इ-बे : १०१

उपक्रमींपैकी कुणी इ-बे वापरले असल्यास माहिती हवी आहे.
मला असलेली माहिती अशी. इ-बे वर आपल्याला जी वस्तू विकायची आहे तिचे छायाचित्र, माहिती इ. द्यायची. मग त्यावर बोली लागण्यास सुरूवात होते. दिलेला काळ संपला की सर्वात जास्त जी बोली असेल तिला ती वस्तू विकता येते.

शंका :
दिलेली वस्तू पाठवण्याचा खर्च कोण करते? (पुस्तकासारखी गोष्ट असल्यास पाठवण्याचा खर्च आणि मूळ किंमत जवळपास असू शकते. अशा वेळी व्यवहार परवडण्यासारखा नसावा.)
वस्तू पाठवताना फुटण्याचा धोका असेल तर विमा करावा लागतो का?
व्यवहाराचे स्वरूप कसे असते? (म्हणजे आधी पैसे मिळाले की वस्तू पाठवायची किंवा कसे?)

लेखनविषय: दुवे:

Comments

ऑनलाईन पुस्तक खरेदी

बार्न्स अँड नोबेल्स किंवा बॉर्डर्स वगैरे मधून मी ऑनलाईन पुस्तक खरेदी करते परंतु ऍमेझॉन वगैरे वरून जुनी पुस्तके घेतलेली नाहीत आणि इ-बेही वापरलेले नाही.

मलाही इ-बेवर कुणाचा अनुभव असल्यास कळून घ्यायला आवडेल.

टपाल खर्च आपल्यालाच द्यावा लागतो.

टपाल खर्च आपल्यालाच द्यावा लागतो. तो त्या पुस्तकाच्या किंमतीत टाकता येतो. तसेच किती लवकर ती वस्तू तुम्हास हवी आहे त्याप्रमाणेही कुरीयरचे रेट कमी-जास्त होतात.

माहिती

मी स्वत: ई-बे वापरलेले नाही, पण एका मित्राने ई-बे (http://www.ebay.com/) {http://www.ebay.in/ नव्हे} वापरून खरेदी केलेली आहे. तो ह्युस्टन, टेक्सास येथे राहतो. त्याने आतापर्यंत ज्या वस्तू मागवल्या, त्या व्यक्ती-ते-व्यक्ती(Person-2-Person) अशा नव्हे तर व्यवसाय-ते-व्यक्ती(business-2-person) अशा व्यवहारात होत्या.
आता तुमच्या शंकांविषयी:
१. दिलेली वस्तू पाठवण्याचा खर्च पाठवणारा (seller) करतो, पण तो (अर्थातच) खरेदीदाराकडून (buyer) वसूल केला जातो.
उदा. एखाद्या वस्तूची दिखाऊ किंमत 'क्ष' इतकी असते. पण ती घेताना त्यात पोस्टेज+हँडलिंग शुल्क 'य' मिळ्वले जाते, आणि आपल्याला 'क्ष+य' इतकी रक्कम द्यावी लागते. बर्‍याचदा पोस्टेज मोफत असते, पण अशावेळी ते वस्तूच्या किंमतीत अंतर्भूत केले जात असावे. म्हणजे 'क्ष+य' हीच दिखाऊ किंमत असते.

२. नाजूक वस्तूचा विमा नसतो, पण वेष्टण योग्य प्रकारे केलेले असते व त्यावर 'HANDLE WITH CARE' असा उल्लेख असतो. (अंतिम जबाबदारी मात्र खरेदीदाराची असते)

३. व्यवहारः ऑनलाईन असतो, सुरक्षित असतो.(ई-बे ही तशी प्रतिष्ठित साईट आहे, पण ज्याची त्याने खबरदारी घ्यावी :ण ) खरेदीची ऑर्डर देतानाच हा ऑनलाईन व्यवहार होतो. विक्रेत्यानेही त्याच्या बँक खात्याची माहिती देऊन ठेवलेली असते, त्यात पैसे जमा होतात.

अवांतर पण महत्वाचे : व्यक्ती-ते-व्यक्ती व्यवहाराचा अजूनतरी अनुभव नाही. दुसरे म्हणजे, भारतीय ई-बेविषयी मला वैयक्तिकरित्या खात्री वाटत नाही. उदा. मी जर भारतीय ई-बेवरून फास्ट्रॅक चा चष्मा मागवला तर मला १००% टक्के खात्री आहे की, It will be anything but original Fastrak :ण

||वाछितो विजयी होईबा||

इबे

मी इबे वरती खरेदी विक्री दोन्ही केलेले आहे. दिलेली वस्तू पाठवण्याचा खर्च सहसा विकत घेणारा करतो कारण इबे कडून विक्रेत्याला जी फी आकारली जाते ती मूळ किंमतीवर असते. काहीजण मुद्दाम वस्तुची किंमत अतिशय कमी ठेवून पाठवण्याचा खर्च अव्वाच्या सव्वा ठेवतात ज्यामूळे त्यांना इबेची कमीत कमी फी भरावी लागते.

विक्रेता वस्तू पाठवण्यासाठी जी कुरीयर कंपनी/ टपाल खाते वापरणार तिथे विम्याचा पर्याय उपलब्ध असल्यास ग्राहकांनाही तो पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. थोडक्यात इबेशी त्याला काही देणेघेणे नाही ते विक्रेता आणि खरेदीकर्ता ठरवू शकतात.

खरेदी कर्त्याने वस्तू लिलावात जिंकल्या जिंकल्या लगेच संपूर्ण पैसे भरणे आवश्यक असते. पैसे जमा झाल्याची खात्री झाल्यावरच विक्रेता वस्तू पाठवतो.

खरेदी करताना विक्रेत्याचे रेटिंग पाहणे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. साधारणपणे ९५% वगैरेच्यावर पॉझीटीव फीडबॅक असणार्‍या विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे.

तक्रार

काहीजण मुद्दाम वस्तुची किंमत अतिशय कमी ठेवून पाठवण्याचा खर्च अव्वाच्या सव्वा ठेवतात ज्यामूळे त्यांना इबेची कमीत कमी फी भरावी लागते.

तक्रार केल्यास इबे त्यांच्या जाहिराती उडविते. मी अनेकदा तसे केले आहे.

माझे अनुभव

इबे (बाझी) इंडिया वरील विक्रेत्यांकडून मी ~३५ वस्तू विकत घेतल्या आहेत. ~७० रु ते ~२००० रु मूल्यापर्यंत व्यवहार केले आहेत. अधिक मूल्याच्या वस्तूंसाठी लॅमिंग्टन रोड मुंबई किंवा एस पी रोड बंगलोर येथे जाणे मी सुरक्षित समजतो.
एक विडियोकार्ड मी ~५००० रुपयांना घेतले, ३-४ वर्षे वापरून इबेवर ~१५०० रुपयांना विकले. अन्यथा ते मातीमोल होते.
ट.ख. बहुतेकदा रास्त असतो. जकात कधी भरावी लागते (खासगी टपालवाले स्वतः भरतात आणि आपल्याकडून वसूल करतात) तर कधी (भरायलाच) विसरतात. प. बंगालच्या पत्त्यावर वस्तू पाठविण्यास अनेक विक्रेते तयार नसतात.
विम्याची सोय असते.
विक्रेत्याला किती ग्राहकांनी पसंती/नाखुशी दाखविली ते पाहून व्यवहार करावा.

खरेदीवर सवलत देणारे वाऊचर इबे माझ्या भावाला (इबेवर ७-८ व्यवहार केले आहेत) दरमहा एकदा (कधी ५% कधी १०% कधी १५%) पाठविते. मला का देत नाहीत ते माहिती नाही :(
जालावर अनेक संस्थळे अशी वाऊचर प्रसिद्ध करतात. त्यांपैकी काही हस्तांतरणीय असतात.
दोनदा फसवणूक झाली, त्यापैकी एकदा इबेकडे तक्रार केली तेव्हा सर्व पैसे परत मिळाले, नकली वस्तू माझ्याचकडे राहिली. दुसर्‍या वेळी मी तक्रार करण्यात दिरंगाई केली.
पेपॅल/पैसापे या सुविधांनी पैसे दिल्यास, ग्राहकाने संतोष व्यक्त करेपर्यंत पैसे इबेकडेच एस्क्रो राहतात.
ग्लोबलइझीबाय या सुविधेमुळे परदेशांतील (उदा. इबे.कॉम) विक्रेत्यांच्या वस्तू जकात, आयातकर, इ. भरून भारतात मिळतात.

माझा अनुभव

मी फक्त खरेदी केलेली आहे. विक्री केलेली नाहि.

दिलेली वस्तू पाठवण्याचा खर्च कोण करते? (पुस्तकासारखी गोष्ट असल्यास पाठवण्याचा खर्च आणि मूळ किंमत जवळपास असू शकते. अशा वेळी व्यवहार परवडण्यासारखा नसावा.)

हे जाहिरातीत ठरवता येते. "शिपिंग अँड हँडलिंगचा" खर्च जोडूनच किंमत मोजायची, अशी सोय करता येते.

वस्तू पाठवताना फुटण्याचा धोका असेल तर विमा करावा लागतो का?

वैकल्पिक. अशी सोय करता येते. जाहिरातीत तसे स्पष्ट असले पाहिजे.

व्यवहाराचे स्वरूप कसे असते? (म्हणजे आधी पैसे मिळाले की वस्तू पाठवायची किंवा कसे?)

हे विक्रेत्याने ठरवून जाहिरातीत स्पष्टपणे सांगावे लागते.

यूके

ई बे यूके चा अनुभव ई बे यूएस आणि इंडिया सारखाच. मी केवळ पुस्तके खरेदी केली आहेत.

पुस्तकाची किंमत आणि टपालखर्च जवळजवळ सारखेच असतात पुष्कळदा. पैसे भरल्यावर पुस्तक पाठवले जाते. विमा कधी केला नाही.

एका जुन्या सहकार्‍याने ई बे वर चारचाकी गाडी घेतली होती. अजून चांगली चालते आहे. :)

हो कार देखील!

माझ्या नवर्‍याने इबे युएसए मधुन कार घेतली आहे. तीच आहे आमच्यकडे अजुनही. :)
खरेदीचा अनुभव चांगलाच आहे व विक्रीचा अनुभव नाहीये..

आभार

माहिती पुरवणार्‍या सर्वांचे अनेक आभार.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

अजून एक

वरील प्रतिसाद गडबडीत वाचले आहेत पण अजून एक माहीती

सर्वप्रथम मी कधी विकलेले नाही पण नवीन गोष्टी विकत घेतल्यात आणि कायम चांगला अनुभव आला आहे. मी पेपालच वापरतो. डायरेक्ट क्रेडीट कार्ड देत नाही.

विकायच्या असतील तर पेपालच वापरावे असे सुचवावेसे वाटते, (तुम्हीकरणार नाही पण) चेक अथवा मनीऑर्डर नक्की नको... : कधी कधी जास्त रकमेची मनी ऑर्डर / चेक पाठवतात आणि आपण बँकेत जमा केले की काही तरी गडबड करून बँकेच्या खात्याची माहीती घेतात... माझ्या मित्राला असा ऑलमोस्ट अनुभव क्रेग्ज लिस्टवर आलाफक्त त्याने ते मान्य केले नाही म्हणून वाचला...

ई-बे

जेव्हा बाझी होते तेव्हा मी विक्रेता म्हणून् काम केले आहे व आता देखील ई-बे द्वारेच पुस्तके विक्री करतो कधी कधी.

>>दिलेली वस्तू पाठवण्याचा खर्च कोण करते? (पुस्तकासारखी गोष्ट असल्यास पाठवण्याचा खर्च आणि मूळ किंमत जवळपास असू शकते. अशा वेळी व्यवहार परवडण्यासारखा नसावा.)

खर्च हा खरेदीदार व्यक्तीने करावा लागतो.

>>वस्तू पाठवताना फुटण्याचा धोका असेल तर विमा करावा लागतो का?

त्यासाठी विक्रेत्यांने आपली पॉलिसी डिक्लेअर् केलेली असते ती पाहून मगच अश्या वस्तू खरेदी कराव्यात.

>>व्यवहाराचे स्वरूप कसे असते? (म्हणजे आधी पैसे मिळाले की वस्तू पाठवायची किंवा कसे?)

पैसा पे ने पैसे पाठवा १००% मनीबँक गॅरेटी असते व तुम्ही पाठवलेला पैसा तुम्ही वस्तु मिळाली व योग्य आहे असा शेरा दिल्याशिवाय विक्रेत्याच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत.

***

मी गेली अनेक वर्ष ई-बे वरुन खरेदी करत असतो अगदी कपड्यापासून मोबाईल पर्यंत खुप काही खरेदी केले पण फसवणूकीचा एकदाही अनुभव नाही आला एकदा एक कॅमेरा मागवला होता तो खराब निघाला पण विक्रेत्यांने ७ दिवसामध्ये बदलून् दिला होता ते आठवते फक्त.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

 
^ वर