मराठी चित्रपट

मराठी चित्रपटांना इतक्या सोई सुविधा (२५ लाखा पर्यँत अनुदान, करमणुक करात सुट)उप्लब्ध असतांना देखील मराठी चित्रपटांचा दर्जा फारच खालावलेला दिसून येतो. (एखादा अपवाद वगळता)
हिँदी चित्रपट यायच्या चार पाच महिणे आधिच त्याचे ट्रेलर, वर्तमानपत्रात त्याबद्दल माहिती येते, मराठी चित्रपट रिलीज झाला तरीही त्याचा काही थांगपत्ता लागत नाही हे असे किती दिवस चालणार??
कालंच 'आघात' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झालाय (आघातच नाव आहेना?) त्याचं अजून कुठे ट्रेलर नाही पाहिलं की कुठे बातमी वाचनात नाही. इतकेच काय ABCL चा 'विहीर' इतके पुरस्कार मिळवतोय तर त्याच्या फक्त बातम्या वाचतोय. . कधी पहायला मिळणार?? :(
प्रत्येक चित्रपटाने 'झेँडा' चित्रपटासारखी मार्केटींग करावी हिच अपेक्षा. .

अवांतर:Mery Christmas

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रमोशन

मराठी चित्रपटांची पूर्वप्रसिद्धी अतिशय कमी प्रमाणात होते. झी टॉकीजचे चित्रपट सोडले तर बाकी चित्रपटांची ट्रेलर्स पाहिल्याचे आठवत नाहीत. थोडेफार चित्रपट विविध कार्यक्रमांतून प्रमोट केले जातात. उदा. झी मराठी वर सारेगमप, एकापेक्शा एक, फू बाई फू अशा कार्यक्रमांमध्ये आजकाल एखाद्या येणार्‍या चित्रपटाचा नायक/दिग्दर्शक/असंच कोणीतरी येऊन अतिथी परीक्षक म्हणून हजेरी लावतात, पण हे प्रमाण ही अगदीच नगण्य आहे.
काल ४ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले (तीस मार खां च्या बरोबरीने!). अशा गोष्टीही टाळायला हव्यात.

||वाछितो विजयी होईबा||

धक्का

काल ४ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले :O
हा खरच खूप मोठा धक्का आहे. . त्यांची नावे कळली असती तर बरे झाले असते. .

२०१० मध्ये चित्रपट रिलीज करण्यासाठी खाटाटोप

आत्ता एक लिँक मिळाली
त्यात पाच मराठी चित्रपटांची नावे आहेत. .
त्यावरील प्रतिक्रीया फारच बोलक्या आहेत. .

http://www.esakal.com/esakal/20101221/5325676591932518539.htm

या

या संदर्भात ही बातमी रोचक ठरावी.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

दुचिवा वरील माहिती पुरेशी असते.

मी 'झेंडा' पाहिला नाही. कारण त्याचा दिग्दर्शक जो होता तो माझ्या दृश्टीने ताजा विशय हाताळून सवंग प्रसिद्धी एनकॅश करणारा होता.

'विहिर' आल्याआल्या पाहिला होता. त्याचे दुचिवावरील प्रोमो आवडले होते. पाहून त्यातील कथेने खूप उदास झालो होतो. चित्रपटात जीवनाच्या दोन बाजू यशस्वीपणे दाखवून जबरदस्त इम्पॅक्ट साधलाय.

आघात हा वैद्यकिय क्शेत्रावर आधारीत आहे, एवढी माहिती दुचिवावर मिळाली.

तुम्ही कोणत्याही बातम्यांच्या वाहिनी पहात नाही का? त्यात हल्ली मराठी चित्रपट कलाकार त्यांच्या परीने (मुलाखत देत) चित्रपटाविशयी उत्स्तुकता निर्माण करतात.

मेरी क्रिसमस!

व्यवसायिकतेचा अभाव. .

मला वाटतं मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक हे समजून घ्यायला तयारच नाहीत की लोकांना जे सहजासहजी पहायला अनुभवायला मिळते ते पहायला चित्रपटगृहात कोण कशाला पैसे खर्चुन जाईल. .
मराठी चित्रपटात त्याच्या निर्माते दिग्दर्शक नायक यांच्यात व्यवसायिकतेचा खूपच अभाव दिसून येतो. .
(मला वाटणारा अपवाद महेश मांजरेकर) चित्रपटाची प्रसिद्धी महेश मांजरेकरांना योग्य प्रकारे करता येते हे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', शिक्षणाच्या आयचा घो आणि लालबाग परळ वरुन लक्षात येते. .

सहमत

मराठी निर्माते अजून बर्‍याच गोष्टी समजून घेत नाहीत.

||वाछितो विजयी होईबा||

प्रेक्षकाचे वय

वरील अनेक विधानं "उचलली लेखणी...." इस्टाईल आहेत. निर्माते पैसे कमवायला सिनेमे बनवतात, पिरीयड.
ज्यांना प्रेक्षकाचे वय १० वर्षे असते हे कळते तो यशस्वी चित्रपट काढू शकतो.
मराठी चित्रपटातील तांत्रिक अंगे कमजोर होती, ती आता भक्कम होत चालली आहेत. अजय-अतुल सारख्या संगीतकाराने पिपाण्या आणि तबले ह्यांच्या पलिकडचे स्वर्गीय संगीत निर्माण केले आहे. पुढील चित्रपट बरे असतील असे वाटते.

उचलला मोबाईल केलं टाईप. .

ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय, तुम्ही असाल हो मराठी चित्रपटांवर संतुष्ट आम्हालाच सवय लागली तुलना करायची. .
तुलना केल्यावर लक्षात येतं. . मराठी चित्रपटाचा हिरो दिसायला काही धड नसतो, धड नाचता येइना कि फाइट करता येइना. . जमलंच एखाद्याला थोडेफार तर जातो हिँदी चित्रपटात दुय्यम रोल किंवा चप्राशीपणा करायला. .

हो ला हो म्हणणारे प्रतिसाद

--ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय,---

काय जळतंय हे कृपया सांगाल का?

--तुम्ही असाल हो मराठी चित्रपटांवर संतुष्ट आम्हालाच सवय लागली तुलना करायची. .--

तुम्हाला सगळे प्रतिसाद तुमच्या हो ला हो म्हणणारे हवे आहेत् का?

मन जळंतय दुसरं काय. .

'हो' ला 'हो' म्हणनारे प्रतिसाद नकोच. . .
उलट एखाद्याने पटवून द्यावे मराठी चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा श्रेष्ट कसे. आनंद वाटेल .
चित्रपट बनवणारे हे लोक आरोप करतात मराठी माणूसच मराठी चित्रपट बघायला जात नाही. . त्यासाठी तेवढा दर्जेदार चित्रपट नकोका बनवायला.
बर दर्जा सोडूण द्या प्रेक्षकाच्या मनात उत्सुकता तरी निर्माण करा. . पेपरमध्ये जाहिरात येते चित्रपटाची पण त्याने काय कळणार चित्रपट कसा आहे. .

 
^ वर