जोडणी बंद करावी का ?
आजवर सर्व मराठी संकेतस्थळांत मला उपक्रम फार आवडते, ह्याचे कारण येथील विद्वान सदस्य. धनंजय, प्रियाली, रिकामटेकडा, प्रमोद, यनावाला, विकास, आणि इतर अनेक अशा खर्याखोट्या नावाने इथे येणार्या सदस्यांनी आजवर आपल्याला असलेल्या माहितीची उधळण येथे केलेली आहे, आणि त्यामुळे उपक्रम हे एक विद्याभ्यासी लोकांसाठीचे मह्त्त्वाचे संकेतस्थळ आहे असे मला वाटते.
पण मला हे स्थळ ह्यापेक्षाही जास्त चांगले होऊ शकेल असे वाटते. ह्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माहितीची देवाण घेवाण ही सध्या तरी जोडण्यांनी (दुव्यांनी, अथवा लिंकांनी) केली जाते. ह्यापेक्षा सदर जोडण्यांतला मूळ भागाचा सारांश जर मराठीत अंतर्भूत (इन-लाईन) केला गेला, तर उपक्रमाच्या तो साजेसा होईल.
त्यामुळे मी उपक्रमाच्या चालक वर्गाला विनंती करतो, की त्यांनी ऍंकर म्हणजेच <ए /> हे कोंदण (मार्क-अप) खारीज करावे. म्हणजे कोणीच टिचकी मारण्यासाठी दुवे देऊ नये. अर्थात, दुव्याचा पूर्ण पत्ता देणे हे देवनागरीत कठीण जाईल, त्यामुळे अधिकाधिक माहितीचे मराठीत परिवर्तन होईल.
Comments
असहमत
दुवे देण्याची पद्धत आवश्यक आहे कारण लेखांचे संदर्भ किंवा इतर माहिती बर्याच वेळा मूळ इंग्रजीमधून उपलब्ध असते. हे संदर्भ देता आले नाहीत तर मूळ लेखाची विश्वासार्हता कमी हो ऊ शकते. जर ही सुविधा बंद झाली तर सभासद या संदर्भांचे मराठी भाषांतर करतील ही अपेक्षा फारच ऑप्टिमिस्टिक वाटते. 99% वेळेला सभासद संदर्भच देणार नाहीत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
तुम्हाला सहमत !
तुमच्या मताशी सहमत !
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
?
>>> ह्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माहितीची देवाण घेवाण ही सध्या तरी जोडण्यांनी (दुव्यांनी, अथवा लिंकांनी) केली जाते.
इथे २ कारणांसाठी दुवे वापरले जातात -
१. माहितीच्या विश्वासाहार्ता साठी संदर्भ
२. माहितीची देवाण घेवाण
ह्यापैकी नंबर एक चे कारण ~ ६०-७०% वेळा वापरले जाते आणि त्याला पर्याय मराठीत भाषांतर हा होउ शकत नाही.
नंबर दोन चे कारण आपण १) अधीक माहिती साठी दुवे देणे - ह्यासाठी मोस्टली वापारतो.
वरील कुठल्याही कारणासाठी आपण जर दुवे देणे बंद केले तर लेख खुप मोठे होउ लागतील वा विश्वासाहार्ता कमी होइल.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
इच्छा तेथे मार्ग
गूगल असे लिहिण्याऐवजी केवळ "http://www.google.com/=गूगल" असे लिहिण्याचा प्रघात पडू शकेल.
अद्न्यातवास
अवांतर- अद्न्यातवासातून रीटेंचे आगमन सुखावणारे आहे.
जोडणी?
हे कसे करतात? म्हणजे म्यॅन्युअल प्रोसेस नसेल अशी शक्यता गृहित धरते.
अवांतर १:
धनंजय नंतर डायरेक्ट प्रियाली. सकाळी सकाळी चांगला विनोद वाचला. ;-)
अवांतर २:
आमचे एक जुने मित्र* "खारीज" या शब्दाचा वापर त्यांच्या लेखनात करत. त्यांची आवर्जून आठवण झाली. त्यांना हल्ली हॅरी पॉटरचे उमाळेही येतात असे कळते. असो. त्यांनी मौनव्रताला सरणावर चढवल्याने मंडळ आभारी आहे. ;-)
* कधीकधी शत्रू.
- प्रियाली स्नेप
मग
धनंजय नंतर डायरेक्ट प्रियाली. सकाळी सकाळी चांगला विनोद वाचला. ;-)
मग यनावालांपाठोपाठ विकास म्हणजे काय म्हणायचे? ;)
असो. ह.घ्या... आता मूळ प्रस्तावासंदर्भातः
ह्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माहितीची देवाण घेवाण ही सध्या तरी जोडण्यांनी (दुव्यांनी, अथवा लिंकांनी) केली जाते. ह्यापेक्षा सदर जोडण्यांतला मूळ भागाचा सारांश जर मराठीत अंतर्भूत (इन-लाईन) केला गेला, तर उपक्रमाच्या तो साजेसा होईल.
याचा अर्थ समजला नाही. येथे एकोळी धागे अगदी विरळा असतील. लेख/प्रस्तावात देखील माहिती असते आणि प्रतिसादांमधे देखील. मात्र त्याच बरोबर जर काही बाहेरचा संदर्भ असला तर तो व्यवस्थित देणे महत्वाचे असावे आणि त्याला हायपरलिंक असणेच सगळ्यात सोपे वाटते.
डंबलडोर म्हणतात म्हणजे...
हाहाहा! ही किमया फक्त डंबलडोरच करू शकतात.
अर्थ मलाही समजला नाही पण डंबलडोर म्हणतात त्याला गहन अर्थ असावा. उगीच नाही मौनव्रत सरणावर चढवून त्यांनी ही चर्चा टाकली.
असो. डंबलडोर यांचे पुणरागमणाबद्दल स्वागत आहे. ;-)
दुवा-जोडणीसुद्धा आणि सारांशसुद्धा
लेखन वाचताना विचारसूत्र विस्कळित होऊ नये, हा विचार चांगला आहे. खरे तर पानजोडणी (हायपरलिंक) उड्डाण-दुवा हा या कारणासाठी अतिशय उपयोगी आहे. वाटल्यास डोळ्यासमोरचा परिच्छेद सहज नजरेने पूर्ण वाचा, वाटल्यास एखादा तपशील त्या वेगळ्या पानावर जाऊन पडताळा, वेळ असल्यास दोन्ही करा... हे सर्व पर्याय हल्लीच्या दुवा देण्याच्या पद्धतीने वाचकाला मिळतात.
मात्र दुवा देताना वाचकाच्या सोयीसाठी दुव्यावरील मुद्द्याचा सारांश लेखकाने दिला तर बरे असते. याबाबत सहमत. अशा लेखनशैलीला आपण सर्व प्रोत्साहन देऊया.
(सदस्य क्रमांक ८५१ यांच्यासारख्या आंतरजाल-व्यवहारात मुरलेल्या व्यक्तीने अशी सुचवणी कशी काय केली? त्या अर्थी त्यांचा मला मुद्दा समजलेला नाही. हा <१०% रोमन चिह्नांच्या विरोधात हल्लाबोल आहे काय? वगैरे शंका मनात येत आहेत.)
:)
गॉड मूव्हज इन मिस्टीरियस वेज. :)
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
सदस्यक्रमांक-जालावर मुरणे
सदस्यक्रमांक जास्त असलेली व्यक्ति (की सदस्यनाम?) आंतरजाल-व्यवहारात मुरलेली नसते असे काही आहे का? उदा. सदस्यक्रमांक ४००० असलेल्या व्यक्तिने अशी सुचवणी केल्यास विरोध समजण्यासारखा होईल का?
नाही
सदस्यक्रमांक दाखवणे हे निमित्त आहे. त्यातून जे सूचित करायचे आहे ते वेगळे आहे. सदस्यक्रमांक ४००० असणारी व्यक्ती वरिजनल आहे "का" ड्युप्लिकेट आहे त्यावर मुरणे अवलंबून आहे.
ओक्के
यावरून हे आठवले.
अनावश्यक
ते तिथे आले आहे कारण सदर सदस्य उगा वाकड्यात शिरत होते. अन्यथा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कोणीही देऊ शकतो. तेव्हा आपली टिप्पणी फुकट गेली.
धन्यवाद
उत्तराबद्दल आभारी आहे. अवतरण आपल्या स्पष्टवक्तेपणास सूचित करण्यासाठी होते, दोन्ही उपसंवादात सामंतर्य जाणवले हे मात्र खरे. ते आपल्याला अनावश्यक वाटले असूनही आपण स्पष्टीकरण दिले त्याबद्दल आणखीचे आभार.
ताक: धनंजय यांनी खरडीतून उत्तर कळवले आहे.
मुरलेला नाहित.
असे प्रश्न विचारणारे मात्र मुरलेले नसतात असे माझे तरी मत आता झाले आहे! ;-)
-Nile
उलटे आहे
मला कुठेही दुवा दिसला, की जे वाचतो आहे ते सोडून मी दुवा टिचकवतो. त्यामुळे दुवे द्यायचेच असले तर लेखाच्या शेवटी द्यावेत, असे मला वाटते.
--
|| लव्ह, टॉम, लव्ह. ||
काही अंशी खरे आहे
हे काही अंशी खरे आहे. अशाप्रकारे बेसुमार दुवे टिचकवल्याने मूळ लेख बाजूला राहतो आणि वाचक दुवे टिचकवत पुढे निघून जातो. शक्य असेल तेथे दुवे लेखानंतर द्यावेत. काही दुवे लेख सुरु होण्यापूर्वीही द्यावेत का? जसे, विडंबन असेल तर ते सुरु करण्यापूर्वी किंवा भाषांतरीत लेख असेल तर लेख सुरु करण्यापूर्वी मूळ रचनेचे दुवे द्यावेत का?
का?
तुम्ही वाचताना प्रत्येक दुव्यावर चाकाचे क्लिक (माऊस नसेल तर उजवे क्लिक आणि ओपन इन (बॅकग्राउंड) टॅब) करूनच पुढे वाचत नाही काय? अशा प्रकारे विकीसर्फिंग करताकरता मी ३०-४० टॅब सहजच उघडतो. मग निग्रह करून एकएक टॅब थोडाथोडा वाचून बंद करीत पुढे जायचे!
निग्रह
तो निग्रहच कमी पडतो ना अनेकदा. :-(
असा हवा दुवा
दुव्यावर टिचकी मारताच तो नव्या टॅबमध्ये उघडावा असा दुवा हवा. एचटीएमएलचे ज्ञान असणार्यांना तो तसा देता येईल इतरांसाठी मार्गदर्शक लेख लिहा :) इंग्रजीमध्ये वाचायचे असेल तर येथे पहा. :)
स्मृतीमंजुषा
वेगवेगळ्या टॅब मधले जावास्क्रिप्ट एकमेकांचा डॉम वाचून माहिती गोळा करू शकते, त्यामुळे मलावेगवेगळे टॅब उघडणे धोक्याचे वाटते.
आणि संगणकाची स्मृतीमंजुषा खूप वाया जाते, हे वेगळेच.
--
|| लव्ह, टॉम, लव्ह. ||
हॅहॅहॅ
जावास्क्रिप्ट वापरून तर इतरांच्या व्यनि ची यादीसुद्धा वाचता येईल, त्यासाठी नवा टॅब उघडण्याचीही आवश्यकता नाही असे मला वाटते. पिलॅन असा आहे: ज्या व्यक्तीच्या व्यनिंची यादी हवी आहे त्या व्यक्तीला लिहिलेल्या खरडीत जास्क्रि टाकता येईल. (ख.व. असल्यामुळे ते पान कोणीही वाचू शकेल. पण ते जास्क्रि असे असेल की ते स्वत: ज्या पानावर असेल त्या पानाला पार्स करून सदस्यनाम शोधेल. जर सदस्यनाम बकर्याचेच असेल तर ते स्क्रिप्ट कार्यान्वित होईल अशी योजना ठेवता येईल किंवा जास्क्रि थेट व्यनिमधूनच पाठविता येईल.) ते जावास्क्रिप्ट http://mr.upakram.org/privatemsg या पानाला स्मृतीमंजुषेत साठवून आपल्या ख.व. च्या edit-send या फॉर्मला 'post माहिती' म्हणून देईल. मग त्यांपैकी कोणत्याही व्य.नि.चा क्रमांक निवडून तो व्य.नि. वाचणारे जास्क्रि त्या व्यक्तीच्या ख.व. मध्ये टाकता येईल. शिवाय, खरड क्रमांक वैश्विक असतात. त्यामुळे आधी स्वतःच्या डु आयडीला एक खरड टाकून पुढील खरडक्रमांकाचा अंदाज घेतला तर बकर्याला टाकलेली खरड कार्यभाग उरकल्यानंतर स्वतःला डिलीट करेल.
योजनेत तांत्रिक त्रुटी असल्याचे सदस्यांचे मत असल्यास कृपया निदर्शनास आणावे.
इतरांकडे अधिक खतरनाक आयडियाही असू शकतील.
मुद्दा असा आहे की समजा मी एखाद्या व्यक्तीस देवनागरीत खरड लिहिली की "कृपया तुमच्या व्यनिची यादी मला कळवा" तर तशी यादी द्यावी की नाही याचा निर्णय ती व्यक्ती स्वतः घेते. जावास्क्रिप्ट चालू ठेवणे म्हणजे "अशा सर्व विनंत्यांना (ज्या रोमन लिपीमध्ये लिहिलेल्या असतात) मुक्त होकार आहे" असा आदेश संगणकाला देणे होय. त्याला चोरी म्हणणेही मला पटत नाही.
हॅ हॅ हॅ
जुनी युक्ती. तुम्हाला कळल्याबद्दल अभिनंदन.
--
|| लव्ह, टॉम, लव्ह. ||
मुद्दा
म्हणजे खरा व्हिलन जास्क्रि आहे आणि टॅब/अँकर इ. ना दोष देणे हे विषयांतर आहे असेच तुम्ही सांगत आहात काय?
जास्क्रिवर उपाय म्हणजे जास्क्रिला कायकाय अनुमत्या बंद कराव्या ते ठरवून ठेवावे, किंबहुना सार्याच अनुमत्या बंद कराव्या. (मग यूट्यूबचे व्हिडियोही बघता येणार नाहीत ते अलाहिदा.)
ग्रिंडेनवॉल्डने तुमच्यावर वापरली होती का?
नाही
ग्रिंडेनवॉल्डने तुमच्यावर वापरली होती का?
नाही, इ. स. १६८६तला ट्रान्सफिगरेशन टुडे मधला आमचा लेख वाचावा.
--
|| लव्ह, टॉम, लव्ह. ||
ठीक
भांडाभांडी हा माझा उद्देश नाही, खरा व्हिलन जास्क्रि आहे आणि टॅब/अँकर इ. ना दोष देणे हे विषयांतर आहे हे मत योग्य आहे काय ते तुमच्यासारख्या मुरब्बी विझर्डकडून जाणून घ्यायचे आहे.
- तामस (मॉर्वोलो) कोडे
व्यक्तिगत समस्या
ही व्यक्तिगत समस्या वाटते. प्रयत्न केल्यास दुवे टिचकवण्याची सवय घालवता येईल.
_____
डोन्ट आस्क डोन्ट टेल
गेली
गेली पंधरा वर्षे प्रयत्न करतोय, पण सवय जात नाही. कशी घालवावी हे कळेल का ?
- अल्बस.
--
|| लव्ह, टॉम, लव्ह. ||
कल्पना नाही
माहीत नाही. तज्ञांचा सल्ला घेता येईल. या सवयीला ओसीडी म्हणता येईल का?
_____
डोन्ट आस्क डोन्ट टेल
गेली
गेली पंधरा वर्षे प्रयत्न करतोय, पण सवय जात नाही. कशी घालवावी हे कळेल का ?
- अल्बस.
--
|| लव्ह, टॉम, लव्ह. ||
जोडणीविद्वान
जोडणी देण्याची सुविधा बंद करू नये असे वाटते. त्यामुळे माझ्यासारख्या जोडणीविद्वानांची भारीच पंचाइत होईल. (उदा. माझ्या या प्रतिसादात तब्बल नऊ जोडण्या आहेत.) नेम-ड्रॉपिंगप्रमाणे लिंक-ड्रॉपिंग जालीय करियरात अपवर्ड मोबिलिटीसाठी महत्त्वाची भुमिका बजावते, असे माझे मत आहे. दिलेल्या दुव्यातले सर्व आपणाला आधीच माहीत होते, आपला त्यावर अभ्यासही होता व आपण कसे पॉलिमॅथ आहोत असा आभास निर्माण करणे यामुळे कठीण होऊन जाईल. आधीच ओस पडलेल्या चर्चा-लेख (एक उदाहरण) यामुळे आणखीच ओस पडतील अशी भीती वाटते.
सहमत
सहमत आहे. सॉमरसेट मॉम म्हणतो तसे - द ऍबिलिटी टू कोट इज अ सर्विसेबल सब्स्टिट्यूट फॉर विट. [आता ह्या विधानासाठीही कुणाचेतरी उद्गारच द्यावे लागतात :).]
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आणि इतर अनेक मधील एक
"का" यांच्याशी सहमत.
त्यांच्या प्रतिसादातील पॉलिमॅथ लिंक देण्याऐवजी त्यांनी पॉलिमॅथ म्हणजे काय हे लिहीत बसले असते तर मूळ उद्देश बाजूला राहतो. सध्याच्य चर्चेचा मूळ उद्देश लिंक का असाव्यात किंवा का नसाव्यात याची चर्चा करणे आहे. पॉलिमॅथची माहिती देणे नाही.
माहिती नुसतीच देण्यापेक्षा स्थळ-काळ (घेणार्यांचा रागरंग(रंग शब्द शब्दशः घेऊ नये))पाहून दिली तर तिची उपयुक्तता वाढते. माहितीच्या पुरात गटांगळ्या खाण्यापेक्षा थोडा चवीचा विचार करायला हवा.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
इन्पुट फॉर्म्याट फिल्टर्ड
ज्याला जसे हवे तसे ठरवण्याची मुभा द्यावी- तुम्हाला नको असेल तर तुम्ही इन्पुट फॉर्म्याट फिल्टर्ड हटमळ वापरा.
दुव्यावर महाजाल
अहो हे माहितीचे महाजाला हे दुव्याच्या दुव्यावर तर सुरु आहे आणि तुम्ही चक्क काढून टाका म्हणताय? हे म्हणजे मला येथे कोणत्या संकेतस्थळाचा संदर्भ द्यायचा म्हटला तरी त्या संकेतस्थळाची थोडक्यात माहिती द्या आणि मग पुढे आपला मुद्दा लिहा असे झाले. दुवा हवा. सदस्य दुवा देऊन थोडक्यात सांगत असतील तर आनंदच. म्हणजे प्रतिसादात नुसताच दुवा नको वाटते हे खरे. पण दुवा जोडणीची सोयच काढून टाका म्हणजे उद्या उपक्रमा ऐवजी शनिपारावर येऊन चर्चा करा असे झाले.
नवे आव्हान?
पुन्हा एक नवे आव्हान?
जाऊदे यावेळी पास! :)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?