उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
ग्यानबाची मेख
उत्सुक
January 18, 2011 - 1:26 pm
एखाद्या विद्यार्थ्याने दोन वर्षे कालावधी असणार्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि काही महिन्यात विद्यालय सोडले,तर सदर विद्यालय कागदपञांची अडवणुक करु शकते का?प्रथम वर्ष ऊत्तीर्ण नसताना द्वितीय वर्षाचे शुल्क मागु शकतात काय? कृपया माहिती कळवा...
दुवे:
Comments
अवघड आहे.
>>>सदर विद्यालय कागदपञांची अडवणुक करु शकते का?
हो. काही कारणाने विद्यालय विद्यार्थ्याची कागदपत्रासाठी अडवणूक करु शकते.
>>>प्रथम वर्ष ऊत्तीर्ण नसताना द्वितीय वर्षाचे शुल्क मागु शकतात काय ?
प्रथम वर्ष उत्तीर्ण नसतांना द्वितीय वर्षाचे शुल्क मागणे चूकीचेच आहे.
बाकी, विद्यार्थ्याची डिटेल केस कळवा. कोणत्या शाखेचा विद्यार्थी आहे. द्वितीय वर्षाची शुल्क कोणत्या कारणाने ते मागत आहे. वगैरे.
अशा अर्धवट माहितीवर आपल्या प्रश्नाची उत्तरे देणे अवघड आहे.
-दिलीप बिरुटे
सामान्य
अहो त्याने एखाद्या अस विचारलय् म्हणजे जनरलाइज्ड केस आहे. उत्तर पण जनरलाइज्ड असल पाहिजे.
व्यक्तिगत् चौकशी का??
जनरलाइज्ड उत्तर दिलं आहे.
अहो, विद्यालय एखाद्या विद्यार्थ्याची अड्वणूक करु शकतात काय ?
याचं उत्तर मी जनरलाइज्ड दिलं आहेच की, विद्यालय अडवणूक करु शकतात.
>>>व्यक्तिगत् चौकशी का ??
व्यक्तिगत चौकशी म्हणजे त्याच्या प्रवेशाबद्दलची माहिती अपेक्षित आहे. उदाहरणार्थ तो प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी असेल आणि त्याने प्रवेश घेतांना पूर्ण शुल्क भरले नसेल तर त्याला राहिलेले शुल्क भरल्याशिवाय विद्यालय त्याला कागदपत्रे देणार नाहीत, या अर्थाने विद्यार्थ्याची डिटेल केस असे म्हणालो होतो.
-दिलीप बिरुटे
हक्क
>>>प्रथम वर्ष ऊत्तीर्ण नसताना द्वितीय वर्षाचे शुल्क मागु शकतात काय ?
प्रथम वर्ष उत्तीर्ण नसतांना द्वितीय वर्षाचे शुल्क मागणे चूकीचेच आहे.
इथे तसा त्याना हक्क आहे का यावर उत्तर अपेक्षित् असताना चुक् का बरोबर् ते आपण का सांगितले?
तो प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी असेल आणि त्याने प्रवेश घेतांना पूर्ण शुल्क भरले नसेल तर त्याला राहिलेले शुल्क भरल्याशिवाय विद्यालय त्याला कागदपत्रे देणार नाहीत, या अर्थाने विद्यार्थ्याची डिटेल केस असे म्हणालो होतो.
याची आपल्याला का आवश्यकता भासली?? मुळात तो प्रथम वर्षच् उत्तीर्ण नाहीय ना?? आणि प्रवेश दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठि घेतलेला आहे.
आपण बरोबर आहात.
>>>प्रथम वर्ष उत्तीर्ण नसतांना द्वितीय वर्षाचे शुल्क मागणे चूकीचेच आहे.
इथे तसा त्याना हक्क आहे का यावर उत्तर अपेक्षित् असताना चुक् का बरोबर् ते आपण का सांगितले?
क्षमा असावी माझी फार मोठी घोडचूक झाली हे माझ्या लक्षात आले आहे.
>>>मुळात तो प्रथम वर्षच् उत्तीर्ण नाहीय ना?? आणि प्रवेश दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठि घेतलेला आहे.
आपले बरोबर आहे. आपला प्रश्न समजून घेण्यात माझीच चूक होत आहे.
च्यायला, प्रतिसाद लिहून झक मारली असे वाटत आहे. :)
-दिलीप बिरुटे
मी पण
आपले बरोबर आहे. आपला प्रश्न समजून घेण्यात माझीच चूक होत आहे.
च्यायला, प्रतिसाद लिहून झक मारली असे वाटत आहे. :)
>>> आपला प्रश्न??? आइला तो कोण्तो उत्सुक ग्यानबाची का काय ती मेख टाकुन् कुठे दडी मारुन बसलाय कुणास् ठाउक?? आणि बिल माझ्या नावावर टाकले जात आहे. झक्क मारालि मी सुद्धा प्रतिसाद देउन. :)