युनिकोड आणि मराठी फॉन्टस

युनिकोडने विविध भाषांमधे लिहायची सुविधा उपलब्ध करुन दिल्यापासून संगणकावर मराठी लिहिणे फारच सोयीचे झाले आहे. बरहा, गमभन यांनीदेखील भारतीय भाषांमधे टंकलेखन करण्यासाठी अतिशय मोलाचा हातभार लावला आहे.
साधारणपणे विविध पुस्तके, संकेतस्थळांवर टंकलेखन करण्यासाठी सर्वसाधारण दिसणारे फॉन्टस (उदा. इंग्रजीमधील एरीयल, टाईम्स न्यु रोमन सारखे) वापरले जातात आणि त्यावर काम चालून जाते. मात्र दिवाळी अंकांमधील जाहिराती / शीर्षके टंकण्यासाठी डिजायनर फॉन्टस (मराठी पर्यायी शब्द सुचवा ) ची आवश्यकता असते ती ह्या फॉन्टस मुळे भागत नाही.
काही वर्षांपूर्वी मी जेव्हा "डीटीपी" क्षेत्रात काम करत असे तेव्हा "आकृती" "श्री लिपी" "कृती" ह्या सॉफ्टवेअर्सची चलती होती. "आकृती" वापरायला सोपे होते मात्र "श्री लिपी" चे डिजायनर फॉन्टस त्या तुलनेत कितीतरी सरस होते. किंमतीचा विचार करता "आकृती" चे सॉफ्टवेअर तुलनेने स्वस्त होते.

अशा प्रकारचे मराठी डिजायनर फॉन्टस / सॉफ्टवेअर्स (मोफत / विकत ) बद्दल येथील जाणकारांकडे माहिती मिळेल काय यासाठी हा चर्चाप्रस्ताव. युनिकोडवर अशा प्रकारचे काही नवीन उपक्रम चालू आहेत काय याबद्दल माहिती घ्यायला आवडेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

युनिकोड मध्ये

कोरलड्रॉ तसेच ऑटोकॅड मध्ये फाँट डिझाईन करता येतात. पण हे टि टि एफ असतात.
ओपन टाईप वेगळे बनवावे लागतील. मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवर याची काही माहिती आहे.

तसेच मायबोलीवर एक किरण नावाचे सदस्य आहेत त्यांनी 'किरण' नावाचा एक फाँट बनवला होता.
हा युनिकोडपूर्वी महत्त्वाचा होता. हल्ली फारसा वापरात दिसत नाही.

युनिकोड मध्ये डिजायनर फॉन्टस मला तरी सापडले नाहीत.
पण मला या प्रकल्पात रस आहे.
तुम्हालाही असेल तर आपण एकत्रीत पणे काही करू शकू,
कारण प्रकल्प सुरुवात करायला मोठा असू शकेल.

-निनाद

मलाही उत्सुकता आहे

या विषयाबाबत मलाही उत्सुकता आहे.

मराठी फॉन्ट्स

संगणकावर माराठी आता जराशी कुठे वापरू जाऊ लागली आहे. सध्याच्या परिस्थितीत बहुतांशी संगणक (निदान भारतातले तरी) अजून एक्सपी ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असल्याने कोठेही विनासायास दिसू शकणारा मराठी फॉ न्ट मंगल हाच आहे. त्यामुळे सध्या तरी त्याला पर्याय दिसत नाही. तज्ञ मंडळींनी दुसरा पर्याय जरूर सुचवावा.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

युनिकोडचा बाप

मराठी युनिकोड हे सी-डॅक प्रणालीचे अपत्य आहे. पण त्यात सुधारणा करू शकणारा जबाबदार माणूस कोण याच्या मी शोधात आहे. कुणाला माहित असल्यास कळवावे.

या प्रणालीचे वैशिष्ट्य असे की मराठीत लागणारी अक्षरे सर्व अक्षरे त्यात नाहीत कारण देण्यात येते की जागा नाही. मात्र मराठीत न लागणारी कित्येक अक्षरे त्यात आहे.
मला यातले फारसे कळत नाही आणि नीटसा कळणारा माणूस भेटला नाही. पूर्वी शिवाजी, सुशा इत्यादी फुकटचे फॉन्ट आणि आकृती, श्रीलिपी इत्यादी विकतचे फॉन्ट एका बाईट मध्ये एक अक्षर याप्रमाणे बसायचे. कुठलेही इन्सटॉलेशन न करता व्यवस्थित चालायचे. आता त्याची जागा दोन बाईट मध्ये एक अक्षर याप्रमाणे चालणार्‍या युनिकोडने घेतली आहे. पण ती सुद्धा ऑपरेटींग सिस्टीम मधे फेरबदल केल्याशिवाय चालत नाहीत. याच वेळी इस्की (सी-डॅककृत प्रणाली) कोणीच वापरत नव्हते. (मी एकदा विकत घेतली होती आणि काही काळ वापरली.) सरकारी असल्याने ही प्रणाली युनिकोड मध्ये शिरली असा माझा अंदाज आहे. यातच मराठीचे देवनागरी हिंदी देवनागरीशी जोडले गेले. त्यामुळे हिंदीला मराठीचा ळ, अर्धा र तर मराठीला हिंदी आणि इतर देवनागरी सदृष्य लिप्यांची अक्षरे आपल्यात सामावून घ्यावी लागली. त्यामुळे मिळालेली जागा भरली. आता एक एक अक्षर (उदा. ऍ) साठी युक्त्या करून अक्षरे बनवावी लागतात. किंवा अक्षरे बनतच नाहीत.

याचा एक दुष्परिणाम म्हणजे (असे मला वाटते) कोरल, ऑटोकॅड, पेजमेकर अशा ठिकाणी युनिकोड बिलकूल चालत नाही. सुरुवातीला सी डॅकने आपली एकाधिकारशाही राखण्यासाठी असे केले असणार. पण आता ती एक मोठी अडसर झाली आहे. याचा परिणाम म्हणजे छपाईवाले युनिकोड वापरू शकत नाहीत. (ओपन ऑफिस किंवा माय्क्रोसॉफ्ट ऑफिस हे छापणार्‍यांना सुयोग्य वाटत नाहीत.) यावर कुठलाही तोडगा काढण्याचा कुणाचा विचार असावा असेही दिसत नाही. (माझी माहिती मर्यादित आहे. जाणकारांना विनंती आहे की त्यांनी अधिक माहिती द्यावी.)

माझे विचार याबाबतीतचे असे आहेत.

१. मराठीसाठी स्वतंत्र (हिंदी वा अन्य भाषांसोबत नव्हे) लिपीप्रणाली जारी करावी. जेणे करून जागेचा प्रश्न सुटेल.
२. टी.टी.एफ. (शिवाजी, सुशा आदी सारखी एक बाईटची) आणि युनिकोड यांची एका झटक्याने अदलाबदल करता येण्यासाठी संगणकीय प्रणाली करावी. (ही रुपांतर करणारी नसावी. तर फक्त ट्रीम वा ऍड बाईट करणारी असावी.)
३. युनिकोड मधील स्वतंत्र फॉन्टस तयार करण्यासाठी सोपी प्रणाली तयार करावी. अशा फॉन्टस क्रिएटर्स मुळे शिवाजी व सुशा झाले.
४, हाफ स्पेस, नल स्पेस यातून सुटका करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी. (पूर्वी याशिवाय होत असे.) म्हणजे स्पेलचेक चांगले चालेल.

तुमच्या माहिती साठी.

संस्कृत २००३ या नावाने एक खुला युनिकोड फॉन्ट उपलब्ध आहे. मराठीत तो बरा चालतो.
श्रीलिपी आणि आकृती दोघांनीही आपापले युनिकोड फॉन्टस तयार केले आहेत. (पण ते फुकट नसावेत.)

प्रमोद

नवीन

कोरल, ऑटोकॅड, पेजमेकर अशा ठिकाणी युनिकोड बिलकूल चालत नाही

कोरल, ऑटोकॅड, पेजमेकर आणि फोटोशॉप मध्ये युनिकोड सपोर्ट नाही म्हणून तेथे ते चालत नाहीत.
माझ्या अंदाजाने एकाधिकारशाही वगैरे मुद्दा नसावा.

कोरलच्या नवीन १२ व्या आवृत्तीत आता युनिकोडचा समावेश आहे. मी वापरून पाहिलेले नाही. तसेच फोटोशॉप वगैरेचे पण असेल. जिम्प या फुकट फोटो एडिटींग सॉफ्टवेयरमध्ये मध्ये युनिकोड चालते. मी वापरले आहे.

-निनाद

धन्यवाद

संस्कृत २००३ चांगला दिसतोय. वापरून पहावा एकदा.
आता मला शोधत असताना हा दुवा सापडला. इथे मांडलेले फाँटस बरे वाटत आहेत. अर्थातच मी ते वापरून पाहिलेले नाहीत. परंतु, वापरण्यासाठी चांगले वाटत आहेत.

 
^ वर