भाषणातील व्हर्टीकल्स

एखाद्याने केलेले भाषण वाचायची इच्छा आज अनेक वर्षाने झाली. अशी उत्सुकता निर्माण व्हायचे कारण होते, उत्तम कांबळे ह्यांच्या साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाबद्दल सर्वत्र ठळकपणे आलेला चांगला अभिप्राय! मेडीयनेही (सकाळेतर) ह्या भाषणाला "मोठ्या कॅनव्हासचे" (जुन्या मराठीतला "व्यापक दृष्टीकोन") म्हणले.

ह्या मोठ्या कॅनव्हासचे हे भाषण नक्की काय घेऊन येते? - अनेक विषय! साहीत्य संमेलनाच्या आशयात त्या भाषणातील अनेक विषय असावेत की नाही ह्यावर विषेश चर्चा होऊ शकते. पण अनेक मुद्दे आवडले ते असे- वैचारीक लेखनाला आलेली मरगळ, ग्रंथालयातील परीस्थिती, मराठी भाषेला लागलेली घरघर, वगैरे. "वगैरे" म्हणण्याचे कारण म्हणजे, ह्या चर्चेचा तो विषय नाही.

त्या भाषणात मला त्यातील व्हर्टीकल्स दिसत होते. ते अधुनमधून डोकावून जात, कधी एकमेकात मिसळत होते. त्यामुळे विचारात पडलो. भाषण-लिखाण ही एक कला असेलच, पण कुठल्यातरी अभ्यासक्रमातही घेतलेली असेल. खात्री आहे की, "आर्ट ऑफ स्पीच रायटींग" असा गुगल मारला की, ढीगभर अभारतीय संदर्भ मिळतील. त्यात कॉन्टेक्स्ट-सेन्सिटीव्हीटी कशी निवडायची, व्हर्टीकल्स कशी घ्यायची, ह्याबद्दल मला प्रश्न आहेत.

तसेच, श्रोत्यांना बाऊंसर जातील असे संदर्भ किती व कोणते घ्यावेत? ह्याबद्दल प्रश्न आहेत. ह्या बाऊंसरची उंची किती असावी म्हणजे अध्यक्षाच्या पोहोच व्यवस्थितपणे श्रोत्यांना कळेलसे कसे करायचे हा खर कळीचा मुद्दा आहे. - त्याचा विचार कसा करायचा?

उपक्रमींकडून मार्गदर्शनाची अपेक्षा!

लेखनविषय: दुवे:

Comments

टंकदोष

"उद्धव कांबळे" ऐवजी "उत्तम कांबळे" असे वाचावे. टंकदोषाबद्दल खेद आहे. इतर ठिकाणीही एक्दोन चुका आहेत पण त्या समजुन घेता येतात.

टंकदोष

टंकदोषाबद्दल खेद आहे.

टंकदोष की टंकनदोष?

संदर्भ

संदर्भ (प्रमाण) कुठे पहायला मिळेल?

विकी

येथे टंकण म्हणजे टायपिंग असे दिले आहे.

येथेटंक समूहास फाँट म्हणतात असे दिले आहे.

टायपो

पहीला दुवा हिंदी आहे, दुसरा मराठी, त्यामुळे संदीग्ध आहे. पण मला इंग्रजी शब्दच जास्त जवळचा वाटतोय- तोच मी दुरुस्ती म्हणून सुचवतो- टायपिंग मिस्टेक/ टायपो.

लेजिटमट प्रतिसाद

ह्या चर्चेला एकही लेजिटमट प्रतिसाद आला नाही अजुन!

वेगळा आणि चांगला विषय, अनोळखी संज्ञा

("व्हर्टिकल्स" ही संज्ञा मला ओळखीची नाही. चर्चाविषयात दोन वेगवेगळे मुद्दे असावेत, असे वाटते : [१] "बाउन्सर संदर्भ" - विषयाशी निगडित पण श्रोत्यांना अनोळखी असे संदर्भ, [२] "व्यापक दृष्टिकोन" - भाषणात अनेक धाग्यांची गुंफण केल्यामुळे आवाका कधी नको इतका मोठा होणे. या बाबतीत मनात थोडे विचार आले, ते लिहितो.)

- - -

संदर्भ : सांगणारा आणि ग्रहण करणारा या दोघांच्या सामायिक माहितीच्या स्रोतांच्या चौकटीत संवादातील मुद्दे बसवले, तर संवाद कार्यक्षम होतो. या हेतूने संदर्भ किती आणि कसे द्यावेत?

ज्या ठिकाणी मर्यादित आणि पूर्वनियोजित संवादक आहेत, तिथे सूत्रे बनवणे आणि पाळणे त्या मानाने सोपे आहे. उदाहरणार्थ शोधनिबंध घेऊया. (शोधनिबंध कधीकधी भाषण म्हणून वाचतात.) शोधनिबंधांत स्वयंस्पष्ट असलेल्या वाक्यांना संदर्भ लागत नाहीत. "स्वयंस्पष्ट" म्हणजे पूर्वनियोजित वाचकाला स्पष्ट असलेली माहिती. गणिताबद्दल शोधनिबंधात कलन-विकलन वगैरे सिद्धांत स्वयंस्पष्ट मानता येतात. लेखकाच्या संशोधनाचे वर्णन-विवरण असलेली वाक्ये सुद्धा "शोध" असतात, त्यांना संदर्भ देत नाहीत. यावेगळी सगळी वाक्ये संदर्भासह द्यावी लागतात. येथे ऐकणार्‍या-वाचणार्‍याने संदर्भ आधी पडताळले असतीलच असे नव्हे. पण संदर्भ कुठे मिळतील, त्यांचे परिशीलन वाटल्यास करता येईल, इतपत स्रोत ओळखीचे असतात.

वर्तमानपत्रांत नुकत्याच घडून गेलेल्या भूतकाळातल्या बहुतेक घटना, आणि शालेय शिक्षणात शिकवतात त्यापैकी ढोबळ माहिती वाचकांना माहीत असेल, असे गृहीत धरता येते. तशी वाक्ये संदर्भस्रोत न सांगता वापरता येतात. यावेगळी माहिती देण्यासाठी स्रोत द्यावा लागतो : उदाहरणार्थ - "पंतप्रधानांच्या माहितीसचिवाने सांगितले की...", "अमुकतमुक यांनी केलेल्या उत्खननात..."
वृत्तलेखनात स्रोताचा त्रोटक निर्देश केल्यानंतर तपशीलवार निर्देश (पृष्ठ क्रमांक, पुस्तकाचा प्रकाशक) दिला जात नाही. वृत्तपत्रात संदर्भांविषयी जे धोरण असते, तसेच काहीसे धोरण सामान्य सुशिक्षित श्रोत्यांपुढे भाषण करताना ठेवता येईल.

- - -

भाषणात माहितीचे किती धागे असावे? (ललितवाङ्मयात समांतर प्रश्न असतो - नाटकात/लघुकथेत/कादंबरीत किती कथानके-उपकथानके असावीत?) याबाबतीत सुद्धा "पेलतील तितकी!" असे सोपे न-उत्तर देता येईल. परंतु एक ठोकताळा म्हणून "१० मिनिटांच्या भाषणात एकच 'कथानक' असावे" असे मला अनेक सल्लागारांनी सांगितलेले आहे.

पुष्कळदा अनेक धाग्यांची गुंफण हेच भाषणातले प्रमुख निवेदन असते. म्हणजे धागे सुरुवातीला वेगळे वाटत असले, तरी विणल्यावर एकच एकसंध वस्त्र तयार होते, असा संदेश भाषण देणार्‍याला श्रोत्यांपर्यंत पोचवायचा असतो. असे असल्यास वेगवेगळे धागे सुरुवातीला स्पष्ट दिसावेत, मग त्यांच्यातील वीण उकलून-घालून दाखवावी, मग एकसंधपणाचे प्रतिपादन करावे. उपलब्ध वेळात हे सर्व जमेल इतपतच व्यापक दृष्टिक्षेत्र असावे. कालमर्यादा असलेल्या भाषणात किंवा लेखी संदेशात एकसंधता कळून येणे हे संवादाच्या संदर्भात महत्त्वाचे असते.

वैश्विक काळाला मर्यादा नसतात, विश्वाचे क्षेत्रही विपुल आहे, त्यामुळे आयुष्यात आणि वास्तवात एकसंधता असेल किंवा नसेल. येथे फक्त कार्यक्षम संवादातील एकसंधतेबद्दल माझे विचार सांगितले आहेत. :-)

मुद्देसूद आणि व्यवस्थित स्पष्ट

धनंजय यांनी चर्चेचा विषय अतिशय मुद्देसूद आणि व्यवस्थित स्पष्ट केला आहे. मी अनेक रंगलेल्या चर्चा ऐकल्या आहेत क्वचित एखादं प्रेझेंटेशन दिलं आहे पण ९९% श्रोतृवर्गातच राहीले आहे.

त्या दृष्टीने मला फक्त २ गोष्टींची भर घालावीशी वाटते -
(१) प्रथम निवेदन (चर्चासत्रात पुढे काय येणार आहे त्याचा धावता आढावा)

(२) एकमेकांत गुंफलेले काही मुद्दे आणि मुख्य म्हणजे प्रत्येक मुद्याला आधारभूत (सपोर्टींग) व्यवहारातील उदाहरणे देता आल्यास जरूर जरूर द्यावी. अनेकांना एबस्ट्रॅक्ट भाषणापेक्षा अशी ठोस उदाहरणे असलेली भाषणे पटकन आकलन होतात. प्रेक्षकदेखील 'रिलेट" करू शकल्याने खुलतात.

उदाहरणच द्यायचं झालं तर परवा मी एक प्रेझेंटेशन दिलं होतं ज्यात मुद्दा हा होता की मेंदूचा उजवा भाग काही विशिष्ठ कार्ये करतो तर डावा काही विशिष्ठ कार्ये करतो.
"gestalt" अर्थात अपूर्ण चित्र पूर्ण करावयाची मनुष्याची प्रवृत्ती ही उजव्या मेंदूच्या कारकत्वाखाली येते. हे वाक्य सांगितल्यानंतर श्रोतृवर्गाचे चेहरे कोरे करकरीत होते.
पण तेच मी २ उदाहरणे देऊन स्पष्ट केलं की - जेव्हा मी १-२-३ म्हणते तेव्हा तुम्हाला ४ म्हणवसं वाटतं त्याला "gestalt" प्रवृत्ती कारणीभूत असते. दुसरं एक उदाहरण दिलं की "मी तुम्हाला जर आत्ता सांगितलं की मी एक रोचक गोष्ट सांगणार आहे आणि दुसर्‍या क्षणी सांगितलं की नाही मी ती सांगू शकत नाही कारण मला ती गोष्ट कोणालाही सांगायची परवानगी नाही. तर तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल आणि ती गोष्ट ऐकण्याकरता तुम्ही व्याकुळ व्हाल. याचं कारण "gestalt" हा गुणविशेष. चित्र पूर्ण करण्याची उजव्या मेंदूची प्रवृत्ती "
ही उदाहरणे ऐकून बर्‍याच श्रोत्यांच्या मुखावर मला हास्य दिसले. कारण त्यांना तो मुद्दा उदाहरणांमुळे कळला होता.

(३) शेवटी धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे एकसंधपणे प्रतिपादन करणे.

चांगले मुद्दे

-अनेकांना एबस्ट्रॅक्ट भाषणापेक्षा अशी ठोस उदाहरणे असलेली भाषणे पटकन आकलन होतात. प्रेक्षकदेखील 'रिलेट" करू शकल्याने खुलतात.
सहमत. चांगला मुद्दा.
- प्रथम निवेदन (चर्चासत्रात पुढे काय येणार आहे त्याचा धावता आढावा)
एकाच विषयावर बोलण्यासाठी अनेक वक्ते आलेले असतील तर ह्याचा फायदा होइलच. एखादाच वक्ता एखाद्याच विषयावर (अपेक्षित) बोलणार असेल तर (ऊदा- विषय असा असेल तर, "मेरीकेतील डॉलर छपाई आणि त्याचे दुष्परीणाम") तर श्रोत्यांना अंदाज आलेला असतो. त्यामुले हे प्रसंगानुरुप ठरवावे असे वाटते.
-कारण त्यांना तो मुद्दा उदाहरणांमुळे कळला होता.- सहमत!

धनंजयच्या प्रतिसादाला काही उपप्रश्न केले आहेत ते कृपया तुमच्यासाठीही आहेत असे समजावे.

रीसेप्टीव्हीटी आणि इगो

"व्हर्टीकल" हे एक विषय डोमेन समजावे. ऊदाहरणार्थ- शिक्षण, राजकारण, मराठी भाषा, साहीत्य, तरुणांची वैचारीक जडणघडण.
इतर प्रतिसाद अत्यंत मुद्देसुद व स्पष्ट आहे.
- शोधनिबंधाच्या अंगाने समजावलेली प्रक्रिया खूप आवडली व समजली.
-"१० मिनिटांच्या भाषणात एकच 'कथानक' असावे" - हा सल्ला मोलाचा वाटला.

श्रोत्यांना आपल्यापेक्षा कमी माहीतीगाराच्या भाषणाबद्दल उत्सुकता नसणे स्वाभाविक आहे. पण एखाद्या फारसे माहीती नसलेल्या भाषणकाराने लोकांना चकीत करण्यासाठी व श्रोत्यांच्या सुरुवातीच्या "काइंड ऑफ उपहास + इगो ["कोण हा", "मला काय सांगणार हा"]" मान्सिकतेचे परीवर्तन करण्यासाठी आवश्यक त्या करामती करणे आवश्यक असतेच. त्या कशा करायच्या असतात ह्याचे काही शास्त्र आहे का?

दुस-या उदाहरणात असे दिसते की, अत्र्यांसारख्या वक्त्याचे भाषण ऐकायला जाणा-या श्रोत्यांची मानसिकता- अशा वक्त्याचे श्रोते "गिव्हन" मोड मधे असतात. त्यांची रीसेप्टीव्हीटी खूप चांगली असते.

बाकी- तुमच्या प्रतिसादासारखे प्रतिसाद मिळतील ह्या अपेक्षेनेच तर अशी चर्चा येथे करावीशी वाटते.

भाषण

भाषण कुठे आहे, प्रेक्षकवर्ग कोणता आहे यावर बरेच अवलंबून आहे असे वाटते. शास्त्रीय संस्थांमध्ये किंवा विद्यापीठांपधील शास्त्रावर आधारित भाषणांमध्ये पॉवरपॉइंटचा वापर होतो. त्यात जवळजवळ प्रत्येक गोष्टीचा संदर्भ दिलेला असतो. इतर वेळी असे संदर्भ सहजगत्या दिले जातात पण त्यांचे प्रमाण फार कमी असते. वक्ता चांगला असेल तर आशय आणि नवीन संकल्पना यांची सुरेख गुंफण घातलेली असते त्यामुळे श्रोत्यांना कुठेही संदर्भ लागला नाही असे जाणवत नाही.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

तसे आहेच

--भाषण कुठे आहे, प्रेक्षकवर्ग कोणता आहे यावर बरेच अवलंबून आहे असे वाटते. --
होय, तसे आहेच.
पॉवरपॉइंटचा मुद्दा चांगला आहे.

उत्तम कांबळे यांच्या भाषणावरही चर्चा व्हावी

चर्चा वाचतोय.

-दिलीप बिरुटे

 
^ वर