कोकणस्थ ब्राह्मण, कुळ, कुळदैवत

सदर चर्चा विशिष्ठ जातींबद्दल आहे. इथे कोणत्याही जातीला दुखावण्याचा अथवा तुलनेचा हेतू नाही. तरीही जर उपक्रमाच्या धोरणात बसत नसेल तर कृपया चर्चा प्रस्ताव त्त्वरीत उडवावा.

माझ्याकडे असलेली तुटपुंजी माहीती: कोकणस्थ ब्राह्मण या जातीमध्ये अनेक कुळे आहेत. आणि प्रत्येक कुळाचे एक "लक्ष्मी-केशव" मंदीर त्यांच्या मुळ कूळ-गावी आहे. बरीचशी मंदीरे तत्त्कालिन ब्राह्मणांच्या चरितार्थासाठी बांधलेली आहेत.

चर्चाप्रस्तावः
१. कुळ म्हणजे काय? ती कशी तयार झाली?
२. माझा आधी समज होता की प्रत्येक कुळाचे असे एक 'लक्ष्मी-केशव' मंदीर असते. मात्र काही कुळे अशी आहेत ज्यांचे कुळदैवत लक्ष्मी केशव नसून शंकर पार्वती आहेत (उदा. डोंगरे कुळाचे कुलदैवत भवानी-भुतेश्वर आहे असे ऐकून आहे). तर प्रश्न असा की कोकणस्थ ब्राह्मणांतही शैव व वैष्णव असा भेद होता / आहे का? त्यांच्या चालीरिती / पद्धतींत काहि फरक असतो / केला जातो का?
३. ह्या लक्ष्मी केशव मंदीरांचा काही विषेश इतिहास आहे का? बरीचशी मंदीरे पेशवाईच्या पुढे-मागे बांधलेली आढळतात. त्यांना पेशव्यांचे आर्थिक पाठबळ असे का? ह्या मंदीरांना तत्कालिन ब्राह्मणंच्या चरितार्थाचे हक्काचे स्थळ याशिवाय इतर महत्त्व / इतिहास आहे का?

याशिवाय एकूणच कोकणस्थ ब्राह्मणांचा इतिहास जाणून घ्यायचा असेलतर एखादे पुस्तक सुचवता येईल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

कुल

एकच कुल देवता असलेली कुटुंबे एका कुलातली मानली जातात. त्यांच्यातील परस्पर विवाह संबंध निषिद्ध मानले जात नाहीत.
चन्द्रशेखर

उपप्रश्न

एकच कुल देवता असलेली कुटुंबे एका कुलातली मानली जातात. त्यांच्यातील परस्पर विवाह संबंध निषिद्ध मानले जात नाहीत.

यावरून दोन उपप्रश्न विचारतो. हे प्रश्न श्री.चंद्रशेखर यांच्या प्रतिसादावर देत असलो तरी त्यांच्यापुरतेच मर्यादित नाहीत
१. एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे? (हे काहिसे आधी कोंबडी की अंडे सारखे झाले ना? कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवणे)
२. गोत्र व कुळ यात फरक काय?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

हम्म, अंदाजपंचे!

१. एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे? (हे काहिसे आधी कोंबडी की अंडे सारखे झाले ना? कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवणे)

बहुदा कुळाचे एखादे दैवत असावे. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधणे
हे काही नवीन नसावे. अमेरिकेत काही गावांमध्ये इतक्या ठिकाणी चर्चेस दिसतात की तिथे पूर्वी मराठी लोक राहत होते का काय असे वाटावे! (प्रत्येकाचा वेगळा पंथ म्हणून म्हटले). कुळ म्हणजे कुटुंबकबिला वाढला की म्हणत असावेत असा आपला एक अंदाज करते. :) अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी.

२. गोत्र व कुळ यात फरक काय?

गोत्र म्हणजे ऋषिंवरून असते असे ऐकले आहे. जसे भारद्वाज वगैरे. कदाचित शिक्षणपद्धती असाव्यात. (स्कूल ऑफ थॉट). हाही एक अंदाज आहे. कुळ हे कदाचित नातेसंबंधी लोक असावेत.

९६ कुळी

मी मिलिंद अनंत पालांडे
आम्ही ९६ कुळी आहोत पण आम्हाला आमच्या कुळ देवी व कुला देव याबद्दल शाशांक आहोत तरी मला कोणी आमच्या कुलादेवाची व देवीची अचूक माहिती देईल त्याचा मी ऋणी राहेन..
मोबाईल--९८९२०७५३८८

कुळ देवी व कुलदेव याबद्दल शाशंक आहोत

दिंडोरी नाशिकचे मोरे दादांच्या "क्षात्रधर्म" या पुस्तकामध्ये ९६ कुळी मराठ्यांची गोत्रावळी आणि देवक याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

कुलदैवत

असल्या गोष्टी ठरवण्याच्या किंवा शोधून काढण्याच्या भानगडीत पडू नका बुवा! माहिती नसली तर असल्या जुनाट गोष्टी विसरून जा. त्याने आयुष्यात काहीही अडत नाही. मला माझी कुलदेवता किंवा दैवत (असल्यास) काय आहे? याची माहिती करून घेण्याची आयुष्यात कधीही गरज भासली नाही. व आता भासेल असे वाटत नाही. या असल्या कल्पनांचे ओझे आपण जितक्या लवकर खांद्यावरून फेकून देऊ तितके आयुष्यात हलके वाटेल. गोत्रासंबंधी येथे वाचा
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

उत्सुकता

मला केवळ शंका आहेत त्या उत्सुकता म्हणून. या असल्या कल्पनांचे ओझे खांद्यावर घेतलेलेच नाही, तेव्हा ते उतरवण्याचा प्रश्नच नाही.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

संभ्रम

>>> या असल्या कल्पनांचे ओझे आपण जितक्या लवकर खांद्यावरून फेकून देऊ तितके आयुष्यात हलके वाटेल. <<<

+ या विचाराशी १०० टक्के सहमत.

वास्तविक श्री. ऋषिकेश यांच्या धाग्यातील शैव आणि वैष्णव यांच्यातील भेदावर लिहिण्याच्या बेतातच होतो. पण ते लिहावे कि ना, या संभ्रमात असतानाच "वेळीच" श्री.चंद्रशेखर यांचा प्रतिसाद वाचला आणि मग त्यांचे वरील वाक्य प्रमाणभूत मानून गप्प राहण्याचे ठरविले.

बाळाजी विश्वनाथ भट

"बरीचशी मंदीरे पेशवाईच्या पुढे-मागे बांधलेली आढळतात. त्यांना पेशव्यांचे आर्थिक पाठबळ असे का?"
पेशव्यांच्या आधी चित्पावनांना कनिष्ठ वागणूक मिळे असे ऐकले आहे. पेशवाईतील आरक्षणामुळे ते पुढे गेले/आले असे म्हणावे काय? ;)

थोडी माहिती

कोकणस्थ (चित्तपावन)

कोकणास्थ लोकांची वस्ती चौदाव्या शतकाच्या आधी कोकणात असल्याचे आढळून येत नाही. ते तेथे कसे आले याबद्दल तीन मते आहेत.

(१) परदेशाहून जहाजाने आले. सरळ नाक, गोरा रंग यावरून ही जात परदेशीय असावी असा तर्क. बर्बर देशातील ह्या लोकांना परशुरामाने आपले केले व त्यामुळे तो त्यांचे दैवत ठरला. परशुरामाला गणेशपुराणात बर्बरदेशीय म्हटले आहे. अर्थात हे फारसे संयुक्तिक नाही. गौर वर्णीय, सरळ नाकाची माणसे केरळ, कर्नाटक प्रांतातही आढळतात; ते स्वत:ला चित्तपावन म्हणवत नाहित. (मंडलिक, साने)
(२) हे लोक मुळचे कर्नाटकाच्या समुद्रावर्ती भागातील. तेथून ते कोकणांत आले. अनेक गावांची नावे दोनही प्रदेशात समान आहेत. गोकर्ण, वनवासी भागत कोकणस्थांची वस्ती आहे. (राजारामशास्त्री भागवत)
(३) चौदाव्या शतकात महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. शेकडो कुटुंबे देशोधडीला लागली. मराठवाड्यातील काही जण कोकणात उतरले. त्यांनी
किनार्‍यालगतच्या खाजण जमिनी लागवडीयोग्य केल्या. अनेक कोकणी कुटुंबाची कुलदेवता मराठवाड्यातील अंबे-जोगाई आहे.( भावे)
शक्यता अशी की या सर्वांत कमी-अधिक सत्य असावे.

मुळचे कोकणस्थ शैव. व्याडेश्वर, हरिहरेश्वर, कोळेश्वर, वेळेश्वर, सोमेश्वर इत्यादि कुलदेव आहेत. जोगेश्वरी ही कुलदेवता. काही कुळात पुढे विष्णूची उपासना सुरु झाली. लक्ष्मी-नारायण, केशवराज, लक्ष्मीनृसिंह, लक्ष्मीकेशव ही कुलदैवते काहींनी स्विकारली. खंडोबा,कालभैरव व काही क्षुद्र दैवतेही काही कुटुंबात पुजली जातात. पेशवे गणपतीचे उपासक. महालक्ष्मीची नवरात्रातील पूजा हेही यांचे वैशिष्ट्य.

चित्तपावन संघातर्फे प्रसिद्ध होणारे ग्रंथ कुलवृतांत, उदा.लिमये, साठे वगैरे, भरपूर माहिती देतील.

शरद

कालभैरव, खंडोबा ही क्षुद्र दैवते नाहीत...

लिहिण्याच्या भरात दैवतांचा अधिक्षेप केला जाऊ नये, ही विनंती...

कालभैरव आणि खंडोबा ही क्षुद्र दैवते नाहीत. शिवपंचायतनात शंकर, पार्वती (गौरी), गणपती यापाठोपाठ या दोन देवांना महत्त्व दिले जाते. कालभैरव हा शंकराचा उजवा प्रमुख गण, तर खंडोबा हा डावा प्रमुख गण मानला जातो. (उभे राहण्याच्या स्थानानुसार) रामपंचायतनात 'गरुड हनुमंत पुढे उभे राहती' याला जितके महत्त्व आहे तितकेच ते शिवपंचायतनात भैरोबा व खंडोबाला आहे. ही दोन दैवते शस्त्रधारी व ताकदवान आहेत आणि विविध जातींची कुलदैवते आहेत. अनेक शैवोपासक कुटूंबांच्या देव्हार्‍यात या दोन्ही देवतांचे सोन्या-चांदीचे टाक असतात.

कालभैरव हा तर अतिशय प्रबळ देव आहे. तो शक्तीपीठांचा मुख्य संरक्षक देव आहे. काशीमध्ये विश्वेश्वराचे दर्शन घेतलेल्या भाविकांना कालभैरवाची परवानगी घेतल्यावाचून बाहेर पडता येत नाही. ही अनुमती म्हणून काशीयात्रा करणार्‍या प्रत्येकाला काळ्या धाग्याचा गंडा गळ्यात बांधावा लागतो. शाक्त पंथात तंत्रविद्येत अधिकारी साधकाला भैरव, तर साधिकेला भैरवी म्हटले जाते. केवळ भैरव हेच उपास्य दैवत मानणारा 'कापालिक' हा अघोरपंथ एकेकाळी अस्तित्वात होता.

हा भेद आणखी थोडासा स्पष्ट करता येईल.
मूळ स्वरुपातील दैवते : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया
विष्णूची अवतार रुपातील दैवते : नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम
शंकराची अवतार रुपातील दैवते : कालभैरव, खंडोबा, मारुती
आदिमायेची अवतार रुपातील दैवते : सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली
शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती, तसेच आरंभ पूजनाची देवता - गणेश
देवांचा सेनापती : कार्तिकेय (दक्षिण भारतात याला महत्त्व आहे. अय्यप्पा म्हणतात)
वैदिक देवता : इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा (यातील सूर्य व अग्नी वगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही )

क्षुद्र हा शब्द आज कुणासाठीही वापरणे अपमानास्पद आहे, पण कधी काळी हा शब्द सर्रास वापरात होता तेव्हाही जी क्षुद्र दैवते मानली जात होती त्यात वेताळ (वेतोबा), म्हसोबा, मुंजा (मुंजोबा, पिंपळोबा), शिंग्रोबा, जखाई, येस्काई, मरीआई, काळुबाई आसरा अशी तळागाळातील जाती पूजा करत असलेली दैवते होती. त्यात भैरोबा व खंडोबाचा समावेश नव्हता.

मायनर किंवा किरकोळ

लिहिण्याच्या भरात दैवतांचा अधिक्षेप केला जाऊ नये, ही विनंती..
इथे क्षुद्रचा अर्थ मायनर किंवा किरकोळ असा घ्यायला हवा. शंकर मेजर आहे. त्यामुळे खंडोबा, कालभैरव मायनरच. बहुधा मूळचे लोकल डेइटी असावेत.

आजकाल साईबाबा शिर्डीकर स्वामी समर्थ अक्कलकोटकर, गजानन महाराज शेगावकर, शंकर महाराज पुणेकर मेन झाले आहेत. त्यांचा अधिक्षेप व्हायला हवा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

त्याहीपेक्षा उपदैवते अधिक समर्पक...

क्षुद्र, मायनर, किरकोळ, कनिष्ठ, दुय्यम यापेक्षा या दैवतांना उपदैवते म्हणणे समर्पक ठरावे, म्हणजे मुख्य दैवते व उपदैवते अशी विभागणी करता येईल.

अगदी योग्य

म्हणजे मुख्य दैवते व उपदैवते अशी विभागणी करता येईल.
अगदी योग्य वाटते आहे. बाहेर समाज नावाची एक अत्यंत गुंतागुंतीची चीज आहे, हे विसरलोच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जोग, बापट

शक्यता अशी की या सर्वांत कमी-अधिक सत्य असावे.
जोग हे कर्नाटकातले, तर बापट आंध्रातले असे म्हणतात.

ह्याशिवाय:

  1. काही जणांच्या मते कोकणस्थ अफगाणिस्तानांतून आलेले आहेत.
  2. काही जणांच्या मते कोकणस्थ मूळचे इराणी आहेत.
  3. काही जणांच्या मते कोकणस्थ भरकटलेले ज्यू आहेत.

सत्य काहीही असो, एक गोष्ट मात्र खात्रीने सांगता येईल की कोकणस्थ इतर होमो सेपियनांसारखेच असतात.

विष्णुवर्धन हे खास कोकणस्थांचे गोत्र आहे. कन्नड सिनेमाचा सुपरस्टार विष्णुवर्धन माहीत असणाऱ्यांची एव्हाना खात्री पटली असेलच की कोकणस्थ हे कर्नाटकातूनही आलेले आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हा हा हा

काही जणांच्या मते कोकणस्थ अफगाणिस्तानांतून आलेले आहेत.
काही जणांच्या मते कोकणस्थ मूळचे इराणी आहेत.
काही जणांच्या मते कोकणस्थ भरकटलेले ज्यू आहेत

हा हा हा....तालिबानी कोकणस्थ.

पुरवणी

अनेक कोकणी कुटुंबाची कुलदेवता मराठवाड्यातील अंबे-जोगाई आहे.

कोकणातील कोकणस्थ व ह्या देशावरील कुलदेवता असणार्‍या कोकणस्थ ब्राह्मणांच्या काहि चालीरितिंतही फरक पडतो असे ऐकून आहे. जसे कोकणात कुलदेवता असणारे शुभकार्याच्यावेळी बोडण घालतात तर देशावरील देवीचा गोंधळ घालतात.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

शैव कोकणस्थ म्हणजे गुरव?

मुळचे कोकणस्थ शैव

गुगलले असता शैव पुजार्‍यांना "गुरव" म्हणतात असे आढळले. बर्‍याच मंदीरांमधे गुरव पुजारी दिसतात. हे गुरव म्हणजे मुळचे शैव कोकणस्थ का? (प्रश्न कदाचित बाळबोध असेल पण मला खरंच कल्पना नाही आणि उत्सुकता आहे म्हणून विचारतोय)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

गुरव म्हणजे मुळचे शैव कोकणस्थ का ?

शैव मंदिरामध्ये पुजा अर्चा करणा-या पुजा-याला गुरव म्हणतात परन्तु गुरव कोकणस्थ असतील हे पटत नाही

शैव

शैव वैष्णव भेदाविषयी माझ्याही मनात गोंधळ आहे. बहुतेक कोकणस्थ शैव असतात आणि त्यांचे कुलदैवत **श्वर म्हणजेच कोणतातरी शंकर हेच असते. पेशवेही कोकणस्थ होते आणि त्यांचे कुलदैवत गणपती म्हणजे शैवच होते. कुलदेवता मात्र मराठवाड्यातील अंबेजोगाई असते. मात्र असे असूनही ते विष्णूचा अवतार मानलेल्या परशुरामाचे भक्त असतात आणि परशुरामाला आपला नेता (?) मानतात. माझ्या संपर्कातल्या यच्चयावत कोकणस्थांपैकी एकच कोकणस्थ कुल मला माहिती आहे ज्यांचे कुलदैवत विष्णू (नृसिंह) आहे.

परंतु आम्हा थत्ते मंडळींचे बिवली हे मूळ गाव कोकणात आहे आणि तेथे लक्ष्मी केशवाचे मंदिर आहे. (थत्ते कुलवृत्तांतात अनेक लोकांचे आडनाव विद्वांस असे का नोंदलेले आहे हा अजून एक मला पडलेला प्रश्न आहे).

पेशवाईच्या काळात मंदिरे बांधण्याच्या निमित्ताने अनेक ब्राह्मणांनी जमिनी सनदा वगैरे मिळवल्या. अष्टविनायकातल्या बहुतेक गणपतींची निर्मिती पेशवाईच्या काळातच झाली. बहुतेक गणपती मंदिरांचा इतिहास (एन्काउंटरच्या वृत्तांतासारखाच) एकसुरी असतो. "अमुक अमुक यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यांनी त्याप्रमाणे शोध घेतला असता ही मूर्ती सापडली. पेशव्यांनी मग मंदिर बांधण्यास सांगून पाच वगैरे गांवे दान केली इत्यादि....". त्याकाळी कोणीही गणपतीच्या मूर्तीची कथा सांगून पेशव्यांकडून देणग्या उकळत असावेत.

घरोघरी गणेश चतुर्थीला गणपती बसवण्याची पद्धतही त्याच काळात सुरू झाली असावी. तसेच ही पद्धत पेशव्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या प्रदेशातच-महाराष्ट्र, कर्नाटक, इंदूर बडोदा- आढळते. सत्ताधार्‍यांचे अनुकरण + लांगूलचालन करण्याची प्रवृत्ती सर्वत्र असल्यामुळेच असे असावे का?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

शांडिल्य जोशी

शांडिल्य गोत्री जोशींचे कुलदैवत लक्ष्मीनृसिंह आहे असे ऐकले आहे.

परशुराम स्वत:च शिवभक्त होता ना?

अवांतर माहिती...

गणेश चतुर्थीला गणपतीची मातीची मूर्ती बाहेरुन आणून तिची प्रतिष्ठापना करण्याची व नंतर विसर्जित करण्याची पद्धत चित्पावन समाजाकडून इतर समाजांत आली. त्याआधीच्या काळात किमान देशावर तरी देव्हार्‍यातील गणेशमूर्ती ताम्हणात काढून घेत व चार दिवस पूजा झाल्यावर पुन्हा बाप्पा देव्हार्‍यात विराजमान होत. विसर्जन हा प्रकार नव्हता. (ही अर्थात आमच्या आजी-आजोबांकडून ऐकलेली माहिती आहे.) गणपती या देवताला खरे महत्त्व पेशव्यांच्या काळापासूनच आले. नानासाहेब पेशवे श्रेष्ठ गाणपत्य (गणेश उपासक) होते. अष्टविनायक स्थानांना महत्त्वही तेव्हापासूनच आले असावे.

कुलदैवत

आमचे कुलदैवत खंडोबा असे मला लहानपणी सांगण्यात आले. त्याला म्हाळसाकांत असे म्हणुन त्याचे चांदीचे टाक पुजेत ठेवले जात. खंडोबाचे नवरात्र घरात केले जाई. चंपाषष्ठी ला येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हणून तळी ( खोबरे व भंडारा असलेले तबक) तीन वेळा उचलून घेतले जाई. नंतर ते खोबर प्रसाद म्हणुन् वाटायच.
माझी बायको कोकणस्थ तिला खंडोबा हे दैवत अब्राह्म्णी वाटायच. तसेही देशस्थ त्यातुन घाटावरचे म्हणल्यावर इतरांना ब्राह्मण्याचा आळ आल्यासारखे वाटायचे
प्रकाश घाटपांडे

दैवतांचे प्रकार

ग्रामदैवत, कुलदैवत, इष्टदैवत वगैरे दैवतांचे प्रकार आहेत. (आराध्यदैवत असाही एक प्रकार असावा पण त्यात आणि इष्टदैवतात नेमका फरक कोणता ते माहित नाही.)

ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते.

बाकी, कोकणस्थ ब्राह्मणांच्या कुळांची माहिती नव्याने कळली.

कुलदैवत व कुलस्वामिनी

कुलदैवत व कुलस्वामिनी वेगळी असावी असे वाटते. आमचे रत्नागिरीजवळ बसणीला लक्ष्मी-केशव हे कुलदैवत आहे आणि कुलस्वामिनी मात्र कोल्हापूरची अंबाबाई आहे.

बाकी अजुनही कुळ कशास म्हणवे हे नीटसे समजलेले नाही

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कुलदैवत व कुलस्वामिनी वेगळी असावी असे वाटते

कुलदैवत अर्थात् कुलस्वामी व कुलस्वामीनी.....
कुलस्वामी : लक्ष्मी-केशव
कुलस्वामीनी : कोल्हापूरची अंबाबाई

कुळ

कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. (दत्तक विधान अर्थातच यात मान्य आहे. अशी तडजोड आमच्या कुळातील एका फांदीवर पाहिलेली आहे.) बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते. (ही माझी उडत उडत आठवणींवर आधारित माहिती. चू. भू. दे. घे.)

कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात असे वाटते. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारतयुद्ध हे एक टोळीयुद्ध होते या वचनाची आठवण होते. ;-)

कुळ

आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात.
कुळ,कुलधर्म आणि कुलाचारविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
www.jejuri.in/kuldharma-kulachar

 
^ वर