एपिक ब्राउझर

काल बातमी वाचून 'भारताचा पहिला' असे सांगण्यात आलेला, एपिक ब्राउझर उतरवून घेतला, इंस्टॉल केला आणि वापरायला सुरुवात केली.
एपिक विषयी च्या काही गोष्टी पुढीलप्रमाणे:
१.http://http.cdnlayer.com/href/epic-setup.exe या थेट दुव्यावरून उतरवून घेता येईल.
२. फाफॉ वर आधारित आहे.
३. बिल्ट-इन ऍप्लिकेशन्स चिक्कार आहेत, जे खिडकीच्या एका बाजूला उघडतात. जसे की, फेसबूक, ऑर्कूट, जीमेल, याहू आणि इतर.
४. यात बिल्ट-इन विषाणू-रोधक आहे, जो सायटीही स्कॅन करतो आणि पाहिजे तर पूर्ण प्रणालीही.(कितपत प्रभावशाली आहे, माहिती नाही.)
५.सर्फिंग थोडे फास्टर आहे.(असे मला जाणवले)
६.सर्व प्रमूख भारतीय भाषा टंकीत करण्याची बिल्ट इन सोय.
७.भरपूर बिल्ट इन स्किन्स उपलब्ध आहेत.
८. फाफॉ वर आधारित असल्याने त्याचे सर्व ऍडऑन्स येथेही चालतात.
९.एका टिचकीवर खाजगी विदा नष्ट करण्याची सोय.(clear private data)
१०.बिल्ट इन वर्डप्रोसेसर

या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत. अजून वापरतो आहे. अजून काही कळल्यास सांगेनच!

लेखनविषय: दुवे:

Comments

एपिक ब्राउझर

वापरत आहे. आवडला ! बाकी नंतर !

फार जास्त सोयींनी त्रास होतो

एपिक मला आवडले नाही. फार जास्त सोयींनी त्रास होतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दूर्लक्ष कराना...

डावीकडचे ऍप्लिकेशन्सचे शॉर्टकट्स 'आयकॉन' किंवा 'टेक्स्ट' करा. आणि ती डावीकडची खिडकी बंदही करता येते की.

फार जास्त सोयींनी त्रास होतो.

खरंय! मॉलमध्ये गेल्यावर ते कर्मचारी जवळ येऊन विचारतात ना 'येस् सर?'/'मे आय हेल्प् यू, सर्?' तसा प्रकार होतो कधी कधी!
||वाछितो विजयी होईबा||

बघतो

डावीकडचे ऍप्लिकेशन्सचे शॉर्टकट्स 'आयकॉन' किंवा 'टेक्स्ट' करा. आणि ती डावीकडची खिडकी बंदही करता येते की.

बघतो. बघतो. खरे तर एवढ्या सोयींची गरज नाही. वरण-भात-भाजी-पोळी पुरे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यु....!

माहितीबद्दल धन्यु....! जरा चेंज म्हणून मी वापरेन.

-दिलीप बिरुटे

आवडला

वापरून पाहिला. आवडला. बर्‍याच सोई आहेत, शिवाय क्रोम इतकाच वेगवान वाटतो आहे.
माझ्या दृष्टीने अडचण इतकीच की यासाठी खिडकी उघडावी लागली. लिनक्सकरता तयार झाला म्हणजे बर्‍याच काळ वापरून बघता येईल.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

फायरफॉक्स असताना गरज वाटत नाही

फायरफॉक्स असताना दुसऱ्या ब्राऊजरची गरज वाटत नाही. फायरफॉक्स बहुतेक गरजांसाठी पुरेसा आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

यात

एपिकमध्ये कदाचित दुसर्‍या कुठल्या बाबतीत सोईचा ठरू शकेल किंवा तो वेगवान असू शकेल. वापरून बघितल्याशिवाय सांगणे कठीण आहे.
सध्या मी सर्व ब्राउझर वापरून मग कोणता चांगला ते ठरवतो. बरेचदा रिव्हूमध्ये जो चांगला तो माझ्या संगणकावर चांगला नसतो. उदा. लिनक्सवर क्रोमियम वेगवान आहे असे म्हणतात पण मला क्रोमियम फाफॉ आणि ऑपेरा दोन्हीपेक्षा हळू आढळला.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

मस्तच आहे.

अनावश्यक लपलेली सेशनं आढळली नाहीत.

नवा ब्राऊजर आवडला. फिडलर वापरुन पाहीले व अनावश्यक लपलेली सेशनं आढळली नाहीत.

फाफॉ ४

फाफॉ ४ ची चाचणी आवृत्ती नुकतीच आली आहे.
http://www.mozilla.com/en-US/firefox/beta/

क्रोमप्रमाणेच सुटसुटीत आहे पण अ‍ॅड-ऑनला समस्य़ा येत आहे असे दिसते. आता एपिकही पहावा म्हणतो.

बेटा

फाफॉ ४ बेटामधून बाहेर येण्याची वाट बघतो आहे.
याखेरीज सप्टेंबरमध्ये फाफॉचे नवीन जावास्क्रिप्ट इंजिनही येते आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

आवडला.

वापरून पाहिला. आवडला.

शैलु

सुंदर् न्याहाळक

अप्रतिम आहे ब्राउजर. मोझीला च्या काठीच्या आधाराने उभा असला तरी अप्रतिम आहे
भारतीय उत्पादनास प्रमोट करण्यासाठी सर्वांनीच हातभार लावला पाहिजे. आज् सर्वांनी मदत् केली तर् उद्या हा ब्राऊजर् आंतरराष्ट्रीय पातळीवर् आयई, मोझिला, सफारी, ऑपेरा अशा न्याहाळकांना टक्कर देऊ शकेन.

पण् एकंदरीत ईपिकचा बाज आवडला. सुंदर् फीचर्स् आहेत.
ईपिकला शुभेच्छा :)

सुंदर एपिक

आज दिवसभर वापरून पाहिला एपिक. सुंदर आणि उपयोगी आहे. सोई काहीशा जास्त वाटल्या तरी खूप कामी पडणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे फाफॉचे अॅड ऑन चालत असल्याने फाफॉपेक्षा कांकणभर सरस झाला आहे.

 
^ वर