कंपनी सरकारचा एकछत्री कारभार

माझं अगदी मजेत चाललेलं असतं. पण मधेच कुठेतरी माशी शिंकते आणि "चिंता करीतो विश्वाची" असे विचार मनात यायला लागतात. टाटा,बिर्ला, अंबानी यांची नावे आपण रोजच या ना त्या निमित्ताने ऐकत असतो. या नावांनी आपलं दैनंदिन आयुष्य कसं व्यापलयं त्याची ही एक झलक !

टाटा :
वीज, चहा पावडर, कॉफी, मीठ, पाणी स्वच्छ करणारे यंत्र (वॉटर प्युरीफायर), चश्मे, घड्याळ, युपीएस, ट्रेन्ट (वेस्टसाइड- तयार कपडे), क्रोमा, स्टार बाजार, तनिष्क ज्वेलरी, टाटा स्काय, फोन, इंटरनेट, जीवन विमा, सर्वसाधारण विमा, पोलाद, केमिकल्स, आयटी आणि सॉफ्टवेअर सर्विसेस, हॉस्पीटल, हॉटेल्स, फायनान्स, म्युचुअल फंडस्, चार चाकी कार्स, तीन चाकी टेम्पो, चार चाकी वाहने, अवजड वाहने, शीतयंत्र (ए.सी.), औषधे, ग्रुहनिर्माण, अक्सेस कंट्रोल सिस्टीम्स, ऑटोमेशन सिस्टीम्स, बंदरे (पोर्टस्) इ.

रिलायन्स :
वीज, मीठ, कपडे, मैट्रेसेस, ग्यास, पेट्रोलियम, लॉजिस्टीक्स, बिग टिव्ही, फोन, इंटरनेट, जीवन विमा, सर्वसाधारण विमा, केमिकल्स, आयटी आणि सॉफ्टवेअर सर्विसेस, हॉस्पीटल, फायनान्स, रिलायन्स फ्रेश, सोलार प्रॉड्क्टस्, मेट्रो ट्रेन, म्युचुअल फंडस् इ. इ.

काही कालाने आपण टाटा, रिलायन्सशिवाय जगू शकू काय ? ह्या स्वदेशी "ईस्ट इंडिया" कंपनीज तर होणार नाही ना !

लेखनविषय: दुवे:

Comments

नाही

नाहि, मला नाहि वाटत की यांच्या शिवाय जीवन अशक्य आहे. हवे तर असे म्हणु शकतो आपण की यांची आपल्याला सतत गरज असते पण असे म्हणतात की change is permanant, त्यामुळे यांचा देखिल एक ठराविक मक्तेदारीचा काळ ठरलेला आहे. त्यानंतर ती संपुश्टात येणारच.

आणि तुम्ही म्हणालात तसे ह्या स्वदेशी "ईस्ट इंडिया" कंपनीज तर होणार नाही ना !

असे अजिबात होणार नाही, कारण मला नाही वाटत की आपल्या देशी राजकारण्यांच्या हावरेपणापुढे या कंपनीज फिक्या पडतील.

शक्य आहे

आजतागायत रिलायन्सचे एकही उत्पादन किंवा सेवा विकत घ्यायला लागली नाही. आता मी वापरत असलेल्या इस्त्रीच्या वायरच्या इन्सुलेशनच्या प्लॅस्टिकच्या उत्पादकाने रिलायन्सकडून कच्चा माल घेतला असला तर मला माहिती नाही. पण मग कुठवर विचार करायचा असा प्रश्न येईल.

घ्यायची नाही असा निश्चय आहे. बघू कुठवर जमते ते.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

प्रॉब्लेम काय आहे?

श्री. राजकुमार यांचा प्रॉब्लेम काय आहे हे समजले नाही. ही सर्व उत्पादने व सेवा कोणीतरी देणारच. मग टाटा किंवा रिलाय न्स या कंपन्यांनी दिली तर कोठे बिघडले. कोणत्याही क्षेत्रात जेंव्हा मक्तेदारी येते तेंव्हा ग्राहकांना अडचण सोसावी लागते त्यामुळे जितक्या जास्त कंपन्या या क्षेत्रांत उतरतील तेवढे उपभोक्त्यांच्या दृष्टीने चांगलेच आहे.
चन्द्रशेखर

मोनोपोली

त्यांचा प्रॉब्लेम मोनोपोली हाच आहे.

या दोन कंपन्या जवळजवळ सर्व वस्तू/सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. इतर कंपन्या यांच्यापुढे टिकाव धरू शकल्या नाहीत तर अशी स्थिती येऊ शकेल.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

एस ए पी

या कंपन्या चालवण्यास लागणार्‍या एस ए पी सारख्या प्रणाल्या आणि त्यांचे सल्लागार ही मोनोपोली पक्की करण्यास मदत कर असतील काय?

आपला
गुंडोपंत

वैयक्तिक स्वरुपाचा प्रतिसाद

हा प्रतिसाद थोडासा वैयक्तिक अंगाने जाणारा वाटतो. संपादित व्हावा असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

का?

असे का वाटते बॉ?

या प्रणाल्या मी म्हणतो तसे कार्य करत नाहीत असे आहे का?
या प्रणाल्या कुणा एकाच्या मालकीच्या आहेत का?
सल्लागार कंपनीच्या हिताचे सल्ले देत नाहीत का?

तरीही कुणाला हा वैयक्तीक वाटत असेल,
तर वरील मजकूर प्रकाटाआ स्वसंपादीत असा वाचावा.

आपला
गुंडोपंत

प्रॉब्लेम काय आहे?

तुम्ही म्हणता ते एक अर्थाने बरोबर आहे. ह्या दोन कंपन्यांमुळे (किंवा त्यांच्यासारख्या इतर कोणत्याही) जर इतर चॉईस राहणार नसेल तर ती गंभीर परिस्थिती असेल. आणि भविष्यात (सरकारच्या आशिर्वादाने) तशी वेळ येणारच नाही असे नाही.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

घ्यायची नाही असा निश्चय आहे. बघू कुठवर जमते ते.

मला भेटलेल्या अनेक मंडळींना रिलायन्सबद्दल राग आहे. टाटांबद्दल आदर आहे. बहुतेक हा त्यांच्या बिझनेस स्ट्र्टेजीचा पराभव म्हणावा लागेल. ते पैसे फेकून उदयोग विकत तर घेतात मात्र माणसांची मने जिंकणे अजून जमत नाहीये असे दिसतेय.
बेस्टचा वीज वितरणाचा ताबा रिलायन्स एनर्जीकडे गेल्यावर आम्हीही बराच (निरर्थक) त्रागा केल्याचे स्मरते. असो.

मी ही तुमच्यासारखाच निश्चय केला होता पण जेव्हा मला वायरलेस इंटरनेट घ्यायचे होते तेव्हा मी प्रथम टाटा सेवाकेंद्राकडे गेलो. त्यांनी कनेक्शन चालू होण्यास चार दिवस लागतील असे सांगीतले. रिलायन्सने मात्र दोन तासांत चालू करुन दिले. सेवा ही अजूनपर्यंत ठिक वाटतेय.

टाटा सेवाकेंद्राने सांगीतलेला वेळ मला खालील कारणांमुळे योग्य वाटला.
१. घरी येऊन पत्त्याची खातरजमा करणे (पोस्टपेड कनेक्शन).
२. नेटवर्कची तपासणी करणे. जर तुम्ही राहता तेथे नेटवर्क नसेल तर ते कनेक्शन तुम्ही नाकारु शकता.

रिलायन्सने अशी काहीही कारणे दिली नाहीत तरीही मी घाई असल्याने त्यांचे प्रॉडक्ट विकत घेतेले. मात्र टाटा सेवांबद्दल अनुभव न घेताही एक प्रकारचा आदर वाटतो. कारण मात्र देता येत नाही. हाच प्रसंग जर उलटा घडला असता तर मी रिलायन्सला शिव्या (मनातल्या मनात तरी) घातल्याच नसत्या याची खात्री देता येत नाही.

वेळ

मला एमटीएनएलने ब्रॉडबॅण्ड कनेक्शन दीड तासात दिले. अर्थात माझ्याकडे आधीची लॅण्डलाईन असल्याने पत्त्याचा प्रश्न नव्हता.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

रिलायन्स ब्रॉडबँड

ही फालतू 'विका-विका' कंपनी आहे. नंतर सर्व्हिसच्या नावाने शंख आहे.
मला तरी अत्यंत वाईट अनुभव आहे.'अनिल रिलायन्स' चे कोणतेही सेवा/उत्पादन घेऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे.
अनिल अंबानीच्या कंपन्या (ऍडॅग) त्याचे (आणि रिलायन्सचे) नाव खराब करत आहेत.
मुकेश अंबानीच्या कंपन्या त्यामानाने चांगल्या आहेत.

रिलायन्सबाबतीतला माझा अनुभव

अतिशय वाईट अनुभव आहे. त्यांची रिलायन्स हॅल्लो ही वायरलेस लँडलाईन (म्हणजे काय?) फोन सेवा व रिलायन्स ब्रॉडबँड ही सेवा मी घेतली होती. त्यापैकी रिलायन्स हॅल्लो ही लाईफटाईम इनकमिंग फ्री-मासिक भाडे नाही अशा स्वरुपाची आहे. व ब्रॉडबँड सेवा ही मान्सून ऑफर 350 रुपये अमर्यादित वापर अशी होती.

एकदा एका महिन्यात मला अनरीचेबल नंबर (बाबांनी 02133 एवढेच डायल केले होते व पुढचा नंबर डायरीत शोधत होते) वर 1 रुपया चार्ज लावल्याचे बिल आले. मी फोन करुन त्यांना विचारले की जर नंबर अनरीचेबल आहे तर त्याचे बिल कसे काय आले? मला थातुरमातुर उत्तरे दिली. मी एक रुपयासाठी त्यांच्या मागेच पडलो. पण काही उपयोग झाला नाही. नंतर वैतागून पुणे-सातारा रस्त्यावरील ग्राहक न्यायालयात हे बिल व रिलायन्स अनएथिकल प्रॅक्टिस करत असल्याचा अर्ज दिला. ग्राहक न्यायालयाने सुधारित अर्ज पाठवून पुन्हा भरुन देण्यास सांगितले व सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. (तशीच एक प्रत रिलायन्सला पाठवल्याचे त्यांनी कळवले)
मी सुधारित अर्ज भरुन पाठवला परंतु काही कारणास्तव सुनावणीसाठी उपस्थित राहता आले नाही. पुढच्या महिन्याच्या बिलात 1 रुपया रिफंड झाला. :-)

नंतरच्या महिन्यात रिलायन्सच्या काही केबला चोरीला गेल्याने सुमारे 14 दिवस इंटरनेट बंद होते. अनेकदा तक्रार केली पण उपयोग नाही. मला नेहमीप्रमाणे महिन्याचे 350 रुपयाचे बिल आले. मी फोन करुन त्यांना सांगितले की मला 16 दिवसच इंटरनेट वापरायला मिळाले तेवढेच मी भरणार बाकीचे पैसे भरणार नाही व वरील अनुभवाचा रेफरन्स दिला. पुढच्या महिन्याच 14 दिवसांचे बिल रद्द केल्याचे पत्र आले. :-)

पण या एकंदर प्रकारात फारच शक्ती खर्च होत असल्याने कंटाळून एअरटेलचे इंटरनेट घेतले. माझा वापर लक्षात घेता सोयीस्कर प्लान घेणे बरेच खर्चिक आहे. पण एकदाही अडचण आली नाही. (इन्स्टॉलेशन करायला आलेला मुलगा लिनक्स बघून भांबावला होता. त्याच्या सीडीमधली exe फाईल का उघडत नाही हेच त्याला समजत नव्हते. :-) मी थोडावेळ त्याची गंमत बघून डीएनएस वगैरे माहिती घेतली व माझे मीच कॉन्फिगर केले. काही दिवसांनी एअरटेलचे डीएनएस गंडलेले आहे हे लक्षात आल्यापासून ओपनडीएनएस वापरत आहे.)

मथितार्थ असा की रिलायन्सच्या सेवा भंगार आहेत. वापरु नका.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान

ग्राहक न्यायालयात गेल्याबद्दल (आणि जिंकल्याबद्दल) अभिनंदन.

जिंकलो असे म्हणता येणार नाही

मी सुनावणीसाठी उपस्थित राहू न शकल्याने तो खटला तिथेच संपुष्टात आला असावा. मात्र माझ्या चिवटपणामुळे रिलायन्सने 1 रुपया परत केला असावा. सुनावणीसाठी उपस्थित राहिल्यानंतर कदाचित मला मानसिक त्रास व खटल्याच्या खर्चाबद्दल भरपाई मिळू शकली असती. ग्राहक न्यायालयात अनएथिकल प्रॅक्टिस सिद्ध झाल्यास रिलायन्सला मोठा दंडही होऊ शकला असता व ग्राहकवर्गाला त्याचा व्यापक फायदा होऊ शकला असता, असे मागे पाहून वाटते.

घटना घडून गेल्यानंतर ग्राहक न्यायालयात विशिष्ट मुदतीतच तक्रार करता येत असल्याने आता पुन्हा ते प्रकरण उकरुन काढता येणार नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आदर

>>मला भेटलेल्या अनेक मंडळींना रिलायन्सबद्दल राग आहे. टाटांबद्दल आदर आहे.

मला टाटांबद्दल पूर्वी आदर होता. पण सिंगूर नॅनो प्रकरणापासून तो नष्ट झाला. त्याकाळी बंगाल सरकार आणि टाटा मोटर्स याम्च्यातील कराराची काही कलमे वाचायला मिळाली. ती पाहून माझा असा समज झाला की मध्यमवर्गीयांना परवडेल अशी कार बनवण्याचे स्वप्न (१ लाखात) टाटा पुरे करीत नसून बंगाल सरकार करीत आहे.

दुसरे म्हणजे त्या प्रकरणात टाटांचे वागणे धक्कादायक होते. जेव्हा तो वाद चालू होता तेव्हा टाटा त्या वादाशी 'त्यांचा' काही संबंध नाही अशा रीतीने मौन बाळगून होते. जणू तो प्रश्न बंगाल सरकारने सोडवून जमीन मोकळी करून टाटांना द्यायची आहे. संपूर्ण वादात टाटांकडून कोणत्याही प्रकारची 'ऑफर' आली नाही. (वाद एकूण जमिनीपैकी काही भागाचा होता. तेव्हा कारखान्याचा लेआउट थोडा बदलून/पर्यायी जमीन मिळवून प्रश्न सुटू शकला असता). प्रकल्प बाहेर नेण्याची धमकी मात्र वेळोवेळी आली.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

टाटाचे काय चुकले?

त्याकाळी बंगाल सरकार आणि टाटा मोटर्स याम्च्यातील कराराची काही कलमे वाचायला मिळाली.

-सरकारांनी कोणत्या अटी मान्य करून राज्यात आर्थिक गुंतवणूक करून घ्यायची हे त्यांचे त्यांनी ठरवायचे आहे.
शेवटी 'गरज' कोणाची हा महत्त्वाचा निकष आहे.

जेव्हा तो वाद चालू होता तेव्हा टाटा त्या वादाशी 'त्यांचा' काही संबंध नाही अशा रीतीने मौन बाळगून होते. जणू तो प्रश्न बंगाल सरकारने सोडवून जमीन मोकळी करून टाटांना द्यायची आहे.

- कोणतीही कंपनी सरकारने देऊ केलेल्या जमिनीवर जेव्हा आपला प्रकल्प उभा करते तेव्हा ती जमीन शेवटी 'सरकारने' त्यांना दिलेली असते.सरकारने ती जमीन जनतेकडून कशी घेतली याचा कंपनीशी काहीच संबंध नसतो. 'सरकारने' टाटा कंपनीला काही बदल सुचवले असते तर ते करायचे की नाही ते टाटाने ठरवावे. पण आपण होऊन सरकार-जनता वादात पडून 'आ बैल मुझे मार' हा पवित्रा कोणताही भांडवलदार घेणार नाही.
(टाटांनी जी समाजकार्ये केली आहेत ती थेट आहेत. टीआयएफार,विविध अभ्यासक्रमांसाठी देणग्या, एन्सीपीए, एन्जीओ, इस्पितळे इ. त्यांनी त्याचा उदोउदो केलेला दिसत नाही.)

:)

मुळात टाटांनी पश्चिम बंगाल मध्ये नॅनो सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कारखान्यासाठी जाण्याचे धाडस् केलेच कसे हा एक मोठा मुद्दा आहेच.

आपण होऊन सरकार-जनता वादात पडून 'आ बैल मुझे मार' हा पवित्रा कोणताही भांडवलदार घेणार नाही.

पुर्णपणे सहमत...

कदाचित अनेक पिढ्यांचा टाटा उद्योग समूह आणि दोनच पिढ्यांचा अंबानी कुटुंबींचा उद्योग या तुलनेवर लोकांचा पिढ्यांवर आणि स्वानुभवावर जास्त विश्वास आहे. याच सोबत खास करुन चारचाक्या घेताना टाटा नको, बाकी कोणतीही घेईन असा विचार असलेले अनेक लोकं पाहिले आहेत. असो.






टाटा इंडिकॉम

रिलायन्सच्या तुलनेत टाटा इंडिकॉमचा त्रास फार कमी झाला. पण आमच्या बिल्डरने एअरटेल व रिलायन्सबरोबर साटेलोटे केल्याने मी त्यांच्या वायर्ड सर्विसच्या सेवाक्षेत्राच्या कक्षेत येत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बालिशपणा

प्रत्येकाच्या मनात सेवा देणार्‍या लोकांच्याबद्दल काहीतरी प्रतवारी असते. आपण त्याबरहुकूम कोणतीतरी एक कंपनी सिलेक्ट करतो. पण दुसर्‍या कंपनीबद्दल मनात राग ठेवणे हा एक प्रकारचा बालिशपणा आहे असे वाटते.
चन्द्रशेखर

गूगल

गूगलचे काय? आंतरजालावर गूगलची जवळपास अशीच स्थिती आहे. मग गूगलची सर्व उत्पादने वापरणे बंद करावे काय?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

चोर

चोर!! चोर!!!
चोरला.. माझा प्रतिसाद चोरण्यात आला आहे.. थांब गुगलून तुझ्या घरचा पत्ता शोधून माझा प्रतिसाद घेऊन जातो ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

गूगल

आंतरजालावर गूगलची जवळपास अशीच स्थिती आहे. हे मान्य. मात्र त्याचा मोनोपलीचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर आर्थिक परिणाम होईल असे अजूनतरी वाटत नाही.

मग गूगलची सर्व उत्पादने वापरणे बंद करावे काय?
याचे उत्तर नाही असेच आहे. मात्र जर गुगल आपल्या उत्पादनांच्या वापरासाठी प्रत्येकवेळी माझ्या खिशात हात घालायला लागला तर मात्र नक्कीच. मात्र त्यांचे उत्पन्न मिळविण्याचे अभिनव मार्ग पाह्ता थेट खिशाला हात घालायची शक्यता फार कमी वाटते.

मी उल्ले़ख केलेल्या जवळपास प्रत्येक उत्पादनासाठी मला खिशाचा सल्ला घ्यावा लागतो.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

या टाटा , बिर्ला , किर्लोस्करांनी आणि इतर खाजगी उद्योजकांनी ...

भारत स्वतंत्र झाल्या नंतर आपण साधी सुई सुद्धा स्वदेशी बनवू शकत नव्हतो. या टाटा , बिर्ला , किर्लोस्करांनी आणि इतर खाजगी उद्योजकांनी भारतीयास लागणारी प्रत्येक वस्तू भारतात सुई पासून विमान पर्यंत स्वदेशी तंत्रज्ञान वापरून भारतात बनवली. आज राजकारणी महासत्ता बनण्याच्या ज्या गप्पा मारतात त्या करता यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. या कंपन्यांचे राज्य जर भारतात आले तर भारत नक्कीच महासत्ता बनेल. राजकारण्यांनी देश खड्ड्यत घालण्या पेक्षा या कंपन्यांनी बांधलेले रस्ते भारतास नक्कीच विकासा कडे नेतील. अंबानी यांनी भ्रष्ट्राचाराचा आसरा घेवून उद्योग वाढवला त्यांच्या बद्दल असूया बाळगण्या पेक्षा त्यांच्या मुळे आज आपण १ पैसा सेकंद इतक्या कमी दरात फोन वर बोलू शकतो आपण त्यांची सेवा वापरत नाही अशी शेखी मिरवण्यात मतलब नाही. तुम्ही जो टूथब्रश वापरता त्याचा कच्चा माल अंबानी चा असतो. तुम्ही सुद्धा कंपनी काढा भारतात तुम्हाला कोणी रोकणार नाही फक्त इतरान बद्दल मत्सर बाळगण्या ची मध्यम वर्गीय सदाशिव पेठी वृत्ती सोडा.

काहीतरीच

लाल रंगाच्या वाक्यांना योग्य जागी मारले आहे.

स्वातंत्र्याच्या काळी आपण सुईसुद्धा स्वदेशी बनवू शकत नव्हतो हे विधान अतिशयोक्त आहे.

>>या टाटा , बिर्ला , किर्लोस्करांनी आणि इतर खाजगी उद्योजकांनी भारतीयास लागणारी प्रत्येक वस्तू भारतात सुई पासून विमान पर्यंत स्वदेशी तंत्रज्ञान वापरून भारतात बनवली.

हे अगदी भंपक विधान आहे. यातील स्वदेशी तंत्रज्ञान ही निव्वळ लोणकढी आहे. यांच्या प्रत्येक कंपनीने परदेशी कंपन्यांशी टेक्निकल कोलॅबोरेशन केली होती आणि तंत्रज्ञान परदेशातून विकत घेतले होते. बिर्लांच्या अम्बेसेडरचे तंत्रज्ञान त्यांनी ६० च्या दशकात जनरल मोटर्स कडून आणले आणि त्यात स्वतःची कोणतीही भर (अजूनही) घातली नाही. वेळोवेळी कॉण्टेसा वगैरे नवी वाहने आणली ती सुद्धा पुन्हा कोलॅबोरेशननेच. बहुतेक उद्योजकांची हीच गत आहे. करसवलती मिळवण्यासाठी आपल्या कंपन्यांत R & D खाती उघडली पण तेथे कोणतेही सिग्निफिकंट काम होत नव्हते. म्हणूनच उदारीकरणाचा जमाना येताच यांचे धाबे दणाणले. आणि बॉम्बे क्लब स्थापन करून सरकार कडे लॉबिंग करायची वेळ आली.

जुन्या जमान्यात या कंपन्यांशी/उत्पादनांशी या उद्योजकांची नावे जोडली गेली तीही सरकारी कृपेनेच. कारण विदेशी कंपन्यांना येथे व्यवसाय करायचा असेल तर देशी भागीदार घेणे सरकारने सक्तीचे केले होते.

भारतीय उद्योगाने कुठले नवे उत्पादन निर्माण केले असे उदाहरण जवळजवळ नाहीच.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात खरोखर काही संशोधन विकास झाला असेल तर तो सरकारी क्षेत्रातच (इस्रो, डिआरडीओ, कृषी विद्यापीठे, बीएआरसी वगैरे) झाला.

आताच्या जमान्यात हे उद्योगपती खरेतर फक्त इन्वेस्टर बनले आहेत.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

भारतीय उद्योगाची नवी उत्पादने

भारतीय उद्योगाने कुठले नवे उत्पादन निर्माण केले असे उदाहरण जवळजवळ नाहीच.
थत्ते साहेब टाटांची नॅनो गाडी कोणत्या परदेशी उत्पादकांनी बनवली आहे हे संगू शकाल का? इ न्फोसिसचे कोअर बॅ न्किंग सोफ़्टवेअर कोणत्या परदेशी कंपनीने बनवले आहे? महिन्द्राच्या एस.यू.व्ही. गाड्या कोणते परदेशी उत्पादक बनवतात?
चन्द्रशेखर

जवळजवळ नाही.

इंडिका आणि नॅनो मला मान्य आहे. म्हणूनच जवळजवळ नाही असे विधान केले होते.
महिंद्र बनवत असलेल्या एस् यू व्ही ही नवी उत्पादने नाहीत. जुन्याच जीपवर थोडेफार फरक केलेली उत्पादने आहेत. तसे मग तुम्ही बजाजच्या दर ३-४ महिन्यांनी येणार्‍या दुचाकीच्या नव्या मॉडेलला नवे उत्पादन म्हणणार का?

इन्फोसिस चे बँकिंग सॉफ्टवेअर मला उत्पादन म्हणून अभिप्रेत नाही. आयटी सेक्टरमध्ये नवीन तंत्रज्ञान जसे नवी ऑपरेटिव्ह सिस्टिम, नवीन प्रोसेसर, नवीन प्रकारच्या प्रिंटरचे तंत्रज्ञान, नवीन प्रकारचे डेटाबेस तंत्रज्ञान असे काही केले तर मी नवे उत्पादन म्हणेन.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

महिंद्र बनवत असलेल्या एस् यू व्ही ही नवी उत्पादने नाहीत

महिंद्र बनवत असलेल्या एस् यू व्ही ही नवी उत्पादने नाहीत
आपण आपल्या ओळखीच्या जाणकार ऍटोमोबिल इंजिनीयर कडून या नवीन वाहनांबद्दल चांगली माहिती करून घ्यावी हे योग्य ठरेल.

चन्द्रशेखर

माहिती

>>आपण आपल्या ओळखीच्या जाणकार ऍटोमोबिल इंजिनीयर कडून या नवीन वाहनांबद्दल चांगली माहिती करून घ्यावी हे योग्य ठरेल.

मेकॅनिकल इंजिनिअर नाही का चालणार?

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

और ये लगा सिक्सर!

लाल रंगातील अवतरणांशी सहमत!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा...

भारत स्वतंत्र झाल्या नंतर आपण साधी सुई सुद्धा स्वदेशी बनवू शकत नव्हतो. आणि टाटा , बिर्ला , किर्लोस्करांनी आणि इतर खाजगी उद्योजकांनी भारतीयास लागणारी प्रत्येक वस्तू भारतात सुई पासून विमान पर्यंत स्वदेशी तंत्रज्ञान वापरून भारतात बनवली. ही दोन्ही विधाने मला वाटते चुकीची आहेत.

या वाक्यांना काहीही आधार वाटत नाही. भारतात स्वातंत्र्याच्या पूर्वीच वेगवेगळे कारखाने अस्तित्वात होते. भारतात स्वदेशी आणि परदेशी मालावर बहिष्कार सुरु झाल्यावर ब्रिटीशांकडून कोणतीही मदत नाकारण्यात आली आणि टाटांच्या जमशेदपूर स्टील ऍंड आयर्न या कारखान्याचे भांडवलही भारतीय़ांनीच तीन महिन्यात गोळा केले होते आणि सरकारकडून आणि परदेशातूनही मदत घेण्याचे नाकारले असा स्पष्ट उल्लेख स्वातंत्र्याचा लढा या नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तकात आहे. या काळात मोठ्या जमीनदार आणि व्यापार्‍यांनी राजकीय पुढार्‍यांबरोबर बॅंका आणि विमा कंपन्या सुद्धा काढलेल्या होत्या. मद्रास प्रांतात तुतिकोरीनला चिदंबरम पिल्ले यांनी स्वदेशी जहाजवाहतूक कंपनी सुद्धा सुरु केलेली होती.

आणि शिवाय स्वातंत्र्यानंतर मुंबईच्या उद्योगपतींनी मुंबईचा भरपूर विकास करु, Mass Production करु असा बनवलेला प्लॅन आणि त्याला गांधीजींनी दिलेले I believe in production by masses हे उत्तर, हा प्रसंग भारतातच घडलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी भारतात उद्योगधंदे नव्हते यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते.

दुसरे वाक्यही असेच कैच्याकैच आहे. टाटांच्या व्हिस्टा, मारुती स्विफ्ट आणि पालिओचे इंजिन एकच आहे. मांझाचे, फियाट लिनियाचे, मारुती स्विफ्ट डिझायरचे इंजिन एकच आहे आणि ते माझ्यामते फियाट कंपनीचेच आहे. पूर्ण डिझेल इंजिनच जर परदेशी कंपनीचे असेल तर गाडी स्वदेशी कशी म्हणता येईल? हीच गोष्ट भारताच्या हलक्या लढाऊ विमानाची, तेजसची आहे. हे विमान पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे का? कारण याचे इंजिन General Electric F404 परदेशी आहे असे बातमीत वाचल्याचे आठवत आहे. नंतर याला कावेरी हे इंजिन बसवणार असेही वाचले.

बनावटीचे म्हणजे काय? भारतात फक्त जोडणी करुन बनवलेले भारतीय होते का? पूर्ण भारतीय असा उल्लेख का करत नाहीत? स्वदेशी बनावटीचे यात काहीतरी बनावट असल्यासारखे वाटू लागले आहे.

==================

+

थोडी सुधारणा

दुसरे वाक्यही असेच कैच्याकैच आहे. टाटांच्या व्हिस्टा, मारुती स्विफ्ट आणि पालिओचे इंजिन एकच आहे. मांझाचे, फियाट लिनियाचे, मारुती स्विफ्ट डिझायरचे इंजिन एकच आहे आणि ते माझ्यामते फियाट कंपनीचेच आहे. पूर्ण डिझेल इंजिनच जर परदेशी कंपनीचे असेल तर गाडी स्वदेशी कशी म्हणता येईल? हीच गोष्ट भारताच्या हलक्या लढाऊ विमानाची, तेजसची आहे. हे विमान पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे का? कारण याचे इंजिन General Electric F404 परदेशी आहे असे बातमीत वाचल्याचे आठवत आहे. नंतर याला कावेरी हे इंजिन बसवणार असेही वाचले

व्हिस्टा टिडीआय मध्ये फियाटचे नाही टाटांचेच डिझेल इंजिन आहे. सध्या टाटा आणि फियाट यांची निर्मिती एकेमेकांच्या कारखान्यात होते. फियाटची विक्री आणि विक्रीपश्चात सेवा टाटा कडूनच होते. मग काय कुठे कुठे असे मुद्दे काढणार?






उत्तम सेवा हा मुद्दा आहेच.

"विक्री पश्चात सेवा" हे टाटा ग्रुपने आपले ब्रीद मानले आहे त्याचा अनुभव ज्यांना आलेला आहे त्यांना अशा सेवेचे महत्व काय असते याची जाणीव नक्कीच असते. दुचाकीच्या दुनियेत आज भारतात "हीरो होंडा" ला समर्थ तोंड देणारा दुसरा कुणी प्रतिस्पर्धी (टाटा/रिलायन्स अजून दुचाकीच्या साम्राज्यात नसल्यामुळे असेल कदाचित) नसल्याने होंडावाल्यांना एक प्रकारची गुर्मी आली आहे तिचे प्रतिसाद विक्रिनंतरच्या सेवेत दिसते. शहरा-शहरात फरक असू शकेल मात्र बहुतांशी जागी तिथल्या सेवा केन्द्राचा मस्तवालपणा जाणवतोच.

मात्र काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या टाटाच्या साम्राज्यातील सेवेची वाखाणण्यासारखी स्थिती आहे.

नुकतेच घडलेले एक उदाहरण देतो >> माझ्याकडे "टाटा इंडिकॉम" चे कनेक्शन आहे, जे मला फोनवरून बुकिंग केल्यानंतर एकाच दिवसात मिळाले अन् दुसर्‍या दिवशी त्यांच्या प्रतिनिधीने आवश्यक ती कागदपत्रे माझ्याकडून घेतली होती. कनेक्शनची वा स्पीडची काही तक्रार नव्हती. मासिक बिलदेखील चेक कलेक्शन सेंटरतर्फे जात होते. सहा महिन्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे माझा चेक कलेक्शन सेंटरकडून टाटाच्या स्थानिक युनिटकडे गेला नाही (ज्याची मला कल्पना नव्हती). साहजिकच पुढील महिन्याचे जे बिल आले तीत "विलंब आकार म्हणून रु. २५/-" चा उल्लेख होता. ते बिल घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर "ड्यू डेट" नंतर चेक आल्याचे समजले. वास्तविक त्यात माझी काही चूक नव्हती, तसा खुलासादेखील केला. त्यावर तेथील प्रशासन विभागाने याबाबतीतील सत्य परिस्थिती तात्काळ त्या कलेक्शन सेंटरकडून समजावून घेतली आणि लागलीच जागेवरच तो २५ रुपयाचा विलंब आकार काढून टाकला. इतकेच नाही तर तीन दिवसानंतर मुंबईतील हेड ऑफिसकडून याबाबत मला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे जी.एम्.चे मेलदेखील आले.

बीएसएनएल् वा इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून अशी वागणूक कदापिही मिळत नाही. "पहिले पूर्ण बिल भरा, मग त्यातील चुका शोधायच्या का नाही ते पाहता येईल" असे ग्राहकाला तोडून टाकणारे उत्तर मिळते. मला वाटते अशा कारणासाठीदेखील टाटा, रिलायन्स वा तत्सम ब्रँण्ड्स लोकांना हवेहवेसे वाटत आहेत.

रिलायन्स...

रिलायन्सची ब्रॉडबँड सेवा भयंकर आहे. मला आणि आमच्या इमारतीतील अनेकांना असे अनुभव आलेले आहेत. कित्येक दिवस इंटरनेट बंद पडलेले असे. त्याचा काळ लक्षात ठेवून आम्ही तक्रार केल्यावर पैसे कमी केले जात पण दुरुस्तीला बराच वेळ लागत असे. महिन्यातले १०,१२ दिवस असेच जात. शेवटी कंटाळून आम्ही ते बंद केलं तर आम्हाला २२०० रुपयांचे बिल पाठवले. मुळात अमर्यादित वापराची महिना ४५० ची योजना असताना २२०० बिल त्यांनी कसे पाठवले हे कळलेच नाही. आम्ही ते बिल भरले नाही. नंतर कित्येक दिवस ते बिल भरा म्हणून फोन येत होते. सांगून सांगून आम्ही कंटाळलो. तरी भरले नाहीच. नंतर कायदेशीर नोटीस आली तरी ते बिल भरले नाही. नोटीस फेकून दिली. रिलायन्सचे लोक येऊन फक्त मोडेम घेऊन गेले. गच्चीवरुन घरात आलेली वायर अजून तशीच आहे.
यानंतर घेतलेले बीएसएनएलचे इंटरनेट मात्र अतिशय उत्तम चालले आहे. अगदीच क्वचित बंद पडले तर केवळ दहा पंधरा मिनिटांसाठी ते बंद पडते आणि तक्रार करायच्या आतच चालू झालेले असते. शिवाय तुमचा घरचा फोन देखील बीएसएनएलचा असेल तर तुम्हाला त्याचे मासिक भाडे माफ होते आणि सरकारी कर्मचार्‍यांना २० टक्के सवलत आहे. सध्या आम्हाला अमर्यादित ५१२ वेग आणि फोन वापरुनही महिना ८५० च्या आसपास बिल येते जे माझ्या मते परवडण्याजोगे आहे.

कंपन्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर उगाच भावनिकता दाखवू नये असे माझे मत आहे. जिकडे चांगली सेवा मिळते ती उत्पादने वापरावीत. कुठलीही सेवा नीट मिळाली नाही तर त्याबाबत तक्रार करणे, पैसे कमी केले जावेत म्हणून आग्रह धरणे हे प्रत्येक ग्राहकाने केलेच पाहिजे. तक्रार करणे महत्त्वाचे आहे. माझ्या ओळखीतले कित्येक जण आहेत जे इंटरनेट, फोन बंद पडला तरी वेळीच तक्रार करत नाहीत, पैसे कमी करुन घेत नाहीत.
फोन कंपन्यांनी सुद्धा विनाकारण न मागता नको असलेली सेवा माथी मारली तरी तक्रार करावी. बिलच भरत नाही असे सांगितल्यावर बर्‍याचदा सगळे सरळ येतात असा अनुभव आहे. पोस्टपेडच्या जोडणीचा असा फायदा होऊ शकतो.

-सौरभ.

==================

+

अगदी असाच नव्हे हाच अनुभव

अगदी असाच नव्हे तर हाच अनुभव रिलायन्स ब्रॉडबँड बाबतीत मला आला आहे.मला तर वाटते लोकांकडून खोटी बिले उकळून रिलायन्स कम्युनिकेशन्स ही कंपनी चालत आहे.
बीएसएनएलचा अनुभव अत्यंत उत्तम आहे.

नंतर कायदेशीर नोटीस आली तरी ते बिल भरले नाही. नोटीस फेकून दिली.

मी मात्र नोटिशीनंतर ते बिल भरले. माझी काही चूक नसताना मला मनस्ताप आणि आर्थिक भुर्डंड सहन करावा लागला.

मी जाहीर आवाहन करतो की -
रिलायन्स कम्युनिकेशन्स (ऍडॅग) या कंपनीचे फोन,मोबाईल्स, ब्रॉडबँड अथवा वायरलेस इंटरनेट कोणीही घेऊ नयेत. ती कंपनी चोर आहे.
हसू नका.पाहिजे असेल तर अनुभव घ्या.

बिल भरले ही चूक केली.

तुम्ही बिल भरले ही चूक केली. customercare@relianceada.com वर खालील भाषेत लिखित तक्रार करायची. मी हे टेम्प्लेट जपून ठेवले आहे. सुदैवाने मला ते पुन्हा वापरावे लागले नाही.

I want to register 2 complaints regarding your customer help line. Let me put it straight. It is HORRIBLE.

First Experience

1. Today I called up your number *333 for providing information of the complaint regarding my Reliance Hello Phone. The concerned person told me to call *377.

I called up *377, he told me to call *333. Again I called up *333, I was told I have landed in the wrong department, and the correct number is *377.

I talked with following people in sequence.

1.Prosenjit
2.Shailesh
3.Vishwanat
4.Deepak

My telephone number is 020-********

Last week when I called up your number the person kept me on hold for 20 minutes and then he disconnected.

At least show some responsibility and take my complaint from email now. I don't have any more patience to bear with your phone help line. I have attached my bill of September. In this bill, I have been charged Rs. 1.20 for a number for which call can not get through. The number is 02133.

Please check this and correct it in the next billing cycle.

Also please turn off my itemized billing.

2. Second experience.

I am not able to access my broadnet since last Saturday. My brodnet user a/c id is ********493.
I was told that the service person will come on Sunday 12.00 noon. When I reminded again, I was told he will come around 2.00 pm. Still no one cared to call me or get in touch with me. Today is tuesday, when I enquired today, the call center person is not sure when the problem will be rectified.

Your irresponsible and arrogant phone help line agents are a torture to the customer and it shows your sheer disrespect to the customer.

When other competitors are providing best in class services, I don't see any reason to continue with Reliance services.


This is regarding the continuation of my same complaint mentioned below. (i.e. Second experience)

Since my broadnet was not working, I registered a complaint (SR-57008113) to make it working. Nobody cared to contact me for a week, so I requested for disconnection (termination) of my internet facility. (SR-57330861). My broadnet account Id was ********493.

Nobody cared to take note of that request ALSO. Now I have received my bill for internet for subsequent month. That obviously I am not going to pay.

But your horrible recovery agents are calling me daily and even daring to visit my home when I am not available at home. This is a sheer harrasment and torture to me and my family. Please stop this, else I will not have any other option but to lodge a police complaint informing the same. Ask your agent to meet me instead of visiting my home, when I am not there.

I hope you are aware of recent incidences of a bank getting heavily fined due to misbehavior of recovery agents.

I hope you will take affirmative action in this regard.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

.

घ्याल तर फसाल, न घ्याल तर हसाल.

चूक झाली हे खरे! पण हीच त्यांची 'बिझनेस स्ट्रॅटेजी' आहे.
तुम्ही पाठवलेल्या या किंवा अशा अनेक ईमेल पठवूनही त्याला साधी पोचही मिळाली नाही.
घरी रिकव्हरी एजंट येतात ही गोष्टच अत्यंत अपमानास्पद आहे.
"मला रिलायन्स टेलेने फसवले आहे.सबब हे रिकव्हरी एजंट चोर असून..."असे स्टिकर कपाळावर लावून फिरावे की काय?
पोलिस? तक्रार? म्हणजे आणखीच बदनामी!

इतकेच काय? कंझ्युमर कोर्टात दावा करून त्याचा पाठपुरावा करायला जो खर्च येतो (आणि वेळ जातो ) त्यापेक्षा २००० रुपये भरलेले परवडले
असे वाटते.

मध्यमवर्गीय, आत्मसन्मान जपणार्‍या व्यक्तीची हे दुबळे बिंदू लक्षात घेऊनच हा दांडगावा चालला आहे.
म्हणून 'अनिल रिलायन्स'चे नावही काढले की तळपायाची आग मस्तकाला जाते.
पुन्हा एकदा -
तुम्ही जर मध्यमवर्गीय, आत्मसन्मान जपणारी व्यक्ती असाल तर अनिल अंबानीच्या 'एए' चिन्हांकित निळ्या रिलायन्सच्या
(ऍडॅगच्या) कोणत्याही सेवा अथवा उत्पादने वापरू नका.
घ्याल तर फसाल, न घ्याल तर हसाल.

बिल अपना प्रीत पराई.....

विसुनाना, तुम्ही ते बिल भरायला नको होते. आपली काही चूक नसताना आपण त्यांचे काहीच देणे लागत नाही. कायदेशीर नोटीस आली तरी काही होत नाही. या कंपन्यांना असे जर खटले लढायचे झाले तर तेच एक काम करत बसावे लागेल. मध्यंतरी माझ्या वडिलांनी, ते कामानिमित्त जुन्नर, भीमाशंकर भागात जातात तिकडे एअरटेलची रेंज मिळत नसल्याने तो फोन बंद करुन बीएसएनएल घेतला. तेव्हा फोन बंद केल्यावरही एअरटेलची बिले येणे चालूच होते. कित्येक वेळा फोन आले, आम्ही त्यांना समजावून सांगितले की फोनच वापरत नाहीये. त्यांनीही मग कायदेशीर नोटीस पाठवली. तिलाही मग आम्ही केराची टोपली दाखवली. त्यानंतर आजतागायत काहीही झालेले नाही.

भारतात फोन आणि इंटरनेट (काही काळाने डीटीएचही...) यांच्या बाबतीत सगळीकडे अशीच बोंब आहे. चांगल्यात चांगला निवडण्यापेक्षा अनेक वाईटांमध्ये कमीत कमी वाईट जो आहे त्याची सेवा घेणे एवढेच हातात आहे.

-सौरभ

==================

+

माझी 'केस'

मुंबई वोडाफोनने 'विशिष्ट रकमेहून अधिक रकमेचे प्रीपेड कार्ड घेतले तर प्रति मिनिट दरात विशिष्ट सवलत' अशी जाहिरात दिली होती. सामान्य समज वापरल्यास, केवळ एक महिन्याच्या मुदतीत संपणार्‍या कार्डांसाठीच अशी सवलत देणे त्यांना परवडणारे होते. परंतु तेथे एका अशा कार्डाचाही उल्लेख होता ज्याची मुदत एक वर्ष होती. (कदाचित) मुद्रणदोषामुळे 'सवलतींवर अटी लागू' अशी चांदणी नव्हती. मी एक वर्ष मुदतीचा, २००० रुपयांचा रिफिल केला आणि रजिस्टर्ड पत्राने त्या सवलतीची मागणी केली. त्यांना स्वत:हून परिस्थितीचे गांभीर्य समजले आणि ४०० रुपयांच्या अतिरिक्त टॉकटाईमच्या बदल्यात 'ग्राहक न्यायालयात जाणार नाही' असे तोंडी वचन (जे त्यांनी ध्वनिमुद्रित केले असेल) घेऊन त्यांनी प्रकरण मिटविले.

मी बंगलोर वोडाफोनला अर्ज दिला की क्ष तारखेपासून माझा पोस्टपेड क्रमांक बंद करा. क्ष+१० दहा दिवसांनी तो बंद झाला. शेवटचे १० दिवस मी मनसोक्त जीपीआरएस वापरले आणि 'तुरळक' कॉल केले. बिल आले तेव्हा सांगितले की क्ष तारखेपुढील वापराचे पैसे मी देणार नाही, तसे सुधारित बिल दिले नाही तर मी अख्खे बिलच बुडविणार! पाच महिने इमेल-इमेल खेळल्यावर ते दमले. बंगलोरचे घर भाड्याचे होते. घरमालकाकडे कायमचा पत्ता होता पण अजून (दहा महिन्यांनी) कोणी एजंट आलेला नाही. अर्थात माझ्या मुंबई वोडाफोन प्रीपेड मधून थोडेथोडे पैसे खणून त्यांनी हजार रुपयांची भरपाई करून घेतली असेल तर मला माहिती नाही.

सेवेचे महत्व

>>> कंपन्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर उगाच भावनिकता दाखवू नये असे माझे मत आहे. जिकडे चांगली सेवा मिळते ती उत्पादने वापरावीत. <<<

१००% सहमत. उगाच अमुक एक ब्रॅण्ड शंतनुराव किर्लोस्करांनी बनविला आहे म्हणून खरेदी करून वृथा महाराष्ट्राभिमान दाखविण्यात काही अर्थ नाही. शेवटी आम्ही ग्राहक म्हणून जो पैसा देतो तो खरेच "हार्ड अर्निंग मनी" असतो, त्यामुळे त्या बदल्यात वस्तू आणि सेवा याबाबत चिकित्सकपणा दाखविणे योग्यच आहे. "रिलायन्स पेट्रोल" पंपावरील सेवेचा अतिशय आनंददायक अनुभव होता. २०० रुपयाचे पेट्रोल "पॅशन"मध्ये भरा असे म्हटले की काटेकोरपणे २०० आकडा मशिनमध्ये येतच असे. गावातील ९९.९९% पेट्रोल पंपवरील अटेन्डंट १०० चे मागीतले तर ९९.६७ इथेच मीटर थांबवितो. वाद घालायला सुरू केले तर मागे लाईनमध्ये उभे असलेले आमचेच बंधू (आणि भगिनीसुद्धा ~~ विशेषतः रिक्षावाले) "अहो, जाऊ दे. कशाला ३० पैशासाठी वाद घालताय्?" असले प्रवचन सुरू करतात. इथे प्रश्न ३० पैशाचा नसून या अटेन्डंट मंडळीच्या खाबूगिरी सवयीचा आहे आणि तेथील सेवेच्या दर्जेचा असतो हे आमच्याच लोकांना कळत नाही हे दुर्दैव !

नवे तंत्रज्ञान

सर्वच पेट्रोल कंपन्यांच्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित पंपावर आपल्याला हव्या असलेल्या किमतीचे इंधन अगोदरच किंमत फीड करून भरले जाते. अगदी दहा मिलीपर्यंत काटेकोर असते.
इतकेच काय "साहेब, झिरो बघा" असेही भरण्याअगोदर सांगितले जाते.
तात्पर्य, जुनाट पंपावर पेट्रोल भरणे टाळावे.
(शिवाय 'अटेंडंटची खाबुगिरी' समजली नाही. जितके पेट्रोल भरले तितके पैसे त्याला मालकाला द्यावे लागत असणार. अर्थात मालकाच्या संगनमताने त्याचा काही 'कट' असेल तर दोष पंपमालकाचाही आहे.)

अटेंडंट गोम

>>> सर्वच पेट्रोल कंपन्यांच्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित पंपावर आपल्याला हव्या असलेल्या किमतीचे इंधन अगोदरच किंमत फीड करून भरले जाते. <<<

नाही, बिलकुल नाही >
कोल्हापूरातील पेट्रोल संचालक आईन्स्टाईनच्या बापाचे बारसे जेवलेले आहेत. त्यांना "नव्या तंत्रज्ञाना" ला काळोख कसा फासायचा ही विद्या चांगलीच माहिती आहे. "फीडर लावून पेट्रोल सोडा" असे म्हटल्यावर "फीडर मोडलाय" असे सहज उत्तर मिळते. इथे किमान एका पंपावर "इंधन अगोदरच किंमत फीड करून भरले जाते" अशी स्थिती दाखवा आणि हजार रूपये मिळवा असे म्हटले जाते. ("झीरो बघा" हे बरोबर आहे, इथेही सांगितले जाते. प्रश्न झीरोचा नसून हिशोबाप्रमाणे मागितलेल्या लीटरचा अखेरचा थेंब गाडीच्या टाकीत येत नाही याबाबत आहे.)

>>>(शिवाय 'अटेंडंटची खाबुगिरी' समजली नाही. जितके पेट्रोल भरले तितके पैसे त्याला मालकाला द्यावे लागत असणार.)<<<

इथेच खरी गोम आहे. समजा अटेंडंटला १००० लिटरचा कोटा दिला असेल तर तो नक्कीच पंपमालकाला रुपये ५० गुणिले १००० = रुपये ५०००० देणे क्रमप्राप्त आहे, तसे तो देतोही. पण प्रत्यक्षात त्याने लिटरमागे जी ३०-३५ पैशाची कमाई केलेली असते (ग्राहकाला कमी मिली सर्व्ह करून) तिच्याशी मालकाला काही घेणेदेणे नसते. म्हणजे १००० लिटर मागे त्याची (आणि त्याच्या साथिदारांची) दिवसाला ३०० रुपयांची "वरकड कमाई" होतेच होते. हा प्रकार फार बोकाळला आहे या भागात. स्थानिक शिवसेना शाखेने यावर आंदोलनही केले होते, त्यावेळी एक आठवडा सेवा ठीक झाली. पण लागलीच पुढील आठवड्यापासून येरे माझ्या मागल्या !

थोडीशी चावी मारतो.

चर्चा जोरात चालू आहे हे पाहून आनंद झाला मात्र ह्या ओघात मूळ मुद्याला बगल मिळून चर्चा दुसरीकडेच चालली आहे असे वाटतेय. मूळ मुद्दा हा की,
"काही कालाने आपण टाटा, रिलायन्सशिवाय जगू शकू काय ? ह्या स्वदेशी "ईस्ट इंडिया" कंपनीज तर होणार नाही ना !"

१. जगू शकतो ? तर का ?
२. नाही ? तर का ?
३. "ईस्ट इंडिया" कंपनीज होतील का ? हो तर कसे ?किंवा नाही तर कसे ?

धन्यवाद !

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

प्रश्न

चर्चा मुळ मुद्यावर आणल्या बद्दल अभिनंदन... मला काही मुलभुत प्रश्न आहेत.
ईस्ट इंडिया कंपनी आणि टाटा - रिलायन्स यांची तुलना कशा करता? तुलना करताना त्याला योग्य बैठक हवी. यांची तुलना कशी काय होऊ शकते बुवा?






प्रश्न

ईस्ट इंडिया कंपनी आणि टाटा - रिलायन्स यांची तुलना कशा करता? तुलना करताना त्याला योग्य बैठक हवी. यांची तुलना कशी काय होऊ शकते बुवा?

तुलना यासाठी की ईस्ट इंडिया कंपनी जशी व्यापारी म्हणून आली आणी एक एक संस्थान खालसा करीत राज्यकर्ती बनली.
टाटा - रिलायन्स यांचा भारतातील विविध व्यापारातील वाटा बघता ते उद्या (अप्रत्यक्श) राज्यकर्ते बनू शकतील काय ? असा प्रश्न आहे. (सध्याही काही प्रमाणात ते असावेत असे वाटते.) तुलना चुकीची वाटत असल्यास योग्य बदल सुचवावा. त्याचे स्वागतच होईल याची खात्री बाळगा.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

पैसा भारतातच राहील...

निदान रिलायन्स/टाटा यांच्यामुळे भारतात खर्चल्या जाणार्‍या पैशाचा बराचसा भाग भारतातच राहील. निदान फायदा तरी. कारण त्यांचे भागधारक बहुसंख्येने भारतीय आहेत.
ईस्ट इंडिया कंपनीने खूपच एकतर्फी व्यापार केला आणि क्रय-विक्रयात दोन्हीकडून होणारा फायदा तिकडेच गेला.

खरेतर जागतिकीकरणानंतर अमूक एक कंपनी पूर्णपणे भारतीय आहे असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. भारतात अजूनही बर्‍याच मूलभूत उत्पादनांची वानवा आहे. त्यामुळे जवळजवळ सर्व तथाकथित भारतीय कंपन्या परदेशी सुट्या भागांवर अवलंबून आहेत.

ब्रिटिश

ब्रिटिशांनी जगभर व्यापाराच्या नावाने राज्यकेले. हा मुद्दा पाहिल्यास उपरोक्त कंपन्या फायद्याचा विचार करतात शासनाचा नाही. भारताचे सरकार चालवणे, हे एखादा उद्योग चालवणे एवढे सोपे नक्कीच नाही. तसेच भारतीयांवर राज्य करणे हे फार चांगले स्वप्न नाही. येथे असलेली विषमता हाताळने हे भारतीयांना सुद्धा जमत नाही :)

ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले त्यांच्या कंपन्या टाटांनी विकत घेतल्या आहेत. वाटल्यास असे स्वप्न पहा कि टाटा/अंबानी येथे बसून युरोपाच्या बाजारपेठेवर राज्य करत आहेत.






 
^ वर