडलीत

नाइलसाहेब, तुम्ही नस पकडलीत. मला त्यामुळेच हा कार्यक्रम् आवडला.

धागा हलवायला हवा

मागे तुम्ही आयोजन नियोजन संबर्धात् धागा काढला होता त्याचा फायदा झालेला दिसतो. अभिनंदन. ;-)

हा धागादेखील तिकडे हलवायला हवा असे वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

का?

-- हा धागादेखील तिकडे हलवायला हवा असे वाटते.--
येथेच राहील्याने काय होणार आहे?

'ट्रेंड सेटल' करायचा आहे का?

येथेच राहील्याने काय होणार आहे?
का? तुम्हाला 'ट्रेंड सेटल' करायचा आहे का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तुम्हाला ?

--का? तुम्हाला 'ट्रेंड सेटल' करायचा आहे का?
मी येथे चर्चा टाकलीये. तुम्ही ती येथून दुसरीकडे नेण्याचा प्रस्ताव करत अहात. तुम्हाला ट्रेंड सेटल करायचा आहे का?

 
^ वर