सायबर क्राइम

एखादी घटना आजुबाजुला घडली की तिचे गांभीर्य जास्त जाणवते. आज पर्यंत ऐकत आलेलो सायबर क्राइम प्रकरण जेव्हा माझ्या मित्राच्या बाबतीत घडले तेव्हा आम्ही च्याट पडलो. मित्र क्रेडीट कार्ड खूप वर्षांपासुन वापरतोय, आयटी स्याव्ही आहे, व क्रेडीट कार्ड फक्त ठराविक ठिकाणीच वापरतो आणि ऑनलाइन तर कधीच नाही वापरत. एका शॉपींग मॉलमधे त्याने मागील महीन्यात कार्ड वापरले व त्यानंतर वापर केला नव्हता.

असे असतांनाही शुक्र्वारी त्याला एसेमेस आला की, २१ हजार रुपयांची विमानप्रवासाची तिकीटे कुणी काढली आहेत. मित्राने लगेच विमानकंपनीला कळवले पण त्यांचे म्हणणे होते की, पीएनआर नंबर द्यावा- जो मित्राकडे नव्हता. त्याने क्रेडीट कार्ड कंपनीला फोन करुन कार्ड ब्लॉक केले व त्या व्यवहारचे पेमेंट विमानकंपनीला देऊ नये अशी विनंती केली. पण क्रेडीट कार्ड कंपनीचे म्हणणे होते की, पेमेंट अगोदरच झालेले आहे व त्यामुळेच एसेमेस आला आहे.

मित्राने पोलीस कंप्लेट केली आहे. आता पाहू काय होते ते.

गंमत अशी आहे, नंतर आम्ही खूप युजकेसेस विचार करुन पाहील्या पण असा क्राइम करणारे ते कशा पद्धतीने करत असावेत ह्याची अंधुक कल्पना जरी असली तरी अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. काय वाटते तुम्हाला?

लेखनविषय: दुवे:

Comments

विषय खुप गंभीर आहे

अजुन सुद्धा आपल्यातली बरीच लोकं (मी धरुन) सायबर क्राइम नहोऊ देण्या करता काय करायचे ते करत नाही.

क्रेडीट कार्ड क्राइम मध्ये काय करतात साधारण पणे ते सांगतो

तुम्ही जेव्हा क्रेडीट कार्ड दुकानदाराला देतात तेव्हा (ज्याला क्राइम करायचा आहे असा) तो काउंटर खाली क्रेडीट कार्ड चा नंबर व मागिल बाजुस असणारे ३ क्रमाक नोंदवुन घेतो. एकदा हे नंबर कळले की मग ब-याच वेळेला इंटरनेट वरुन क्रेडीट कार्ड पेमेंट करु शकतात.

बाकी अवांतर
मागे संचित ह्या चर्चा प्रस्तावात शिकल्या प्रमाणे कोणी म्हणेल लोटरी सारखे काही तरी झाले व त्या मित्राचे पैसे गेले. चोर सापडला नाही तर काहीच होणार नाही त्याला.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

क्रेडिट कार्ड वापरून विमानाचे तिकिट काढणे

जर क्रेडिट कार्ड नंबर, नाव व मागच्या बाजूचा 3 आकडी नंबर हे माहित असले तर नेटवरून विमानाचे तिकिट काढणे पूर्ण शक्य आहे. ज्या बॅन्का असे पेमेन्ट करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेब साईटवर लॉग इन करणे आवश्यक करतात त्या ठिकाणी हे अवघड जाते. पण आपल्याकडच्या बहुतेक बॅन्का असे न करता फक्त जुजबी माहिती विचारतात. विमानाचे तिकिट काढताना आपल्याकडच्या बॅन्का बहुदा जन्म तारीख, पत्ता व मोबाइल नंबर हे विचारतात. ज्याला गुन्हा करायचा आहे तो अशी माहिती मिळवू शकतो. पुष्कळ मॉल मधे ही माहिती तुमच्याकडून घेतात.
नेट पेमेंट करताना लॉग इन करावेच लागेल अशाच क्रेडिट कार्डाचा वापर केल्यास अशा पद्धतीचे गुन्हे होणार नाहीत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

डबल सुरक्षा

अगदी मनातले बोललात. मी ही अशाच कंपनीचे क्रेका वापरतो ज्याला अशी डबल सुरक्षा आहे.

क्राइम इन्व्हेस्टीगेशन

शा गुन्ह्याचे क्राइम इन्व्हेस्टीगेशन कसे करतात हे जाणकारांकडून माहीती करुन घ्यायला आवडेल.

कार्ड क्लोनिंग

क्रेडीट कार्ड वापरताना खालील काळजी घ्यावी.

१. नवे कार्ड मिळाल्यावर सर्वप्रथम पिन क्रमांक बदलून घ्यावा.

२. मागील बाजूस असलेला ३ आकडी सी.व्ही.व्ही क्रमांक डायरी वा अन्य लक्षात राहील अशा ठिकाणी नोंदवून कार्डवरुन खोडावा.

३. शक्यतो विश्वसनीय वाटेल अशाच ठिकाणी कार्ड स्वाईप करावे. बरेचदा हॉटेलात बिल दिल्यावर आपण कार्ड वेटर कडे सुपुर्द करतो. स्वतः काऊंटरवर जाण्यास संकोच वाटतो. प्रतिष्ठित आस्थापने* वगळता शक्यतो स्वतःच कार्ड स्वाईप करताना समोर उभे रहावे. अन्यथा आपले कार्ड क्लोन होण्याचा धोका संभवतो.

४. ऑनलाईन खरेदी विश्वसनीय संस्थळावरूनच करावी ती सुद्धा सुरक्षित मानके तपासूनच.

५. ऑनलाईन खरेदीसाठी व्हर्च्युअल क्रेडिट कार्डचा वापर करावा. आघाडीच्या सर्वच बँका व्हीसीसी ची सोय उपलब्ध करुन देतात. यामध्ये खरेदीसाठी आवश्यक रकमेचे तात्पुरते व्हर्च्युअल कार्ड जनरेट करता येते. यावर क्रेडिट कार्डसारखेच अन्य तपशील असतात. यावरील कार्ड क्रमांक व व्हीसीसी क्रमांक वापरुन ऑनलाईन खरेदी सुरक्षितपणे करता येते. अशी व्हर्च्युअल कार्डे २४ तासापर्यंत वैध राहतात. अशा कार्डाचा वापर न झाल्यास रक्कम पुन्हा आपल्या मूळ कार्डात जमा होते.

* एका प्रतिष्ठित आस्थापनातही कार्ड क्लोन होण्याची एक घटना वाचल्याचे स्मरते. परंतु त्या आस्थापनाने नुकसान भरपाई देऊन प्रकरण मिटविले.
जयेश

खर आहे ते

आपला प्रतिसाद आवडला.

आभासी क्रेका

मी स्वतः आभासी क्रेका वापरतो. एकतर आपल्याला जेवढ्या रकमेचे हस्तांतरण करायचे आहे, तेवढीच त्या आभासी कार्डाला देता येते, म्हणजे एकदा माझा वापर करून झाला की त्या कार्डवर ह्स्तांतरण करण्यासाठी काही शिल्लकच राहत नाही.

||वाछितो विजयी होईबा||

नेट्सेफ

मी पण, एच.डी.एफ.सी नेट्सेफ

क्रेका ची काळजी

मोहन राव

क्रेका वापरताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे

सिक्युअर कोड

मी जेव्हा ऑन लाईन ट्रान्झॅक्शन करतो तेव्हा सी वी वी नंबरखेरीज दुसर्‍र्‍या पायरीत अजून एक सिक्युअर कोड द्यावा लागतो. (हल्ली तर या सिक्युअर कोड शिवाय बँका क्रेडिट कार्डावर व्यवहार करू देत नाहीत).

एक अनुभव : मी एका दुकानात क्रेडिट कार्डावर व्यवहार करीत होतो. त्यावेळी कार्ड स्वाईप केल्यावर बराच वेळ काही न घडल्याने त्या दुकानदाराने परत कार्ड स्वाईप केले (माझ्यासमोरच). त्या नंतर १ मिनिटाच्या आत माझ्या मोबाईलवर बँकेतून फोन आला आणि "तुमच्या कार्डावर आत्ताच अमूक रकमेची दोन ट्रान्झॅक्शन्स् झाली आहेत. ती खरी आहेत का?" अशी विचारणा केली गेली. मी त्यातले पहिले रद्द करावे अशी विनंती केल्यावर त्यांनी ते रद्द केले व मला एकाचाच चार्ज लावला.

नितिन थत्ते

एच डी एफ सी

हा अनुभव मला एच डी एफ सीच्या क्रेडीट कार्डे संदर्भात आला आहे. १५ हजाराच्या वर खरेदी केली तरी सुद्धा फोन आलेला होता. म्हणून क्रेडीट कार्ड एचडीएफसीचे वापरतो.

आयसीआयसीआय बँकेची इंटरनेट बँकींग वेबसाईट चांगली आहे डबल सुरक्षेच्या बाबतीत. त्यामुळे ऑनलाईन खरेदीसाठी आयसीआयसीआय.

एसबीआयच्या डेबीट कार्डवरून खरेदी करताना पिन नंबर टाकावा लागतो. त्यामुळे दुकानात शॉपिंगसाठी मी तेच वापरतो.

क्रेडीट कार्ड फक्त तिथेच वापरतो जिथे फक्त क्रेडीट कार्डच वापरावे लागते.

खिशात पैसे असताना क्रेडीट वापरत नाही. ;-)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

एस बी आय चे क्रेका

चांगला अप्रोच आहे. एस बी आय चे क्रेका घ्यायला हवे.

असाच अनुभव

मलाही असाच अनुभव माझे कार्ड वापरताना आला. विशिष्ट रकमेपेक्षा जास्त खरेदी केल्यास तो व्यवहार मोबाईलवर कंफर्म केला जातो. तशी विनंती आपण क्रेडिट कार्ड सेवा पुरवणाऱ्या ब्यांकेला करू शकता.

अनेक ब्यांका ३-डी सेक्युअर (http://en.wikipedia.org/wiki/3-D_Secure) ही पद्धत वापरून ऑनलाईन घोटाळे टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

खरी अडचण

आपण स्वतः जेंव्हा ऑन लाइन ट्रॅन्झॅक्शन करतो तेंव्हा आपण काळजी घेतो हे ठीक आहे. पण या चर्चेतील मुख्य प्रॉब्लेम दुसर्‍या माणसाने आपल्या क्रेडिट कार्डावर ऑन लाइन ट्रॅन्झॅक्शन करू नये म्हणून काय काळजी घेता येईल हा आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

ट्रेनिंग फी

प्रतिसादातून ब-यापैकी नोन गोष्टीच बाहेर आल्या. असा क्राइम नक्की कसा केला जातो ह्याची अंधूक कल्पना प्रत्येकाला असतेच पण नवे-नवे मार्ग शोधले जातात आणि ते आपल्याला नुकसान झाल्यावर कळतात हे ट्रेनिंग फी देण्यासारखे आहे.

पॅसेंजर मॅनिफेस्ट

विमानांची टिकीटे जर काढली गेली असतील तर पोलीसांना तपास करायला सोपे आहे - मॅनिफेस्ट लिस्ट विमान कंपन्यांच्या पडताळून व साधारण २१००० चे तिकीटे होती त्या वरुन अनुमान करायला सोपे जावे.

http://rashtravrat.blogspot.com

फिल्डींग

अपडेट- मित्राने क्रेकाकंला स्पष्ट सांगितले की, तो त्यांना पेमेंट करणार नाही कारण हा फ्रॉड होणे हे एकाप्रकारे त्यांच्याच सिक्युरीटीचा घोळ आहे. क्रेकाकंने ते मान्य केले हे नशीब. ज्या वेळेस मित्र पोलिस स्टेशनात गेला होता तेव्हा तेथे अजुन एक जण अशीच कंप्लेंट घेऊन आला होता- त्याची केकाकं वेगळी होती आणि त्या ब्यांकेने कोणतीही जबाबादारी घेण्यास टाळले होते.

त्या महाभागाने तिकीट ज्या दिवशीची काढली होती ती एक दिवस अडव्हान्स करुन घेतली- विमान कंपनीने ती करुन् दिली सुद्धा- असला प्रकार आहे हे माहीती असुन सुद्धा.
त्यामुळे लावलेली फिल्डींग वाया गेली.

प्रश्न असा आहे की, जेव्हा एखादा क्रेकाहोल्डर एखादे कार्ड पहील्यांदा वेबवर वापरतो, तेव्हा ब्यांक त्याच्याकडून काय प्रोसेस करवुन घेते? काय व्हेरीफिकेशन मागते? असे काही जर नसेल तर आपणही अशा घटना अनुभवु शकतो.

नवीन

क्रेडीट कार्ड विथ डिस्प्ले हि नवीन संकल्पना कदाचित काही प्रोब्लेम्स चे निराकरण करू शकते.

 
^ वर