चेंगरी

एखाद्या मंदीराच्या जत्रेत चेंगरी होऊन भाविक दगावण्यासारख्या घटना भारतात नव्या नाहीत. गेल्या १० वर्षात आठवणीनुसार ४ वेळा तरी हे घडले आहे. प्रत्येक ठिकाणी गर्दी-संख्यानियंत्रण कसे केले पाहीजे ह्याचे भान अजिबात न ठेवल्यामुळे निरपराध व्यक्तिंना प्राण गमवावे लागले आहे.

वर्षानुवर्षे चालत आलेल्या सोहळ्यातील पुर्वींची भाविकांची संख्या व सध्याची संख्या ह्याचा संबंध मंदीराशी संबंधीत असलेल्यांना का लावता येत नाही हे समजणे अवघड नाही, कारण भारतातील लोकांची एकंदरीत गर्दी "व्यवस्था"पना आणि सुरक्षेविषयक अनास्था व कॉमनसेन्सचा अभाव.

तुम्ही एखाद्या प्रसिद्ध मंदीराला भेट द्याल तेव्हा पहा रांगा लावण्यासाठी केलेली व्यवस्था कशी ढिसाळ असते. रेलींगला वेल्डींगची "बर" तशीच असते, जोडणी तकलादू असते, श्वास घेण्यास शुद्ध हवा मिळेल ह्याची खात्री नसते. अत्यंत घाण, निसरड्या फरशा, उन्हात फरशा तापून पायाला चटके बसवण्याची व्यवस्था असते. थोडक्यात, कुठलाही विचार न करता काहीही केलेले आढळते.

ह्या सगळ्यावर सरकारी नियंत्रण आणणे म्हणजे, आणखी विलंब. त्यामुळे ज्यांना आर्कीटेक्टरचे ज्ञान असेल व जे त्या देवाचे भाविक असतील त्यांनी अशा त्रुट्या ओळखुन त्या-त्या मंदीर व्यवस्थापनाला स्वस्तातील पर्याय देणे आवश्यक आहे. असे सातत्याने घडत गेले की, लोकशिक्षण होऊ शकते. काय वाटते उपक्रमीयांना?

लेखनविषय: दुवे:

Comments

द्रुतगति मार्ग

लोकशिक्षण केले तर 'भाविक' कमी होऊ शकतील. उलट, अशा घटनांमुळे स्थानाला प्रसिद्धीच मिळत असावी. लोकांचे जीव वाचवून व्यवस्थापकांना काही लाभ होईल काय?
त्यापेक्षा, सरकारने केवळ निरीक्षकाचे काम करावे, सरकारचे (म्हणजे करदात्यांचे) पैसे मृतांसाठी खर्च होतात. त्यामुळे, व्यवस्थापनाने जेथे पुरेशी सुरक्षित व्यवस्था केली नसल्याचे सरकारला दिसेल तेथे गर्दी करू इच्छिणार्‍यांकडून डिस्क्लेमरवर सह्या केल्याशिवाय प्रवेश देऊ नये.

१५० कोटी (काऊंटींग)

१५० कोटी (काऊंटींग) लोकसंख्या असलेल्या देशात गि-हाइकांची वानवा होऊ नये. जर उद्या हा एक व्यवसाय म्हणून जर कोणी केला तर?

शंका

भाविकांसाठी हा देवाकडे जाण्याचा द्रुतगति मार्ग असेल तर?
नक्की ग्राहक कोण आहेत? भाविकांनी या व्यावसायिकांकडून तिकिटे विकत घेऊन सुरक्षितता मिळवावी असे अपेक्षित आहे की आयोजकांनी अशा व्यावसायिकांना काँट्रॅक्ट द्यावे असे अपेक्षित आहे?

मुलांचे रडवेले चेहरे

--भाविकांसाठी हा देवाकडे जाण्याचा द्रुतगति मार्ग असेल तर?--
हा, हे मात्र खरे आहे. पण पालक गमावलेल्या मुलांचे रडवेले चेहरे (टाइम्स् मधे रविवारी छापून आलेला) पाहून काळीज गलबलले.
--नक्की ग्राहक कोण आहेत?
भाविक
--भाविकांनी या व्यावसायिकांकडून तिकिटे विकत घेऊन सुरक्षितता मिळवावी असे अपेक्षित आहे --
ते तर देणगी देऊन ती फी देतातच. त्याच्या बदल्यात त्यांना ही सुरक्षा देणे अपेक्षित आहे.

--आयोजकांनी अशा व्यावसायिकांना काँट्रॅक्ट द्यावे असे अपेक्षित आहे?
नाही. माझा खुलासा तुम्हाला कंफ्युज करुन गेला. मीच नीट लिहायला हवे होते.
मला म्हणायचे होते की, जर एखाद्याने उद्या सुंदर मंदीर एखाद्या टेकडीवर बांधून "मंदीर-भाविक-देणग्या" हा एक व्यवसाय म्हणून जर केला तर त्यास मंदीर अक्ट लागू होणे अपेक्षित आहे. आणि ह्या नियमांत गि-हाईक सुरक्षा महत्वाची मानली जाणे अपेक्सित आहे.

देव्

हा व्यसाय झालाच् आहे. देव् त्यना बुद्धि देओ.

१० वर्षात आठवणीनुसार ४ वेळा

एका वर्षात चार वेळा असेल हो. दहा वर्षात अजुनच जास्तच.

नुकसान भरपाई, दंड शिक्षा इ इ रक्कम ही सगळी त्या त्या देवस्थानाकडूनच घेतली पाहीजे. सरकारी खजिन्यातुन नाही.

लोकांना अशी चेंगराचेंगरी होते याचे ज्ञान आहे. उद्या अगदी उत्तमोत्तम व्यवस्था जसे अगदी लेखाजोखा करुन मर्यादित लोकांना आत सोडणे इ केले तरी आपलीच लोक इतकी बेशीस्त व आपले तेच खरे करणारी आहेत की अशी व्यवस्था मोडीत काढतील. अर्थात म्हणून व्यवस्था करु नये असे म्हणणे नाही पण आपदकालीन सुरक्षा व्यवस्था इ. ची नीट पहाणी केल्याशिवाय परवानगी देउ नये. तरीही पैसे चारले किंवा वजन वापरुन काम करुन घेतले की त्याकडेही कानाडोळा होत असणार. त्यामुळे त्यातही त्रुटी रहाणार.

एकंदर समाजात शिस्त येत नाही तोवर्, सतत आपणच पुढे घुसाघुस न करता दुसर्‍यालाही जागा द्यावी अशी मनोवृत्ती येत नाही, तोवर हे असेच चालायचे.

राजकमल थिएटर

--नुकसान भरपाई, दंड शिक्षा इ इ रक्कम ही सगळी त्या त्या देवस्थानाकडूनच घेतली पाहीजे. सरकारी खजिन्यातुन नाही. --
सहमत
--उद्या अगदी उत्तमोत्तम व्यवस्था जसे अगदी लेखाजोखा करुन मर्यादित लोकांना आत सोडणे इ केले तरी आपलीच लोक इतकी बेशीस्त व आपले तेच खरे करणारी आहेत की अशी व्यवस्था मोडीत काढतील. --
असहमत.
ह्याबाबत मी जयपुरच्या राजकमल थिएटरचे उदाहरण देतो. तेथेही समाजातील कोणत्याही थरातील व्यक्ति चित्रपट पहायला जाते. तेथील स्वच्छता चांगली असते कारण तेथे प्रवेश करणा-याला तेथील उत्तमोत्तम गालिचे, सूम्दर रंगकाम पाहून घाण करावीशीच वाटत नसेल. स्वच्छता राखा असे मुद्दाम लिहून सांगण्याची गरजही नाही आणि हेच लोक जे बाहेर (व इतर थिएटरात) पचापचा थुंकतील पण राजकमल मधे नाही.
त्यामुळे व्यवस्था चांगली असेल तर लोक (अगदी अशिक्षीतही) त्यास रीस्पॉन्स देतो हे आणखीही उतर उदाहरणांवरुन सांगता येईल.

तिरुपतीचा चांगला अनुभव...

आम्ही चार वर्षांपूर्वी तिरुपतीला गेलो होतो. हजारो लोक तिथे दर्शनाचा पास घेऊन रांगेत पुढे पुढे सरकत असतात. मुख्य मंदिराच्या जवळ पोचलो असताना आमच्या पिल्लीने 'राष्ट्रीय कार्यक्रम' जाहीर केला. आता तिथून स्वच्छतागृह बरेच लांब होते. काय करावे? धर्मसंकटच. पण अशावेळी तिथले सुरक्षारक्षक आमच्या मदतीला आले. त्यांनी माझ्या पत्नीला एका साधा पास दिला. त्यावर देवस्थानचा शिक्का होता. माझी पत्नी मुलीला घेऊन गेली आणि अर्ध्या तासाने पुन्हा त्याच मार्गाने परतली. तो पास पाहिल्यावर तिला वाटेतील सर्व रक्षकांनी बाजूच्या रस्त्याने आम्ही होतो तिथे परतण्यास मदत केली. रांगेतील लोकांनाही हे माहित असते. त्यामुळे कुणीही ' ओ बाई! पुढे कुठे घुसताय?' असे शेरे मारले नाहीत.

शेगावलाही खूप शिस्तबद्ध व्यवस्था आहे. एकाच वेळी १००-२०० लोक एका टप्प्यावर थांबलेले असतात. तिथे स्वच्छतागृह व प्रथमोपचारांची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते. शिवाय स्वयंसेवकही आपुलकीने मदत करतात.

लोकप्रतिसाद

वरच्या प्रतिसादातील राजकमल थिएटराच्या उदाहरणातून मला हेच सांगायचे होते. व्यवस्था चांगली असेल तर लोक प्रतिसाद नक्कीच देतात.

असहमत

अगदी उलट अनुभव तिरूपती इथे आला. की परत इथे कशाला यावे असा प्रश्न पडावा असा.

बेंगलोर हून तिरूपतीला जाण्यासाठी आंध्र टूरिझची बससेवा आणि दर्शन अशी पॅकेज टूर आहे. सकाळी ५ च्या दर्शनासाठी नेले जाते. प्रत्येकी २००/- चे तिकीट हे पॅके़जमध्ये समाविष्ट असते. मी, माझी पत्नी, आई, बाबा आणि आजी (वय ७५+) असे गेलो होतो. तिथे आम्हाला तिकिटे देऊन रांगेत उभे रहा म्हणून सांगितले. तिकीटाच्या रकमेनुसार वेगवेगळ्या रांगा असतात असे ऐकून होतो. जिथे लोखंडी बार असलेल्या रांगा सुरू होतात तिथे सकाळी ४ वाजता प्रचंड गर्दी व ढकला-ढकली सुरू होती. पत्र्याची शेड असलेल्या त्या भागात ५-६ लोखंडी बार असलेल्या रांगा होत्या. त्यातली नेमकी कोणती किती रकमेची हे लिहिलेले नव्हते. (नंतर कळले की रकमेनुसार वेगवेगळ्या रांगा पुढे होत्या.) शिवाय सगळ्यांचे एकच तिकीट होते आणि तसेही चुकामूक होणे परवडणारे नव्हते. त्या लोखंडी रांगांपैकी काही रांगांमधूनच लोकांना सोडले जात होते. (का ते माहित नाही) पण हे सांगण्याची पद्धत म्हणजे एक खाकी गणवेशातला माणूस चुकीच्या रांगेत शिरणार्‍या लोकांना काठीने बडवत होता (ज्यात दुर्दैवाने माझ्या बाबांनाही मार बसला) तरीही लोक दुसर्‍या रांगेत घुसत होते. लोखंडी रांगांपर्यंत पोचताना आजीच्या अंगावर लोक पडतील की काय अशी अवस्था झाली होती. सुदैवाने असे झाले नाही.
पुढे रांगा सुरळीत होत्या पण या रांगांसाठी बांधलेल्या इमारतीमधून मुख्य देवळात रांग गेल्यावर पुन्हा तशीच गोंधळाची परिस्थिती, रेटारेटी सुरू होती. देवळाच्या मुख्य गाभार्‍यात रांगेत सारखे पुढे जाण्यासाठी धक्के दिले जातात. त्यासाठी खास माणसांची तिथे नेमणूक आहे.
कदाचीत भारतातील बाकी ठिकाणांपेक्षा इथे चांगली सोय असेल पण ती चांगली म्हणणे अवघड आहे. मुख्य म्हणजे रांग सुरू होतानाची परिस्थिती फार अवघड आहे.

- ओंकार.

व्यवस्थापन

गर्दीचे व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे हे खरेच. हा मुद्दा केवळ देवस्थानाला आणि तेथील गर्दीला लागू आहे असे नाही तर सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना जेथे गर्दी होते तेथे लागू आहे. सिनेमागृहात किंवा नाटकगृहात तिकिटविक्री करून एका मर्यादेपर्यंत अपेक्षित जमावालाच आमंत्रित केले जाते. त्यात भर म्हणजे एका दिवशी चित्रपटाचे अनेक खेळ केले जातात. अशा धर्तीवर सभांचे किंवा खेळांचे (स्पोर्टस) एके दिवशी अनेक खेळ करणे थोडे कठिण असले तरी मर्यादित जमावाला आधी पास किंवा तिकिटविक्री करून आमंत्रित करणे शक्य असते. अशा ठिकाणी चेंगराचेंगरीचे प्रकार कधीनाकधी होतात परंतु त्यांचे प्रमाण आटोक्यात राहते किंवा कमी असते.

देवस्थानांच्या बाबतही असे करणे आवश्यक आहे. त्याची प्रमुख जबाबदारी देवस्थानाने घ्यावी. (अर्थातच त्यानंतर सरकारनेही घ्यावी) वर योगप्रभू यांच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे रांगा, सुरक्षाव्यवस्था आणि सुरक्षारक्षक यांच्या सहाय्याने परिस्थिती आटोक्यात राहू शकते.

अवांतरः

त्रुटी या शब्दाचे अनेकवचन त्रुट्या असे होत नसावे, ते त्रुटीच राहते. चू. भू.दे. घे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ

--गर्दीचे व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे हे खरेच--
ह्या परीच्छेदातील पॉइंट योग्यच आहे. भाविकांची गर्दी शिर्डी, शनीशिंगणापूर सारख्या ठिकाणी ५ ते ६ लाखांच्या आसपास एखाद्या ठराविक दिवशी होत असते आणि अशाच एक्शेप्शनल दिवसांशी अशा घटना निगडीत असतात. त्यामुळे गर्दी नियंत्रण प्रभावीपणे करणे हेच जास्त प्र्याक्टीकल असते.
कुठल्याही आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज लाखांनी प्रवासी येत-जात असतात. युरोपातील एकाही विमानतळावर कुठल्याही प्रकारचा सावळा गोंधळ अनुभवायला मिळत नाही. (ज्यास एक्सर्ट्रनल कारण नाही). हे योग्य गर्दी नियंत्रणाचेच उदाहरण आहे. त्यासाठी योग्य आर्कीटेक्टचीच मदत घेऊन ह्या गोष्टी देवस्थानांनी करणे अत्यावश्यक बनत जाणार आहे. कारण प्रवासाची सुविधा वाढल्यांमुळे व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार असल्यामुळे अशा ठिकाणंवर जाणा-या भाविकांची संख्या वाढतच जाणार आहे.

सरकारी नियंत्रण नाही तरी ...........

सरकारी नियंत्रण नाही तरी तिरुमला देवस्थानम सारखी कमिटी हवी. ज्याचे नियंत्रण निवृत्त आय ए एस किवा सैन्य अधिका-याकडे हवे. अर्थात बहुतेक देवस्थानांना हे मुळीच करायचे नसते कारण मग अशा प्रोफेशनली मॅनेज्ड कमिटीला मोबदला द्यावा लागेल व त्यांची मिळकत कमी होईल. बहुतेक मंदीर कोणा एका कुटुंबाकडे पिढ्यांपिढ्यांची असते त्या मुळे त्यांना नुसता अर्थिक लाभ हवा असतो. देवाची भक्ती वगैरे काही नसते (तिरुपती, वैष्णोदेवी अशासारखी देवस्थाने सोडली तर). वैष्णोदेवीचे सुद्धा असेच हाल होते पण जगमोहन ह्यांनी ते दुर केले. मी एकदा उज्जैन जवळ ओमकारेश्वरला गेलो होतो, तेथे दोन कुटंब आहेत आलटून ताबा घेतात व प्रत्येक जण फक्त पैसे ओरपण्यात व्यस्त असतो. त्याचे पण हाल असेच आहे

 
^ वर