मेनोपॉज डे
असा दिवस वगैरे पाळला जातो हे आजच वर्तमानपत्रातून कळले; बरे वाटले. समाज इतक्या सभ्यतेने असे विषय हाताळायला लागलाय हे पाहून कुठेतरी मनात बरे वाटले.
लेख वाचतांना गाडी एका पॅरॅग्राफशी अडकली व विचारांच्या गर्तेत गेलो. असे काहीसा तो सारांश होता-
"स्त्रीला मेनोपॉज येतो व ती ते स्वीकारते; पुरुष स्वीकारु शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे दौर्बल्य ते उघडपणे मान्य करत नाहीत आणि स्त्री मात्र मेनोपॉजनंतरही लैगिंकसुख देऊ-घेऊ शकते हे पुरुषांना पचवणे जड जाते, व त्यातून संशयकल्लोळ निर्माण होऊ शकतो."
ह्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतांनांच एका दुसऱ्या लेखात (जो मेनोपॉज ह्या विषयाशी संबंधीत नव्हता) काही वादग्रस्त मुद्दे आढळले. ते असे-
"स्त्रीला तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर इतर स्त्रीयांनी मानसिक धक्क्यातून सावरायला मदत करणे आवश्यक असते. अनेकदा ती अशा अत्याचारांबद्दल बोलतही नाही कारण अत्याचारीत जवळचे नात्यातले असु शकतात. तिला बोलते करुन आपलेसे केले पाहीजे. तसेच तिला ’असे कपडे घालू नको, रात्रीचे बाहेर जात जाऊ नकोस असे अनेकदा बजावले होते ते ऐकले असतेस तर.." असे टोमणे मारु नयेत" अशा स्वरुपाचा मजकुर होता.
पहील्या लेखातील त्या पॅरॅग्राफनंतर जे मत माझे व्हायला लागले होते ते ह्या विचारांनंतर पुर्णपणे दुभंगले. पुरुष हा प्राणी कसा जनावर आहे आणि स्त्री कशी त्याला भक्षी पडते असे चित्र रंगवले जातेय की काय असा समज निर्माण व्हायला लागला.
कार्पोरेट जगात जे प्रकार पाहीले आहेत, त्यात पुरुषांचे काय चुकते असा मला प्रश्न पडतो. कोणापासुन लांब राहणे कसे आवश्यक असते हे कळेपर्यंत अनेकांना उशीर झाला आहे हे कळलेलेही नसते. मला वाटते जे मानव (स्त्री-पुरुष) इतरांवर अत्याचार (मानसिक व शारीरीक) करु शकतात ते समोर कोण आहे ह्याचा विचारही करत नसावेत. खेड्या-पाड्यातील स्त्रीच्या शिक्षणाअभावी आलेल्या जगण्याच्या लढाइतील लाचारी तिला दुर्बल करत असेलही आणि त्यामुळेच तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला जात असेल तर तेच पुरुषांच्या बाबतीतही लागू होत नाही असे का वाटते- येथे एक्प्लॉइटेशन होतेच ते लैगिंक नसले म्हणून काय झाले? सो, ग्रो-अप एव्हढेच म्हणावेसे वाटते.
जाताजाता, लैगिकखेळ हे प्रोमोटेड आणि स्पॉन्सर्ड आहेत त्यामुळे त्याबद्दल मनात एक काहीतरी मस्तप्रकार असा समज करुन द्यायला अनेक घटक खूप यशस्वी झालेत. तटस्थपणे त्याबद्दल विचार करता त्यात एव्हढे एक्सायटींग काय आहे हे समजत नाही. उलट, नग्नतेने जे केले जात त्यात एक्सायटमेंट वाटण्यासारखे काय आहे?- रानटीपणाचा कळस वाटतो. आयुष्यात त्याही पेक्षा अनेक गोष्टीत हजारो पटींची एक्साइटमेंट असते आणि त्या गोष्टी प्रमोट होणे आवश्यक आहे.
Comments
हेतू
जगण्याची प्रेरणा असल्यामुळे जिवंत राहणे हा शरीरातल्या संवेदी-संरक्षक-प्रतिक्षिप्त क्रियांचा "हेतू" आहे असे पटत नाही का?
याहून अधिक मला काही मांडता येत नाही.
नितिन थत्ते
नाही, किंवा समजत नाही
हा "प्रेरणा" काय प्रकार आहे? "प्रेरणा" म्हणजेच "हेतू" आहे काय?
ही व्याख्या समजायला कठिण आहे.
असे काहीसे म्हटलेले आहे.
हे वाक्य चालेल का?
अशा कविता आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत :
येथे झाडे, नद्या, गायी, शरीर यांची प्रेरणा, यांचा हेतू "परोपकार" आहे असे सांगितलेले आहे. त्या हेतूने झाडे फळे देतात, नद्या वाहातात, गायी दूध देतात, आणि शरीरही तसेच (कार्य करते)."
आजवर मी मानत आलो आहे, की ही काव्यात्म उपमा आहे. म्हणजे नदीच्या वाहाण्यावर मनुष्यस्वभावात असलेल्या "परोपकार" भावनेचा आरोप आहे. नद्यांचे सोडा. वृक्ष आणि गायी सजीव आहेत. "परोपकार" ही त्यांची प्रेरणा असून फळे देण्यात, दूध देण्यात त्यांचा "परोपकार" हेतू आहे काय? हे काव्यात्मक नसून तथ्यात्मक आहे काय?
दोन्ही वाक्ये समांतर अजिबात नाहीत
>>मधुरत्वाची प्रेरणा असल्यामुळे गोडवा भासवणे हा शर्करांमधील कार्बन-ऑक्सिजन-हायड्रोजन यांच्या संरचनेचा "हेतू" आहे.
हे वाक्य चालेल का?
नाही. प्रेरणा सजीवांना असतात अशी माझी समजूत आहे.
>>परोपकाराय फलन्ति वृक्षा: परोपकाराय वहन्ति नद्यः।
परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय इदं शरीरम्।।
हे काव्यात्म वर्णन आहे हे मान्य आहे. त्याचप्रमाणे आम्हाला प्रकाश मिळावा म्हणून सूर्य उगवतो वगैरे विधाने काव्यात्म आहेत.
पण सजीवांना जगण्याची प्रेरणा असते हे त्याच्याशी इक्वेट का केले जात आहे? की जगण्याची प्रेरणा/इच्छा/हेतु असे काही नसतेच असे तुम्हाला म्हणायचे आहे? की नाकात हुळहुळल्यावर शिंक येणे याचा जगण्याच्या प्रेरणेशी काहीच संबंध नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे?
नितिन थत्ते
सजीवाचे एकक काय?
"सजीवा"चे एकक काय आहे?
काही लोकांना मी विचारले (किंवा रोजव्यवहारात त्यांनी मला सांगितले) की त्यांना इच्छा असतात. त्यावरून लोकांना इच्छा असतात, असे माझे मत आहे. अवयवींना ("ऑर्गनिझम"ना) इच्छा असतात, असे मानल्यामुळे काही फायदा आहे. काही निर्णय घेताना वेळ वाचतो. म्हणजे "बागेत घुसलेली बकरी कशी हाकलायची?" असा काही निर्णय घ्यायचा असेल, म्हणा. तर बकरीचे पाय हलावेत म्हणून बकरीच्या पाठीवर काठी लावता येते, वगैरे. (हा आरोप अर्थात ढोबळ असतो. बकरीला अमुकतमुक हेतू आहे, असा माझा आरोप कधीकधी सपशेल फसतो. "बकरीला अनिच्छा होईल" म्हणून लावलेली कडू-काटेरी पाल्याची झुडपे बकरी फस्त करते...)
अवयवींच्या बाबतीत काही असा अनुभव आहे, खरा. मात्र "अवयवांना (ऑर्गन-ना) इच्छा असते" अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचा अनुभव मला आलेला नाही. काहीकाही अवयव एकसंध न राहाता गळून पडतात असा अनुभव आहे. (दात, केस, रक्त वगैरे अवयव गळण्याचा तर स्वानुभव आहे.) काहीकाही अवयव खूप काळ एकसंध राहातात. खरेच राहातात का? आतड्यातील स्रवणार्या ग्रंथी "टिकाऊ" असल्यासारख्या भासतात. तरी काही दिवसांत ग्रंथीतली जवळजवळ प्रत्येक पेशी गळून त्या ठिकाणी नव्या पेशी आलेल्या असतात. असे असल्यास "ग्रंथी" टिकाऊ आहे की नाही, याबद्दल व्याख्यात्मक प्रश्न निर्माण होतो.
पण तुम्ही म्हणता अवयवांना इच्छा असतात. (येथे "मनुष्यव्यक्ती" हे अवयवी असून "त्वचा" हा अवयव आहे, असे मानले आहे. हे चुकले असल्यास सुधारून सांगावे.) अवयवांच्या इच्छा त्या कुठल्या? अवयव इच्छापूर्तीसाठी काय-काय निर्णय घेतात?
स्पष्टीकरण
येथेही साहचर्य हाच मुद्दा असतो. या विधानाचा अर्थ असा असतो की हेतु चांगला असताना असे घडत नाही, ही घटना अपवाद समजावी. मानसिक रुग्णांनी खून केला तर त्यांनाही जेरबंदच करावे लागते, त्यांना निर्दोष म्हटले जाते पण ते निरर्थक आहे. खुन्याला बंदिवासात टाकण्यामागचा सर्वात महत्वाचा उद्देश 'पुनरावृत्ती टाळणे' हाच असतो. एखादे माकड जर 'नेहमीच' राजाच्या नाकावर मारत असेल तर तेथेही हेतूचाच आरोप करता येईल. माझा मुद्दा असा आहे की जेव्हा साहचर्य सापडेल तेव्हा विज्ञानाच्या as if या तत्त्वानुसार हेतूचे अस्तित्व मान्य करावे लागते.
काहीच समजले नाही
तुम्ही ऑकम्स रेझरचा धर्म सोडला आहे की काय, अशी शंका येते. किंवा अगदी उलट : कदाचित त्याचा अतिरेक होत असावा. (थिंग्स शुड बी ऍज सिंपल ऍज पॉसिबल, बट नो सिंप्लर.)
"साहचर्य" म्हणजे काही असते, हे मला समजले. त्याबद्दल निरीक्षणात्मक निकष ठरवू शकू, असे मी आधीच मान्य करतो. "क्ष" आणि "य" यांचे एकत्र निरीक्षण होण्याचे प्रसंग ('क' प्रसंग) आणि निरीक्षणात त्या दोहोंचा अभाव असण्याचे प्रसंग ('ख' प्रसंग) हे अधिक अनुभवात येतात, मात्र "क्ष"चे निरीक्षण होता "य"चा अभाव ('ग' प्रसंग), आणि "य"चे निरीक्षण होता "क्ष"चा अभाव ('घ' प्रसंग) हे कमी अनुभवात येतात...
"हेतू" हा टंकित आकार/ध्वनी त्याच अर्थाने लावण्याचा तुमचा मुद्दा मला अजून समजलेला नाही. "साहचर्य" शब्दात चार स्वर आहेत, "हेतू" मध्ये दोन स्वर आहेत. "साहचर्य" असे लांबलचक म्हणण्यात मराठीभाषकांचे बळ अधिक खर्च होते, त्या ऐवजी "हेतू" म्हणावे, आणि दमछाक टाळावी, असा तुमचा मैत्रीपूर्ण "हेतू" आहे काय?
ठीक आहे, वापरूया दोन अक्षरी शब्द. पण
मध्ये साहचर्य असलेले "क्ष" आणि "य" काय आहे?
माझ्या उदाहरणात "क्ष" म्हणजे त्या व्यक्तीने आधी सांगितलेली चांगली/वाईट व्हावे अशा रीतीने कृती बदलण्याची इच्छा, आणि "य" म्हणजे त्यानंतर उद्भवलेली चांगली/वाईट परिस्थिती.
इच्छा नसताना, इच्छेच्या दिशेने वर्तन बदललेले नाही, अशा घडलेल्या परिस्थितीबाबत बोलताना मी व्यवहारात "हेतू" संकल्पना वापरत नाही. तुम्ही म्हणता वापरावे.
मनोरुग्ण नसलेल्या मुलाच्या हातून वस्तू तुटली समजा. वस्तूवर हात घट्ट करणारे त्याचे स्नायू ढीले झाले, वस्तू जमिनीवर पडली, फुटली. तर "वस्तू पाडण्याची त्याची इच्छा होती की नाही" याच्याकडे दुर्लक्ष करून "पुनरावृत्ती टाळण्यासाठी" त्याला जेरबंदच करावे. (किंवा जी काय शिक्षा आहे ती करावी - कोपर्यात उभे करणे, रागे भरणे वगैरे.) असल्या प्रकारची विचित्र वागणूक करण्यास माझा पुरता विरोध आहे.
अशा परिस्थितीमध्ये "हेतू" संकल्पना वापरून माझे मुलाशी वर्तन ठरवणे मला सोयीचे आहे. "वस्तू फोडण्याचा हेतू" असेल तर रागे भरावे, नसेल तर घाबरलेल्या मुलाला चुचकारावे.
की तुमचे आणि श्री. नितिन थत्ते यांचे म्हणणे असे काही आहे?
१. "मुलाच्या वस्तू फोडण्याची इच्छा नसण्याचे" साहचर्य "वस्तू न-फुटण्याशी" असते.
२. "मुलाच्या वस्तू फोडण्याची इच्छा नसण्याचे" साहचर्य "हाताचे स्नायू ढिले न-पडण्याशी" असते.
३. "हाताचे स्नायू ढिले न-पडण्याचे" साहचर्य "वस्तू न-फुटण्याशी" असते.
हे इतके मला समजले आहे. मान्यही आहे. या प्रत्येक वाक्यात साहचर्याबरोबर पहिल्या शब्दाच्या पाशी "हेतू" असे काही असते, असे तुम्ही (किंवा श्री. नितिन थत्ते) म्हणता.
म्हणजे
(१) मध्ये "वस्तू न-फुटणे" हा मुलाचा "हेतू" असतो.
(२) "हाताचे स्नायू ढिले न-पडणे" हा मुलाचा हेतू असतो. (? माझ्यासाठी निरर्थक)
(३) "वस्तू न-फुटणे" हा हाताचा हेतू असतो. (??? माझ्यासाठी अमान्य)
यातील पहिले वाक्य क्रियाशील आहे. मुलाशी कसे वागावे, हाबद्दल त्यातून मला निर्देश मिळतो. दुसरे वाक्य या कथानकाच्या संदर्भात निरर्थक आहे. (क्रिकेट-बोलिंग शिकवताना चेंडू हाताच्या स्नायूंनी कसा आवळावा त्याबद्दल तपशीलवार प्रयास असू शकते, तशा परिस्थितीत कदाचित मला अर्थ कळतो.) मात्र तिसर्या वाक्यातले साहचर्य अगदी वेगळे आहे, आणि त्यातून मुलाच्या हातांशी कसे वागावे, याबद्दल मला काहीएक निर्देश मिळत नाही. "साहचर्याचे वेगवेगळे प्रकार असतात", त्यातील फक्त काही साहचर्यांना "हेतू" म्हणावे, अशी एक अधिक संकल्पना मी स्वीकारतो, आणि त्या स्वीकाराचा फरक माझ्या वागण्यातून तुम्हाला स्पष्ट दिसून येतो.
ही संकल्पना त्यागून माझे जितके नुकसान होईल, त्या मानाने एका अधिक संकल्पनेचे ओझे माझ्यासाठी हलके आहे. "बट नो सिंप्लर".
तोंडची वाफ वाचवण्याकरिता "साहचर्य" ऐवजी मी "हेतू" वापरू लागलो, तर "मुलाने मुद्दामून वस्तू फोडली की चुकून", याबद्दल विधान आणि निर्णय करण्यासाठी मला नवीन शब्द घडवावा लागेल, प्रसारित करावा लागेल. त्याचा खर्च अधिक येईल असा माझा अंदाज आहे. म्हणून अन्य मराठीभाषक लोकांशी बोलताना मी हल्लीच्या अर्थाने चार-अक्षरी "साहचर्य" शब्द वापरत राहेन आणि "मुद्दामून/चुकून" संदर्भात "हेतू" शब्द वापरत राहीन. हाच माझ्यासाठी लघु-उपाय आहे.
तुम्ही "मुद्दामून/चुकून" ही संकल्पना त्यागून व्यवहार करता, हे माहीत झाले, तर अन्य लोकांसाठी बरे आहे. लोकांना अनपेक्षित वाटेल, कधीकधी त्यांना दु:ख-वेदना होतील अशा तर्हेचे तुमचे वागणे असेल, याची कल्पना लोकांना आधीच असली, तर बरे. लोक स्वतःचे संरक्षण करण्याची तयारी करून ठेवतील.
तसे नव्हे
शिव शिव शिव :)
मुलाला ADHD आहे की CP आहे की DMD आहे की hyperhidrosis आहे हा मुद्दा गौण आहे. जर त्याच्या हातातून सातत्याने वस्तू पडत असतील तर त्याच्या 'वस्तू हाताळण्याच्या स्वातंत्र्यावर' निर्बंध येतील. fMRI ने त्याचे इच्छाकेंद्र तपासण्याची आवश्यकता नाही. केवळ एकदा चूक घडली की कायम पुनरावृत्ती घडेलच असे मी सुचविले नाही, वारंवार निरीक्षणे करून त्याची खात्री करून घ्यावी लागेल. परंतु, तो मुलगा कायमच 'हेतु' चांगला ठेवूनही कायमच वाईट घटना घडवेल अशी माहिती उपलब्ध असेल तर इच्छा ही संकल्पना बाहेरील निरीक्षकांसाठी निरर्थक राहील. "त्याच्या हातून वाईट काम घडले, पण त्याचा हेतू चांगला होता" याऐवजी "त्याच्या हातून वाईट काम घडले, पण सहसा त्याच्या हातून चांगले काम घडते" असे कारण सांगून त्याला remedial action देणे टाळावयाचे असते.
फार फरक आहे
--मनुष्य हा प्रजोत्पादनाव्यतिरिक्त समागम करणारा एकमेव प्राणी नसावा. मनुष्यवंशाच्या त्यातल्या त्यात जवळचा बोनोबो वानर हे एक उदाहरण आहे. वंशवृक्षापेक्षा लांब जाता डॉल्फिन हे उदाहरण आहे. म्हणजे प्रजोत्पादन होण्याची शक्यता नसतानाही समागम करतात.--
इतर मोजक्या जनावरांमधे असेलही ही सवय, पण त्यांच्या "ताई-वहीनीला" कितीजण काय प्रश्न विचारतात ते पाहून त्यांच्याकडील परीस्थिती समजु शकेल.
वासनाशमन फक्त समागमापुरते लिमिटेड नाही. लस्ट- स्त्री आणि पुरुष दोघांची इतकी प्रमाणाबाहेर गेली आहे की, वासना शमवण्यासाठी नवेनवे उपाय शोधले जात आहेत (मानवेतर प्राण्यांनी अजुन सुरु केलेले नाहीत). जसे- पोर्नो, पुस्तके, फोटो, ई. त्यात पैसा मिळतोय म्हणून सिरीयल्स, आयटम गाणी, बिकीनी (ही कला आहे वगैरे), असली थेरं. ३-डी आणि व्हीडीओ वापरुन केलेली व्ह्र्चुअल शमनदाणी, बाहुल्या, इतर खेळंणी ही त्याप्राण्यांनी अजुन तयार केलेली नाही.
ब्यांडविद्थचा वापर वाढावा म्हणून फ्री पोर्न दिले जातेय, घराघरात इंटर्नेट असल्यामुळे खेड्या-पाड्यातही पोर्न पाहीले जात आहे व एकंदरीतच सगळी जनता रोज कितीवेळ केवळ ह्याचाच विचार करत असते ते पाहीले तर किती म्यानाअवर्स वाया जात असतील ह्याचा विचारच नको.
काही-काही मेडीकल दुकाने ७००-७५० रु ला मिळणा-या एक गर्भप्रतिबंधक औषध विकुन एका औषधावरच भरपुर प्रॉफिट कमावत आहेत.
असे सगळे चित्र असतांना अंग खाजवणे ही क्रिया का घडते हा संशोधनाचा जरी विषय असला तरी प्रोमोटेड आणि स्पॉन्सर्ड सेक्स हे बांडगुळ कापले नाही तर नुसतीच चर्चा होईल.
जिभेचे चोचले आजकाल उदरभरणापुरते मर्यादित नाही
असे काही आहे काय?
- - -
तुमच्या प्रतिसादात फक्त लैंगिक व्यवहाराच्या शब्दांऐवजी खाद्यव्यवहारातले शब्द घातलेले आहेत. (अदलाबदल अधोरेखिते आहेत तितकीच). जनावरांमध्ये ते खाद्यव्यवहार केले जात नाही, हा भाग तथ्यात्मक आहे.
तुमच्या "बांडगूळ"-परिच्छेदातील भावनेशी असहमत आहे, हे सांगणे नलगे. इच्छेविरुद्धच्या लैंगिक व्यवहाराला काबूत आणण्यासाठी जी काय कमीतकमी बंधने ऐच्छिक व्यवहारांवर तुम्हाला आणायची असतील, तेवढ्यापुरते माझे तुम्हाला समर्थन आहे. त्याअधिक बंधने आणण्यास विरोध आहे.
तुमच्या मालकीच्या जनावराचे जनावर-आवर्स कुठल्या उपयोगासाठी खर्च करायचे, त्याबद्दल नियोजन तुम्ही केले तर योग्यच आहे. तुमच्या अपत्यांच्या/पाल्यांच्या मनुष्य-आवर्सचे नियंत्रण समाजात योग्य मानतात तितके करू शकता. तुमच्या व्यवसायात हाताखालच्या कामगारांच्या मनुष्य-आवर्सचे नियंत्रण फक्त त्यांच्या नोकरीच्या वेळापुरते तुम्ही करू शकता.
मात्र अन्य मनुष्यांनी मनुष्य-आवर्स कसे खर्च करावेत याबद्दल चर्चा-शालेय-शिक्षण-प्रवचन यापेक्षा वेगळे नियंत्रण तुम्ही करू शकणार नाही. (आणि चर्चा-शिक्षण-प्रवचन गोष्टी काही दुर्बल नाहीत, हे माझे मत नमूद करतो.)
सहमत आहे.
--इच्छेविरुद्धच्या लैंगिक व्यवहाराला काबूत आणण्यासाठी जी काय कमीतकमी बंधने ऐच्छिक व्यवहारांवर तुम्हाला आणायची असतील, तेवढ्यापुरते माझे तुम्हाला समर्थन आहे. त्याअधिक बंधने आणण्यास विरोध आहे--
सहमत आहे.
प्रकाटाआ
प्रकाटाआ
सारांश
चर्चेचा सारांश लिहावा असे वाटते आहे. पाहू या जमते का.
चर्चा
चर्चा गहन होते आहे असे दिसते. सजीव, हेतू इ. चा उल्लेख आल्याने हा दुवा रोचक ठरेल असे वाटते.
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
हा शब्दही आहे.
Andropause हा दुवा पाहून मूळ विषयाकडे पुन्हा वळता येईल.