थोडी तांत्रिक मदत हवी होती..

मनोगत, उपक्रम यासारखे एखादे मराठी संकेतस्थळ काढण्याकरता किती जागा लागते आणि ती कुठे विकत मिळेल? पैशे किती पडतात? सदर जागा विकत घेण्यासंबंधी काय प्रोसिजर आहे? क्रेडिट कार्डाने पैशे भरले तर चालतात का?

आम्हाला या संबंधी काहीच तांत्रिक माहिती नसल्यामुळे ती येथे विचारत आहोत. कृपया जाणकारांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती!

ता. क. - 'काय तात्या, तुम्हीही नवीन संकेतस्थळ काढताय की काय?' असे प्रतिप्रश्न विचारून कृपया विषयांतर करू नये ही नम्र विनंती...;)

धन्यवाद,

आपलाच,
तात्या अभ्यंकर.

Comments

आहे ना जागा!

तात्या
त्या जागे चे माहीत नाही, पण आमच्या मनात मात्रा तुमच्या साठी कायम जागा आहे बरं!
-गुंडोपंत

सहमत

;))

आम्हाला न कळता.हे घ्या..

आम्हाला न कळता.हे घ्या..मिसळ पाव असं म्हणायला पाहिजे होते तात्या, चारचवघात हा विषय आला म्हणजे, आम्हाला भाऊबंद म्हणून लोकं नाव ठेवतील म्हणून मदत करावीच लागेल.तसा मी एकदाच हजार/पाचशे देइन अन आजीवन सदस्य राहीन,कोणत्या ही सबबीवर मला काढता येणार नाही,माझ्या कोणता ही लेख दर्जा असो वा नसो,संपादित करता येणार नाही.आहे का कबूल.(तात्या गमतीचा भाग सोडून द्या,काही ना काही मदत मी करेन माझ्या परिनं)

मदत

नमस्कार,

प्रथम काय करावे ?

संकेतस्थळ चालू करण्यसाआधी कागदावर एक रुपरेखा तयार करा, तुम्हाला काय करावयाचे आहे, कोणती प्रणाली वापरनार आहात, रुपरेखा काय असेल, कीती जागा हवी आहे / गरजेची आहे, एक संकेतस्थळासाठी नाव व पाठीशी काही अनुभवी व्यक्तीची साथ.

असे करुन पाहा काही मदत होते का ?

१. तुम्हाला नवीन संकेतस्थळ चालू करण्यासाठी तुम्ही गुगल वर जाऊन काही दुवे शोधू शकता जसे www.net4domain.com ईतर.

२. संकेतस्थळ व्यवस्था दोन विभागामध्ये विभागली जाते एक Domain Name व दुसरा विभाग Hosting.
उदा. http://mr.upakram.org हे संकेतस्थळाचे नाव Domain Name व जेथे उपक्रम साठवले जाते अथवा ज्या जागी ठेवले जाते त्या जागेस Hosting असे म्हणतात.

३. संकेतस्थळासाठी साधारणता १०MB ते ५० जीबी पर्यंत जागा विकत घेता येऊ शकते (तुमची गरज अथवा संकेतस्थळाची रुपरेखा ह्यावर जागा अवलंबून असते) तुम्ही कमीत कमी १ वर्षासाठी जागा व नाव विकत घेऊ शकता ( समजा भाड्याने घेत आहात जर गरज असेल तरच पुढील वर्षाचे पैसे द्यावेत) एक वर्षानंतर जर तुम्ही पुढील वर्षाचे पैसे भरले नाहीत तर ती जागा व नाव त्या सुविधा देणा-या संस्थेची होते.

४. सेवा कुठून ही ह्या पण घेताना काही गोष्टी लक्षात घ्या जसे....
संकेतस्थळावर जो भाव सुविधेनूसार ठरलेला आहे अथवा दिलेला आहे तोच राहील का ? जसे काही सुविधा घेण्यासाठी पुन्हा-पुन्हा पैसे द्यावे लागतात ( खुप वाईट अनुभव आहे ह्या बाबतीत खुप संकेतस्थळाचे) . ईतर छुप्पे व्यवहारतर नाहीत ना ? जसे काही संकेतस्थळे Php Database मुफ्त देतात तर काही जण फक्त काही प्रमाणामध्ये मुफ्त देतात व नंतर सांगतात की प्रणाली अधिक हवी असेल तर पुन्हा पैसे भरा.

५. सगळ्यात महत्वाचे संकेतस्थळासाठी सर्व पैसे /व्यवहार हे क्रेडिट कार्डानेच भरावे लागतात.

अजून काही मदत हवी असेल तर पश्न विचारा जसे जमेल तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.

राज जैन

राजसाहेब,

आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल मनापासून आभार..

आम्ही जागे संदर्भात प्रश्न विचारला होता, तूर्तास आपण तेवढाच ध्यानात घेऊ.

३. संकेतस्थळासाठी साधारणता १०MB ते ५० जीबी पर्यंत जागा विकत घेता येऊ शकते (तुमची गरज अथवा संकेतस्थळाची रुपरेखा ह्यावर जागा अवलंबून असते) तुम्ही कमीत कमी १ वर्षासाठी जागा व नाव विकत घेऊ शकता ( समजा भाड्याने घेत आहात जर गरज असेल तरच पुढील वर्षाचे पैसे द्यावेत) एक वर्षानंतर जर तुम्ही पुढील वर्षाचे पैसे भरले नाहीत तर ती जागा व नाव त्या सुविधा देणा-या संस्थेची होते.

I see. १० एमबी जागा विकत घ्यायची म्हटलं तर आणि ५० जीबी जागा विकत घ्यायची म्हटलं तर अंदाजे अनुक्रमे किती खर्च येतो? मनोगत, उपक्रम यांसारख्या संकेतस्थळाला साधारण किती जागा लागते? या प्रश्नाचं अंदाजे का होईना पण कुणी उत्तर दिलं तर बरं होईल.

उपक्रमरावांनी उपक्रमकरता किती जागा विकत घेतली आहे याचं उत्तर खुद्द त्यांनीच दिल्यास आम्हाला निश्चित अंदाज येईल. मनोगतकारांनी अंदाजे किती जागा घेतली असावी याचंही उतर कुणी दिल्यास उत्तम होईल.

४. सेवा कुठून ही ह्या पण घेताना काही गोष्टी लक्षात घ्या जसे....
संकेतस्थळावर जो भाव सुविधेनूसार ठरलेला आहे अथवा दिलेला आहे तोच राहील का ? जसे काही सुविधा घेण्यासाठी पुन्हा-पुन्हा पैसे द्यावे लागतात ( खुप वाईट अनुभव आहे ह्या बाबतीत खुप संकेतस्थळाचे) .

ज्या संकेतस्थळांचे वाईट अनुभव आहेत त्यांची कृपया नांवे सांगा. म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल! ;)

तूर्तास इतकेच. आपले पुनश्च एकदा आभार..

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

बुचकळ्यात पडलोय

तात्या तुमचे स्वतःचे आधीच एक मराठी स्ंकेतस्थळ् आहे http://tatya7.blogspot.com/. ते चांगले असताना तुम्ही नवीन् काढायचे म्हणताय ते कशासाठी हे समजले तर् तुम्हाला सुचवता येईल.
तुम्हाला त्यातला blogspot हा भाग खटकतोय?
तुम्हाला इतराना सामील करायचेय पण् सध्या चे स्थळ करू देत् नाही?
तुम्हाला इतर् कुठल्यातरी सुविधा हव्या आहेत् त्या सध्या नाहीत?

जितेनराव,

ते चांगले असताना तुम्ही नवीन् काढायचे म्हणताय ते कशासाठी हे समजले तर् तुम्हाला सुचवता येईल.

आम्ही नवीन संकेतस्थळ काढतो आहोत असं या चर्चाप्रस्तावात कुठेही म्हटलंलं नाही! ;)

तुम्हाला त्यातला blogspot हा भाग खटकतोय?
तुम्हाला इतराना सामील करायचेय पण् सध्या चे स्थळ करू देत् नाही?
तुम्हाला इतर् कुठल्यातरी सुविधा हव्या आहेत् त्या सध्या नाहीत?

हे प्रश्न प्रस्तुत चर्चेच्या दृष्टीने गैरलागू वाटतात. तरीही आपण दाखवलेल्या आस्थेबद्दल आपले आभार..

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

खुलासा

हे प्रश्न प्रस्तुत चर्चेच्या दृष्टीने गैरलागू वाटतात.
तुम्हाला काही तांत्रिक बाजू माहिती नसावी. तसे असते तर् तुम्हाला हे गैरलागू वाटले नसते
DNS setting ची जादू वापरून तुम्हाला जागेचे पैसे ने भरता (फक्त Domain name चे पैसे भरून्) सद्ध्याचेच संकेतस्थळ दुसर्‍या नावाने चालवता येते. म्हणजे जगाच्या दृष्टिने ते misalpav.com राहील पण तुम्ही मात्र सध्याच्याच ठिकाणी लिहाल. म्हणून तुम्हाला काय हवे आहे किंवा नको आहे हे समजणे महत्वाचे आहे.

बरोबर.

म्हणजे ब्लॉगस्पॉट ची सजावट इ. वापरुन, किंवा इतर सोयी वापरुन पण आपले डोमेन नेम विकत घेऊन आपला ब्लॉगच त्या नावावर हलवणे हे शक्य आहे.
सदस्य योगेश (पुणेकर.नेट)आणि सर्किट(दभांडारकर्स.कॉम) यांनी तेच केले आहे असा अंदाज आहे.

अधिक माहितीसाठी ब्लॉगस्पॉटवरील ही माहिती पहा.

ब्लॉगचा नावाऐवजी दुसरे नाव?

आपले डोमेन नेम विकत घेऊन आपला ब्लॉगच त्या नावावर हलवणे हे शक्य आहे.

परंतु त्यामुळे केवळ आपल्या ब्लॉगलाच इच्छित नांव देता येईल असे वाटते.

सदस्य योगेश (पुणेकर.नेट)आणि सर्किट(दभांडारकर्स.कॉम) यांनी तेच केले आहे असा अंदाज आहे.

योगेशरावांच्या पत्त्यावर जाऊन पाहिले असता तो केवळ त्यांचाच ब्लॉग आहे असे कळले. तिथे मनोगत किंवा उपक्रमसारखं सगळ्यांनाच लिहिता येत नाही.

संत तात्याबा मिसळपाव डॉट कॉम काढण्याच्या खटपटीत आहेत!

फरक

सर्किट रावांचा ब्लॉग हा वर्डप्रेस आधारित आहे. त्यामुळे त्यांना डोमेन नावासोबत होस्टिंग सर्व्हिस घेणे आवश्यक आहे.

आम्ही (पैशे वाचवण्यासाठी) ब्लॉगस्पॉटवर ब्लॉग ठेवून केवळ डोमेन नाव घेतले आहे. हवे तसे डोमेन नाव घेऊन गूगल तर्फे ब्लॉग रि-डायरेक्ट करणे अतिशय सोपे आहे.

आमचे परममित्र शॉर्ट सर्किट यांना आमच्या ब्लॉगवर आमंत्रित (की निमंत्रित) करुन तेथे लेखन करण्यास प्रवूत्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

हे घ्या

www.2createawebsite.com/

या दुव्यावर एकदा पहा तुम्हाला हवी ती माहिती मिळते का? मला हा दुवा गुगलवर शोधताना मिळाला. तुम्हाला कितपत उपयोगी पडतो ते पहा.

पल्लवी

लवकर सुरू करा.

मिसळपाव.कॉम लवकर सुरू करा. वाट पहात आहे. -:)

-ईश्वरी.

आता आम्ही मिसळपाव चे अनभिषिक्त सम्राट आहोत! ;)

आधी आम्ही फक्त मिसळपाव डॉट कॉम हे एकच नांव विकत घेतले होते, पण आमच्या सातीने आम्हाला खरडवहीत निरोप टाकून वेळीच सावध केले. म्हणून आम्ही मिसळपाव निगडीत सगळीच डोमेन नांवं विकत घेऊन मोकळे झालो.

आता आम्ही खालील नांवांचे मालक आहोत! ;)

१) मिसळपाव डॉट कॉम
२) मिसळपाव डॉट इन्फो
३) मिसळपाव डॉट नेम
४) मिसळपाव डॉट नेट
५) मिसळपाव डॉट ओआरजी
६) मिसळपाव डॉट यूएस

आता यापुढे मिसळपावाकरताच जगायचं अन् मिसळपावाकरताच मरायचं! ;)

(मिसळपावप्रेमी) तात्या.

मिसळपावचे जागतिक हक्क संत तात्याबांकडे आहेत! ;)

मिसळपाव डॉट यूएस?

ऐवजी मिसळपाव डॉट इन असा घ्यायचा होता हो.

योगेश डॉट इन



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

माहीत नाय!

ते काय आपल्याला माहीत नाय बा! मी ज्या संकेतस्थळावर ही नांवं विकत घ्यायला गेलो होतो त्या संकेतस्थळाने जेवढी दाखवली तेवढी सगळी घेतली!

तात्या.

पण मग

उद्या मिसळपावाचे पेटंट अमेरिकेतील मॅकडोनाल्ड्स ने घेतले व पुरावा म्हणून विसोबांची मिसळपाव डॉट यूएस ही साईट दाखवली तर तुमच्या मामलेदाराला मिसळपाव विकताना रॉयल्टी द्यावी लागेल ना.

(पेटंटबाबत अज्ञानी ) योगेश



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

एक सल्ला हवाय!

नुकतेच आम्हाला http://manashosting.com/reseller.html या संकेतस्थळावर १०००० एमबी जागेकरता वर्षाला ८००० रुपये पडतील असे समजले.

मिसळपाव डॉट कॉम ला एवढी जागा पुरेशी आहे का? की अधिक लागेल? की एवढी लागणार नाही?

आम्हाला त्यातली काहीच तांत्रिक माहिती नाही म्हणून येथे चौकशी करत आहोत. नाहीतर उगाच आमचे जास्त पैसे खर्च व्हायचे! ;)

तात्या.

संत तात्याबा आता जागेच्या खटपटीत आहेत!

महाग आहे !

महाग आहे !
नका घेऊ !

मी सांगतो आहे तुम्हाला !
तुम्ही येथे जा !
http://www.hostmonster.com

तात्या विचार करा ! व मगच पैसे द्या ! हे मी वरच सांगीतले आहे !

राज जैन

 
^ वर