मराठी स्माईलीज्

या चर्चेदरम्यान मराठी स्माईलीज् ('हसमुखे' कसंतरीच वाटतं!) विषयी एक मुद्दा आला होता.
उदा.
वटारलेले डोळे दाखविण्यासाठी 8 ऐवजी ळ्‍
जीभ दाखविण्यासाठी P ऐवजी ण्‍ किंवा ७
ही चांगली कल्पना आहे. आणि कदाचित रुपयाच्या चिन्हाप्रमाणे लागलीच उचललीही जाऊ शकेल.
किमान मराठी सायटींवर मराठीत टंकन करत असताना मध्येच स्माईलींसाठी इंग्रजीत टंकावे लागते. ते टळेल.

उपक्रमावर मुळातच स्माईलीज् ची सोय नाही, ती करता येईल का?(भावना पटकन पोहचवता आणि रुजवता येतात.)

लेखनविषय: दुवे:

Comments

स्मायली

अशी सोय उपक्रमावर जरुर असावी. याच्याशी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

गो रेट्रो

मला रंगीतसंगीत स्मायल्यांपेक्षा उपक्रमावरील :-) असले साधेसोपेच जास्त आवडतात.

:-)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हे

कसे केले?
स्मायलीला कसे पळवायचे?

एचटीएमएलचे अबकड

बास का राव
बास का राव
बास का राव
बास का राव

<marquee> </marquee> हे वापरुन हा खेळ आपण आधीही खेळलो होतो ना.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मी नव्हतो


धन्यवाद.


एचटीएमएल शी कुस्ती करून


बरेच दिवस झाले


त्यामुळे विसरलो :)

झक्कास्स!

@आजानुकर्ण आणि आरागॉर्न: वा!!!

||वाछितो विजयी होईबा||

निरिक्षण

वाक्यांना बराच वेळ पळवले तर त्यांच्यामध्ये फेज ल्याग येतो.

यईच

उपक्रमावर मुळातच स्माईलीज् ची सोय नाही, ती करता येईल का?(भावना पटकन पोहचवता आणि रुजवता येतात.)
यईच तो मै बी बोल रेला था.

बाकी वापरताना मी बरेचदा :प् किंवा :ड् हे वापरतो. ज्यांना समजायचे ते समजून घेतात. :ड् :प्

ताक : भावना रूजवणे आवडले. :प्

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

समजून घेतात

पण बाकिच्यांचे काय?
म्हणूनच ग्राफिकल स्माईलीज् पाहिजेत.
||वाछितो विजयी होईबा||

चांगली कल्पना, पण सोबत "डोळे :" हवेत

:७ जीभ काढणे
... (येथे मात्र बहुतेक हसमुखांसाठी केवळ विरामचिह्नेच दिसतात, अर्ध्यापेक्षा कमी ठिकाणी रोमन चिह्ने वापरावी लागतात.)
:-० ( :-o ऐवजी)

मराठीत शिरोरेषेमुळे थोडी गडबड होते खरी - रेषा म्हणजे मानेचा पाठचा भाग समजला तर चेहरा नेहमी खालमुंडी होतो.
:ळ म्हणजे मुक्यासाठी ओठांचा चंबू करणे (भरपूर लिपस्टिक लावलेले ओठ)
...
...
:६ डुक्कर

शब्द पटत नाही.

स्मायली हा शब्द वापरात असला तरीही पटत नाही. उदाहरणार्थ :-( याचा जो चेहेरा बनतो त्याला स्मायली (अथवा हसमुखे) कसं म्हणणार? स्काईपमधला 'इमोटीकॉन' हा शब्द जास्त पटणेबल आहे.

भावमुद्रा

>>>स्मायली हा शब्द वापरात असला तरीही पटत नाही.
भावमुद्रा असा शब्द चालेल का ?

-दिलीप बिरुटे

तोच प्रतिसाद इथे पुन्हा देतो

वा छान कल्पना.,, शुभस्य शीघ्रम्



























इंग्रजी  मराठी
 :)  किंवा :-)  :)  किंवा :-)
 :(  किंवा :-(  :(  किंवा :-(
 :P  :७ किंवा :प
 B-)  ३-)
:-o  :-०
 :?  :?
 :S  :इ

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

छान पर्याय

असे सोपे पर्याय उपलब्ध करून दिले तर रुळायला वेळ नाही लागणार
||वाछितो विजयी होईबा||

दादासाठी, राजसाठी

दादासाठी 4141
राजसाठी 2151
हे आकडे वापरतात म्हणे. चूभूद्याघ्या. ह्यांना काय म्हणायचे?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नवा शब्द

याला 'माजली' म्हणावे का?

अजून...

नाना-7171
आई-३१३
ॐ-३७
तुपे-34/३५
पवार-4912
इत्यादी. यादी अजून लांबवता येईल.
याला 'माजली'पेक्षा सरळ 'माज' म्हणता येईल.

||वाछितो विजयी होईबा||

⎝^⏝^⎠ केवळ फाफॉमध्ये चालते आहे

⎝ ⏠⏝⏠ ⎠
अक्षरांदरम्यान स्पेस नसेल तर ते असे दिसतातः
स्पेसप्रमाणेच, एंटरसुद्धा लागोपाठ असतील तर एकच टंकले जाते, असे दिसते.

स्पेसप्रमाणेच, एंटरसुद्धा लागोपाठ असतील तर एकच टंकले जाते, असे दिसते.

स्पेसप्रमाणेच, एंटरसुद्धा लागोपाठ असतील तर एकच टंकले जाते, असे दिसते.
⎝⏠⏝⏠⎠

एच टी एम एल असे आहे:

%E2%8E%9D
%E2%8F%A0
%E2%8F%9D
%E2%8F%A0
%E2%8E%A0

बुद्धदर्शन

या स्मायलीमधले स्मित थोडे कमी केले तर बुद्धाच्या चेहर्‍याचा भास होतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अजून

हे मी बनविले:

डोळा मारणारा: ⎛°⏝

रडका स्मायली(=रडली): ⎝⏜︵⏜⎠

टीपः

⏝ किंवा ⏜ किंवा ⏠ इ. एखादे चिन्ह प्रीफिक्स केले नाही तर जुन्या फाफॉमध्ये ⎛, ⎞, ⎝ आणि ⎠ आखूड दिसतात.

मदत

_ ॒ ॔ ॓ या विरामचिन्हांचाही वापर करता येईल असे वाटते.

 
^ वर