उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
आयुर्वेदामधे जीवनसत्व (व्हायटामिन्स) हा विषय हाताळला गेला आहे का?
गिरीश
July 30, 2010 - 4:07 pm
आयुर्वेदामधे जीवनसत्व (व्हायटामिन्स) हा विषय हाताळला गेला आहे का? जेव्हढे जीवनसत्व-प्रकार आज माहिती आहेत, तितकेच प्रकार आयुर्वेदाला माहिती होते का? जर होते तर ते कसे मिळवायचे ह्याची काय उपाययोजना सुचविली आहे?
दुवे:
Comments
शब्द आणि कल्पना
कल्पना नाही पण हा प्रश्न अयोग्य वाटतो.
म्हणजे आयुर्वेद जर म्हणाला की गाजरे खाल्ल्याने रातांधळेपणापासून बचाव होतो तर त्याने अ जीवन सत्त्वाचा विचार केला आहे की नाही हे कसे ठरवणार?
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
कारणीमीमांसा
**संहीतेंमधे गाजर का खावे ह्याची कारणीमीमांसा दिली गेली असली पहिजे, अशी अपेक्षा आहे. प्रश्न अयोग्य का वाटतो हे मात्र समजले नाही.
केरोटीन
गाजर खावे कारण त्यात अमूक द्रव्य असते असा उल्लेख आयुर्वेदात असण्याची शक्यता नसणारच. पण विटॅमिन शब्द नसेल तरी विचार तोच आहे असे मला वाटते.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
कृपया नोंद घ्यावी
कृपया नोंद घ्यावी- हा धागा "भरपूर" प्रतिसाद यावेत ह्या लालसेने निर्माण केलेला नाही. उपक्रम हे स्थळ अशा चर्चा पचवू शकते ह्याची खात्री आहे. काही सदस्य मेडीकल प्रॅक्टीशनर आहेत असे कळते, म्हणून हा प्रश्न विचारला आहे.
जेव्हढे संशोधन वैद्यकीय शास्त्रात आज झाले आहे, तितके बारकावे आयुर्वेदात नसावेत असा प्रथम समज होतो. पण हे मत चुकीचे असु शकते.
बी-१२ सारखे जीवनसत्व मिळवण्यासाठी अंडी किंवा मांसाहार सुचवला जातो. असा उपचार आयुर्वेदात असु शकेल का हा प्रश्न पडल्यामुळे वरील प्रश्न विचारला आहे. जी मंडळी मांसाहार करतच नाहीत त्यांना बी-१२ ची कमतरता पडते की नाही? जर पडली तर ते गुपचूप मांसाहार करतात का असा प्रश्न पडतो.
संयम
म्हणूनच इतका वेळ इथे आलो नव्हतो.
आता "गाय हा उपयुक्त पशु आहे", "गोमाता म्हणण्याचा अधिकार केवळ बैलाला आहे", वेदांतील वर्णने, वगैरे युक्तिवाद चालू झाले तर विषयांतर होईल. पण ६०० मि.लि. दूध पिऊन पुरेसे ब१२ मिळते. उलट दिशेने विषयांतर करायचे झाले तर गोमय किंवा पञ्चगव्यातून मिळू शकणारे ब१२ वगैरे विषयही आहेतच.
तुमच्याकडून खुलासेवार समजावून घ्यायला आवडेल
धन्यवाद. ह्या सगळ्याबद्दल तुमच्याकडून खुलासेवार समजावून घ्यायला आवडेल.
कंटाळा
कुठलातरी नवा खेळ खेळूया. मला वाटते की हा विषय येथे पूर्वी चर्चून संपला आहे.
ठिकाय
ठिकाय. मला माहिती नव्हते.
संयम
मसावर संयम कसा ठेवावा याची उत्तम प्रॅक्टीस होते. :)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
नाही
जर ए, बी, सी, डी, ई, के व्हिटामिने जोडणार्या संकल्पनेला चर्चाप्रस्तावात "व्हिटॅमिन" म्हटले असेल, तर नाही. ही संकल्पना आयुर्वेदात नाही.
बी१२ जीवनसत्त्व कमी पडल्यामुळे काही लक्षणे दिसतात : (विवक्षित मज्जातंतूंची अकार्यक्षमता + लाल पेशी बेढब होऊन संख्येने घटणे), अशी लक्षणे आयुर्वेदात न्यायची म्हणजे बहुधा बहु-दोष-प्रकोप मानावा लागेल - शिवशिवणे वगैरे वातामुळे... इ.इ.
{येथे एका उल्लेखात चूक होती, तो परिच्छेद गाळला आहे.}
आता आणखी एक प्रश्न विचारला होता - मांसाहार न करणार्या भारतीयांमध्ये बी-१२ जीवनसत्त्वाची कमतरता का दिसत नाही?
याची दोन स्पष्टीकरणे आहेत. भारतात "शाकाहारा"मध्ये दुग्धजन्य पदार्थ खाता येतात. त्यातही विशेषतः विरजलेल्या पदार्थांत (दही-ताकात) बी-१२ जीवनसत्त्व पर्याप्त मात्रेत आढळते.
बी-१२ जीवनसत्त्व मातीमधील जीवाणूंमध्ये देखील आढळते. भाज्यांवर थोडीशी माती राहिली तर त्यांतील जीवाणूंमधून बी-१२ जीवनसत्त्व मिळू शकते. मात्र हे पर्याप्त आहे की नाही हे त्या मातीवरती (त्यातील जीवाणूंवरती) अवलंबून असते, आणि कितीशी माती चुकून पोटात जाते, त्यावर अवलंबून असते.
व्हिटामिन एम..
बाकीच्या जीवनसत्वांबद्दल माहित नाही मात्र आयुर्वेदाचा व्यावसायिक उपयोग करणार्याला व्हिटामिन "एम" भरपूर प्रमाणात मिळते.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com