तायडी, बायडी आणि आयडी
मराठी संकेतस्थळांवर लिखित आणि अलिखित नियम खूप सापडतात. लिखित-अलिखितची धूसर सीमारेषा असणारा एक नियम सांगतो की तुमची आयडी ही तुमची पैचान आहे; ती सांभाळून ठेवा. असे असताना काही उपक्रमींनी आज आपली आयडी बदलून सावळागोंधळ घातला. सध्या कोण कोण आहे हे कळेनासे झाले आहे. मी स्वतः कोण आहे हेच मला आठवेनासे झाले आहे. एक स्पष्ट करतो की चोर्यामार्या करणे हा आमचा फुल्लटैम किंवा पार्टटैम धंदा नाही पण डल्ला मारता आला तर मारला अशी संधीसाधू प्रवृत्ती कधीतरी उफाळून येते (आमचा आदर्शः गोपींचे कपडे पळवणारा श्रीकृष्ण) त्याबद्दल क्षमा मागतो आणि काही प्रश्न उपस्थित करतो.
१. आज आयडी बदल करणार्यांना आपली आयडी चोरीला जाऊ शकेल अशी कल्पना नव्हती का?
२. तुमची आयडी ही तुमची पैचान बनली आहे असे तुम्हाला वाटते का? लोक नेटाबाहेर तुम्हाला त्याच नावाने ओळखतात का? त्याचे फायदे-तोटे सांगा.
३. तुमची आयडी गेल्याचा प्रभाव तुमच्या लेखनावर पडेल का? या प्रश्नाचे प्रयोजन असे की आपल्या खर्या नावाने लिहिताना भीती वाटते, पाळलेला राक्षस असे नाव घेतले की संकेतस्थळाचे बाउन्सर असल्याची उर्मी दाटते.
येथे तायडी आणि बायडीवर चर्चा चाललेली नाही पण आयडीवर सर्वतोपरीने चर्चा करून हवी आहे.
आपला,
हा हा हा (विकट हास्य)
आपली आयडी किती महत्त्वाची असते याची कल्पना लोकांना यावी हे या चर्चेचे प्रयोजन आहे.
Comments
ता.क.
ज्यांची आयडी आम्ही ढापली ती परत हवी असे ख.व. मधून कळले आहे. ती २४ तासांच्या मुदतीने परत करून मिळेल.
उत्तरे
१. आज आयडी बदल करणार्यांना आपली आयडी चोरीला जाऊ शकेल अशी कल्पना नव्हती का?
आमचाच आयडी चोरीला गेला. आम्ही काही प्रयोग करून पहात होतो. पण आम्ही मूळ आयटीवाले नसल्याने चूक झाली.
२. तुमची आयडी ही तुमची पैचान बनली आहे असे तुम्हाला वाटते का? लोक नेटाबाहेर तुम्हाला त्याच नावाने ओळखतात का? त्याचे फायदे-तोटे सांगा.
माझा आयडी हा आयडी नसून माझे नाव आहे. त्यामुळे ती माझी पैचान आहेच. आम्ही वेगळ्या आयडीने वावरत होतो तेव्हाही माझे नाव बर्याच जणांना माहिती होते.
३. तुमची आयडी गेल्याचा प्रभाव तुमच्या लेखनावर पडेल का? या प्रश्नाचे प्रयोजन असे की आपल्या खर्या नावाने लिहिताना भीती वाटते,
खर्या नावाने लिहित असल्याने प्रश्न गैरलागू.
२४ तासांची मुदत कशाला हे कळले नाही. तो लगेच (१० मिनिटांत)मोकळा करावा ही मागणी.
नितिन थत्ते
सौदा
स्वघोषित बाउन्सर या नात्याने शिक्षा आहे.
२३ तास ५९ मि. चालेल का?
थत्ते, हलकेच घ्या हो. मनोरंजन-विरंगुळा असे वर्गीकरण आहे. मी तुमच्या नावाने यापुढे फक्त या चर्चेत पुढले २३ तास ५९ मि. लिहिन. निरोप पाठवणार नाही. खरडीही लिहिणार नाही.
माझाही
आमचाच आयडी चोरीला गेला. आम्ही काही प्रयोग करून पहात होतो. पण आम्ही मूळ आयटीवाले नसल्याने चूक झाली.
धनंजयांनी "मालक संकेताक्षर असलेल्या व्यक्तीचा संपादकांवर अंकुश असतो" असे लिहिल्याने मी माझे नाव "मालक" बदलताच श्री. बेसनलाडु (डुप्लिकेट) यांनी माझा "विनायक" आयडी चोरला. संपादकांवर अंकुश ठेवता आला नाही ते वेगळेच.
आता मी "विनायक गोरे" आयडीने आहे. या निमित्ताने धनंजयांचे म्हणणे गंभीरपणे घेऊ नये इतकेच कळले.
आता "मालक" आयडी नितिन थत्ते (ओरिजिनल) यांचा आहे असे समजते.
विनायक
हम्म!
नेमके काय झाले हे कळून घ्यायला थोडा वेळ लागेलपण खरडवह्या वाचल्यावर थोडा क्लू मिळाला.
प्रयोग करण्यासाठी मालक हे नाव वापरायची गरज होती का? नितिन थत्ते याच नावाने पुन्हा रजिस्टर करून पाहिले असतेत तरी झाले असते. प्रायमरी की, युनिक की असे ठरवलेल्या फील्ड्समध्ये ड्यु. एन्ट्री होत नाही हा बेसिक रुल आहे. :-(
असो.
मालक हे "संकेताक्षर" भलतेच धोकादायक ठरते.
उत्तरे
होती. (लेक्स ल्यूथर राजीव यांनी माझा रिकामटेकडा हा आयडी घेतला. माझा त्या आयडीवर काहीच दावा नाही.)
होय. होय. फायदा: थोडी गंमत. तोटा: अशा चोर्या.
नाही. खोट्या नावांचे रेशनिंग नाही, नवी समर्पक टोपणनावेही सुचू शकतील.
काड्या लावा
रिकामटेकडा हे नाव तुम्हाला शोभून दिसतं. राजीव यांना विनंती करणे गरजेचे वाटत नसेल तर एक उपाय आहे.
काड्या लावा...काड्या लावा, तुम्ही तुमच्या आयडीला काड्या लावा (संदर्भः परदेसिया ये सच है पिया या गाण्यासारखे म्हणून बघा)
||रिकामटेकडा|| कसे वाटते?
उर्वरित उत्तरांसाठी धन्यवाद. पटली.
ठीक
धन्यवाद.
त्यांनी आयडी परत केला तर मी आभार मानेन परंतु विनंती करण्याइतपत आयडी महत्वाची नाही.
नको, ते आयडीसाठी कासावीस झाल्यासारखे दिसते.
सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला
गेले काही दिवस उपक्रमावर काय चाललंय हे कोणी समजावून सांगेल काय? खरडवहीतून सांगितलं तरी चालेल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हेच चाललंय
परकाया प्रवेश सुरु आहेत. हे करणे किती धोकादायक असते हे दाखवून देण्यासाठी ही चर्चा आहे.
मनोरंजन
ज्यांनी हे चालवलं आहे त्यांच नक्कीच मनोरंजन होत आहे. आयडीपुराणाची चावून चावून चोथा झालेली उसाची चोयटी चघळत राहायची सवय जाणार नाही.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
मी माझे नाव ..
मी माझे नाव बदलले आहे हे बाकीच्यांना लगेच कसे कळु शकेन ?
पाळलेल्या राक्षसाला कसे कळाले की नितीन थत्तेंनी नाव बदलले आहे ???
बाकी आपण आप्ली जबाबदारी घ्यावी...
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
मालक
मालक हा की-वर्ड असावा असा अंदाज खरडवह्या वाचून बांधला.
आपली आयडी कधी सोडू नये हे खरेच. इथे जे झाले त्याला चोरी म्हणता येत नाही असे वाटते. आपली आयडी आपण सोडली की त्यावर कुणाचा हक्क राहत नाही. ती उचलणे दुसर्याला शक्य आहे. परंतु पाळलेला राक्षस यांनी नितिन थत्ते असे नाव घेतल्याने आणि ते थत्त्यांचे खरे नाव असल्याने त्यांनी ती आयडी परत करावी.
एखाद्याच्या नावाची चोरी करणे फार सोपे असते असे मराठी संकेतस्थळावरील काही महाभागांना वाटते. टेक्नॉलॉजीतील अपुर्या ज्ञानाने ते तुमचा पासवर्ड शोधण्याचा प्रयत्न करतात. काही ठराविक अटेम्प्ट्स नंतर लॉकिंगची सुविधा नसल्याने अनेकदा असे प्रयत्न होतात. नंतर हे लोक पासवर्ड इमेल करण्याची कळ दाबतात आणि इमेल मूळा आयडी धारकालाच जातो. :-) माझ्या बाबतीत असे प्रकार घडले आहेत. नव्याने संकेतस्थळाकडून इमेल आला की चोरीचा प्रयत्न झाला होता असे कळते.
नाव तेच ठेवून प्रतिसादाच्या सहीत दुसर्याचे नाव वापरण्याचा उद्योगही काही महाभाग करतात. अशावेळी सावध राहणे उत्तम.
या निमित्ताने राधिकाने आपला आयडी परत घेतला हे उत्तम झाले. लेखनही सुरु केल्यास अधिक बरे होईल.
गेले २ दिवस चाललेल्या प्रकारांनी खो खो हसते आहे. अशाने नोकरी जायची एक दिवस. आवरा या लोकांना.
सहमत
निव्वळ मनोरंजन म्हणून हा खेळ चालला. ज्यांची जुनी नावे चोरली गेली ते लोक स्वतः नाव बदलण्याचा खेळ आधीपासूनच खेळत होती. त्यामुळे त्यांचे ओरिजिनल नावे इतरांना वापरण्याची आयती संधी चालून आली. चोरी करणार्यांचा या चोरी झालेल्यांशी आधीच संवाद झाला असावा. सूड उगवण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा काहीतरी मोठी गोष्ट केल्याचा (निरर्थक) आनंद म्हणा, यातून या चोरांनी या खेळाची सुरुवात केली.
---
जर 'उपक्रम'च्या प्रशासकीय मंडळींना हा खेळ थांबवायचा असेल, तर नितिन थत्ते, रिकामटेकडा असे सध्या खोटे आयडी लावून फिरणारे सदस्य (जे ओरिजिनली, अनुक्रमे पाळलेला राक्षस, लेक्स ल्यूथर राजीव अशा नावांनी पूर्वीपासून उपक्रमवर सदस्य आहेत, व त्यांचे आधीचे लेखनही पाहता येऊ शकते!) त्वरित ब्लॉक करावेत. सुरक्षाविषयक बाबींमध्ये बदल करण्याची गरज वाटते तसेच नोंदणीच्या वेळी निवडलेले सदस्य नाव बदलण्याची मुभा यापुढे बंद करण्यात यावी ही सूचना.
काय प्रॉब्लेम आहे?
विशाल तेलंग्रे तुमचा प्रॉब्लेम काय?
ही चर्चा विरंगुळ्यासाठी आणि प्रबोधनासाठी आहे. आरोपबाजीसाठी नाही.
या लोकांना आम्ही सांगितले होते का आयडी बदलायचे पोरकट खेळ करायला? आणि जर मला ब्लॉक करायचे तर नितिन_थत्ते_वरिजनल, नितिन थत्ते, टारझन, रिकामटेकडा, प्रेषक, विनायक गोरे, पाळलेला राक्षस, विनायक या सर्वांना ब्लॉक करा. आयडी बदलायचे खेळ सर्वांनीच सुरु केले. तेव्हा जरा विचार करून बोलत जावे अशी विनंती.
:)
पण तुम्ही कोण तुर्रमखान आमच्या वतीने बोलणारे ?
- टारझन
पाळलेला राक्षस
पाळलेला राक्षस आमचे नाव चोरीला गेल्याचा उलगडा आताच झाला. याचा आनंद अवर्णनीय आहे. आम्ही आमचे नाव बदलल्यावर पाळलेला_राक्षस, पाळलेला.राक्षस, पाळलेला राक्षस., पाळलेला राक्षस्, |पाळलेला राक्षस| असे करू. आता उपक्रमावर दोन स्वघोषित बाउन्सर होतील.
आयडी बदलली हाये
मायबाप पब्लिक,
आज तुमची बरीच करमणूक झाली असेल असे मानून थत्त्यांशी आयडी अदलाबदल केली आहे. एंजॉय फ्रायडे नाईट!
चीअर्स!!
पा. रा.
चलो
"चलो, सब लोग अब अपना अपना गिलास वापिस लो.."
"अपना अपना?"
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
शंका
या खेळात सामील असलेल्यांपैकी काहीजण उपक्रमवर संपादक आहेत, अशी मला दाट शंका आहे, जर तसं काही असेल, तर संबंधितांनी कळवावं. (व्यनि हा मार्ग उत्तम!)
अमर आत्मा
अमर व्यक्ति व मरणारे आयडी.
पुनरपि जननं जठरे शयनं
प्रमोद
मालकाच्या आयडीले
अरे, आयडी आयडी, तयार करा भाराभर
आधी चोरा दुसऱ्याची तंव्हा सगळं सुकर !
अरे, आयडी आयडी, खोटा कधी म्हनू नहीं
मालकाच्या आयडीले, खोटा कधी म्हनू नहीं
आयडी बदलल्याने प्रतिसादांत गोंधळ
आयडी बदलल्यामुळे प्रतिसाद/निरोप वगैरे वाचताना गोंधळ होतो.
उदाहरणार्थ माझ्या उपप्रतिसादांत पुष्कळदा अशा प्रकारचे उल्लेख येतात :
"वर श्री. क्ष यांनी म्हटले आहे की... त्याचे उत्तर... तसेच श्री. य यांनी म्हटले आहे की... त्याचे उत्तर..."
जर आयडी बदलला, तर हे संदर्भ लागत नाही. एक माननीय आयडी-पासवर्ड एकक कित्येकदा आपले सदस्यनाव बदलतात. मी त्यांच्या आजच्या-ताज्या-नावाचा उल्लेख करणे टाळतो. उल्लेख करायचाच झाला, तर "सदस्य क्रमांक क्ष" असा उल्लेख करतो.
आता एखाद-दुसर्या एककाबद्दल हे करणे शक्य आहे - गैरसोयीचे असले तरी. त्याहून अधिक सदस्यांबद्दल हे असे लक्षात ठेवावे लागले, तर तो प्रयत्न मी सोडून देईन. यामुळे संवाद खुंटेल.
काही मनुष्य-व्यक्ती नवीन सदस्यनाव-संकेताक्षर एकके बनवतात, आणि जुने एकक वापरायचे थांबवतात. अशा वेळी कधीकधी नवा डाव मांडायचा असतो. ते ठीकच आहे.
पण अशा मनुष्य-व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क- ईमेल-फोन-भेटगाठीत आधी चर्चा झालेली असेल, त्याचे संदर्भ नाहिसे होतात. कधी त्या मनुष्यव्यक्तीला अशा संपर्काचा, किंवा आदल्या आयडीशी झालेल्या व्यनिचर्चेचा उल्लेख करायचा असतो. जुन्या सदस्यक्रमांकाने खरड-व्यनीने, तसेच नवीन सदस्यक्रमांकाने खरड-व्यनीने "दोन्ही एकके एकाच मनुष्यव्यक्तीची" असे सांगितल्याशिवाय, ती दोन एकके मानणेच भाग पडते. यामुळेसुद्धा संवाद गैरसोयीचा होतो.
ज्या लोकांना खरेच संवाद साधायचा आहे, त्यांनी सदस्यनामे बदलण्याची मजेदार करमणूक करताना संवादकांची इतकी गैरसोय करू नये, की संवाद बंद पडेल.
मान्य
पूर्णपणे कबूल.
परंतु ही गंमत करताना आम्ही सर्वांनी धोका (विनायक यांच्या उदाहरणाने तो दिसलेला होता) पत्करलेला होता, थोड्या कालाने (म्हणजे किती?) आयडी परत मिळतील ही आशा होती. रिकामटेकडा हा आयडी परत मागण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. प्रतिसादांत उल्लेख करताना इतरांना जो त्रास होणार आहे त्याबद्दल क्षमस्व.
गोंधळ होतोच
मी सदस्यनाव-संकेताक्षर एकके चारदा बनवलेली आहेत पण जुनी एकके वापरायचे पूर्णत: थांबवलेले नाही.
हे खरे आहे. असा संवाद गैरसोयीचा होतो.
_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड
विशेष
एकूणच विशेष प्रकार आहे, तसा प्रत्येक गोष्ट अजून नीटशी ध्यानात येत नाहीये, पण मला उमगलेले गणित -
आपले संकेत नाव बदलण्याचा प्रकार नितीन थत्ते, रिकामटेकडा ह्यांनी केला ती बाब पाळलेला राक्षस, राजीव ह्यांच्या ध्यानात आली व त्यांनी ह्यांच्या नावावर अतिक्रमण केले, पण ह्यामध्ये बळजबरीचा प्रकार किवा चोरी हा प्रकार देखील वाटत नाही, पण हा प्रकार करण्यासाठी काही विशेष असे ज्ञान असणे गरजेचे आहे असे मला वाटते (निदान दृपलचे किवा येथील संपादक लोकांशी असलेले घनिष्ट संबंध किवा एकूणच अशा गोष्टींचे विशेष ज्ञान). संकेत नावाने फार काही फरक पडतो असे वाटत नाही, पण नितीन ह्यांची काही दिवस गैरसोय होऊ शकते. पण छान, थोडा विरंगुळा हवाच होता, गोष्टी जास्तच "गंभीर" होत चालल्या होत्या असे वाटत असतानाच हे घडले. :)
हाहाहा!!
नाही हं! ड्रुपलचे ज्ञान वगैरे म्हटले तर संकेतस्थळाला सिक्युरिटी नाही का? कोणी उठून काही करू शकतो का? मग तर तुमचे निरोपही सर्रास वाचले जातात असे म्हणता येईल. असे काही नसते असा माझा अंदाज आहे. उपक्रमाची संरक्षण व्यवस्था चोख आहे असे मला वाटते. चू. भू. दे. घे.** हे जे काही घडलं त्यासाठी फक्त निरीक्षण आणि चापल्य यांची गरज आहे. तुम्हाला लोकांचे आयपी दिसतात का हा प्रश्न मी मनोगतावरील वावरापासून अद्यापपर्यंत ऐकला आहे पण असे काही नसते*. :-) तेव्हा उगीच गैरसमज नको. नसलेल्या माहितीचा विपर्यास तर नकोच नको. संपादकांनाही आयपी वायपी दिसत नाहीत असे वाटते.
"मालक" हा शब्द या घोळाला कारणीभूत आहे हे मला अक्षरशः काही सेकंदांत कळले.
बाकी, मालकाने जाम धमाल उडवून दिली हे खरेच.
* असे करणे शक्य आहे पण त्या गोष्टीचा इथे काही संबंध नाही.
** प्रेषक वगैरे कदाचित तपास करू शकतील.
बरर
आपले नक्कीच मालकाशी किंवा निदान संपादकांशी काही घेणे/देणे असावे :) लगेच पक्षाच्या प्रवक्त्या असल्यासारख्या आपण हे विधान केलेत :)
मला दृपालच्या संरक्षण व्यवस्थेबद्दल बोलायचे नव्हते पण असे शक्य आहे असे वाटले :) असो स्पेकुलेशन साठी क्षमा असावी :प
हो ते "मार्क इधर है" वाल्या संवादानंतर घोळ आहे ध्यानात आले होते पण तो इथपर्यंत गेला म्हणजे किती प्रतिभावान लोक इथे आहेत ह्याचेच ते द्योतक आहे :) बाकी एकदम झ्याक आहे हे :)
मालकाशी नाही
अरे बापरे! तुम्ही सूतावरून स्वर्ग गाठताय. तसे या संकेतस्थळाशी आमचे लागेबांधे जुने आहेत हे आमचा बिल्ला क्र. पाहिल्यावर लक्षात येईलच.
पण मालकांशी* काही संबंध नाही. आता मालकाचा धनी कोण आहे ते मलाच माहित नाही. :)))))))
* मालक म्हणजे उपक्रमावर "रातोरात" प्रसिद्धीच्या शिगेवर पोहोचलेली आयडी.
:)
:) चला काही गोष्टी तर तुम्ही न सांगता सांगितल्या (रीटे च्या रिडक्शन लजिक परमाने :प) पण त्या तश्या असाव्यात हि शंका होतीच. असो.
हा बिल्ला नंबर कुठे दिसतो हे जरा कृपा करून सांगा बरे, मी शोधून थकलो आहे.
रातोरात हे परफेक्ट आहे :)
नाही, तसं नसावं
आजचा प्रकार घडायला वरील दोन्ही* गोष्टींची गरज नव्हती, असे मला वाटते. याच चर्चेत मी सुरुवातीला नोंदवलेला प्रतिसाद संपादकांनी उडवला, तथापि हा चर्चा-प्रस्तावच निरर्थक व बिनबुडाचा आहे, यावर का कारवाई केली जात नाही, अशी मला शंका आली म्हणूनच या खेळात सामील असलेल्यांपैकीच काहीजण संपादक आहेत, ही शंका तयार व्हायला फार वेळ लागला नाही.
* ~ संपादक असणे म्हणजे सर्वच गोष्टींत प्रवीण असणे, असा त्याचा अर्थ होत नाही. केवळ सदस्यांच्या प्रतिसादांचे संपादन आणि फार तर युजर डिटेल्सचा बदलणे इतपतच अधिकार (प्रीव्हिलीजेस्) संपादकांना दिलेले असतात. बाकी इतर सर्व हक्क संस्थळाचा मालक किंवा मुख्य-प्रशासक यांच्याकडे असतात. ह्म्म, संपादकांना कोडींग करण्यासाठीदेखील प्रवेश देता येतो, पण असं अॅडमिन करत असेल, असं वाटत नाही.
ह्म्म
सामान्यतः आपले म्हणणे खरे ठरू शकते पण एकूणच प्रकार लक्षात घेता हे "आदर्श" प्रकरण असू शकते असे मला वाटले, आतले कधीच बाहेर येणार नाही, सगळेच एकमेकाचे मावस भाऊ आहेत. खरे खोटे "मालक" जाने. आपण जरा जास्तच गंभीर झालात, हे थोडे फार चालूच राहणार कि हो :)
आणि मालक महाशयांनी देखील "हं खेळा पण ह्या रेषेच्या बाहेर जायचं नाही" अशी भूमिका घेतली असू शकते, कोणी गेलाच तर आहेच तलवार. तर आपण खेळ बघायला काय हरकत आहे ? :)
स्वतःच्या
मी स्वतःच्या नावाने लिहीतो त्या मुळे माझी आयडी कोणी चोरली तर वाईट जरुर वाटेल.
स्वतःच्या नावाने जर लिहीले तर काही बांधीलकी राहते - नाही तर उचलली जिभ व लावली टाळ्याला असे होऊ शकते.
http://rashtravrat.blogspot.com