खरडवहीचे नियम?

खरडवही संबंधात उपक्रमाचे काही नियम आहेत का? की इथे कुणीही कुणाच्याही खरडवहीत काहीही खरडू शकतो?

एखाद्या व्यक्तिने आपल्या खरडवहीत काहीही लिहू नये असे वाटत असेल तर त्यावर काही उपाय आहे का?

नुकतेच ऐहिक यांनी माझ्या खरडवहीत मनोगत आणि उपक्रम संदर्भात दोन टिप्पणे खरडली होती ती मला अप्रस्तुत वाटली. पुन्हा या व्यक्तिने माझ्य खरडवहीत काहीही लेखन करू नये याकरता काही तांत्रिक बंदोबस्त करता येईल का?

माधवी.

लेखनविषय: दुवे:

Comments

अप्रस्तुत?

मी श्री. संजोप राव यांच्या 'उपक्रम - काल आज आणि उद्या' या लेखावर माधवी गाडगीळ यांनी लिहिलेल्या प्रतिसादावर जे उपप्रतिसाद लिहिले होते तेच त्यांच्या खरडवहीत चिकटवले होते. हे प्रतिसाद संपादक काढून टाकण्याची शक्यता असल्याने आणि ते गाडगीळ यांना कळणे आवश्यक असल्याने मला हे करणे भाग पडले. ज्यांना आपल्या लिखाणावर इतरांनी प्रतिसाद देणे पसंत नाही त्यांनी सार्वजनिक संकेतस्थळांवर येऊच् नये!
ऐहिक

गिल्टी?

हे प्रतिसाद संपादक काढून टाकण्याची शक्यता असल्याने

याचाच अर्थ आपल्या लेखनाबद्दल आपणच खुद्द् गिल्टी होतात असा होत नाही का?? म्हणूनच आपले लेखन संपादक कदाचित काढून टाकतील असे आपल्याला वाटले!

आणि ते गाडगीळ यांना कळणे आवश्यक असल्याने मला हे करणे भाग पडले.

आपले विचार(?) मला कळण्याची आवश्यकता भासल्यास मी आपण जाहीरपणे जे लिहिता ते अवश्य वाचत जाईन. माझ्या खरडवहीत लिहून आपण ते मला कळवायची काहीही गरज नाही.

ज्यांना आपल्या लिखाणावर इतरांनी प्रतिसाद देणे पसंत नाही त्यांनी सार्वजनिक संकेतस्थळांवर येऊच् नये!

आपण माझ्या लिखाणावर जाहीरपणे कोणताही प्रतिसाद द्या, त्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. माझ्या खरडवहीत येऊन लिहिण्याबद्दल माझा आक्षेप होता, आहे.

माधवी.

गिल्टी??

याचाच अर्थ आपल्या लेखनाबद्दल आपणच खुद्द् गिल्टी होतात असा होत नाही का?? म्हणूनच आपले लेखन संपादक कदाचित काढून टाकतील असे आपल्याला वाटले!

म्हणजे आतापर्यंत ज्यांचे ज्यांचे लेखन संपादकांनी काढून टाकले त्यांना त्याबद्दल अपराधी वाटले पाहिजे का?

काय म्हणाल?

आपले लेखन कदाचित काढून टाकले जाईल अशी जर का आपल्या मनात शंका असेल तर आपण त्या भावनेला काय म्हणाल?

काहिही म्हणणार नाही..

माझ्या आणि संपादकात मतभेद आहेत इतकेच समजेन.. त्यात अपराधी काय वाटायचे?? ..फार फार तर सर्किट रावांसारखे संतापून एखाद दोन ग्लेन फिदिच रिचवावेत इतकेच :-))

लेखन काढले आहे.

ऐहिक या व्यक्तिचे लेखन माझ्या खरडवहीत राहू नये असे मला वाटले म्हणून मी ते आता काढून टाकले आहे.

क्षमस्व.

माधवी.

खरडवही आणि निरोप

खरडवही ही सार्वजनिक असते. मला कुणाचीही खरडवही वाचता येते.
मग खरडवहीत लिहिणे म्हणजे माझे म्हणणे सगळ्यांनी वाचावे, हे उद्देश्य.
तुमचे असे उद्देष्य होते का ?
अगदी हेच.
याचाच अर्थ आपल्या लेखनाबद्दल आपणच खुद्द् गिल्टी होतात असा होत नाही का?? म्हणूनच आपले लेखन संपादक कदाचित काढून टाकतील असे आपल्याला वाटले!
या प्रश्नाचे उत्तर वरुण यांनी दिलेच आहे. आपण ज्या व्यक्तीच्या लिखाणाविषयी एवढे गदगदून लिहिले आहे, त्या व्यक्तीचे बरेचसे लिखाण उपक्रमवरुन आणी संपूर्ण लिखाण मनोगतवरून काढून टाकले आहे. याचा अर्थ ती व्यक्ती स्वतःच्या लिखाणाविषयी अपराधीपणाची भावना बाळगून आहे असा होतो का? त्यांच्या ब्लॉगवरील लिखाणातून तर असे अजिबात जाणवत नाही!
ऐहिक या व्यक्तिचे लेखन माझ्या खरडवहीत राहू नये असे मला वाटले म्हणून मी ते आता काढून टाकले आहे.
का? तुमच्या लिखाणावरील जाहीर प्रतिसादाला तुमचा आक्षेप नाही तर तेच लिखाण तुमच्या खरडवहीत ठेवताना तुम्हाला गिल्टी का वाटते?

ऐहिक

झक्कास

वाह वाह,

काय मस्त वाद वाचायला मिळाला ! एकदम मनोरंजक !
एका गोष्टीकडे बघण्याच्या किती पद्धती असतात !!

जसे जसे वाचत जावे, एक एक मुद्दा पटत गेला, आणि थोडे पुढे गेल्यावर तो पुन्हा पटेनासाही झाला.

एनिवे, खरडवहीतील प्रतिसाद काढून टाकणे हाच सध्यातरी एकमेव उपाय दिसतोय.

सही.

अरे अरे!

जरि कलहकारणे व्यय न हो साचा हा व्यर्थ भार बुद्धीचा!मराठी टंकलेखनासाठी वापरा.

खरडवही

खरडवही म्हणजे ज्यात खरडपट्टी काढता येते ती वही

ऐहिक

आपल्याला आमचा उघड पाठींबा. आपण स्रीयांशी न भांडणे केव्हाही चांगले.
आपला
कॉ.विकि

 
^ वर