पुण्यातील पाणी कपात

पावसाच्या अवकृपेमुळे पुण्यावर आलेल्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड देण्याची चर्चा एव्हाना घरोघरी सुरु झाली असेल. त्यात आजकाल एका नव्या विषयाची भर पडली आहे- पाऊसपाणी संचयन.
असे ऐकीवात आहे की, पुण्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीवाहीन्यांतून जवळवास ३०% पाणी जमीनीत झिरपते. एव्हढे टीसीएम पाणी दरवर्षी पुणे शहराच्या जमीनीत मुरत असेल तर अजुन पाऊसपाणी संचयन करण्याची गरज आहे का?
पाणीवाहीन्या टाकतानांच जर त्यास आवश्यक तेव्हढी छीद्रे ठेवली तर पाणी मुरवण्याची सोय वर्षभर होऊ शकते, नाही का? मग हा पाऊसपाणी संचयनाचा हव्यास हवाच कशाला?

लेखनविषय: दुवे:

Comments

बापरे

अरे बापरे. म्हणजे गेले वर्षभर पाणी कपात नव्हती?

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

हॅहॅहॅ

पाणीवाहीन्या टाकतानांच जर त्यास आवश्यक तेव्हढी छीद्रे ठेवली तर पाणी मुरवण्याची सोय वर्षभर होऊ शकते

शाश्वत गति यंत्रांची आठवण होते.

उजनी धरणात अतिशुद्ध पाणी

नाहीतर काय हो! पावसाचे सगळेच पाणी पुण्यात मुरवत बसले तर उजनी धरणात जे अतिशुद्ध पाणी पुण्यातून जाते त्याचे काय होईल.

शाश्वत गती यंत्र

शब्द आवडला. परपेच्युअल मोशन मशीन साठी चांगला शब्द आहे. नक्कीच वापरेन.
पाण्याचे म्हणाल तर पुण्यनगरीतले पाप वाढल्यामुळे पाऊस पडत नसल्याचे काही बुजुर्गांचे मत आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वरुण यंत्र, वर्तमान पत्रे

वरुण यंत्राचा प्रयोग का केला जात नाहीये? त्यासाठी लागणारे ढग तर रोज आकाशात दिसत आहेत.
वर्तमान पत्रे देखील ह्याबाबत फार आढावा घेत नाहीयेत, फक्त पाउस होत नाही असे म्हणणे म्हणजे उत्तर नव्हे, मौसम विज्ञान विभागने देखील ह्यावर काही खास अशी माहिती दिली नाहीये.

जग्डव्याळ अर्थव्यवस्थेतील लोकांच्या मनोवृत्तीचे हसू येते.

जगात १०-११ व्या स्थानी भारतीय अर्थव्यवस्था आहे पण वरुणयंत्राच्या व्हेदर मॉडीफिकेशन करण्याचा खर्च जेव्हा तावातावाने चर्चीला जातो तेव्हा ह्या जग्डव्याळ अर्थव्यवस्थेतील लोकांच्या मनोवृत्तीचे हसू येते.

उधळपट्टी

पुण्यातील लोक पाण्याची उधळपट्टी करतात. त्यावर नियंत्रण पाहिजे.नळाचे पाणी गाड्या धुणे,बागेला पाणी घालणे अशा गोष्टीत वाया जाते.
प्रकाश घाटपांडे

दररोज अंघोळ

हॅहॅहॅ... प्रत्येकाने दररोज अंघोळ केलीच पाहिजे काय? कुटुंबात एका दिवशी एकानेच अंघोळ केली तर दररोज घरटी किमान १०० लिटर पाणी वाचेल.(हिशेब हवा असेल तर व्यनिने... ;) )
(बुट्टीचे संडास पुन्हा सुरू करावेत काय?)
ह.घ्या.

+१

सहमत. जियो विसुनाना. याला म्हणतात फीजिबल पर्याय ठेवणे.

शिवाय पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पुण्यात खूप कॉलेजे आहेत आनि त्यात खूप बाहेरगावचे विद्यार्थी हॉस्टेलांमधून राहतात. त्यांना रोज आंघोळ करणे कधीही आवश्यक वाटत नाही.
(या सगळ्या हॉस्टेलाईटस् मुलामुलींनी रोज आंघोळ करण्याचे + धुतलेले कपडे घालण्याचे मनावर घेतले तर पुण्याच्या पाणीपुरवठ्याची स्थिती काय होईल असा भयावह विचार मनात आला.?)

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

अल्गोरिदम

या सगळ्या हॉस्टेलाईटस् मुलामुलींनी रोज आंघोळ करण्याचे + धुतलेले कपडे घालण्याचे मनावर घेतले तर पुण्याच्या पाणीपुरवठ्याची स्थिती काय होईल असा भयावह विचार मनात आला.?)
आमच्या एका हॉस्टेलैट मित्राने यावर रिकर्सिव अल्गोरिदम काढला होता. रोज सकाळी तो कपाट उघडून त्यातील कमीत कमी मळलेला शर्ट घालत असे. रात्री आल्यावर तो शर्ट परत कपाटात. असे करून त्याला बरेच दिवस कपडे धुणे लांबणीवर टाकता येत असे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

कपाटात????

रात्री शर्ट कपाटात जात असे म्हणजे मुलगा फारच म्हणजे फाआआआआरच शिस्तीचा होता. =))

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

हम्म

अल्गोरिदम चालवण्यासाठी त्याने काही काळ शिस्त पाळल्याची दाट शक्यता आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

पुण्यातली पाणी कपात

पाणी कपात हा काय चर्चेचा विषय आहे का? पाऊस पडला नाही म्हणून धरणात पाणी नाही म्हणून पाणी कपात होणार आहे. त्यात विशेष काय आहे? पुण्यात रहाणार्‍या सर्वांना नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे क्रमप्राप्त आहे. त्यात चर्चा करण्यासारखे काहीच नाही.

चन्द्रशेखर

+१

पाऊस गेल्या वर्षीच कमी पडला होता. तरी वर्षभर कपात का नव्हती? हा चर्चेचा विषय होऊ शकेल.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

सगळीकडे

पाणी दिलखुलासपणे वापरणे हा प्रकार जगाच्या पाठीवर सगळीकडे दिसून येतो. ऍव्हरेज अमरू दररोज ९० ग्यालन पाणी वापरतो.

--

मला बरेच प्रश्न पडायला लागले आहेत...

'सामना' मध्ये मास्तर (श्रीराम लागू) वारंवार 'मारुती कांबळे कोण? त्याचं काय झालं?' हा प्रश्न विचारत असतो. त्या धर्तीवर मलाही बरेच प्रश्न पडायला लागले आहेत.

१) दोन वर्षापूर्वी ते ढगात सिल्व्हर आयोडाईड फवारण्याचे प्रयोग झाले होते? आता त्यांची चर्चा का होत नाही?
२) वरुणयंत्राचा प्रयोग का होत नाही?
३) वाजपेय यज्ञ केला की पाऊस पडतो म्हणतात. पुणे आणि महाराष्ट्रातील विद्वान ब्राह्मण असे यज्ञ गावोगावी का करत नाहीत?
४) एक दिवसाआड पाणी पुरवूनही समजा पंधरवडाभर पाऊस आलाच नाही तर काय करायचे? वेधशाळा, भोलानाथ नंदीबैल, चातक, पावसाचे कीडे, पंचांग, सहदेव भाडळी यापैकी कशावर विश्वास ठेवायचा?
५) उत्तर भारतातून पाण्याच्या वॅगन्स भरून रेल्वेगाड्या का मागवल्या जात नाहीत?
६) कर्नाटक व आंध्र प्रदेश ही शेजारी राज्ये पाण्यासाठी कायम हावरट असतात. महाराष्ट्रातील लोकांना कधी शहाणपण सुचणार?

कृपया पुढील मजकूर गंभीर वाचनाची आवड असणार्‍यांनी दुर्लक्षित करावा. टाईमपास करणार्‍यांचे हर्षभराने स्वागत...

आता काही उपशंका
१) आंघोळीपुरते पाणीही उपलब्ध न झाल्यास काय काय करता येईल?
२) पुण्यात पाणी नसल्याने आपल्याला इतर कोणत्या भागातील नातेवाईकांकडे पाहुणचारासाठी जाता येईल? मात्र 'उघड्याशेजारी नागडं गेलं आणि थंडीने काकडून मेलं', असं नको व्हायला.
३) अंगाला वास यायला लागल्यास चांगला डिओडरंट कुठला वापरावा?

उपशंकेचे उपनिराकरण

आंघोळीपुरते पाणीही उपलब्ध न झाल्यास काय काय करता येईल?

-हल्ली बाजारात (अल्कोहोलबेस्ड) अजल निर्जंतुकारकाच्या बाटल्या उपलब्ध असतात.त्या फक्त (तळ)हातापुरत्याच वापराव्या असे कुठे सांगितले आहे?
हा थोडा महागडा उपाय आहे, पण उपाय आहे.

विशेष सुचना

विशेष सुना आवडली ना.

वरुणयंत्राचा प्रयोग व पाण्याच्या वॅगन्स

वरुणयंत्राचा प्रयोग का होत नाही? काही बुद्धीमान लोक तो खर्च जास्त आहे व सरकार त्या पैशांची उधळपट्टी करत आहे अशी बोंब मारत बसतात. पाऊस पडून शेतकरी श्रींमंत झाले तर मते मिळनार नाहीत असेही वाटत असेल. लोकांना प्रश्नच उरले नाहीत तर ते मिंधे होणार नाहीत आणी मग कोणाच्याही ऐकण्यापलीकडे जातील असे वाटते.

उत्तर भारतातून पाण्याच्या वॅगन्स भरून रेल्वेगाड्या का मागवल्या जात नाहीत?

उत्तर वरुन नक्कल.

काही प्रश्न्

१. प्रयोगशाळेत पाणी तयार करण्याबद्दल काहि प्रयोग का होत नाहित?
२. पुण्यातील भामट्यांनी ह्या परिस्थितीचा आजून फायदा का घेतला नाही? "हवेतून पाणी तयार करून देतो असे सांगून लुबाडले" अशी बातमी ऐकिवात नाही.
३. युरोप मधील आर्थिक मंदी ह्यास जबाबदार नाही ह्याची काय शाश्वती?

हवेतून पाणी

२. पुण्यातील भामट्यांनी ह्या परिस्थितीचा आजून फायदा का घेतला नाही? "हवेतून पाणी तयार करून देतो असे सांगून लुबाडले" अशी बातमी ऐकिवात नाही.

माझ्या माहितीतला एक माणूस (बसमधे भेटायचा) याचीच विक्री करायचा. हवेतील आर्द्रता शोषून घेऊन पाणी तयार करता येते. समुद्रावर वा काही निर्जन ठिकाणी प्यायचे पाणी यामुळे स्वस्तात मिळते असा त्याचा दावा होता. काही ठिकाणी याची त्याने विक्री केली होती.

प्रमोद

वाह!!

वातावरणात जल/वायू/अग्नि/पृथ्वी/आकाश हे सगळे तत्व असतात, ह्या हिशोबाने तो भामटा/सदगृहस्थ कोट्याधीश झाला असणार :)

वातावरणातून पाणी

वातावरणातून पाणी काढण्याचा प्रयत्न माझ्यामते चुकीचा नाही. जिकडे आर्द्रता भरपूर असते तिकडे हे जास्त सहज शक्य आहे.
माझ्या माहितीचा माणूस भामटा नाही तर एक प्रामाणिक विक्रेता आहे. (हल्ली भेटत नाही. नाहीतर दुवा मागितला असता.)

प्रमोद

दूवा

अपमान करणे हा हेतू नव्हता, खेद आहे. माफी असावी.
हो कल्पना रम्य आहे, किवा अस्तित्वात पण आहे, खालील बातमी मध्ये असेच काही सांगितले आहे.

http://www.wired.com/science/discoveries/news/2006/10/71898

मनास पटत नाही हे खरे. पण मनाला जे पटते ते खरे असे पण नाही.

दुव्यावर द(ऊ)व(ए)

दुव्यावर द(ऊ)व(ए)

पाणीटंचाई सुरु झाल्यावर भामटे सक्रिय होतील...

गेल्या वर्षी मिनरल वॉटरचा २० लिटरचा कंटेनर आम्ही ७० रुपयांना विकत घेतला होता. सहा महिन्यांपूर्वी त्यासाठी १०० रुपये मोजले होते. आता पाणीटंचाई सुरु झाली तर किती रक्कम मोजावी लागेल हे आताच कसे सांगता येईल? पण पाऊस वेळेवर पडला नाही तर काही गोष्टी नक्की होणार.
१) टँकरसाठी मागेल तेवढे पैसे मोजावे लागणार.
२) बोअरवेल खणणार्‍यांचाही भाव वधारणार
३) पाऊस न पडल्याचे कारण सांगून भाज्यांचे भाव कडाडणार (श्रावणासारखा सणावारांचा महिना आणि त्यात कमावून घेण्याची संधी. कोण सोडणार?)

शुद्ध पाणी

हॅ हॅ हॅ.

आम्ही कुठचेही पाणी घेतो. त्यात क्लोरिवॅट किंवा तत्सम थेंब टाकून पाणी पितो. त्याने सहसा रोग होत नाही. अगदी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरचे पाणी घेतले तरी.
(असे पाणी अनेक वर्षे प्यायल्यावर कदाचित कुठलासा कॅन्सर/रोग होतही असेल पण खिश्याच्या क्षयापेक्षा तो बरा).

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

कृत्रिम पावसाचे विज्ञान उलगडणार

कृत्रिम पावसाचे विज्ञान उलगडणार
"या प्रयोगांमधून भारतासाठी कोणते तंत्र योग्य आहे, हे आम्ही तपासणार आहोत"

आजच्या सकाळमधे ह्या चर्चेतील सगळे मुद्दे चर्चेला घेतले आहेत.

आजच्या सकाळमधे ह्या चर्चेतील सगळे मुद्दे चर्चेला घेतले आहेत. मुख्य म्हणजे पाणी गळती जमीनीत झाली असती तर आतापर्यंत पुणे शहर तरंगले असते, जमीनी धसल्या असत्या हे ही कळले.

 
^ वर