बासरी वादन

मला बासरी वादना विषयी, कोणास काही माहिती असेल तर द्याल का?

म्हणजे, कशी वाजवावी याच्या टिप्स् , नोट्स्, बासर्या किती प्रकारच्या आसतात .

काही दुवे दिले तरी चालतील.

बासरी व पावा यात फरक काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

पावा म्हणजे उभी बासरी

बासरीला संस्कृतमध्ये वेणु म्हणतात. पूर्वी बांबूच्या वनात सोसाट्याचा वारा वाहत असताना पोकळ बांबूच्या चिरांतून जो आवाज येई त्यावरुन कुणा संगीताच्या जाणकाराला हे वाद्य स्फुरले असावे. बासरी दोन प्रकारची असते. आडवी आणि उभी. उभ्या बासरीला पावा म्हणतात. सनईप्रमाणे हा पावा तोंडासमोर धरुन वाजवतात. बासरीमध्येही जी मोठी आणि घनगंभीर नादाची बासरी असते तिला वेणु म्हणतात तर छोटी दोन वितांची असते तिला मुरली म्हणतात. आडव्या बासरीला छिद्र असते. श्वासाची फुंक जमली तरच आडवी बासरी वाजवायला जमते. पावा मात्र निमुळत्या चिरेच्या मुखातून वाजवला जातो आणि वाजवायला सोपा व सहज असतो.

बासरीचा आणखी एक पाश्चिमात्य प्रकार म्हणजे फ्ल्यूट. शाळेत ड्रीलच्या वेळी, लष्करी संचलनात किंवा वाद्यवृंदात आपण ती ऐकतो. इंग्लिश फ्ल्यूट ही धातूची (पितळी, स्टील) असून तिला सुरांच्या छिद्रावर बटणे असतात. बासर्‍यांच्या सहाय्याने तयार केलेले वाद्य म्हणजे बॅगपायपर. यालाच आपल्याकडे पंचवेणुवाद्य म्हणतात.

बासरी वादनावर नुकतेच दिवंगत पं. अरविंद गजेंद्रगडकर यांनी पुस्तक लिहिले आहे.

मेहेंदळे म्युझिक

अप्पा बळवंत चौकातील मेहेंदळे म्युझिक स्टोअरमध्ये बासरीवादनाची प्राथमिक माहिती देणारी छोटी छोटी पुस्तके मिळतील. जुनी लोकप्रिय हिंदी गाणी कशी वाजवावीत याचे नोटेशन्सही मिळतील. मात्र बासरीमध्ये योग्य फुंक जमणे (विशेषतः खर्जातले स्वर काढण्यासाठी) योग्य मार्गदर्शनाशिवाय शक्य नाही. अनेक स्वर उमटण्यासाठी अर्धे बोट उचलावे लागते, दोन बोटात विशिष्ट अंतर ठेवल्यास त्रास कमी होतो. वगैरे माहिती पुस्तक वाचून समजणे अशक्य आहे. पुस्तक वाचून तुम्ही केवळ एका मर्यादेपर्यंतच बासरी वाजवू शकाल. किंबहुना बासरी कशी वाजवावी हे समजत नसेल तर चांगली बासरी विकत घेणेही अशक्य आहे. ज्याला बासरी वाजवता येते त्याला सोबत नेले तरच चांगल्या प्रतीची बासरी विकत घेता येईल.

(मला बासरी वाजवता येत नाही. मी पुस्तक वाचून बरेच दिवस शिकायचे प्रयत्न केले. आधा है चंद्रमा वगैरे गाणी वाजवता यायला लागल्यावर मग हौस पूर्ण झाली आणि बासरीवादन बंद केले. तुमचा चर्चाप्रस्ताव वाचून माझी बासरी कुठे हरवली ते शोधावेसे वाटत आहे.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मेहेंदळे म्युझिक स्टोअर

मेहेंदळे म्युझिक स्टोअर सध्या अप्पा बळवंत मधून टिळक रोडला (स्वारगेटापासून फार दूर नव्हे ) हलले आहे असे आठवते. चूभूदेघे. पुणेकर जाणकारानी प्रकाश पाडावा.

कल्पना नाही

कदाचित हलले असावे. अब चौकात बरेच दिवस जाणे झाले नाही. त्यामुळे कल्पना नाही.

बाय द वे पुणेकर जाणकार हे पिवळा पितांबरसारखे झाले काय? (हघ्या)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मग हौस पूर्ण झाली

हो, हो. बरेचदा नवीन काही शिकताना आपलीच पिपाणी वाजते.

पिपाणी

बरेचदा नवीन काही शिकताना आपलीच पिपाणी वाजते.

हा हा. खरे आहे.

(हसरा) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अरेरे!

खूप दिवस बासरी शिकावे असे मला वाटत होते. आजानुकर्ण यांच्या प्रतिसादाने माझा उत्साह ओहोटला :-) आहे.

आता मला गिटार वाजवायला किती अवघड असते याची माहिती हवी आहे.

विकत घेण्याचा खर्च, शिकायला गुरुच लागतो का?, शिकण्याची काठिण्यपातळी वगैरे वगैरे...

"बरेचदा नवीन काही शिकताना आपलीच पिपाणी वाजते." - हे आवडले. :-)

==================

+

:)

आता मला गिटार वाजवायला किती अवघड असते याची माहिती हवी आहे.

हाहा, हसून हसून लोळायची वेळ आणली.. :)
असो..
मला बासरीचे माहिती नाही, पण रेकॉर्डर शिकायला सोपा असतो एवढे माहिती आहे.

साधारण बासरीच्याच प्रकारातला. अर्थात अधिक ज्ञानी लोक सांगतात की बासरी वेगळी, आणि शिकायला किंचित अवघड असते.
पण गिटारीपेक्षा शिकायच्या दृष्टीने बरी असावी. कारण इथे तिसरीपासून शाळेतल्या मुलांना रेकॉर्डर शिकवतात असे पाहिले आहे. कठीण असते तर सुरूवातीला शिकवायला म्हणून मुलांसाठी वेगळे वाद्य निवडले गेले असते.

आम्हाला हल्ली रोज ती पीं-पीं घरात ऐकायला लागते आहे. प्रकारांमध्ये आल्टो, सप्रानिनो, बेस, टेनोर अशी नावे ऐकली आहेत.

धीर धरा

आम्हाला हल्ली रोज ती पीं-पीं घरात ऐकायला लागते आहे.

धीर धरा. आणखी काही वर्षांनी व्हायोलिन, विओला, चेलो, क्लॅरिनेट वगैरेंची "भीषण" किंवा "भेसूर" (बेसूर नाही) सूर ऐकावे लागतील. तेव्हा रेकॉर्डरची पीं-पीं सुमधुर वाटेल. ;-)

पाव्यासारखाच दिसतो

या रेकॉर्डरसदृश दांडक्यालाच आम्ही पावा म्हणतो.

(तौलनिक) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१

रेकॉर्डर = उभी बासरी

गुरुची आवश्यकता

कोणतेही ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्याचा आनंद वेगळा असला तरी त्या मार्गाने केवळ ठराविक मर्यादित अंतरच पार पाडले जाते. गुरुचे मार्गदर्शन असल्यास एखादा पल्ला गाठणे सोयीचे होते. आता तुम्हाला फक्त प्रवासच करायचा आहे की पल्लाही गाठायचा आहे यावर गुरुची आवश्यकता अवलंबून आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर