विवेकवाद-बुद्धीप्रामाण्य-तर्कसंगत: एक कुतुहल

जिथे तिथे वैज्ञानिक दृष्टीकोन कशाला? तर्काच्या कसोटीवर सगळ्याच गोष्टी घासून पाहिल्या पाहिजेत का? श्रद्धेच्या ठीकाणी चिकित्सा कशाला? असे विचार उपक्रमावर काही सदस्यांकडून नियमीत मांडले जातात. अश्या सदस्यांना खालील जाहिरात पाहून काय वाटते हे जाणून घ्यायचे मला कुतुहल आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

अनुभव

एकदा अनुभव घेऊन बघाच. असे ओकसाहेबांप्रमाणे सांगावे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

आमचं मत

वरील लेखनात शुद्धलेखनाच्या भरमसाठ चुका आहेत. जाहीरातीसाठी बाबा आदिल शाह याने नवी एजन्सी शोधावी. उजवीकडचा कोपरा फाटलेला दिसतो. तो श्रद्धावंतांनी समस्या निवारण न झाल्याने फाडला का निरिश्वरवाद्यांनी निषेध दर्शवण्यासाठी फाडला हे सांगता आले नाही.

नौकरीपासून वशीकरणापर्यंत जंत्री दिल्यावर एवं अन्यमध्ये काय राहीले हे कळले नाही. वसुली, तुम्ही भेट देऊन या आणि आमचे प्रबोधन करा.

पिवळ्या आणि लाल रंगावरील मैटर ओळखीचा वाटला.

-राजीव.

प्रबोधन

वसुली, तुम्ही भेट देऊन या आणि आमचे प्रबोधन करा.

प्रबोधन करण्यासाठी 'भेट देण्याची' गरज आहे असे तुम्हाला वाटते का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अंदाज

उपक्रमवरून तर्कट लोकांना हाकलण्यासाठी याची मदत होईल का? असा प्रश्न त्यांना पडत असावा.

खालिदबाबा
ह्याला विवेकवादी लोक शास्त्र म्हणणार आणि बिचारा आदिल शाह मऊ लागतो त्याला खणणार.

प्रोजेक्ट म्यानेजरसे अनबन

:-) हा हा हा... मस्त हॉक्स!

तत्त्वतः फरक् नाही

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वरील दोन जाहिराती आपल्याला हास्यास्पद वाटू शकतील. पण हे सगळे खरे मानून त्या बाबांकडे जाणारे काही लोक असणारच. या
जाहिरातीत लिहिलेले खरे वाटणे आणि:
*घराच्या प्रवेशद्वाराची दिशा बदलली तर आपली आर्थिक उन्नती होईल;
* काही निरर्थक अक्षरे लिहिलेल्या श्रीयंत्र नावाच्या पत्र्याची घरी रोज पूजा केली की लक्ष्मी प्रसन्न होईल;
*नागबळी विधी केला की गतजन्मीची पापे नष्ट होतील;
*जगातील यच्चयावत् सर्व माणसांचे भविष्य त्रिकालज्ञ ऋषींनी नाडीग्रंथात पूर्वीच लिहून ठेवले आहे;
*सूर्याभोवती फिरणारे दगड, माती, वायू यांचे निर्जीव गोळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काय घडेल ते ठरवतात;
अशा गोष्टींवर श्रद्धा ठेवणे यांत तत्त्वतः काही भेद नाही.

बरोबर

अशा गोष्टींवर श्रद्धा ठेवणे यांत तत्त्वतः काही भेद नाही.

हाच मुद्दा अधोरेखीत करायचा होता. होमिओपथी, फलज्योतिष्य, नाडी ग्रंथ ह्यांचे उघड समर्थन करणारे उपक्रमी इथे मौन पाळून बसले ह्यातच सगळे आले.
'वैयक्तिक अनुभव' ह्या एकमेव निकषावर समर्थन करणार्यांना बाबा बंगाली किंवा आदिल शाह असे शेकडो अनुभव सांगतील. तेव्हा मात्र ह्याच सर्वांना विज्ञानवादाची कास धरण्याचा साक्षात्कार होईल/होतो.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

गुडवन

ही अर्ग्युमेंट् आवडली. "पण् त्यांच्याकडे जाणारे अडाणी असतात्" असा विचार् करणारे बहुदा (ज्योतिष्य, नाडी इ. बाबतीतला) स्वतःचा अडाणीपणा विसरत् असावेत

-Nile

 
^ वर