उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
क्रिकेट आणि म्याच फिक्सिंग
गिरीश
September 23, 2010 - 4:05 am
कालच्या च्यांपियन लिगमधील चैनई आणि वॉरीयर ह्यांच्या म्याचमधे चैनई जिंकणार हे आधी पासुनच वाटत होते. सेमी-फायनलमधे एकही आयपीएल टीम नसणे हे स्पर्धेच्या दृष्टीने हीतावह नव्हतेच. झालेही तसेच -चैनईने अगदी फालतू स्कोअर करुनही वॉरीयरला तो करता आला नाही. आधीच्या म्याच मधे ज्या अश्विनला धोपट-धोपट धोपटले होते त्याने ३ विकेटी घेतल्या. सगळेच मजेदार.
क्रिकेटमधे खरंच म्याच फिक्सिंग होत नाही हे त्यांनी खरंच पटवून देण्यासाठी वॉरीयरच्या ऐवजी चैनईला पराभूत व्हायला सांगायला पाहीजे होते.
दुवे:
Comments
"परफॉर्मन्स"
क्रिकेट म्हणजे एक स्टेजवरचा "परफॉर्मन्स" झाला आहे का? तुमची करमणूक झाली ना मग बास!
वाटते तरी तसे
क्रिकेटचा खेळ डब्लू डब्लू एफ् सारखा झाला आहे. कोण जिंकणार हे आधीच ठरलेले असते.
२०-२०
२०-२० हा काय क्रिकेटचा खेळ आहे?
तो तर क्रिकेटच्या साधनांनी खेळला जाणारा दुसराच खेळ आहे.
बाकी डब्लू डब्लू एफच्या तुलनेशी सहमत.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
डब्लू डब्लू एफ्
डब्लू डब्लू एफ् = उत्तम उदाहरण!
कॉन्स्पिरसी थिअरी...
चेन्नईच्या आधीच बंगळुरु सेमीमध्ये शिरली होती.
जर टूर्नामेंटच्या सुरूवातीला तुम्ही असं भाकीत केलं असतंत तरी फार प्रचंड आदर वाटला नसता. (दहा टीमपैकी जर तीन टीम आयपीएलमधल्या असतील [५ चे २ ग्रुप, पहिल्या ग्रुपमध्ये २ आयपीएल टीम व दुसऱ्यात १. प्रत्येक ग्रुपमधून दोन टीम सेमीमध्ये जातात] तर सेमीमध्ये एक तरी आयपीएलची टीम येण्याची शक्यता किती - प्रत्येक मॅच जिंकण्याची प्रत्येक टीमसाठी शक्यता ५०% धरली तर... हे गणित कोणी सोडवेल काय? माझा अंदाज - सुमारे ८२%) पण कॉन्स्पिरसी थियऱ्यांची मानवी मनाला भुरळ घालण्याची शक्ती प्रचंड आहे असं दिसतं. ८२% शक्यतेची गोष्ट घडल्यावर देखील यात काहीतरी गौडबंगाल असल्यासारखं वाटतं हेच नवल नाही का?
भारतातून एक व्यक्ती यदृच्छेने निवडली. ती हिंदू निघाली. अरे बापरे ही हिंदूंची कॉन्स्पिरसी आहे निश्चितच...
अहो नाही, भारतात सुमारे ८१% हिंदू आहेत. त्यामुळे त्यात काही आश्चर्य करण्यासारखं नाही.
छे छे आमचा असल्या गणितापेक्षा कोणीतरी हरामखोर सगळी यंत्रणा आपल्या फायद्यासाठी चालवतो आहे यावरच अधिक विश्वास आहे.
कदाचित तुमचं खरंही असेल. कदाचित प्रत्येक ओव्हरच्या प्रत्येक बॉलला नक्की काय होणार हे ठरलेलंही असेल. फक्त अमुक टीमचा स्कोअर कमी झाला तरीही ती जिंकलीच कशी किंवा अमुक गोलंदाज गेल्या मॅचमध्ये मार खाल्ल्यानंतर या मॅचमध्ये ३ विकेट घेतोच कशा यावरून काहीच सिद्ध होत नाही. क्रिकेटचा खेळ तितका अनिश्चित निश्चितच आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
डकवर्थ-लुईस
>>क्रिकेटचा खेळ तितका अनिश्चित निश्चितच आहे.
सहमत आहे. त्या अनिश्चिततेचे प्रतिबिंब पडत नाही म्हणूनच डकवर्थ लुईस नियमाला विरोध होत असतो.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
प्रतिबिंब
मी स्वतः फास्ट बॉलर होतो. त्यामुळे मला माहीती आहे की, फुलटॉस बॉल टाकणे -न टाकणे मला सहज ठरवून करता यायचे. मुंबई इंडीयन्सच्या म्याच मधे झहीर खानला शेवटच्या ओव्हरमधे हे करता येत नव्हते? टाकले ते ही लेग साइडला?- म्हणजे मग नुसता ग्लान्स केला, की फोर!
येथून पुढे कोणत्याही म्याचमधे (कोणत्याही लीगच्या) हे प्रतिबिंब दिसते का पहा-
वनडे असेल तर ८ तासांचा खेळ घडवून आणणे आवश्यक असते.- ती म्याच च्यानेलवाल्यांना कमर्शियली सक्सेसफूल होण्यासाठी
१. पहिली ब्याटींग असलेल्या संघाने ६ विकेट पटापटा घालवल्या (६/८० वगैरे), की नंतर टुकार ब्याटस्मन लांबलचक इनिंग खेळतात. मग ते २२५ पर्यंत पोहोचतात. नंतरची टीम मग ते रन ४५-४८ ओव्हरमधे करतात- जेव्हा त्यांना नेटरनरेटचा प्रश्न नसतो. सेटलमेंट- तुम्ही सगळी अब्रु घालवलेलीच आहे, मग आता तुमचे शेवटचे ब्याट्स्मन आम्ही खेळू देतो पण म्याच आम्हालाच द्यायची, ओके?
२. वरील क्रम उलटा करा
३. ज्या देशाने प्रतिस्पर्धी देशात सपाटून मार खाल्लेला असतो, त्याच्या घरच्या मैदानात त्यांना सेरीज जिंकणे शक्य कसे होते? अचानक खेळाडूंना फॉर्म कसा गवसतो?
आणखी खूप ऑब्जर्वेशन्स् आहेत.
उदाहरणं द्या
माझा मुद्दा मॅच फिक्सिंग होतच नाही असा नाही. तर काही वेळा ज्या रॅंडम गोष्टी होतात त्याही बघणारांना चमत्कारिक वाटतात. व त्यामधून काहीतरी नसलेले अर्थ काढले जातात.
१. उदाहरणं द्या - अविश्वास आहे म्हणून नाही. चर्चा अधिक रंगतदार होण्यासाठी.
२. उलटा क्रम म्हणजे काय ते कळलं नाही.
३. घरी जिंकणं जास्त सोपं असण्याची अनेक कारणं असतात - हवामान, घरच्या बोर्डाने तयार करवून घेतलेली पिचं, प्रेक्षकांची साथ...
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
हिशोब सरळ
१. उदाहरणे शोधून देतो.
२. उलटा क्रम म्हणजे, पहील्यांदा ब्याटींग केलेल्यांनी समजा २५० धावा केल्या आहेत. दुस-या टीमने उत्तर देतांना फटाकन् ६-७ खेळाडू गमावले की, पहा नंतर वरील प्रकार पुन्हा दिसतो. उद्दीष्ट असते ८ तास सामना चालवण्याचे तरच तो च्यानेलवाल्यांना परवडतो. हिशोब सरळ आहे हो, तेव्हढ्या जाहीराती कमी होणार.
३. इंडीयन कंटीनेंटमधे कीती फरक पडणार?
थोडीशी सहमती
मुद्दे १ व २ हे बहुतेकांना मान्य असतीलच. ८ तास एअरटाइम असताना एखादी मॅच ५ तासात संपली तर जाहिरातीतून मिळणार्या ३५-४० % महसुलावर पाणी सोडावे लागेल.असे प्रकार वाहिन्यांचा एअरटाइम वाया जाऊ नय म्हणून होतात
मुद्दा ३: घरच्या मैदानावर खेळताना हवामान, आपल्या सामर्थ्यानुसार बनवलेल्या धावपट्ट्या, प्रेक्षकांचा पाठिंबा अशा गोष्टी असतात.
इंग्लंडच्या भारत दौर्यात पहिली कसोटी शक्यतो नागपूर/मुंबई/चेन्नई येथे असते.(पाहुण्याचे स्वागत पराकोटीच्या उषणता व आर्द्रतेने करण्यासाठी), तर भारताच्या इंग्लंडदौर्यातील पहिली कसोटी लीड्स वर असते.(पराकोटीची थंडी व हातभर स्विंग होणारा बॉल)
||वाछितो विजयी होईबा||
सरळ संघच विकला जातो
भारतात म्याच फिक्सिंग वगैरे होत नाही . भारतात सरळ संघच विकला जातो. मग संघाचे मालक जसे हुकुम देतील तसेच खेळाडूना खेळावे लागते .
thanthanpal.blogspot.com
शेवटी जनतेचा बळी जातो.
कधी कधी मालक खुद्द परदेशी संघ हवा आहे असे सांगत, त्यातून ते आपले सिनेमे हिट्ट करून घेतात, राजकारणी त्यांना संरक्षण देतात आणि शेवटी जनतेचा बळी जातो.
त्यांना पाळतात
एक मालक पाकीस्तानी खेळाडूंवर खूप प्रेम करतात, त्यांना पाळतात. सध्या ते कुठे आहेत कळत नाही.
मी बघितले आहे परवा.
माझं नाव हे, माझं नाव ते, असं काहीतरी ओरडत रस्त्यावरून जाताना मी बघितले आहे परवा.
खणला त्याला
:-) मस्त हाणला आणि खणला त्याला.