'मोबाइल नंबर पोटेर्बिलिटी' (एमएनपी) चं गंगेत घोडं न्हालं !

शेवटी 'मोबाइल नंबर पोटेर्बिलिटी' (एमएनपी) चं गंगेत घोडं न्हालं ! ही सुविधा अखेर गुरुवारी हरयाणात सुरू झाली. २० जानेवारीपासून २०११ पासून ती संपूर्ण देशभरात उपलब्ध होईल.
मला तरी आतपर्यंत "ट्राय " खो खो चा खेळ खेळतयं का असे वाटत होते. प्रथमदर्शनी तरी ही सुविधा उपयुक्त ठरेल असे वाटतेय मात्र ती कशी राबविली जातेय त्यावर सगळं अवलंबून आहे.
आता सर्वप्रथम मी माझा लूप मोबाईलचा नंबर वोडाफोनवर हस्तांतरीत करणार आहे. केवळ चांगला क्रमांक मिळाला होता म्हणून गेली ५ वर्ष अंगावर सांभाळलाय. (आमच्या ठाण्याच्या लूप मोबाईल सेंटरची लीज्ड लाईन सोमवारपासून बंद आहे आणि सगळे व्यवहार ठप्प आहेत. ग्राहक सेवा कार्यालयाची ही अवस्था तर ग्राहकांचे काय ?)

वरील सुविधेच्या फायद्या तोट्यांची चर्चा व्हावी. भारताव्यतीरीक्त इतर देशांत ही सेवा वापरुन पाहिलेल्यांचे अनुभव कळावेत हाच यामागील उद्देश !

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

चांगला विषय, चुकीची वेळ.
रजनीकांतच्या चित्रपटासोबत आर्ट फिल्म रिलीज करतात का? अवचटांविषयीच्या धाग्यात येथे किती प्रतिसाद मिळतील कुणास ठाऊक!

दबावगट (लॉबी) नसला की चांगले निर्णय कसे रेंगाळतात याचे एमएनपी हे उदाहरण वाटते.
मी मुंबई वोडाफोन (साडेसात वर्षे वापरलेला क्रमांक) ते महाराष्ट्र बीएसएनएल असा बदल करणार आहे. महाराष्ट्र वोडाफोन (बीपीएल) भंगार आहे.

नाही

लंबर पोर्ट्याब्लिटी बहुधा सेम सर्कलमध्येच मिळेल. मुंबई > महाराष्ट्र अशी मिळणार नाही. (चू भू दे घे)

ही मुंबई आणि महाराष्ट्र अशी वेगळी सर्कल अजून का बरे ठेवली आहेत? अंबरनाथहून ठाण्याला ३० किमीवर एसटीडी होतो आणि नागपूरला ७०० किमीवर लोकल कॉल होतो.

नितिन थत्ते

नोप्स

संदर्भ स्मरत नाही पण मुख्यतः रोमिंग वापरकर्त्यांच्या सुविधेसाठी पोर्टेबिलिटीची कल्पना आली, 'खुले मार्केट' संकल्पनेसाठी नाही.
आता प्रत्येकच मेट्रो राज्यावेगळ्या सर्कलमध्ये आहे.

खुला बाजार

रोमिंग करणार्‍याला तसाही तोच नंबर वापरता येतो. रोमिंग करताना ऑपरेटर बदलता यावा अशी अपेक्षा म्हणजेच खुल्या बाजाराची अपेक्षा.

नितिन थत्ते

तसे नव्हे

रोमिंग करताना पैसे मूळच्याच ऑपरेटरला द्यावे लागतात. पुण्यात राहून मुंबईचा क्रमांक वापरण्यापेक्षा मी तो क्रमांक बीएसएनएलकडे स्थानांतरित करणार आहे. यात खुले मार्केट ऑपॉप येतेच पण तो मूळ उद्देश नाही.

शक्य नाही

अरे बाबा,
मुंबई सर्कल मधला नंबर महाराष्ट्र् सर्कल मध्ये बदलता येत् नाही.
तुला पाहिजे तर तो MTNL करून घेता येईल.

होय

येथे तेच मान्य केलेले आहे.
याच प्रतिसादासाठी तुम्ही आयडी बनविलात असे दिसते ;)

दमानं.

याच प्रतिसादासाठी तुम्ही आयडी बनविलात असे दिसते ;)
श्री. हाकमारी हे श्री थत्ते आहेत की काय? नव्या सदस्यांना हे संकेतस्थळ अगदी आपलेसे वाटावे असाच प्रतिसाद आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बरोबर

>>लंबर पोर्ट्याब्लिटी बहुधा सेम सर्कलमध्येच मिळेल. मुंबई > महाराष्ट्र अशी मिळणार नाही.
आजच एका डिलर कडे चौकशी केली.. माहिती योग्य आहे
आता हि सोय येऊनही मला नंबर बदलावा लागेलसं दिसतंय :(

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

होय

मीही शोध घेतला. :(
मी नंबर मात्र बदलणार नाही.

सही!

--रजनीकांतच्या चित्रपटासोबत आर्ट फिल्म रिलीज करतात का? अवचटांविषयीच्या धाग्यात येथे किती प्रतिसाद मिळतील कुणास ठाऊक!

सही!

चांगली सुविधा

नंबर पोर्टॅबिलिटीची सुविधा चांगली आहे. मी रिलायन्स, एअरटेल आणि आयडिया यांच्या सेवा (!) वापरून पाहिल्या आहेत. आयडियाची सेवा बरी वाटली. एअरटेलचा एक नंबर आयडियाकडे बदलून घेईन.

ठाणे मुंबई सर्कलमध्ये कसे काय? मला वाटले मुलुंडपासून मुंबई सुरु होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पब्लिक डिमांड!

मुंबई सर्कलचे नेटवर्क अंबरनाथ-बदलापूर यांच्या मध्यापर्यंत मिळते.

बीटीचे डेव्ह-टेस्ट

--भारताव्यतीरीक्त इतर देशांत ही सेवा वापरुन पाहिलेल्यांचे अनुभव कळावेत हाच यामागील उद्देश

बीटीचे डेव्ह-टेस्ट करणा-या ब-याच कंपन्या पुण्यात आहेत त्यांच्या कडून ब्रिटनमधली माहीती मिळवता येइल.

अभासी स्वात्यंत्र

संकल्पना छान आहे पण राबवणूक कशी होते ह्यामागे जाम उत्सुकता आहे, साधारणपणे ग्राहक हिताच्या गोष्टी मागे अभासी स्वात्यंत्र असते असे वाटते. आणि तसे पाहता सगळेच चोराचे मावसभाऊ आहेत.

 
^ वर