हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान समजावा काय ?

आदर्श परिस्थितीमध्ये जनता कधीच सरकारला मोफत धान्य मागत नाही. केवळ ते धान्य गोदामामध्ये सडवान्यापेक्षा गरीबांमध्ये मोफत वाटप करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी अशी प्रतिक्रिया दिली.
गरिबांना मोफत धान्य देणे अशक्‍य - पंतप्रधान
हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान समजावा काय ?
आम्ही धान्य मोफत वाटू शकत नाही, पण ते सडवून देऊ शकतो असेच पंतप्रधानांना म्हणायचे आहे काय ?

इथून पुढे धान्याचा एकही कण सडला जाणार नाही, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली नाही.

>>देशात धान्य सडत असताना लोकांच्या गरजांकडे लक्ष दिले पाहिजे, ही न्यायालयाची भावना आपण जाणतो,' असेही डॉ. मनमोहनसिंग म्हणाले.
भावना जाणणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करणे ह्यातील फरक डॉ. मनमोहनसिंग यांना कोण समजून सांगेल ?

"वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड परायी जाने रे" असे अभिमानाने गुनगुनायाचे, पण प्रत्यक्ष काही करण्याच्या बाबतीत ठणाणा.

इथून पुढे धान्य गोदामात सडले जाणार नाही. ह्याची काय शाश्वती ?

गोदामांमध्ये ठेवण्यासाठी जागा नसल्याने धान्य सडविण्याऐवजी गरीब व भुकेल्यांना मोफत वाटण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १२ ऑगस्ट रोजी दिले होते. मोफत धान्य वाटणे शक्य नसल्याचे सांगून कृषी मंत्री शरद पवार यांनी हा आदेश फेटाळून लावला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा दणका दिल्यानंतर केंद्र सरकार याविषयी निर्णय घेण्यास बाध्य झाले.

लेखनविषय: दुवे:

Comments

आकडे हवे

"देशात धान्य सडत असताना लोकांच्या गरजांकडे लक्ष दिले पाहिजे" हे जर-तर वाक्य आहे. मुळात 'गोदामांमध्ये जागा नसल्यामुळे खूप धान्य सडते' या गृहीतकाला सिद्ध करणारे आकडे मला सापडले नाहीत. 'खूप धान्य सडते' अशा आशयाच्या सनसनाटी बातम्या खोट्या असल्याचे कोठेतरी वाचले होते.

अपमान-अधिकारक्षेत्र

तिकडे दिलेलाच प्रतिसाद इकडे देत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होत नाही; आणि झाला तरी हरकत नाही. (करायला हवा असे म्हणावे का?)

धान्य फु़कट वाटायचे की सडू द्यायचे हे ठरवणे सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नाही.

टीप : धान्य सडू नये हा साधा कॉमन सेन्स आहे. म्हणून ते सडण्यापेक्षा फुकट वाटा किंवा स्वस्तात द्या असे सरकारला सांगण्याचा मला, गांधीवादी यांना तसेच प्रत्येक नागरिकाला व संसदप्रतिनिधींना अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना भारताचे एक नागरिक म्हणून तसे म्हणण्याचा अधिकार आहेच. पण न्यायाधीश म्हणून आदेश देण्याचा अधिकार नाही.

म्हणून पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत निर्णय-

१ सर्वोच्च न्यायालयाने ढवळाढवळ करू नये - बरोबर
२ धान्य फुकट वाटता येणार नाही. - हे चूक की बरोबर हे आपण ठरवायचे आहे. प्रथमदर्शनी (धान्य सडू न देण्याची हमी न देता म्हणणे) चूक आहे. त्यावर चर्चा होऊ शकते. फुकट वाटायला संसद आणि जनता यांनी भाग पाडावे असे माझे मत आहे. लाखो सह्यांची पत्रे पाठवायला हरकत नाही.

[मूल ऐकत नसेल तर त्याचे पालक गुरखा/पोलीस/वॉचमन आदिंचे नाव घेऊन मुलाला घाबरवतात आणि त्याला ऐकायला लावण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात मुलाला ऐकायला लावण्याचा हक्क पालकांनाच असतो आणि गुरख्याला नसतो. तो हक्क खरेच गुरख्याला द्यायचा नसतो. आणि गुरख्यानेही तो हक्क आपल्याला नाही हे समजून घ्यायचे असते.]

धान्य फुकट वाटायला हवे या गांधीवादी यांच्या मताशी सहमत आहे.
वरचा युक्तीवाद फक्त न्यायालयाचा अपमान झाला का याबाबतच.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

आम्ही एव्हडे अन्नधान्या पासून दारू निर्मितीचे पक्ष कार्यकर्त्यां

हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान समजावा काय ? हा न्याय संस्थेचाच नव्हे तर भारतीय common man. च्या गरिबीचा त्याच्या जीवनमानाचा अपमान आहे. .गांधीवादी आता गांधीवाद फक्त स्टेज वर बोलण्या करता आहे, व्यवहारात वापरण्या करता नाही . त्यांच्या तीन माकडांचा अर्थ चांगले ऐकु नका, चांगले बोलू नका , आणि चांगले पाहू नका असा झाला आहे.आम्ही एव्हडे अन्नधान्या पासून दारू निर्मितीचे पक्ष कार्यकर्त्यांना परवाने वाटले, योजनाबद्धरीत्या गोदामे बांधली नाही, धान्य सडू दिले ते या कारखान्यान करता कच्चा माल स्वस्तात मिळावा म्हणून , गरिबांना मोफतच , कमी किमतीत देण्या करता आम्ही धान्य सडवले नाही. आमच्या या योजनेच्या आड येवून न्यायालयांनी अडथळे आणू नये. नाहीतर आम्हाला न्यायव्यवस्था बदलावी लागेल अशी गर्भित धमकी ही यात आहे.
thanthanpal.blogspot.com

तीन माकडं

त्यांच्या तीन माकडांचा अर्थ चांगले ऐकु नका, चांगले बोलू नका , आणि चांगले पाहू नका असा झाला आहे.

ठणठणपाळांचं लेखन वाचून मला त्यांनीही तीच भूमिका घेतली आहे असं वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

राजेशजी! थोडा उतावीळपणा होतोय...

राजेशजी,
ठणठणपाळ यांच्याविषयी मत व्यक्त करताना आपला थोडासा उतावीळपणा होतोय, असे वाटते.

ठणठणपाळ यांच्या पूर्वीच्या काही लेखनाबाबत जरुर असहमती दर्शवता येईल. तशी मोकळीक प्रत्येकालाच आहे, पण याचा अर्थ त्यांनी व्यक्त केलेल्या प्रत्येक प्रतिसादाला काही तरी टीकेची किनार लावलीच पाहिजे का?

आता हा वरचाच प्रतिसाद पाहा. यातील शब्द अन शब्द सच्चा आहे. गोरगरीबांच्या पोटात दोन घास पडावेत, अशी तळमळ असणारा कुणीही याच्याशी सहमतच होईल. सरकारने ठरवले तर काहीही अशक्य नाही. पंतप्रधान आणि कृषीमंत्री काय सांगताहेत शक्य नाही म्हणून?

साधी गोष्ट बघा. आपल्यापैकी किती जण सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे लाभार्थी आहेत? तरीही आपण रेशन कार्ड बाळगतोच. कशासाठी? तर कुठेतरी वास्तव्याचा पुरावा म्हणून ते मागितले जाते म्हणून (वास्तविक रेशनकार्ड हा तो पुरावा ठरत नाही, हे सरकारनेच स्पष्ट केले असताना सरकारी विभागच त्याची मागणी करतात, हे विचित्र आहे.) आता सरकारने एक साधे पाऊल उचलले, की रेशनकार्ड हे फक्त दारिद्र्यरेषेखालील गरीबांनाच लागू राहील. जे खुल्या बाजारातून धान्य खरेदी करु शकतात किंवा ज्यांना रेशनकार्ड सरेंडर करायचे आहे त्यांची कार्ड रद्द करावीत आणि एक अध्यादेश लागू करावा, की अशा लोकांसाठी येऊ घातलेले इलेक्ट्रॉनिक आयडी कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट हा वास्तव्याचा पुरावा ग्राह्य धरला जाईल तर कल्पना करा. जादूची कांडी फिरल्यासारखा चमत्कार होईल. मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांची कोट्यवधी रेशनकार्ड रद्द होतील आणि त्याचा फायदा खर्‍या गरजूंना होईल.

मला प्रामाणिकपणे असे वाटते, की ठणठणपाळ यांच्या लेखनात जिथे विसंगती असेल तिथे ती दाखवून द्यावी, पण प्रत्येकवेळी एक ठराविक शिक्का त्यांच्यावर मारला जाऊ नये.

उतावळेपणा

ठणठणपाळ यांची बाजू घेण्यात उतावळेपणा होतोय का?
(तुमचा प्रतिसाद फक्त राजेश घासकडवी यांनाच असेल तर खालचा प्रतिसाद रद्द समजावा).

मी माझ्या प्रतिसादात धान्य (सडू न देता) वाटायला हवे असेच मत व्यक्त केले आहे. फक्त न्यायालयाचा अपमान होतो का या बाबतच विरोधी मत व्यक्त केले आहे.

ठणठणपाळ आणि अजून एक प्रतिसादक यांनी धान्य सडण्याचा संबंध थेट दारूच्या कारखान्यांशी लावून त्यांची नेहमीची 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' याची टेप वाजवली आहे. ठणठणपाळ यांचा शब्द आणि शब्द सच्चा आहे असे आपण म्हणता तेव्हा सरकार दारू कारखान्यासाठी सडके धान्य उपलब्ध व्हावे म्हणून ते सडू देत आहे हे मत तुम्हाला खरे वाटते असे म्हणायचे आहे का?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

माझे चुकत असल्यास सांगा...

चांगले बघायचे/ऐकायचे/बोलायचे नाही, अशी ठणठणपाळ यांनी भूमिका घेतलीय का? असे राजेशजींना म्हणायचे असावे, हे गृहित धरुन मी ठणठणपाळ यांच्यावर शिक्का मारु नये, असे म्हटले आहे. ते त्याच वाक्यापुरते मर्यादित आहे. इतर प्रतिसादकर्त्यांना नाही.

आता नितीनजी, मला काय वाटते ते सांगतो. कदाचित ही प्रथमदर्शनी भावना असल्याने त्यावर टीका होऊ शकेल, परंतु धान्य गोदामात सडत आहे. त्याचे पुरावे माध्यमांनी जनतेसमोर आणले आहेत, न्यायालय सांगतंय की हे धान्य गोरगरीबांना मोफत वाटा तरीही पंतप्रधान आणि कृषीमंत्री काहीतरी खुसपट काढून अंमलबजावणी टाळताहेत यावरुन काय समजायचे? संशयाला नक्कीच जागा आहे.

सरकारला ठरवले तर काहीही अशक्य नसते. ते असे का वागताहेत हे कोडे आहे.

अढी

शरद पवारांनी 'न्यायालयाची सूचना व्यवहार्य नाही' असे विधान केल्यावर न्यायालयाने सर्वाधिकार असल्याच्या थाटात 'ही सूचना नाही आदेश आहे' असे सरकारला सांगा म्हणून सरकारी प्रतिनिधीला सांगितले.

न्यायालयाला अधिकार नसल्याने आदेश दिला असे म्हणण्यात चूक झाली आहे.
त्याने आता गाठ घट्ट झाली असावी. आता कदाचित 'आदेश देता काय? मग नाहीच करत' असे पोस्चरिंग होऊ शकते. असे पोस्चरिंग होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे.

जनहिताच्या दृष्टीकोनातून विचार केला तर न्यायालयाने नसलेले अधिकार वापरून जनतेचे नुकसान केले आहे का?

[परत एकदा : धान्य वितरित करण्याचा मार्ग सरकारने शोधावाच हा आग्रह जनतेने आणि संसदेने धरावाच. धोरणात्मक बाबींत ढवळाढवळ करू नका असे संसदेला सांगता येणार नाही].

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

इथेच खरा वाद सुरु झाला.

>>>शरद पवारांनी 'न्यायालयाची सूचना व्यवहार्य नाही' असे विधान केल्यावर न्यायालयाने सर्वाधिकार असल्याच्या थाटात 'ही सूचना नाही आदेश आहे' असे सरकारला सांगा म्हणून सरकारी प्रतिनिधीला सांगितले.

मा.न्यायालयाने श्री शरद पवार साहेबांना तो 'आदेश' आहे म्हणून फटाकारल्यानंतर मा.पंतप्रधान आणि कृषीमंत्री श्री शरद पवार यांच्या कानगोष्टी होऊन पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक विधान केले.[असे वाटते] अर्थात असे विधान केल्यामुळे मा.न्यायालयाचा अवमान होतो की नाही याचा विचार त्यांनी केला असावाच. कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्या अधिकाराच्या सीमारेषेबाबत नेहमीच वाद उफाळून येतो. इथे कार्यकारी मंडळ या निमित्ताने न्यायालयावर दबाव आणत आहे असे वाटते.

धान्य फूकट द्यायचे की विकत द्यायचे हा निर्णय सरकारने घेतला पाहिजे . पण सरकार काही निर्णय घेत नाही म्हणून लोक मा. न्यायलयाकडे जातात. आणि कार्यकारी मंडळ निर्णय घेणार नसेल तर तिथे न्यायालय निर्णय घेण्याबाबत आग्रही असते आणि इथेच कोणी कोणाच्या अधिकारात किती हस्तक्षेप करायचा याबाबतीत वाद सुरु होतो.

-दिलीप बिरुटे

सरकार निर्णय घेते

--पण सरकार काही निर्णय घेत नाही म्हणून लोक मा. न्यायलयाकडे जातात--

सरकार निर्णय घेते, लाभार्थीही असतात. :-)

टीका नाही, उतावीळपणा तर नाहीच नाही

ठणठणपाळांचं लेखन वाचून मला त्यांनीही तीच भूमिका घेतली आहे असं वाटतं.

उपक्रमावर लेखकांच्या विचारपद्धतीवरून त्यांचं वर्णन करणं, लेबलं लावणं हे चालतंच. आता कोणी कोणाला 'विज्ञानवादी' किंवा 'अश्रद्ध' असं म्हटलं तर ती टीका होते का? मी जर कोणा विचारवंताला 'निहिलिस्ट' म्हटलं तर ती टीका होईल का? एखाद्या सायकीअॅट्रीस्टला 'फ्रॉइडियन' म्हटलं तर ती टीका होते का? एखाद्याने मांडलेले विचार कुठच्या मोजपट्टीने मोजावेत हे जाणून घेणं रास्त ठरतं.

लेबलं लावण्यात एक सामान्यीकरणाचा धोका असतो, त्यामुळे अतिशय शुद्ध उदाहरण मिळाल्याशिवाय त्या पंथाचं लेबल लावू नये, या मताचा मी आहे. मी जे ठणठणपाळांचं लेखन वाचलं आहे त्यात मला कुठेही 'वा, अमुकतमुक छान आहे' असं वाचल्याचं आठवत नाही. त्यांना वारंवार चांगल्याची उदाहरणं मी स्वतः दिली तरी त्यांनी ती चांगली कशी नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं असताना, हा लेखक सर्व घटनांकडे एका विशिष्ट नकारात्मक दृष्टीकोनातून बघतो अशी टिप्पणी केली तर त्यात टीका कशी झाली? नकारात्मक दृष्टीकोन असूच नये असं नाही. प्रत्येकाला आपला दृष्टीकोन स्वीकारण्याचा अधिकार आहे. तो मांडण्याचाही अधिकार आहे. आत्तापर्यंत एकदाही मी ठणठणपाळांनी विचार मांडू नये असं म्हटलेलं नाही.

आपण जे करतो, तेच दुसऱ्याने करण्याबद्दल त्याला दोष देणं ही विसंगती आहे. वरच्या वाक्यातून मला ती विसंगती दाखवायची होती.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पटला तुमचा मुद्दा...

राजेशजी,
तुमचा मुद्दा पटला आणि ठठपा यांनी शिक्षणाच्या धाग्यावर लिहिलेली प्रतिक्रिया वाचल्यानंतर तर लगेच प्रत्ययही आला.

कोणती प्रतिक्रिया वाचून

तुमचा मुद्दा पटला आणि ठठपा यांनी शिक्षणाच्या धाग्यावर लिहिलेली प्रतिक्रिया वाचल्यानंतर तर लगेच प्रत्ययही आला.आपण ही प्रतिक्रिया कोणती प्रतिक्रिया वाचून दीली, हे समजले असते तर बरे झाले असते. thanthanpal.blogspot.com

कोणती प्रतिक्रिया वाचून

तुमचा मुद्दा पटला आणि ठठपा यांनी शिक्षणाच्या धाग्यावर लिहिलेली प्रतिक्रिया वाचल्यानंतर तर लगेच प्रत्ययही आला.आपण ही प्रतिक्रिया कोणती प्रतिक्रिया वाचून दीली, हे समजले असते तर बरे झाले असते. thanthanpal.blogspot.com

एक शंका -

सडलेल्या धान्यापासून बनवलेली दारू मोलॅसिसपासून बनवलेल्या दारूपेक्षा (चवीत/ लाथेत) उजवी असते काय?
(म्हणजे महागही असेल काय?)
-माझी आपली एक शंका.

आम आदमी

सडलेल्या धान्याच्या बातम्या जेंव्हा पासून टिव्हीवर दिसत आहेत तेंव्हा पासून असेच विचार येत आहेत. ज्या प्रकारे शरद पवार निर्धास्त आहेत त्यावरून हा सरकारच्या हिताचा प्रकार वाटतो आहे. धान्य सडवा, मग अनुदान मिळवा, आता धान्य सडले ते खाण्या योग्य नाही म्हणून त्याला पिण्या योग्य बनवा. गरिबीत पिचलेल्या आम आदमीला हिच दारू महागाईचे चटके विसरायला प्यायला विकत द्या आणि सरकार दरबारी महसूल गोळा करा. या सगळ्यातले अर्थकारण कसे असेल याचा विचार करूनच चक्कर येते आहे.






अपमान नाहीच शिवाय फुकट देऊच नये

श्री थत्ते यांच्या "हा न्यायालयाचा अपमान नाही "या मताशी सहमत. मात्र धान्य सरकारने फुकट द्यावे या "सुचने"शी मी सहमत नाही.
एकत अन्यत्र चाललेल्या चर्चेत म्हटल्याप्रमाणे वितरणाचा खर्च अफाट आहे तो कोण करणार वा कसा भरून निघणार? शिवाय एक साधे तत्त्व म्हणजे कोणतीही गोष्ट फुकट दिल्याने त्याची किंमत रहात नाही.

हे अतिरिक्त धान्य गरीबांना सध्याच्या रेशनिंग व्यवस्थे द्वारे ते स्वस्तात द्यावे, खुल्या बाजारात काढून याद्वारे रोजच्या बाजरातील भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, किंवा त्याची निर्यात करावी. अगदीच काही नाही तर पुरग्रस्त लेहमधे, पाकिस्तानमधे, युद्धग्रस्त इराक/अफगाणिस्तानमधे त्याचे वाटप करून काही सॉफ्ट ब्राऊनी पॉईंट्स मिळवावे.. पण काहीही न मिळवता शेतकर्‍याने कष्टाने पिकवलेले धान्य फुकट वाटु नये असे वाटते

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मत

>>श्री थत्ते यांच्या "हा न्यायालयाचा अपमान नाही "या मताशी सहमत

माझे एवढेच मत नसून न्यायालयाला अपमान वाटला तर "हो केलाच आहे अपमान, आणि पुन्हाही करू" असेही म्हणावे असे मत आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

अशी गुर्मी इंदिरा गांधीना ही महाग पडली होती

"हो केलाच आहे अपमान, आणि पुन्हाही करू" अशी गुर्मी इंदिरा गांधीना ही महाग पडली होती हे ३० वर्षात विसरलात का? राज्यकर्ते जेंव्हा जनहित न पाहता स्वार्थ पाहत दारू करता अन्नाची नासाडी करतात उद्दामपणा करतात तेंव्हा न्याय व्यवस्था सर्वोच असते.
thanthanpal.blogspot.com

सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने दिलेला हा आदेश सरकारच्या कामात ढवळढवळ ठरतो हे खरे आहेच.
पण त्याला धुडकावून लावण्याची उघड भाषा पंतप्रधानांनी करायला नको होती.
ते त्यांना शोभत नाही.

अवांतर :
मग नॅशनल ऍडव्हायजरी काऊन्सिल च्या अध्यक्षांनी काही आदेश दिला तर तो सरकारच्या कामात ढवळाढवळ ठरत नाही काय?
'नॅशनल ऍडव्हायजरी काऊन्सिल'चा असा उघड आणि सार्वजनिक अपमान करण्याचे धैर्य ममोसिंग दाखवू शकतील काय? सुप्रीम कोर्टापेक्षा ही 'नॅक' श्रेष्ठ आहे काय?

बात को समझो

नॅशनल ऍडव्हायझरी काउन्सिलच्या अध्यक्षांनी आदेश दिला तर तो धुडकावून लावणे शक्य आहे का हा प्रश्न विचारला तर उत्तर शक्य आहे असे येईल.

प्रश्न सोनिया गांधी त्या काउन्सिलच्या अध्यक्ष आहेत हा आहे. म्हणून विसूनानांना सोनिया गांधींचा आदेश धुडकावता येईल का असा प्रश्न विचारायचा असावा. त्याचे उत्तर 'इन् गिव्हन सरकमस्टन्सेस' नाही हे आहे.

लक्षात घ्या. आदेश बंधनकारक आहे तो त्या काउन्सिलच्या अध्यक्षांचा आदेश म्हणून नाही. तो धुडकावल्यास पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ 'लोकप्रतिनिधींचा विश्वास गमावण्याची शक्यता आहे' म्हणून. [काउन्सिलच्या अध्यक्षपदी दुसरी व्यक्ती असती तर कदाचित तसे नसते].

बाळासाहेब ठाकरे असे नियंत्रण ठेवतील अशी अपेक्षा होती. तेथेही बाळासाहेबांचा आदेश धुडकावल्यास 'लोकप्रतिनिधींचा विश्वास गमावण्याची शक्यता' हेच कारण गृहीत होते.

बाळासाहेब लोकनियुक्त नव्हते. सोनिया गांधी आहेत हा एक फरक मात्र आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

शंका

मला अगदी प्राथमिक शंका आहे.
असा आदेश द्यायचा अधिकार न्यायालयाला का नाही?

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम

अधिकार

>>असा आदेश द्यायचा अधिकार न्यायालयाला का नाही?

घटनेनुसार जनता ही सार्वभौम आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून संसद असते. त्यातल्या काही प्रतिनिधींकडे (मंत्रीमंडळ) शासनव्यवहार करण्याचे काम (लोकप्रतिनिधी) सोपवतात. यात विविध बाबतीत धोरणे ठरवणे, नियम करणे व रोजचा कारभार चालवणे वगैरे कामे येतात. मंत्रीमंडळ संसदेच्या देखरेखीखाली काम करते.

न्यायालयांचे काम या दोन्हींवर अंकुश ठेवणे हे आहे. अंकुश ठेवणे याचा अर्थ अत्यंत मर्यादित आहे. संसद कायदे करण्याचे काम करते. हे कायदे एकमेकांशी आणि घटनेशी सुसंगत आहेत की नाही हे पाहणे एवढेच न्यायालयाचे काम संसदेच्या बाबतीत आहे. न्यायालयाचे सरकारच्या बाबतीतले काम सरकारच्या किंवा इतर कोणाच्या कोणत्या कृतीने लोकांच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली होत नाही ना हे पाहणे एवढे आहे.

धोरणे आखणे, नियम ठरवणे हे काम लोकप्रतिनिधींचेच आहे. न्यायालय लोकप्रतिनिधी नसल्याने त्यांचे अधिकार कमी. [परंतु घटना बनवणारे सर्वजण वकील असल्याने त्यांनी न्यायालयांची अकाउंटेबिलिटी ठरवण्यात हयगय केली आहे]

धान्य फुकट द्या, स्वस्तात द्या, देऊ नका वगैरे न्यायालयाने ठरवणे म्हणजे लक्स किती रुपयांना विकावा हे युनिलिव्हरच्या ऑडिटरने ठरवणे. किंवा कंपनीत विंडोज वापरावे की लिनक्स हे ऑडिटरने ठरवणे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सडणारे धान्य

हल्लीची न्यायालये आणि निवडणूक मंडळ नको त्या ठिकाणी नाक खुपसतात असे माझे मत आहे. याचे एक कारण म्हणजे राजकीय क्षेत्रातील मनोबलाचा अभाव. मायावतीने केलेल्या विविध उद्यानांबाबत, सी एन जी आणण्यासाठी दिलेले आदेश वा भोपाळ गॅसचा १९८९ (?) चा निवाडा अनेक ठिकाणी न्यायालयाने आपली मर्यादा ओलांडली असे मला वाटते. अर्थात यातील कित्येक सरकारी निर्णय चुकीचे असतील ही गोष्ट वेगळी.

सडणारे धान्य याबाबतचा न्यायालयाचा निर्णय हा हिंमत वाढल्याचा परिणाम वाटतो. त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले ते योग्य आहे.

मला सर्वात आधी भावला तो तांत्रिक मुद्दा. जे धान्य पुढील महिन्यात सडणार आहे त्याचे वाटप करा असा अर्थ धरल्यास. दरवेळेला असे धान्य वेगळे काढावे लागेल. असे करण्याची कुठलीही तांत्रिक योजना असू शकते का? (मला वाटते नाही.)

प्रमोद

असेच वाटते

>>>न्यायालयाचा निर्णय हा हिंमत वाढल्याचा परिणाम वाटतो. त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले ते योग्य आहे.

अगदी असेच वाटले.

-दिलीप बिरुटे

तांत्रिक योजना

धान्याच्या उघड्या गोदामात धान्य वरखाली न केल्यामुळे धान्य सडते. प्रगत देशातही हा प्रश्न असतो व त्यांनी त्याच्यावर नेहमीप्रमाणे उपाययोजनाही शोधली आहे. सडण्याच्या प्रकारापेक्षा जास्त धान्य विकलेच न गेल्यामुळे वाया जाते.

परदेश दोरा करायचे.

त्यांनी त्याच्यावर नेहमीप्रमाणे उपाययोजनाही शोधली आहे. त्या उपाय योजना सांगितल्या असत्या तर आपल्या देशाला त्याचा फायदा झाला असता. नाही तर राजकारणी हे वाचून ही व्यवस्था पाहण्या साठी परदेश दोरा करायचे.

thanthanpal.blogspot.com

असेच

न्यायालय-संसद-राष्ट्रपती(=पंतप्रधान) यांच्यामधील कार्यक्षेत्रे कोणती याबद्दल भारताच्या काही शतकांच्या इतिहासात बरीच अनियमितता आहे. वरील उदाहरणांबाबत सहमत आहे.

या ठिकाणी पंतप्रधानांचे मत घटनात्मक आहे, असे वाटते. कोर्टानेही असेच स्पष्टीकरण दिलेले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर गेलो, पण कोर्टाचे आदेश शोधून सापडायचे तंत्र उमगले नाही. कोणी मदत करू शकेल काय? मुळात आदेश/सुचवणी करताना कोर्टाने कुठला घटनात्मक/कायदेशीर सिद्धांत वापरला ते पुष्कळदा कोर्टाच्या कागदपत्रात दिलेले आसते.

कामचलाऊ पंतप्रधान - राहूलची तयारी पूर्ण होईपर्यंत!

पंतप्रधान म्हणून सद्यपरीस्थितीवर त्वरीत नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या गोश्टी करायला हव्यात त्या गोश्टी सध्याचे पंतप्रधान करीत नाही आहेत. एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने 'शब्दाला शब्द म्हणून उत्तर' द्यायचे नसते, देता कामा नये.
पंतप्रधान स्वतः देखील कृती करताना आढळत नाहीत व जे बोलत आहेत त्याने सामान्य जनतेत देखील चूकीचे संदेश पोहचत आहेत.

या देशातील न्यायलये स्वत:चे काम कुठे व्यवस्थित, पारदर्शकपणे, वेळच्यावेळी 'आटपत' आहेत. त्यांनी तुंबलेल्या कोर्टकेसीं बाबत काय केले आहे वा काय करत आहेत? कामकाजाच्या जून्या पद्धती बदलून त्यात सुधारणा करीत,नव-नवे तंत्रद्न्यान न्यायालयाच्या कामकाजात किती वापरात आलेले आहे? हे ध्यानात घेवून न्यायाधीशांच्या सुट्ट्या, वेतन कमी का करता येवू शकते का? त्यानूसार काय व कशी कारवाई करता येईल ह्या कडे पंतप्रधानांनी लक्श पूरवायला हवे.
पण शेवटी पंतप्रधान हे 'कॉंग्रेसचे बुजगावणे'म्हणून बसलेले आहेत. एवढे मोठे पद असून ही काहीही हालचाल करू न शकणारा पंतप्रधान काय कामाचा?

कामचलाऊ पंतप्रधान १०१%

कामचलाऊ पंतप्रधान १०१% बरोबर आहे. मी तर असे म्हणेन की मनमोहन हे रबर स्टंप पंतप्रधान आहेत. यापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात ज्ञानी झैलसिंग नावाचे रबर स्टंप राष्ट्रपती होवून गेले . राष्ट्रपतींना घटनात्मक अधिकार नसतात तरी पण त्याकाळी रबर स्टंप राष्ट्रपती वर भरपूर टीका झाली होती. पण पंतप्रधानाना घटनात्मक अधिकार सर्वात जास्त असतात. या पदावर रबर स्टंप मनमोहन बसून ही टीका होत नाही हा काळचा महिमा की स्वार्थी राजकारणाची परिसीमा.
thanthanpal.blogspot.com

दुसरी बाजू

पहिल्यांदा हे स्पष्ट करतो की, मी सडणारे धान्य गरीबांना मोफत वाटण्याच्या बाजूने आहे. आजच्याच सकाळमधील या संपादकीय लेखात या मुद्द्याची दुसरी बाजू मांडली आहे. ती मला पटली.
(बाय द वे, सकाळचे व्यवस्थापन कुटुंबाकडे गेल्यापासून, सकाळमधील बातम्यांत कृषीमंत्र्यांविषयी एक सॉफ्टकॉर्नर असलेला दिसून येतो. त्यांची बाजू आवर्जून (चांगल्या अँगलने) मांडली जाते.)

||वाछितो विजयी होईबा||

झोंपड़ियों में भोजन करने का नाटक करते रहे ? कहाँ सो गए ?

आवश्य वाचा पंकज झा. says:
देशवाशियों के लिए ”खुशखबरी”…बहुत बधाई. इस महान लोक कल्याणकारी गणराज्य की सरकार देश के सभी 6 लाख गांवों तक कंडोम पहुचाने की तैयारी कर रही है. चलो अब अनाज नहीं पहुचा तो क्या, कंडोम है ना.
निर्मम व संवेदना हीन सरकार की करनी तथा सोच का एक और प्रमाण है. लोगों का भूख से बिलक-बिलख कर मरना कोई मुद्दा नहीं है इस सत्ता की नज़र में. न्भ्खे भारतीयों का स्मरण दिलाने जैसा दुष्कर्म (?) हमारे देश के सज्जन समझे जाने वाले प्रधान मंत्री कोसहन नहीं हुआ. कितनी निर्मम है ये सरकार और इसकी सोनिया ”जी”
क्या फर्क है अत्याचारी अंग्रेजों और इन काले अंग्रेजों के शासन में ? वे भी हम भारतीयों की जान की कीमत दो कौड़ी की समझते थे और अंग्रेजों के मानसिक गुलाम ये आज के हमारे शासक भी हमारी मुश्किलों ,मुसीबतों को हल करने की जिम्मेवारी निभाने की कोई ज़रूरत नहीं समझते.
कहाँ हैं वे राज कुमार जी जो गरीबों की झोंपड़ियों में भोजन करने का नाटक करते रहे ? आज भूखे मरने वालों को सड़ते अनाज को बांटने के मुद्दे पर वे राजकुमार और उनकी रानी माँ ( परदे के पीछे से सत्ता के सूत्र संचालित करने वाली महा देवी) कहाँ सो गए ?
आपने बिल्कुल सही लिखा है बजाज जी. न्यायपालिका के प्रति इस तरह का हिकारत भाव किसी लोकतांत्रिक देश के शालीन प्रधानमंत्री का नहीं है. यह बयान है अंग्रेजों द्वारा स्थापित पार्टी के इटालियन अध्यक्ष के नौकर-शाह का. इस बयान में नमक ‘दांडी’ का नहीं बल्कि उस विश्व बैंक का है, जिसकी चाकरी कर प्रधानमंत्री पहले रोजी-रोटी कमाते रहे हैं. न्याय व्यवस्था को धत्ता बता कर जो पार्टी गरीब शाहबानो के मूंह का निवाला छीन सकती है वह अगर आज देश के करोड़ों गरीबों के पेट पर लात मार रही है तो क्या आश्चर्य. बहरहाल….आप शहीद वीर नारायण की धरती के हैं. यहां का जयस्तंभ चौक ‘चावल गाथा’ का जीता जागता स्तम्भ है. उसे बचा कर रखने में अपना योगदान इसी तरह देते रहे…धन्यवाद.

http://www.pravakta.com/?p=12938&cpage=1#comment-7082
thanthanpal.blogspot.com

एक अब्ज बालकांचा अन्नासाठी आक्रोश

एक अब्ज बालकांचा अन्नासाठी आक्रोश
देशाची लोकसंख्या शंभर कोटीच्या पुढे गेल्याने आता कुपोषणासारख्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे..................सरकारी योजनांचा बोजवारा, उदासीन अधिकारी-कर्मचारी, मागासलेपण, गरिबी, वांशिक संघर्षात मोठ्या प्रमाणात बालकांचाच बळी जात आहे.

चूक

जगात मुळात २ अब्ज मुलेही नाहीत (६.८ अब्जांपैकी २७% मुले आहेत). '१ अब्ज लोक' याचे भाषांतर सकाळने '१ अब्ज मुले' केले आहे. म्हणजे, ~२७ करोड मुले कुपोषित आहेत.

 
^ वर