भारत फुटबॉल ह्या खेळात मागे का आहे बरे?
सध्या सगळीकडे फुटबॉल विश्वकपाचा ज्वर पसरला आहे. हा चर्चाप्रस्तावही मी ब्राझील - हॉलंड सामना बघतच लिहितो आहे. भारत ह्या विश्वकपात नसूनदेखील. फुटबॉलच्या विश्वकपाला 'कवर' करण्यासाठी जवळपास सगळ्या प्रमुख वाहिन्यांनी, वृत्तपत्रसमूहांनी आपले पत्रकार पाठवले आहेत. ह्यातून भारतीयांना फुटबॉल ह्या खेळाबद्दल किती आकर्षण आहे हे दिसते. असे असूनही भारतात फुटबॉलची चांगली लीग नाही. टेनिस ह्या खेळाप्रमाणेच आम्ही सगळे फुटबॉलचेही आर्मचेअर तज्ज्ञ आहोत. लायोनेल मेसीचे ड्रिबलिंग, काकाच्या फ्लिका ह्याबाबत आपण कंटाळा येईपर्यंत गप्पा मारू शकतो. नावे ड्रॉपू शकतो. पण फुटबॉल धड खेळू शकत नाही. हे सगळे बघितले की भारतीयांकडे ह्या खेळासाठी लागणारा दमखम नाही असे काही जण म्हणतात ते खरेच वाटते. ९० मिनिटे पूर्ण जोशाने खेळण्यापेक्षा 'गोल'गप्पा करणे त्यामानाने फारच सोपे आहे नाही का?
असो. तर असे का ? आम्ही भारतीय फुटबॉल ह्या खेळात एवढे मागे का? मते मांडावी व उपाय सुचवावे, ही विनंती.
Comments
ब्राझीलचा पोपट
ब्राझील हरले... आनंद झाला.
आपला
(फुटबॉलप्रेमी) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अर्जेंटिनाचा पोपट
अर्जेंटिना हरले... आनंद झाला.
आपला
(फुटबॉलप्रेमी) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
घाना हरल्याचे वाईट वाटले
ग्यानने मोक्याची संधी घालवली. पण हरावे तर घानासारखे. अर्जेंटिना आणि ब्राझीलने मात्र स्वतःचे तोंडच काळे केले.
आपला
(फुटबॉलप्रेमी) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
ऊरुग्वेचा पोपट
घानाला हरवणारे ऊरुग्वे हरले... त्यांना शिक्षा मिळाली. आनंद झाला.
आता स्पेन हरल्यानंतर जर्मनी वि. नेदरलँड्स अशी फायनल पाहण्याची मनीषा आहे. स्पेनही जिंकू शकते पण जर्मनीने जिंकावे असे मनापासून वाटते
आपला
(फुटबॉलप्रेमी) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अष्टपादाचे भाकित
अष्टपादाचे भाकित - आज स्पेन जिंकणार असे आहे.
ते खरे ठरण्याची खूपच मोठी शक्यता (०.५) आहे. ;)
खी खी
ह्याबाबतीत मी जरा र्याशनल आहे. :p ऑक्टोपसने स्पेन जिंकण्याची शक्यता 0.5 वर्तवली असल्यास जर्मनी जिंकण्याची शक्यताही 0.5 वर्तवली असावी.
बायदवे त्या दिवशी घाना हरले ते नशीब की योगायोग? एक्स्ट्रा टाईममध्ये खोटारडे ऊरुग्वे हात मध्ये घालून बॉल अडवतात काय, पेनल्टीपण वरच्या दांडक्याला लागते काय... कित्ती कित्ती योगायोग.
मला वाटते
याची भरपाई करण्यासाठी यावेळी जर्मनी जिंकावे असे वाटून ऑक्टोपसाने स्पेनला वेटोळा घालता असावा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
घाना हरले ते नशीब , उरुग्वे जिंकले तो योगायोग
घाना हरले ते नशीब , उरुग्वे जिंकले तो योगायोग!
बायदवे -'जरा र्याशनल ' म्हणजे नक्की किती? इर्र्याशनलचे प्रमाण किती? गुणोत्तर काढण्यास सोपे जाईल! :)
खराखरचा ऑक्टोपस!
आजवर बातम्यांमध्ये "ऑक्टोपस"चा उल्लेख वाचला, की "जालविश्वातील कुठलातरी अनुदिनिकार" असा मी घेत होतो.
हा तर खराखरचा जलचर आहे!!!
जर्मनीचा पोपट
जर्मनीचाही पोपट झाला....
खी खी
आपला
(स्पेनप्रेमी) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मलाही तसेच वाटले होते
बातम्यांमध्ये किंवा चर्चेमध्ये ऑक्टोपसचा उल्लेख आला की मला तो कोणीतरी तज्ञ क्रीडास्तंभलेखक किंवा ज्योतिषी असावा असे वाटायचे. पण ब्राझील-नेदरलँड लढतीत ऑक्टोपसने नेदरलँडवर उडीच मारली अशा अर्थाची बातमी वाचल्यावर जरा खोदून पाहिले तेव्हा खरोखरचा प्राणी असल्याचे कळून आश्चर्य वाटले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
छे ! छे! चोचवाल्या मानवेतरांकडून...
तुम्ही 'भारतीय अंधश्रद्धाळू' हे बिरुद अभिमानाने मिरवण्यास पात्र नाही. (नालायक आहात असे म्हणणार होतो.)
चोचवाल्या 'मानवेतरां'कडून (हा शब्द धनंजयांकडून साभार!) भाकिते करवणे हा तर आम्हा अंधश्रद्ध भारतीयांचा स्वयंघोषित सवतासुभा आणि तरीही तुम्हाला अष्टपाद म्हटल्यावर कोणी क्रीडासमीक्षक ब्लॉगलेखक आठवावा?
हा हन्त! हन्त! की ह +न्+ त , ह+न्+त?
महामहीम भाकितकार 'अष्टपा-द-पॉल' यांचा विजय असो!!
(ह.घ्या.हे.वे.सां. न. ल.)
:)
हा हन्त! हन्त! की ह +न्+ त , ह+न्+त?
"संत विनोबा हा शब्द संत, सन्त किंवा सन् त असा कसाही लिहीलेला किंवा छापलेला दिसला की आमचे मस्तक नम् र्, नम् र्* किंवा नम्र होते." - पुल.
*इथे अर्धा म आणि अर्धा र आहे तो टंकायचा कसा माहीत नाही.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
नम्र
नम्र, नम्र, नम्र
इथे अर्धा म आणि अर्धा र आहे तो टंकायचा कसा माहीत नाही.
‍ वापरले की पुढील शब्द मागील अर्ध्या शब्दाला जोडला जातो. ‌ वापरले की तो जोडला जात नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हे फक्त खेळाबद्द्ल आहे?
भारत कुठल्या गोष्टीमधे पुढे आहे?
गप्पा मारणे, बाता मारणे, फालतू विषयांवर शब्दांचा कीस पाडत काथ्याकूट करणे, यात कदाचित पुढे असेल.
फुटबॉलची/इतर खेळ लोकप्रियता
फुटबॉलची लोकप्रियता नांदेडसारख्या शहरात किती आहे हे पाहिल्यास तुम्ही थक्क व्हाल. शेकडो तास फुटबॉल ह्या शहरात खेळलो असेल- पण येथूनही आजतागायत कोणीही गुणी खेळाडू पुढे येऊ शकला नाही.
काही प्रमाणात नैसर्गिक क्षमता, शरीराची वैशिष्ठ्य़पुर्ण ठेवण अशा मिश्रणामुळे काही खेळांमधे चिनी खेळाडू अग्रेसर असतात- असा एक माझा समज आहे, व त्या समजास काहीही विदाश्रेय नाही. (ऊदा- टेबल टेनिस). पण त्याच जीन-रेस मधील आपले ऊत्तर-पुर्वेतील भारतीय बांधव अशा खेळांमधे भारताकडून काहीही कामगिरी करु शकत नाहीत हे का? कदाचित, सोयी, व्यवस्थापन, निर्धार, ह्यात भारत वेगळे करु शकेल असे वाटते.
क्रिकेटचा विचार करता, असे म्हणता येईल की, हा खेळ ४ तास ते ५ दिवस अशा कालावधीत खेळला जात असल्यामुळे त्यात वाहिन्यांना जितका आर्थिक फायदा होतो तितका इतर खेळांमुळे होऊ लागला की, इतरही खेळ लोकप्रिय करुन दिले जातील
१९७० पर्यंत बरे चालले होते
१९७० पर्यंत भारतीय फुटबॉलचा दर्जा बरा होता असे वाटते. त्याकाळी मेघालय, मणिपूर ह्या भागातले फुटबॉलपटू किती होते? भारत ऑलिंपिकसाठी पात्र होत होता. १९५१ आणि १९६२ च्या आशियाई खेळात भारताला फुटबॉलचे सुवर्णपदकही मिळाले. (स्रोत: अर्थात विकी) १९५० साली विश्वकपासाठी भारत पात्र झाला होता. पण ऑलिंपिकला प्राधान्य दिले गेले. असो. कदाचित १९७०-७१ नंतर ( विंडिज आणि इंग्लंडवरील विजयी परदेश दौऱ्यांनंतर ) क्रिकेटची लोकप्रियता भारतात वाढली असावी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
खेळ तसा स्वभाव
फूटबॉलमध्ये सांघिक ऐक्य, डावपेच, दम, संयम आणि ध्येयावर नजर हे गुण लागतात. हा खेळ बहुधा भारतीयांच्या स्वभावाला मानवत नसावा, पण ज्यात भारतीयांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्याकडे नजर टाका.
(पुढील मजकूर हलकेच घ्यावा. सर्व खेळांप्रती आदर आहे. गंमत म्हणून त्यांना रंग लावला आहे.)
क्रिकेट : राजकारण करायला भरपूर वाव, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होते. पैशाचे प्रचंड मोठे कुरण, सहकाराचे पालन केल्यास सगळे सुखाने चरतात. क्रिकेट कधीच न खेळलेला माणूसही इथे सर्वोच्च पद मिळवू शकतो.
ऍथलेटिक्स : पळा पळा कोण पुढे पळे तो. एकाचवेळी इर्ष्या आणि पळपुटेपणा दोन्ही दिसून येते.
तिरंदाजी : दुसर्याच्या मर्मावर अचूक शरसंधान करण्यास वाव.
पिस्तुल नेमबाजी : पोरंसुद्धा शार्प शूटर आहेत आमच्याकडे
रायफल नेमबाजी : क्रिकेटइतकीच जुनी परंपरा. ब्रिटिशांकडून हरल्यावर आमचे संस्थानिक आणि सरदारांनी या खेळाला वाहून घेतले. फक्त त्याला ते शिकार म्हणत.
कुस्ती : इथे सगळेच लहानपणापासून एकमेकांचे नरडे धरतात आणि लंगोट खेचतात. राजकारण्यांना प्रदर्शनीय कुस्ती आवडते. सगळ्यांना सुकामेवा घातलेली थंडाई आवडते.
लॉन टेनिस (डबल्स) : दोघांनी मिळून सगळ्या लॉनचा विद्ध्वंस करण्याची कला. द बॉल शुड बी इन अदर्स कोर्ट ओन्ली.
मुष्टियुद्ध : आमच्या मुठी कायमच वळलेल्या असतात.
बॅडमिंटन : शटलबद्दल सांगायला पाहिजे का? रोज अप-डाऊन करतो आम्ही. (विरार-चर्चगेट)
काही राहिलं का? :)
असे का???
मला नाही वाटत. आम्ही भारतीय क्रिकेट वरही तासन् तास गप्पा मारतो, पण प्रत्येकाला खेळता येतेच, असे कुठे आहे?
भारतातील १०% लोकांनी तरी कधी (गल्लीतील क होईना) क्रिकेट खेळले आहे का?
तात्पर्यः सामान्य जनतेला एखादा खेळ खेळता येणे आणि तो देशाचा संघ त्या खेळात प्रविण असणे यात सकॄतदर्शनी संबंध दिसत नाही.
शिवाय क्रिकेट मध्ये जरी फूटबॉल सारखा स्टॅमिना लागत नसला तरी ८ तास उन्हात उभे राहणे देखील सोपे नाही, याची नोंद घ्यावी.
अजून एक, सर्व जगात खेळले जातात म्हणून भारतानेही फूटबॉल/टेनीसमध्ये जगज्जेते व्हावे असा अट्टाहास का?
बेसबॉलसारखा खेळ अमेरिकेबाहेर जागतिक पातळीवर कुठे फार खेळला जातो? पण अमेरिकन्स कुठे आरडाओरडा करतात, की आपला देश फूटबॉल मध्ये मागे का म्हणून? आणि क्रिकेटमध्ये भारत कसोटीत प्रथम आणि एकदिवशीयमध्ये द्वितीय स्थानी आहेच की! ब्राझील, जर्मनी, उरुग्वे, पॅराग्वे हे कुठे कपाळ फोडून घेतात त्यासाठी? मग आपणतरी का उगीच स्वतःचा कपाळ्मोक्ष करून घ्यायचा? अर्थात भारत इतर खेळात पुढे आला तर चांगलेच आहे, पण ते आपल्याला यायलाच पाहिजे असा अट्टाहास नसावा.
@आजानुकर्ण: आम्ही बाझीलचे डायहार्ड फ्यान आहोत. त्यामूळे तुम्हाला झालेल्या आनंदाचा आम्ही निषेध करतो आणि जर्मनीकडे (आमची सेकंड चॉईस)डोळे लावून बसतो.
||वाछितो विजयी होईबा||
खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा विषय
पु.लं.नी जे निरिक्षण क्रीकेटबद्दल मुंबैत केलं तेच सगळ्या खेळांबद्दल भारताशी निगडीत् आहे:
भारतात कोणताही खेळ हा खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा विषय आहे
अवांतरः यंदाच्या कपासाठी आम्ही स्पेनला सपोर्ट करत होतो आणि राहू.. ब्राझिल आधीच हरली नसती तर स्पेन होतेच हरवायला. असो!
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
भारताची लोकसंख्या कमी का होत नाही?
असे असल्यास भारताची लोकसंख्या कमी व्हायला हवी. का होत नाही? कोडेच आहे. असो.
गोलगप्पा:
ब्राझील गेल्यापासून आम्ही जर्मनीवर पैसे लावले आहेत. पण स्पेनचा खेळ ष्टायलिश आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हा हा हा
हा हा हा (पाताळविजयम् मधल्या मद्राशी राक्षसाचे हास्य! ;) )
स्पेन!!!!!
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
चर्चा कमी करा
चर्चा कमी करा आणि मैदानांवर जाऊन सराव करा. भारत कुठल्या तरी खेळात पुढे होण्याची अंधुक आशा दिसेल. ;-)
किंवा
पुढील चर्चा - आपल्याकडील मैदाने सराव करण्यालायक आहेत का?
उपक्रमांवर फुटलेले चर्चेचे पेव आणि प्रतिसादांची गुर्हाळे पाहता भारत खेळातच काय इतर अनेक क्षेत्रांतही मागे का आहे याची कारणे समजून यावीत. - ह. घ्या.
असो. मी चालले, सराव करवून घ्यायला. ;-)
पाठीवर
चर्चा कमी करा
पाठीवर मारा, पोटावर कशापाई मारताय. चर्चा करणे हा आमचा फुलटाइम उद्योग आहे. :)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
पाठीवर वार?
यालाच ब्याक ष्टाबिंग म्हणतात का? ;-)
नाही
तो पाठीवर मारा पोटावर मारू नका या वाक्प्रचाराचा भाग आहे.
ब्याक स्ट्याबिंगशी काही संबंध नाही. :)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com