....मुळ 'अन्' प्रत्यय मराठीतला कि इंग्रजीतला?

बर्‍याच मराठी व इंग्रजी नकारार्थी शब्दांना 'अन्' किंवा ' 'un' हा एकच प्रत्यय असतो.
उदा. मराठीत अनादर, अनधिक्रुत वगैरे
इंग्रजीत unavailable, unbeleivable etc.
मुळ 'अन्' प्रत्यय मराठीतला कि इंग्रजीतला?

लेखनविषय: दुवे:

Comments

एकच कूळ

मराठी आणि इंग्रजी या भाषा एकाच कुळातल्या आहेत कदाचित त्यातच याचे उत्तर दडलेले असावे.

+१

मराठीत हा नकारार्थी पूर्व-अवयव संस्कृतातून आला. संस्कृतात प्रचलित होता, तेव्हा इंग्रजी भाषा अस्तित्वात नव्हती.
इंग्रजीत लॅटिनमधून (काही बदलांसह) आला. इंग्रजीत तो अवयव संस्कृतातून आला नाही.

इंग्रजी आणि मराठी भाषा एकाच कुळातल्या आहेत, +१

सहमत

सहमत आहे.
या कुळाचा उगम/संबंध प्रोटो-इंडो-युरोपिअन भाषांशी आहे असे वाटते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

अन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
*मराठी तसेच संस्कृत भाषेत काही नामे आणि विशेषणे यांना अ अथवा अन उपसर्ग लावल्यास विरुद्धार्थी शब्द मिळतो.
*शब्दारंभी व्यंजन असल्यास "अ" लागतो. जसे: साध्य X असाध्य., पात्र X अपात्र.
* शब्दारंभी स्वर असल्यास "अन" लागतो. जसे: आवश्यक X अनावश्यक ,
इच्छा X अनिच्छा, औरस X अनौरस, ऋतम् X अनृतम् इ. इंग्रजीत असा भेद दिसत नाही. सरसकट un वापरतात.काही वेळा im वापरतात. जसे:Pure X Impure,Possible X Impossible.
* जरी उपसर्ग सारखाच असला कोणी कुठल्या भाषेतून धेतला असे नाही. नो या इंग्रजी शब्दाचा जो अर्थ, तोच नो या संस्कृत शब्दाचा.
* नीट या मराठी जो अर्थ जवळ जवळ तोच Neat या इंग्रजी शब्दाचा. असे योगायोग असू शकतात.

नुसतेच अन्‌ आणि इम्‌ नाही

नुसतेच un आणि im नाही तर, in, ir, नॉन, a, De, Di, डिस् आणि मिस्.
इन्क्रेडिबल, इर्रिस्पॉन्सिबल, नॉन्‌रिस्पॉन्डिंग, असेक्स्च्युअल, डीकॉम्पोज़, डिफ़्यूज़, डिसकनेक्ट्, मिस्‌फ़ॉर्च्यून वगैरे.--वाचक्‍नवी

?

हे सारे प्रत्यय मराठीतही आहेत असा आपल्या प्रतिसादाचा अर्थ होतो.

दुस्-दुर् हे उपसर्ग मराठीतही

दुस्-दुर् हे उपसर्ग मराठीतही आहेत.

 
^ वर