संख्या

मित्र हो,
आपण संख्यांपासून सुरुवात करू. मला काही प्रश्न आहेत.

संख्यांचे प्रकार कोणते?
० ते ९ याला कोणत्या प्रकारच्या संख्या म्हणायच्या?

शाळेत हे सगळं काही शिकलो होतो. पण आता गंज चढला आहे. मदत करा परत् एकदा शिकायला...

लेखनविषय: दुवे:

Comments

नैसर्गिक

० ते ९ यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात.

मग, पूर्ण संख्यांचा संच आणि नैसर्गिक संख्या यामधे फक्त ० एवढाच फरक आहे का? असे का? शून्य या संख्ये बद्दल कोणी माहिती देउ शकेल का?

शून्य..

शून्य या संख्ये बद्दल कोणी माहिती देउ शकेल का?

अरे बाबा चाणक्या,

"आयुष्यभर झगडलो, खपलो, खस्ता खाल्ल्या, पण हाती काय राहिलं?? तर एक मोठ्ठं शून्य!"

असं काही मंडळी म्हणतात ना? तोच अर्थ आहे रे बाबा शून्याचा!

असो, तुम्हा मंडळींच्या शून्याच्या गणिती व्याख्या चालू द्या! मला त्याही वाचायला आवडतील..

आपला,
(शून्यात नजर लावलेला!) तात्या.

शून्य

विसोबा,

>"आयुष्यभर झगडलो, खपलो, खस्ता खाल्ल्या, पण हाती काय राहिलं?? तर एक मोठ्ठं शून्य!"

या वाक्यातून एक मस्त गोष्ट पुढे आली आहे हे तुम्हाला कळलं का? 'झगडलो, खपलो, खस्ता खाल्ल्या' या गोष्टी जरी काहिशा निराशावादी दिसत असल्या तरीही शेवटी हाती आलेल्या 'शून्या'ने मात्र कमाल केली आहे. कारण इतक्या गोष्टी नकारात्मक ( म्हणजेच ऋण/उणे ) असूनही हाती 'ऋण' राहिलं नाहीये तर 'शून्य' राहिलं आहे म्हणजेच हे 'ऋण' फिटण्यासाठी आवश्यक सकारात्मक ( म्हणजेच धन ) गोष्टी संबंधित व्यक्तीला मिळालेल्या आहेत हेच ती व्यक्ती सरळ तसं न सांगता कबूल करतेय. नाही का?

- वेदश्री.

उत्तरे देण्याचा प्रयत्न

>मग, पूर्ण संख्यांचा संच आणि नैसर्गिक संख्या यामधे फक्त ० एवढाच फरक आहे का?

हो.

>असे का?

नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या सर्वात आधी वापरात आणल्या गेल्या अशा संख्या. शून्य ही मोजसंख्या नाही आणि म्हणूनच ती नैसर्गिक संख्यांमध्ये अंतर्भूत केली गेली नसावी. 'मोजायला काहीही नसणे' म्हणजे शून्य ही संकल्पना नंतर आली आणि या संख्येला सामावून घेण्यासाठी पूर्ण संख्यासंच अस्तित्वात आणला गेला.

- वेदश्री.

नैसर्गिक संख्या

संख्याचे प्रकार असे
नैसर्गिक संख्या- १, २, ३, ४, ५,... (केवळ १-९ नव्हे)
पूर्ण संख्या- ०, १, २, ३, ४,...
पूर्णांक- ...-३, -२, -१, ०, १, २, ३,...
परिमेय संख्या- ज्या संख्या अ/ ब अशा लिहीता येतात अ आणि ब हे पुर्णांक आहेत. उदा. ३/६, ३०५०३९२/ (-५६०) = ज्या संख्याचे दशांश रुप आवर्ती असते, किंवा मर्यादीत असते.
अपरिमेय संख्या- ज्या संख्या लिहीताना त्यांचे दशांश स्थळानंतरचे अंक आवर्ती नसतात (decimal expansion is not recurring), उदा. २.१२१२२१२२२१२२२२... (ईथे २ ची संख्या वाढतेय)
वास्तव संख्या- ह्या संख्या रेषेवर काढता येतात नि परिमेय व अपरिमेय संख्या मिळून ह्या बनतात
काल्पनिक संख्या- ज्या अ*(-१चे वर्गमुळ) अशा असतात, अ ही एक वास्तव संख्या आहे. (-१च्या वर्गमुळासाठी i वापरतात) उदा. ४i
Complex Numbers- अ + ब*(-१चे वर्गमुळ) अशा संख्या, अ नि ब ह्या वास्तव संख्या आहेत. उदा. १.५+४i

याही पुढे क्वाटर्निअन्स व हँमिल्टोनिअन असतात, पण ते काही ईथे फार महत्वाचे नाही..!

प्रत्येक नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असते,
प्रत्येक पूर्ण संख्या, पूर्णांक असतो,
प्रत्येक पूर्णांक असतो, प्रत्येक वास्तव संख्या असतो
प्रत्येक वास्तव संख्या, असते Complex Number असते...

आणि परिमेय संख्य ही कधीच अपरिमेय नसते व उलट...
:-o

- आपला चिंटू

अधिक माहिती

धन्यवाद.
काही अपरिमेय संख्यांना ट्रान्सेंडेंटल संख्या म्हणतात. त्या अमोजणीय अनंत (अन्काऊंटेबली इन्फायनाईट) असतात. ट्रान्सेंडेंटल संख्यांना मराठीत काय म्हणावे? अ-बीजगणिती?
बीजगणितीय संख्या (सर्व परिमेय आणि काही अपरिमेय) मोजणीय अनंत असतात. 'कोणत्या-ना-कोणत्यातरी परिमेय बीजगणिती समीकरणाची उकल' या स्वरूपात सर्वच बीजगणिती संख्या व्यक्त करता येतात ही त्यांची व्याख्या आहे.
उदा., अबीजगणिती संख्या: pi, e.
बीजगणिती संख्या: √२.

ट्रान्सेंडेंटल संख्या

ट्रान्सेंडेंटल संख्यांना मराठीत काय म्हणावे? अ-बीजगणिती?

अ-बीजगणिती संख्या हे ना योग्या वाटते, कारण त्या कोणात्याच परिमेय सहगुणक असणार्या बहुपदीची उकल नसतात.

एके ठिकाणी "गणितातील नसुटलेले प्रश्न कोणते" अश्या मथळ्याचा लेख वाचनात आला होता.
एक असाच प्रसिद्ध प्रश्न म्हणजे

(pi)^e (पायचा ई वा घात) बीजगणितीय आहे की अबीजगणितीय.
खुप छोटा प्रश्न आहे, पण अजून उत्तर माहीत नाही..! कयास असा आहे की ही वास्तव संख्या अबीजगणितीय असावी.

- आपला चिंटू

सम - विषम

१)२, ४, ६, आदी २ ने पुर्ण भाग जाणार्‍या संखेला सम संख्या म्हणायचे , तर दोन ने पुर्ण भाग न जाणार्‍या संखेला विषम संख्या म्हणायचे.

२)एखाद्या संखेला त्याच संख्येशिवाय इतर कुठल्याच संख्येने पुर्ण भाग जात नसल्यास ती संख्या मुळ संख्या म्हणवते. जसे २,५,७,११,१३,१७ आदी.

नीलकांत

सम-विषम आणि मूळ संख्या

सम संख्या - ज्या नैसर्गिक संख्यांना २ ने नि:शेष भाग जातो त्या संख्या सम संख्या होय.

विषम संख्या - ज्या नैसर्गिक संख्यांना २ ने नि:शेष भाग जात नाही त्या संख्या विषम संख्या होय. ( अपवाद : १ )

मूळ संख्या - ज्या नैसर्गिक संख्यांना तीच संख्या अथवा १ व्यतिरिक्त अजून कुठल्याही नैसर्गिक संख्येने नि:शेष भाग जात नाही, अशी संख्या म्हणजे मूळ संख्या होय.

'पूर्ण भाग जाणे' आणि 'नि:शेष भाग जाणे' यात फरक आहे, असे मला वाटते.

- वेदश्री.

च्यामारी..

च्यामारी,

गणीत गणीत काय् लावलाय रे पोरांनो? ;)

ह्या घ्या माझ्याही दोन टीपा!

१) ज्या अंकाच्या एकम स्थानी ० किंवा ५ असतात त्याला ५ ने पूर्ण भाग जातो.
२) ज्या अंकाच्या आकड्याची बेरीज तीनाच्या पाढ्यात येते त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो.

आपला,
(आर्यभट्ट्) तात्या.

:-)

: - )

उणे

बर, मग उणे संख्यांचा उगम कसा झाला बरे? शाळेत असताना त्या प्राथमिक शाळेत शिकवल्या गेल्या नाहीत्.. असे का?

उणे संख्या

वजाबाकी करताना लहान संख्येतून मोठ्या संख्येला वजा केल्यास काय होईल? यातून ऋण (उणे) संख्यांचा उगम झाला.
उदा. ४ - ६ = -२ इत्यादि.
......., -५,-४, -३, -२, -१ या संख्यासंचाला ॠण संख्या म्हणतात.

...., -३, -२, -१, ० , १, २, ३,...... या संचाला पूर्णांक म्हणतात.

 
^ वर