राजकारण

राजकारणात तरुण कसे येतील?
६० च्या वर निवॄत्ति हवी का ?
व्व्व्व् फ्फ्फ्फ् फ्फ्फ्फ् फ्फ् र्व्त्व्त् व् त्व्त्३ ३व्३५त्व्४ ३५३२५३२ ३व्फ्व्ग्व्र् वेव्त्र्त्
द्स्स्फ् द्फ्द्फ्फ् र्वेव्त्४५२५ ३२२५२ द्फ्स्ग् स्ग्र्य्तेत्रेर् वेत्व्त्व्त्

लेखनविषय: दुवे:

Comments

राजकारणात येणार्‍यांसाठी वयाची अट नको

राजकारणात तरुण कसे येतील?
- या ठिकाणि लोकसभेतील* खासदारांची वयानुसार वर्गवारी काढता येते त्यानुसार तरुणांची आकडेवारी खालीलप्रमाणे;
२५ ते ३५ वयोगट - २१/५४२
३५ ते ४५ वयोगट - १००/५४२

हे प्रमाण पुरेसे नाही का? मग आपल्या अपेक्षेनुसार कोणत्या वयोगटाची संख्या किती असावी?

६० च्या वर निवॄत्ति हवी का ?
- नाही, माझ्यामते निवडुन येण्यास येथे दिलेल्या पात्रता पुरेशा आहेत, त्यात निवृत्ती वयाची अट नको.

* लोकसभा फक्त उदाहरण म्हणून घेतले आहे, संपुर्ण भारतातील राजकारण्यांचा विदा माझ्याकडे नाही.

शिपाईगडी

मला मदत हवी आहे

चर्चेच्या प्रस्तावामधील दोन वाक्यानंतर जे लिहीलय ते मला वाचता म्हणजे उच्चारताच येत नाही.
हा कोणता मंत्र आहे का?
कि
एखाद्याला फेफरं आलं कि जीभ वाकडी होते तशाच पद्धतीने बोलत वरील वाक्ये वाचण्याचा प्रयत्न करायचा?

राजकारण म्हणजे काय?

राजकारण हे क्शेत्र इतर व्यवसायिक क्शेत्रांसारखे नाही. इतर क्शेत्रांमध्ये तुम्ही कोणती तरी सेवा इतरांना देता त्या मोबदल्यात तुम्हाला मोबदला मिळतो वा मिळू शकतो. पण राजकारण ह्या क्शेत्रात -
'तुम्हाला येणार्‍या परीस्थितीची किती व केवढी समज आहे.',
'परीस्थिती येण्याआधी तुम्ही कसे आडाखे मांडू शकता, तयारी करू शकता',
'प्राप्त परीस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाता?'
या अशा गोश्टीवर त्या व्यक्तीचे यश-अपयश व अस्तित्व अवलंबून असते.
अस्तित्व टिकवताना प्रेम, पैसा, प्रणय ह्या गोश्टी गौण असतात.

तरूण व्यक्तीसाठी प्रेम, आसक्ती, द्वेश, मत्सर या सारखे विशय मर्यादा होवू शकतात/ असतात. ह्या सगळ्या अनुभवांमधून गेल्यानंतरच 'स्वतःच्या मनातलं झाकता येवून, दुसर्‍याच्या मनातलं ओळखण्याची' कला प्राप्त होते.
आणि म्हणूनच राजकारणात तरूण (राजकीय घराण्यात जन्म न घेतलेले) येवू शकत नाहीत.

आता शेवटी प्रश्न उरतो 'निवृत्तीचा'.
हा प्रश्न बहुतेकदा नियतीच, त्या व्यक्तीने आतापर्यंत जे व जसे 'राजकारण' शिकले आहे त्यावर 'अत्यंत किचकट परीस्थिती समोर आणून' कुरघोडी करीत सोडवते.

स्प्यामर

उपक्रमावर स्प्यामर लोक ओव्हरटाइम करत आहेत असे दिसते. हे कंत्राट घेतले असेल की अंतःप्रेरणेने करत असतील?
अंतःप्रेरणेने करत असतील तर फ्री विल (म्हणजे फुकट मिळणारा विल स्मिथ नव्हे) वर एक चर्चा व्हायला हवी असे वाटते.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

#$%#$%#$%

१. निवडणुकीतून
२. नाही
३. क;श्फह्स्ज्स्ध्ज्द्झ्ज्ज्ज्ज्ज्क्स्ध्फ्ज्क स्क्फ्;अह्हिऔस्द्फ्न्;ओइअस्द् ; अश्द्फ्;असु
#$%#$%#$%$$%^!!!!!!!!!!!!!!!!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सहमत

पहील्या दोन मुद्यांवर चर्चा होऊ शकेल कदाचीत पण तिसर्‍या उत्तराशी पूर्ण सहमत :-)

+२

असेच म्हणतो. पण तिसर्‍या मुद्द्याच्या बाबत खालील म्हणणे लक्षात घेणे आवश्यक.

रचनेच्या प्रश्नाला उत्क्रांतीवादाने दिलेलं उत्तर या स्वरूपाचं आहे. टकमक टोकावर जायचं असेल तर खालून वर उडी मारता येत नाही. गडावर चढण्याचा हत्तीमार्ग शोधावा लागतो. उत्क्रांतिवादाचा थोडा उहापोह आपण पुढच्या लेखात करू. (नमनाला आणखी थोडं तेल पडलं, पण ही लेखमालाही एकदम उडी न मारता हत्तीमार्गाने नेण्याचा प्रयत्न आहे.) एका नामवंत प्राणी शास्त्रज्ञाने म्हटले आहे "दुर्दैवाने उत्क्रांतिवादाचा प्रॉब्लेम असा आहे की तो आपल्याला कळला आहे असं सगळ्यांना वाटतं." आपल्याला शाळेत शिकवल्यापैकी "माकडापासून माणूस झाला" "माणसाची शेपटी न वापरल्याने झिजून गेली" "जिराफाची मान लांब झाली" "सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट" "समूहाच्या भल्यासाठी.." अशा तुकड्यापलिकडे फारसं काही लक्षात नसतं. मानवाला सतावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं त्यात आहेत हे तर कोणी सांगितलेलंही नसतं.

यावरून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सिद्ध होते.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

बाबा, महाराज कि जय!!!

बाबांनी लिहीलेली 'ती दोन वाक्ये' मला उच्चारता ही येत नव्हती. पण नितिन महाराजांनी त्यातील गुढ अर्थ सांगितला, अन् मी धन्य झालो.
जय हो! जय हो!

राज्यकर्तेच लोकशाहीच्या नावा खाली स्वतःच :जनतेला लुटून रजाकाराच

राजकारणात तरुण का येत नाहीत कारण आज राजकारण चांगल्या लोकांचे राहिलेले नाही तर पूर्वीच्या काळी पेंढारी,रोहिल्ला ,रजाकार हे ज्या प्रमाणे राजाच्या नावा खाली राज्यात गुंडगिरी करून रयतेला त्या प्रमाणे आजचे राजकीय नेतेच राज्यकर्तेच लोकशाहीच्या नावा खाली स्वतःच :जनतेला लुटून रजाकाराची भूमिका बजावत आहेत. या मुळे आयुष्यात कांही तरी करून दाखवण्याची महत्वकांक्षा बाळगणारे तरुण राजकारणाकडे वळत नाही.हे तरुण जर राजकारणाकडे वळावे असे वाटत असेल तर राजकारणाचा समग्र ढाचा बदलणे आवश्यक आहे. राजकारण्यांच्या स्वातंत्र्याच्या स्वेराचाराला सर्व प्रथम लगाम घालणे आवश्यक आहे. आज जो एकच नेता अनेक पदे उपभोगतो, स्वतःच्या घरातच सत्ता राहील याची खबरदारी घेतो. गुन्हेगारांना राजकारणात तत्काळ बंदी.पक्षांतर बंदी. लहान पदा पासून सुरवात करून नंतर मोठ्या पदावर बढती, एकच वेळी एका ठिकाणी निवडणूक लढवणे, मुदतपूर्व पद सोडून दुसरी निवडणूक लढवण्यास बंदी. एका पदावर फक्त २ वेळा संधी. आणि स्वतःचा पोटापाण्याचा उद्योग असणे बंधनकारक करावे.इतर उपाय सुचवावेत

एवढा सगळा करायचं

हा हा हा
एवढा सगळा करायचं
त्यापेक्षा शिकून, अमेरिकेला जाऊन सेटल होणे जास्त सोपे नाही का ?
भारतात/भारताचं काय व्हायचं ते होऊनदे, आपण फक्त अमेरिकेतून कळफलक बडविणे जास्त सोपे नाही का ?

>>इतर उपाय सुचवावेत
सुचवायला लाख सुचवू हो, पण ते आमलात कोण आणणार, त्यासाठि जीव धोक्यात कोण घालणार ?
एक तो सतीश शेट्टी मेला बिचारा, त्याच्या मार्गाने जाणारे सगळे त्याच्याच प्रमाणेच मरणार.

http://timesofindia.indiatimes.com/videoshow/5441377.cms

 
^ वर