काही ऍबस्ट्रॅक्ट विचार

खेळातील करीयर

गेल्या रविवार सकाळ मधील लेख खेळणे हा एकमेव धागा घेऊन विणल्यामुळे एक चांगली दिशा असलेला विचार विर्विरीत झाला. खेळण्यातील करीयर तरुणपणातील जोमानंतर कोलमडू शकते- ऍथलेटीक्स व तत्सम खेळातील प्रकारात जेथे फक्त वैयक्तिक क्षमता व कौशल्य ह्यावर बाजी मारायची असते, त्यात वयाच्या तिशीच्या आतच गाशा गुंडाळावा लागतो. क्रिकेटमधे कित्येक खेळाडू ४० पर्यंत खेळत राहील्याची उदाहरणे आहेत पण तो खेळ वय जास्त असलेल्या खेळाडूंनाही सामावुन घेऊ शकतो. त्यामुळेच, छोट्याशा करीयर नंतर काय?, हा प्रश्न हाताळला गेला असता तर तो लेख कंन्व्हींन्सिंग झाला असता.

खेळाडूंना पुढे त्याच क्षेत्रात करीयर चालू ठेवण्यासाठी त्याच खेळाशी निगडीत काही उद्योगधंदे करता येणे शक्य होइल का ते पाहणे शक्य झाले तर असे करीयर करणे कमी धोकादायक ठरु शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळातील साहीत्य आयात करावे लागते, त्यातील खेळाडूने निवडलेल्या खेळातील साहीत्य पुर्णपणे अथवा त्यातील काही भाग भारतात तयार करण्यासाठी ट्रेनिंग घेणे व ते भाग येथेच बनवणे. शक्य नसल्यास, ते साहीत्य आयात करुन येथे विक्री व सर्व्हीस देणे त्या साठी काय करावे लागते ते शिकणे, अशा स्वरुपाच्या सुचना देता येणे शक्य होते.

व्होल्व्होतील प्रवास

जर काहीच केले नाही तर "संसर्गजन्य आजाराला आमंत्रण देणारा प्रवास" असा ह्या बसची किर्ति होण्यास उशीर लागणार नाही. ह्याचा अनुभव अनेकांना आला आहे पण योग्य ठिकाणी तक्रार करता येत नाही, किंवा कशामुळे आजारपण आले आहे, ते कळत नाही.
सध्या आलेल्या मल्टी-ऍक्सल बसमुळे तर हा प्रश्न अधिक उग्र होइल असे वाटते, कारण जास्त लोक. व्हेंटीलेशनची सिस्टीम बाहेरची हवा आत येऊच देत नाही व त्यामुळे आतली हवा किती जुनी आणि प्रदुषीत आहे हे फक्त हवेलाच माहीती असावे. एखाद्याने जर ४-५ तास ह्या बसमधुन प्रवास केला तर संसर्गजन्य आजाराची ग्यारंटी.

लेखनविषय: दुवे:

Comments

?

बात कुछ हजम नही हुई |

चर्चाप्रस्ताव 'विर्विरीत' झाला आहे. (त्यात 'भाषा' विषयांतर्गत लिहिले गेल्याने गूढ अधिकच वाढले आहे.)

हे हे हे

खेळातील करीयर
मान्य + सहमत. अतिशय उत्तम सूचना. :)

व्होल्व्होतील प्रवास
हे हे हे :) हे हि मान्य...कदाचित बसवाले प्राणवायू नळकांडयाची सोय करतील, पण व्होल्व्हो सारख्या नामांकित कंपनीच्या गाडीमध्ये वायू-अभिसरणाची सोय नाही हे पटत नाही.

एसीचे काम कमी

नाही, व्होल्व्होवाले व्हेंटीलेशन बाहेरील हवा येऊ न देण्यासाठी सेट करतात. अशाने त्याम्चे एसीचे काम कमी होत असावे. (फ्युल कंझम्पशन)

एकच

एका वेळेस एकाच विषयावर विचार मांडल्यास चर्चेला सोपे होईल असे वाटते. आताचे दोन विषय निरूपद्रवी आहेत, संतसाहित्य आणि रासायनिक खते यासारखे. मात्र दोन्ही विषय स्फोटक* असतील तर जो राडा होईल तो आवरताना संपादकांना नाकीनऊ येईल असे वाटते.

*उदा. अंधश्रद्धा आणि अनिवासी भारतीय
आयसीयूमधील मराठी आणि आरक्षण
काश्मीर आणि वेदातील विज्ञान
पाकिस्तान आणि परप्रांतिय

गरजूंनी आपल्या मगदुराप्रमाणे भर घालावी. :)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

:)

राडा करता येणार नाही असा विषय? दाखवा दाखवा ऐसा काही!

हिरवट ?

अनिवासी भारतीय रंगीत का आहे? हे बघून एखादा हिरवट अनिवासी भारतीय पण राडा करू शकेल :P

+१

होय, शिवाय, पाकिस्तानमात्र हिरवट रंगात न लिहून त्यांनी सुडोसेक्युलरपणा केला आहे.

+१

हो ना!, तसेहि अनिवासी भारतीय आणि (त्यांना पाहून) रंग बदलणे हा प्रकारच तसा राजकारणीच.

हिरवा

मराठी सायटींवरील उद्बोधक चर्चांचा अभ्यास करणार्‍या संशोधकांना सखोल संशोधनानंतर असे आढळले आहे की अनिवासी भारतीयांवर होणार्‍या चर्चांमध्ये हिरवा रंग हा चर्चेचा प्रमुख मुद्दा असतो.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

निरुपद्रवी

अनिवासी भारतीय स्फोटक का? नाही कळले. निरुपद्रवी लोक आहेत ते.

सहमत

अनिवासी भारतीय स्फोटक नाहीत, पण त्यांच्यावरील चर्चा मात्र स्फोटक असतात.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

ठठपा

ठठपा या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देतील असे वाटते.

आधुनिक इदी आमीन

खरे म्हणजे आणखी एक मुद्दा टाकायला हवा होता- आधुनिक इदी आमीन - दुधामधे विषारी रासायनं टाकून पैसे कमावणारे व होमीसाईड करणारे - दुधवाले

शंका

दुधामधे विषारी रासायनं टाकून पैसे कमावणारे व होमीसाईड करणारे - दुधवाले
येथे जेनोसाईड् हा शब्द अभिप्रेत आहे काय ?

विवेकबुद्धी

होय् तसेच् काहीसे.
लोकांनी विवेकबुद्धी वापरुन पहावे-
१ कीलो "शुद्ध" खवा १२० रु ला मिळतो
१ लिटर् बासुंदी १००-१२५ रु ला मिळते

किती लिटर दुध आटवले म्हणजे खवा तयार होतो?
किती लिटर दुध आटवले म्हणजे बासुंदी तयार होते?

बरोबर

कच्च्या दुधात ७-८% स्निग्धांश आणि ९-१०% अस्निग्ध घन पदार्थ (सोलिड नॉन फॅट- एस् एन् एफ्) म्हणजे १७ टक्के घनद्रव्ये असतात. त्या अर्थी एक किलो खवा बनवायला ५ लिटर उत्तम दूध आटवायला हवे.

बासुंदीत पाण्याचे प्रमाण बरेच जास्त असावे. पण त्यात सुका मेवा वगैरे पदार्थ असल्याने किंमत जास्त होत असावी.

अवांतर : या ठिकाणी खव्याचा भाव २५० रु असल्याचे लिहिले आहे. वरच्या हिशोबा नुसार हा भाव ठीक आहे.

नितिन थत्ते

अजून

घरपोच मिळणार्‍या दुधाच्या किमतीत साठवण आणि वाहतुकीचा खर्च असतो. खव्याच्या बाबतीत तो खर्च वाचतो. शिवाय, खव्याचे आयुष्यही अधिक असते. मुळात, साठवणुकीची सोय नसलेले दूध वायाच जाणार असते, उत्पादकाच्या लेखी त्याची किंमत शून्यच असते. त्यापासून खवा बनविलेला असू शकतो. हे उदाहरण स्केलेबल नसेल (कचर्‍यातील सौर पॅनेल काढून बनविलेल्या वस्तूंचे उदाहरण येथेही लागू पडू शकेल).
पाच लिटर दुधातून चार लिटर पाण्याचे बाष्पीभवन करण्यासाठी (५४०+६०)*४००० कॅलरी लागतील (दूध उकळावे लागत नसावे, ८५° से तापमानाचा अंदाज केला आहे). एक किलो एलपीजीमधून ११००० किलोकॅलरी मिळतात. त्यामुळे, एक किलो खवा बनविण्यासाठी अंदाजे २०० ग्रॅम गॅस लागेल. त्याची औद्योगिक दराने १० रुपये किंमत होईल.

कुल क्याल!

कुल क्याल!

असे गणित असेल तर शुद्ध खवा वर नितिन ह्यांनी एस्टिमेटल्याप्रमाणे ५ लि. दुध घेतले, तापवुन भुगा केला तर वाहतूक, इंधन, फायदा + कमिशन असे धरले तर नक्कीच २०० रु प्रति किलोच्या वर असला पाहीजे.
असे स्पष्ट दिसत असतांना १००-१२५ रु किलो प्रमाणे मिळणारा खवा आपले फुड आणी ड्र्ग अधिकारी शुद्ध म्हणून सांगतात. पटत नाही.

बासुंदीबाबतही हेच म्हणता येईल. घरी आटवुन बासुंदी करुन पहा ५ लि ची. बाहेर जी घट्ट् बासुंदी मिळते तशी बनवायला १० लि दुध लागेल असे वाटायला लागते.

तसे नव्हे

जोवर खव्याची मागणी वाढत नाही (पिण्यायोग्य दुधाचा खवा बनवावा लागत नाही, जे दूध चांगले आहे पण साठविणे, वाहतूक यांचा खर्च परवडत नाही त्याचा खवा होत असेल) तोवर आहे तीच किंमत रास्त वाटते. पण उत्पादन वाढविले तर किंमत वाढवावी लागेल. खव्यापेक्षा बासुंदी बनविण्यासाठी कमीच उर्जा लागेल. (बाजारातील बासुंदीत काहीतरी बल्क फॉर्मिंग पीठ घालत असावेत हे मात्र मान्य.)

?

>>घरी आटवुन बासुंदी करुन पहा ५ लि ची. बाहेर जी घट्ट् बासुंदी मिळते तशी बनवायला १० लि दुध लागेल असे वाटायला लागते.

ही काहीतरी अतिशयोक्ती असावी का? कारण ५ लि दूध आटवून १ किलो घनपदार्थ मिळतो असे म्हटल्यावर १० लि दूध आटवून १ लीटर 'बासुंदी' कशी मिळेल? २ कि खवा मिळेल.
नितिन थत्ते

"लिटर"ली पातेल्यात काहीच उरत् नाही.

नाही, अतिशयोक्ती नाही. पण तुम्ही आणी रीटेंचे दिलेले गणित एकत्र केले की, ५ लि दुधापासुन १ की. खवा होईल ह्याची थेअरी कळते.
आता जे दुध पिश्व्यातुन मिळते ते ५ लि आणून बासुंदी करण्याचा घाट घातला की काय होते ते पहा. लायनी लावून जी बासुंदी आणली जाते तशी घरी करायची असेल तर शक्य आहे का ते नक्की कळते. ग्यासही किती लागतो ते ही समजते. "लिटर"ली पातेल्यात काहीच उरत् नाही.

व्वा, की बात हे...

व्हेंटीलेशनची सिस्टीम बाहेरची हवा आत येऊच देत नाही व त्यामुळे आतली हवा किती जुनी आणि प्रदुषीत आहे हे फक्त हवेलाच माहीती असावे.

त्यामुळेच तर एस. टी. महामंडळाच्या बसगाड्यांचा प्रवास मला अधिक सुखावह वाटतो, प्रत्येक सीटच्या शेजारून तावदान असले तरी कित्येकदा त्यात काचा मात्र नसतात (नुकसान-भरपाई देणे आपल्या राजकारण्यांना परवडत नसावे!)... ऊन असो वा पाऊस, बाहेरची हवा आत येऊन आतमधील सर्व (-)गंधित हवा (-)गंधित करण्याची मस्त सुविधा असते, यासाठी बसचे डिजाइन बनवणार्‍या डिजाइनर/आर्किटेक्चरच्या मेंदूला दाद देतो. ह्म्म, प्रवास म्हणावा तितका आरामदायक नसतो पण! :P

 
^ वर