प्रवाह!

pravah
प्रवाह

परवा एका ओढ्याकाठी गेलो होतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात ह्या प्रवाहाकाठच्या परिसंस्थेला एक वेगळेच स्वरुप प्राप्त होउन गेले होते. खरेतर तो प्रवाह नाहिये; कारण कॅनडातल्या थंडीमुळे त्याच्यावर बर्फाचा पापुद्रा तयार होतोय आणि त्याचा वाहण्याचा गुणधर्म बराच कमी झालाय!

चित्राला थोडे वॉर्म केलेय त्यामुळे सूर्यकिरणांचा रंग जरा जास्त ठळकपणे समोर येतोय.

प्रतिक्रीयांचे अर्थातच स्वागत आहे!:)

-भालचंद्र

लेखनविषय: दुवे:

Comments

वाह्!

कॅनडात बर्फाचा पापुद्रा तयार होऊ लागला असे वाचले की आम्ही कित्ती कित्ती उबदार ठिकाणी राहतो अशी जाणीव होऊ लागते. :-)

ओढ्याच्या किनारी कायम हिरवे राहणारे सूचीपर्णी वृक्ष असले तरीही स्प्रिंग आणि फॉलच्या दरम्यान हा ओढा आणखी सुंदर दिसत असेल असे वाटले. आजूबाजूला सुकलेले गवत आणि झडलेली झाडे तितकीशी आवडली नाहीत तरीही पाण्याचा प्रवाह आणि त्यावर रेंगाळलेले सूर्यकिरण मनात भरले.

क्यानडात

क्यानडात बर्फाचा पापुद्रा तयार होऊ लागला की आम्ही भारतात राहतो याची सुखद उबदार जाणीव होऊ लागते.

झळाळी दिली

एका फारशा आकर्षक नसलेल्या स्थळाला तुम्ही क्यामेराबद्ध करुन, तापवुन झळाळी दिली आहे.

छान

तापवलेले चित्र आवडले. :)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

रुक्ष तरीही सुंदर

थंडीच्या दिवसांमुळे परिसर रुक्ष वाटतो आहे - वाळके गवत, खुरटलेली करडी झुडपे इ. पण सूर्यकिरणांमुळे आलेली झळाळी आणि फोटोला उठाव आणायचे कृत्रिम तंत्र यांमुळे चित्र प्रेक्षणीय झाले आहे.
- परीवश

 
^ वर