खरेदीदाराची नस कशी ओळखायची ब्व्वा?

मी एक वर्ल्ड-क्लास प्रॉडक्ट बनवले (माझ्या दृष्टीने), त्यात मी लाखो ओतले. पण ते घेणारे मिळाले नाहीत. कारण(?), मी इतरांना काय पाहीजे, ते विचार न करता ते मला जे योग्य वाटते ते केले आणि फसलो. पैसे गेल्याचे वाईट वाटले नाही पण ही शाळा शिकायला एव्हढी फी देण्याची गरज नव्हती असे वाटले. तरीही, मागे वळून पाहीले तर, असे वाटते की, भारतीय खरेदीदाराचे मन ओळखणे मला आतातरी जमेल का? ह्याचे उत्तर नाही असेच येते. तुमचे अनुभव ऐकायला आवडतील.

Comments

उत्पादन व ग्राहक

भारत असो किंवा दुसरा कोणताही देश, ग्राहकांची मानसिकता तशीच असते. नवीन उत्पादन बनवायचा विचार करण्याआधी ग्राहक शोधून काढणे हे महत्वाचे असते. ग्राहक शोधला की त्याला कसली आवश्यकता आहे हे शोधून ते उत्पादन केले म्हणजे अशा अडचणी येत नाहीत. आपण लार्सन ऍ न्ड टूब्रो कंपनीचे नाव ऐकले असेल. ही कंपनी जेंव्हा चालू केली गेली तेंव्हा त्यांना दुग्ध प्रक्रियेसाठी लागणार्‍या उत्पादनांचा अनुभव होता. परंतु त्या वेळी भारतात, दूधवाला भैय्या हा आपल्या उत्पादनांचा खरा ग्राहक आहे हे त्यांनी शोधले. त्यावेळी दुधाची ने आण करण्यासाठी गॅल्व्हनाईझ्ड पत्र्याच्या दुधाच्या कॅन्स वापरल्या जात असत. या कॅ न्सना गंजणे, पोचे येणे वगैरे अडचणी होत्या. यासाठी ऍल्युमिनम पत्र्याच्या कॅ न्स या कंपनीने विकसित केल्या. या उत्पादनाला लगेच चांगली मागणी निर्माण झाली. व्हल्कन लावल ही स्वीडिश कंपनी जेंव्हा भारतात आली तेंव्हा त्यांनी सुद्धा या कॅ न्स पासूनच आपला व्यवसाय चालू केला होता.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

दोन्ही उदाहरणे मला नवीन

थ्यांक्स. वरील दोन्ही उदाहरणे मला नवीन आहेत. दुधाचे क्यान्स कॉटेज इंडस्ट्रीत बनवत असतील असे वाटत होते. त्यातील मेसेज मिळाला.

अधिक माहिती मिळाली तर आवडेल

असे करणारे माझ्या माहितीत बरेच आहेत. म्हणजे पैसे व श्रम घालवणारे. मला अशा कल्पना सुचायच्या पण मी पैसे नसल्याने घालवले नाहीत इतकेच. हल्ली असे कोणी भेटले (पैसे घालवण्याच्या आधी) की माझा सबूरीचा सल्ला असतो. कदाचित हजारात एखादे (ही हजार संख्या चांगल्या प्रॉडक्टसची आहे.) चालते असे मला वाटते (ते देखील वेगळ्याच कारणाने).
तुमच्या कडून अधिक माहिती मिळवायला आवडेल.

यावर माझी अशी काही मते (थोडीफार सिनिकल) झाली आहेत.

यातील एक महत्वाचे म्हणजे. तंत्रज्ञान हा उत्पादनाचा पाया नसतो. मार्केटिंग हाच उत्पादनाचा मुख्य पाया असतो. उत्पादनाचे भांडवल, मजूर, तंत्रज्ञान आणि विक्री अशी चार अंग आहेत. खूपसे लोक तंत्रज्ञान (सर्वात आधी) - भांडवल - मजूर आणि बाजार या मार्गाने जातात आणि फसतात. याउलट जे आधी बाजार (म्हणजे जे विकायचे ते कोणाकडून बनवून घ्यायचे किंवा बनवत असलेल्यांकडून विकत घेऊन विकायचे.) मग भांडवल (बाजार मार्केटिंग यशस्वी होत असेल तर उत्पादनात पैसे गुंतवायचे.) मग तंत्रज्ञान (हे भांडवली खर्चात आणता येते.) आणि शेवटी मजूर असा प्रवास केलेले जास्त प्रमाणात यशस्वी होतात.

दुसरे म्हणजे भारतात (आणि इतर जगातही) इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस ना फारसे महत्व नाही. ते मोडणारे, वाकवणारे बरेच असतात. त्यामुळे तुमचे उत्पादन समजा यशस्वी होणार असेल तर त्याची वेगळी प्रत करणारे अधिक भांडवल व क्षमता असणारे बरेच असतील. हा धोका तुमच्या समोर असतो याची जाणीव असली पाहिजे. (ऍपल यशस्वी झाल्यावर आयबी एम ने पीसी आणला.)

उत्पादन मूल्य आणि विक्री मूल्य यांच्यात भरपूर तफावत असणे हे छोट्या विक्रियोग्य गोष्टींसाठी नेहमीच असते. अगदी विक्री मूल्यातील केवळ ५-१० टक्के कच्चा माल आणि ५-१० टक्के मजूरी एवढे प्रमाण असणे बरेचदा असते. यातून असे वाटते की लोक अवाच्या सवा नफा घेत आहेत. पण ते खरे नाही. विक्री व्यवस्था ही खूप खर्चिक असते. विर्कीव्यवस्थेला (ठिकठिकाणी माल पुरवणे, मालाचे पैसे गोळा करणे, खराब माल परत आणणे, दुरुस्ती करणे) कमी लेखून धंदा केला की फसायला होते. हल्ली चर्चेत आलेल्या सॅनिटरी नॅपकिन्स बाबत मला असे वाटले होते.

प्रमोद

ग्ल्याड आय आस्क्ड् थिस क्वश्चन हियर.

--कदाचित हजारात एखादे (ही हजार संख्या चांगल्या प्रॉडक्टसची आहे.) चालते असे मला वाटते--

होय मी ही ऐकले आहे की, आयपॉडच्या यशाआधी त्यासम शेकडो प्रॉडक्टस् बळी पडले होते.

--तंत्रज्ञान हा उत्पादनाचा पाया नसतो. ....जास्त प्रमाणात यशस्वी होतात.---

टेरीफिक!!! विस्डम खूपच पटले. थ्यांक्यु कमी पडेल.

--दुसरे म्हणजे भारतात .... एम ने पीसी आणला.)--

हो, त्याची जाणीव सुरुवातीपासुनच होती आणी त्यामुळे खर्च अधिक वाढला.

--उत्पादन मूल्य आणि .... मला असे वाटले होते.----

मान्य आहे. अनुभव घेतलाय.

ग्ल्याड आय आस्क्ड् थिस क्वश्चन हियर.

प्रतिसाद फार आवडला

प्रतिसाद फार आवडला

समांतर: प्रोडक्ट डेव्हलपमेंट साठी "अजाईल" मेथडॉलॉजी थेट ग्राहकांना प्रोडक्ट डेव्हलपमेंटमधे समाविष्ट करून घेते.अर्थातच याचा खर्च खूपच जास्त आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

"अजाईल" मेथडॉलॉजी आणि खर्च

"अजाईल" मेथडॉलॉजी आणि खर्च ह्याबद्दलचा उल्लेख कुतूहल चाळवुन गेलाय. - जरा मुद्देसुद सांगा.

विस्कटून

खर्च यासाठी जास्त की इथे ग्राहकाकडून त्याची मागणी नोंदवली जाते.. त्याच्या मागणीला ग्राहकच प्रायरोटाईज करतो मग सर्वात महत्त्वाचा भागापासून उत्पादनाला सुरूवात होते.. उत्पादनाच्या प्रत्येक भागावर ग्राहकाचे छोट्या (वेळेच्या) अंतराने मत मागवले जाते.. व उत्पादन बघुन ग्राहकाचे मत पुन्हा मागणीच्या यादीत टाकून पुन्हा प्रायरटाईज केले जाते.. असे हे चक्र ग्राहकाला हवे तसे उत्पादन बनेपर्यंत चालुच असते. यात वेळ अधिक लागतो, उत्पादनावर काम करणार्‍यांचा तांत्रिक दर्जा अथवा कसब अधिक लागते व अर्थातच या सार्‍यासाठी पैसा अधिक लागतो. मात्र तयार झालेलं उत्पादन ग्राहकाला आवडण्याची शक्यता खूप असते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कष्टंबर

कष्टंबर स्याटीस्फाय होणे हेच महत्वाचे- पटलंय मला.

कष्टंबर

स्याटीस्फाय व्हायच्या आधी मिळणे महत्त्वाचे.

या दुव्यावर काही प्रकाश टाकला आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

दुवा आवडला

दुवा आवडला

प्रमोद

या

या बाबतीत नुकताच एक नवीन दृष्टीकोन वाचण्यात आला. जपानमधील बहुतेक सर्व उत्पादनांची गुणवत्ता उत्कृष्ट असते याचे कारण त्यांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये कैझन (Kaizen) हा शब्द अंतर्भूत आहे. याला १००% फिट्ट होइल असा इंग्रजी प्रतिशब्द नाही. याचा अर्थ आहे प्रत्येक प्रक्रियेमध्ये सतत बदल करत रहाणे आणि गुणवत्ता वाढवीत रहाणे. सतत गुणवत्ता वाढवली तर कालांतराने फायदेशीर ठरते हे तत्व जपानबाहेरील फारच थोड्या कपन्या वापरतात. (फोर्ड ने हे तत्व अंगिकारल्यापासून त्यांच्या मोटारींचा खप प्रचंड वाढला. )

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम

पीडीसीये

पीडीसीये सायकल खूप आधी पासुन चालवत आहे. :-)

बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे ! यांह तो हर चीज बिकती है !!

मी एक वर्ल्ड-क्लास प्रॉडक्ट बनवले (माझ्या दृष्टीने), आपल्या दृष्टीने वर्ल्ड क्लास असलेले उत्पादन ग्राहकाच्या दृष्टीने थर्ड क्लास असले तर चालणार कसे. मुळात तुम्ही काय बनवले हे आपण सांगितले नाही. उत्पादन करण्या पेक्षा आज विक्री कलेला जास्त महत्व आहे आंधळ्या ला चष्मा विकणारे आणि हिमालयात फ्रीज विकणारे या जगात आहेत या मुळे आपण विक्री कलेत कमी आहात असे दिसते. आपले उत्पादन मी विकण्यास तय्यार आहे.
बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे ! यांह तो हर चीज बिकती है !! असा हा जमाना आहे.

thanthanpal.blogspot.com

मी विक्रीकलेत ढ आहे

तुम्ही नेहमी इतरांना आधीच माहीती असलेल्या गोष्टी का सांगता?

मी विक्रीकलेत ढ आहे हे मीच वरती मान्य केले आहे आणि तुम्ही तोच अंदाज वर्तवता आहात म्हणून वरील वाक्य.

--आपले उत्पादन मी विकण्यास तय्यार आहे.--

शुभेच्छा.

शुभेच्छा

नुसत्या शुभेच्छा देवू नका .उत्पादन सुद्धा द्या.

तंत्रज्ञान-मार्केट

प्रमोद सहस्रबुद्धे यांनी नेमक्या मुद्द्यांवर बोट ठेवले आहे; विशेषत: तंत्रज्ञान आधी की मार्केट आधी याबाबत.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर