कोंबडी मारण्याचा कारखाना

रिलायन्सच्या पुणे जिल्ह्यातील एका प्रकल्पात रोज चौदा हजार कोंबड्या यांत्रिक पद्धतीने मारल्या जातात. या कोंबड्या आधी तपासल्या जातात. त्यानंतर वर्गीकरण केल्यावर त्यांना प्रक्रियेत समाविष्ट केले जाते. एका कन्व्हेयर बेल्टवर त्या उलट्या टांगलेल्या असतात. रिवाजाप्रमाणे त्यांच्या मानेला पाणी लावण्यासाठी एक वॉटर ट्यूब असते. मानेला पाणी लागलेल्या उलट्या लटकलेल्या कोंबड्या बेल्टसह पुढे जातात. पुढील एका पात्याने त्यांची मान कापली जाते. रक्त डिसपोझ करण्यासाठी वेगळी यंत्रणा असते. सोलण्याची वेगळी यंत्रणा असते. वगैरे वगैरे! शेतकर्‍यांकडून खास अशा कोंबड्यांची पैदास केली जाते. रिलायन्स या प्रकल्पात वेंकटेश्वरा वगैरेकडून कोंबड्या विकत घेत नाहीत असे समजते.

हा 'माल' पुढे निर्यात होतो. परदेशांमधे मागणी अधिक असल्यामुळे किंवा / व पुरवठा कमी असल्यामुळे हा उद्योग भरभराटीस आलेला आहे.

कोंबड्यांची पैदासच या कारणासाठी होत असल्यामुळे वरवर पाहता यात काहीही विशेष वाटू नये. खरे तर 'विशिष्ट शेतकर्‍याकडे विशिष्ट कालावधीनंतर इतक्या इतक्या कोंबड्या असतील' इथपर्यंतचा 'डेटाबेस' रिलायन्सकडे उपलब्ध आहे असे समजते.

जगभरात मांसाहार प्रमुख आहार आहे हेही खरे आहे.

स्वतः चिकन किंवा इतर मांसाहार करत असूनही असा कारखाना असणे हे जरा 'अधिक' (?) क्रौर्याचे वाटते. हा कारखाना अर्थातच कित्येक जणांची पोटे भरतो (रोजगाराच्या माध्यमातून), शेतकर्‍यांचा फायदा करून देतो हे मान्य आहेच.

या चर्चेचा हेतू 'या मताशी सहमत व असहमत लोक किती प्रमाणात असतात ते जाणण्याचे कुतुहल' असा आहे.

उपक्रम जिंदाबाद

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला विषय (फॉर अ न्यू? मेंबर)

याबाबतीत, दृष्टीआड सृष्टी हेच पटते.
निसर्गात जेव्हा प्राण्यांची शिकार होते तेव्हा त्यांना जितक्या यातना सहन कराव्या लागतात त्यापेक्षा यांत्रिक कत्तलखान्यात कमीच यातना होत असणार. अर्थात, यातनांची मानवी व्याख्या वापरणे चूक ठरू शकेल. मिंकना पाण्याजवळ वास्तव्य नसेल तर यातना होतात (असे त्यांच्या स्ट्रेस संप्रेरकांच्या मापनावरून दिसते). घाण, गर्दी, इ. मानवी दृष्टीने त्रासदायक वातावरण त्यांना चालते.
अमेग्लिया मेजर या ग्रहावरील गायीविषयी काय म्हणावे? येथून चर्चा सेडोमॅसोकिजम जोड्यांविषयी करता येईल. हेही पहा.

बाकी, जनुकीय अभियांत्रिकी वापरून केएफसीने शीर्षविहीन कोंबड्यांची पैदास सुरू केल्याच्याही अफवा आहेतच ;)

याच गायीची आठवण आली :-)

विश्वाच्या अंताजवळील उपाहारगृहातल्या याच गायीची आठवण आली :-)

कोंबडी जाते जीवानिशी खाणार म्हणतो वातड झाली तसला प्रकार हा आहे.

स्वतः चिकन किंवा इतर मांसाहार करत असूनही असा कारखाना असणे हे जरा 'अधिक' (?) क्रौर्याचे वाटते. कमाल आहे. नाही का? मानवाला जेंव्हा शेती करणे माहित नव्हते त्या काळात तो जंगली जनावराचे मांस च खात होता . जसा जसा तो प्रगत होत गेला तसे तसे मांस आगीवर भाजून, नंतर शिजवून, मसाले टाकून खात आला आहे. पण अनेक युगे जनावर मारण्याची पद्धत रानटीच होती त्यात स्वच्छता पाळली जात नव्हती. पण यांत्रिकीकरणा मुळे यात स्वच्छता आली. त्याच बरोबर लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे वाढत्या मागणीला नियमित आणि दर्जेदार मांस पुरवणे शक्य जाहले आहे. यामुळे मांस खावून त्या कोंबड्या मारण्याच्या पद्धती बद्दल जरा 'अधिक' (?) क्रौर्याचे म्हणणे म्हणजे नर्काश्रू ढाळण्या सारखे आहे. एक म्हण आहे कोंबडी जाते जीवानिशी खाणार म्हणतो वातड झाली तसला प्रकार हा आहे. कोंबडी खाटकाच्या खाटिकखाण्यात अस्वच्छ जागी काटली काय आणि अंबानींच्या रिलायन्सच्या पुणे जिल्ह्यातील एका वातानुकील प्रकल्पात यंत्रावर काटली काय तीचा जीव तर तुमचे आमचे पोट भरण्यासाठीच जाणार आहे मग बिनकामाची भूतदया दाखवण्यात काय मतलब . आजकाल नेत्या पासून जनते पर्यंत काहींच ना करता अश्या रिकामटेकड्या चर्चा करण्याची होड लागली आहे.

केवढे हे क्रौर्य!

नाहीरेंची बाजू घेऊन इंडियाच्या रहिवाश्यांविरुद्ध खडे फोडण्याची संधी न देणारा धागा काढून अ-नर्काश्रुढाळ यांना यातना देणार्‍या मुद्देसूद यांचा निषेध.

दृष्टीआड सृष्टी

स्वतः चिकन किंवा इतर मांसाहार करत असूनही असा कारखाना असणे हे जरा 'अधिक' (?) क्रौर्याचे वाटते

.

वाटत असेल. म्हणूनच मी कोंबडीला मारत नाही आणि मारताना बघत नाही. मी मेलेली, साफ केलेली कोंबडीच वापरते आणि त्याचा अर्थ आणि प्रतिमा माझ्या डोक्यात "खाद्य" अशीच आहे. त्यामुळे मला वाईट वगैरे वाटत नाही.

मामला खतम! (मेलेले) चिकन जिंदाबाद!

थोडासा पास

बहुतेक शाकाहारी अन्न खातो, म्हणून थोडासा पास.

मात्र पाळीव जनावरांचा "निरुपयोगी" छळ, जनावरांच्या झुंजा वगैरे रोखण्याबाबत जे कायदे आहेत. त्यांच्याबद्दल ,माझी भावनिक सहानुभूती आहे. तुमच्या चर्चाविषयाला हे अर्धवट उत्तर आहे.

पीइटीए

पेटा ही संस्था अनेक ध्वनिचित्रफिती बनविते (त्या अतिशयोक्त/नकली/मुद्दाम प्राणी मारून बनविलेल्या असल्याचेही दावे आहेत). मांस आणि कातडी (त्वचा म्हटले तर अधिक वाईट वाटेल का? - रॅट पेक्षा माऊस या शब्दाविषयी डिस्नीमुळे सहानुभूती निर्माण झाली असे कोठेतरी वाचले होते) मिळविताना प्राण्यांना होणार्‍या यातना कमी/बंद करण्यासाठी आवश्यक असलेला खर्च टाळला तर त्या यातनांस "निरुपयोगी यातना" म्हणता येईल काय?

फार खोल विचार न केल्यामुळे सांगता येत नाही

याबाबत स्वानुभवातून मी फक्त "प्रयोगशाळेत जनावरे मारणे / मोजमापे पूर्ण होईपर्यंत जिवंत ठेवणे" या संदर्भातच थोडा खोलात विचार केलेला आहे. खर्चाबद्दल विचार होतो, हे खरे आहे. उपलब्ध साधने-संपत्ती जितकी आहे, त्याचा सर्वात कार्यक्षम उपयोग होऊन वेदना जितक्या टाळता येतील, तितक्या टाळण्याचा प्रयत्न होतो. "उपलब्ध साधन-संपत्ती" ही शून्यापेक्षा जास्त असते, असा माझा अनुभव आहे.

मात्र तो प्रकार चर्चाविषयाच्या बाहेरचा आहे. चर्चाविषयाबाबत अधिक विचार करण्यासाठी आज वेळही नाही. म्हणून पास.

फरक?

जिवंत कोंबडी आणि मेलेली कोंबडी ह्यात काय फरक असतो?

हम्म

२१ ग्रॅम?

:-)

कोंबडीचा आत्मा २१ ग्रॅमचा असतो का? :-)

मूंडी

मूंडी

नाही

आत्मा या संदर्भानेच मी २१ ग्रॅम असा उल्लेख केला होता :ड्

नाही

नाही-
जिवंत कोंबडी = कोंबडी
बिचारी कोंबडी = चिकन

कायदा

भारतातील ऍनिमल क्रुएल्टीचे कायदे काय सांगतात कल्पना नाही. त्यात हे बसते का हे बघणे रोचक ठरेल.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

आभार

सर्वांचे आभार!

उपक्रम जिंदाबाद

यांत्रिक

मी शाकाहारी आहे.

यांत्रिक पद्धत सगळ्यात जास्त हायजिनिक असावी असे मला वाटते, म्हणून यंत्राला पाठिंबा.

तुम्ही

फूड इन्क नावाचा माहीतीपट बघा.

यावर

यावर डॉकिन्स यांनी सेल्फिश जीनमध्ये (प्रकरण १) मांडलेले विचार वाचनीय आहेत.

The feeling that members of one's own species deserve special moral consideration as compared to others is old and deep... Indeed, we kill members of other species as a means of recreation and amusement. A human foetus, with no more human feeling than an amoeba, enjoys a reverence and legal protection far in excess of those granted to an adult chimpanzee. Yet, the chimp think and feels and -- according to recent experimental evidence -- may even be capable of learning a human language.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

 
^ वर