उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
राष्ट्रपती कोण-दै. लोकसत्ता
विकि
May 13, 2007 - 1:43 pm
भारताचा राष्ट्रपती होण्याचा मान सुशीलकुमार शिंदे या मराठी माणसाला मिळू शकतो.पण त्यांना शरद पवारांचा विरोध आहे कारण नजिकच्या काळात राजकारणाचे फासे पवारांच्या बाजूने पडले जाण्याची शक्यता आहे आणि तसे फासे पडले तर पंतप्रधानपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल असे त्यांना वाटते अशावेळी मराठी व्यक्ती राष्ट्रपतीपदावर असली तर मग मराठी नेता पंतप्रधान होण्यात अडचणी येणार हे नक्की .हा धोका पत्करायला पवार तयार नाहीत.एक मराठी माणुस दुसर्याचे पाय ओढतो ,असे यावर कोणी म्हणाला तर त्याचा तो मर्यादित विचार होईल.
आपणास काय वाटते देशाच्या सर्वोच्च पदावर मराठी माणूस बसायला हवा की नाही.
राष्ट्रपती कोण आणि पवारांचा विरोध वाचा दै. लोकसत्ता
आपला
कॉ.विकि
दुवे:
Comments
मराठी माणूस...
केंद्रात सर्वोच्च पदावर मराठी माणूस असावा अशी समस्त मराठी जनतेची इच्छा आहे. सोबतच ही सुध्दा आहे की अश्या सर्वोच्च पदावर पोहोचल्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या हितसंबंधांना जपलं पाहिजे.
गेल्या काळात या केंद्रातील मराठी मंत्र्यांची बोटचेपी भुमिका बघता , ह्या पदांवर मराठी असोत किंवा नसोत आम्हाला झगडावंच लागेल अशी परिस्थीती आहे.
केवळ मराठी आणि शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन गेली चाळीस वर्षे आपली राजकिय कारकिर्द घडवणारे आणि कॉग्रेसला विरोध करनारे सुध्दा आता शिंदे साहेबांना मदत करताहेत म्हणे.
अवांतरः
भारताच्या सर्वात महत्वाच्या रचनेत दुसर्या जागेवर येणारे मंत्रीपद म्हणजे गृहमंत्री पद. येथे एक मराठी माणूस आहे. यांच्या कारकिर्दीत बेळगाव प्रश्नावर केंद्रसरकार सरळसरळ महाराष्ट्र विरोधी भुमिका घेते त्यावर यांचे काहीच मत नसते.... आणि हे मराठी...
आता गुजरात सरकारने दहेज ते उरण ह्या पाईपलाईनला आक्षेप घेतला, ही पाईपलाईन गॅसची आहे ज्याच्या मदतीने महाराष्ट्र सरकार १४०० मे. वॅ. विज बनवणार होतं, यावर मराठी शिंदे साहेबांची प्रतिक्रिया काय? कामी आहे ते मुरली देवरा. त्यांचे ते मंत्रालय असेलही... मात्र काहींच्या मते ते मराठी नाहीत.
खरं तर भारतच्या संरचनेत कुठल्याही पदावर कुणीही असो त्याने काही फरक पडायला नको, मात्र तळ राखतांना चांगल्यासाठी पाणी चाखता येतं हे कुणी सांगावं?
यावर उदाहरण म्हणून आपल्या प्रसारण मंत्र्यांचे म्हणजे दयानिधी मारण यांचे उदाहरण घेऊया.
भारत सरकार भारतीय भाषांत संगणकवापर वाढावा म्हणून काही सीडी मोफत देते त्यावर भारतीय भाषांचे फॉन्ट्स आणि इतर प्रोग्राम्स आहेत. सर्वात आधी ही सीडी हिंदी आणि तमिळ भाषेत तयार झाली. मारण होते म्हणून तमिळ पुढे आली. आमच्या मराठी बाण्याला दिल्लीतील थंडी का मानवत नाही कुणास ठाऊक?
आमचे कृषीतज्ञ साहेब सुध्दा दिल्लीत जाऊन शांत होतात... हे दुर्दैव .
नीलकांत
दिल्लीत मराठे ........
गेल्या काळात या केंद्रातील मराठी मंत्र्यांची बोटचेपी भुमिका बघता , ह्या पदांवर मराठी असोत किंवा नसोत आम्हाला झगडावंच लागेल अशी परिस्थीती आहे.
या अनुषंगाने मला "घडलंय बिघडलंय" या कार्यक्रमांतील एका गीताच्या खालील दोन ओळी आठवतात.
म्यानातच रुतली तलवारीची पात
दिल्लीत मराठे बसले पराठे खात