मुका शहाणा असेल तर आंधळ्याला सांगायला जाण्याच्या फंदात पडणार नाही कारण आंधळ्याच्या डोक्याची कटकट आणि त्याचा रोजचा मनस्ताप त्याने डोळ्याने पाहिला असणार. आंधळ्यामागची पीडा गेली तर मुका मनात म्हणेल ' अरे बहिर्या! माझी बायको न्यायचीस किंवा माझीपण का नाही नेलीस?' यात वेडा कोण तर बहिरा. त्याने रामायण वाचले असते तर त्याला ठाऊक असायला पाहिजे की दुसर्याची बायको पळवून आणणे किती मूर्खपणाचे असते ते.
(एका माणसाने पेपरमध्ये जाहिरात दिली ' बायको हवी आहे' त्याला सकाळी तासाभरात सात प्रतिसाद आले. सगळ्यांचा प्रतिसाद एका वाक्यात होता. 'आमची घेऊन जा')
* जोक अपार्ट. कोड्याचे उत्तर काय असेल, याची उत्सुकता आहे.
मुकेश अंबानीला मुकी म्हणतात ना! त्याप्रमाणे मुका हा मुकेशचा शॉर्टफॉर्म असेल तर मुका बोलका असण्याचा संभव आहे. ;-)
असो. कोडे अर्धवट वाटते; काहीतरी "मिसिंग" आहे का?
मला असे वाटते की बायको हरवली हे आंधळ्याला न कळणे अशक्य आहे. आंधळ्याला दिसत नाही, ऐकू तर येते. :-) बायको घरात नाही हे तिच्या न होणार्या बडबडीवरून, घरातल्या बंद झालेल्या आवाजावरून कळणे शक्य आहे. (सर्व पुरुषांनी कृपया कबूल करावे की त्यांची बायको घरात नाही हे त्यांना डोळे झाकूनही सांगता येईल.) अर्थातच, ती पळून गेली, निघून गेली की नाहीशी झाली हे कळणे शक्य नाही पण आजूबाजूंच्यांना विचारून तेही कळून घेणे शक्य आहे.
आता मुका, बहिरा, आंधळा आणि त्याची बायको सोडून जर पाचवा प्राणी उपलब्धच नसेल तर पंचाईत आहे. मुक्याला उपलब्ध माणसांकडूनच समजावून घेणे प्राप्त आहे. त्याने मुक्याला आणि बहिर्याला अनेक प्रयत्नांनी प्रश्न विचारले (मुक्यासाठी खाणाखुणा, टॅपिंग, बहिर्यासाठी अभिनय इ.) तर निदान मुका तेथे आहे आणि बहिरा तेथे नाही इतके तरी त्याला कळणे शक्य आहे. त्यावरून बायकोबरोबर बहिरा पळाला या निष्कर्षापर्यंत येणेही शक्य आहे.
मला वाटते, ह्या कोड्यात गर्भितार्थ (हिंदीत ज्याला कडवा सच म्हणतात ते) आहे, तो "विरंगुळा" म्हणूनच "डिकोड" करायचा एक (अंमळ फुटकळ) प्रयत्न ;)
अंधळ्याची बायको
यातील आंधळ्याची बायको म्हणताना, लग्न करताना नवरा कसा आंधळा होतो हे गृहीत धरलेले आहे.
बहिर्याने पळवली
एकदा का लग्न झाले की बायकोचे ऐकतो असे दाखवायचे पण कान बंद करून, अर्थात बहीरे होयचे...नवरा मुकाट्याने "ऐकतो" आहे हे समजल्यावर बायको खूष! अर्थात नवर्यातील बहीरेपणाने त्या बायकोला पळवले!
ते पाहीले मुक्याने,
नवर्याला बोलायला संधी कुठे मिळते? तो बिचारा लग्नानंतर मुकाच झालेला असतो.
मुका अंधळ्याला कसा सांगेल की, तुझी बायको बहिर्याने पळवली!
थोडक्यात आंधळा पण नवराच, मुके राहून बघणारा पण नवराच आणि बहीरे राहून बायकोला खूष ठेवणारा अर्थात पळवणारा पण नवराच... लग्नानंतर अद्वैत यापेक्षा काही वेगळे नसावे. ;)
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
*********************************** "कोडे अर्धवट वाटते; काहीतरी "मिसिंग" आहे का?"... प्रियाली.
..मिसिंग नसेल. पण अनवधानाने काही चुकीचे टंकित केले असावे.आंधळा,मुका,बहिरा यांतील एकाची बायको दुसर्याने पळवली ते तिसर्याने पाहिले.ते त्याने एकाला कसे सांगावे असा ढांचा ठीक दिसतो.
या दुव्यावर थोडीशी चर्चा आहे.
हे कोडे कोणी लहानपणी ऐकले नाही का? वेगवेगळ्या अंदाजे दहा गटांमध्ये मी हे कोडे ऐकले आहे. सामायिक बाब म्हणजे प्रश्नकर्त्याकडून उत्तर मिळत नाही. चिऊकाऊच्या गोष्टी आणि तर्कक्रीडा यांत कृपया फरक करावा.
स्टुपिड् या टोपणनावाने पाच धागे सुरू झाले आणि त्यांपैकी केवळ एका धाग्याकडे ते पुन्हा फिरकले. (तेथेही निरर्थक प्रतिसाद दिला.) त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळण्याची शक्यता नाही.
Q: How do you keep an idiot in suspense?
A: I'll tell you tomorrow!
Comments
उत्तर
मुका टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्टर वापरू शकतो.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
मुका शहाणा असेल् तर..
मुका शहाणा असेल तर आंधळ्याला सांगायला जाण्याच्या फंदात पडणार नाही कारण आंधळ्याच्या डोक्याची कटकट आणि त्याचा रोजचा मनस्ताप त्याने डोळ्याने पाहिला असणार. आंधळ्यामागची पीडा गेली तर मुका मनात म्हणेल ' अरे बहिर्या! माझी बायको न्यायचीस किंवा माझीपण का नाही नेलीस?' यात वेडा कोण तर बहिरा. त्याने रामायण वाचले असते तर त्याला ठाऊक असायला पाहिजे की दुसर्याची बायको पळवून आणणे किती मूर्खपणाचे असते ते.
(एका माणसाने पेपरमध्ये जाहिरात दिली ' बायको हवी आहे' त्याला सकाळी तासाभरात सात प्रतिसाद आले. सगळ्यांचा प्रतिसाद एका वाक्यात होता. 'आमची घेऊन जा')
* जोक अपार्ट. कोड्याचे उत्तर काय असेल, याची उत्सुकता आहे.
मुकी
मुकेश अंबानीला मुकी म्हणतात ना! त्याप्रमाणे मुका हा मुकेशचा शॉर्टफॉर्म असेल तर मुका बोलका असण्याचा संभव आहे. ;-)
असो. कोडे अर्धवट वाटते; काहीतरी "मिसिंग" आहे का?
मला असे वाटते की बायको हरवली हे आंधळ्याला न कळणे अशक्य आहे. आंधळ्याला दिसत नाही, ऐकू तर येते. :-) बायको घरात नाही हे तिच्या न होणार्या बडबडीवरून, घरातल्या बंद झालेल्या आवाजावरून कळणे शक्य आहे. (सर्व पुरुषांनी कृपया कबूल करावे की त्यांची बायको घरात नाही हे त्यांना डोळे झाकूनही सांगता येईल.) अर्थातच, ती पळून गेली, निघून गेली की नाहीशी झाली हे कळणे शक्य नाही पण आजूबाजूंच्यांना विचारून तेही कळून घेणे शक्य आहे.
आता मुका, बहिरा, आंधळा आणि त्याची बायको सोडून जर पाचवा प्राणी उपलब्धच नसेल तर पंचाईत आहे. मुक्याला उपलब्ध माणसांकडूनच समजावून घेणे प्राप्त आहे. त्याने मुक्याला आणि बहिर्याला अनेक प्रयत्नांनी प्रश्न विचारले (मुक्यासाठी खाणाखुणा, टॅपिंग, बहिर्यासाठी अभिनय इ.) तर निदान मुका तेथे आहे आणि बहिरा तेथे नाही इतके तरी त्याला कळणे शक्य आहे. त्यावरून बायकोबरोबर बहिरा पळाला या निष्कर्षापर्यंत येणेही शक्य आहे.
अद्वैत :-)
मला वाटते, ह्या कोड्यात गर्भितार्थ (हिंदीत ज्याला कडवा सच म्हणतात ते) आहे, तो "विरंगुळा" म्हणूनच "डिकोड" करायचा एक (अंमळ फुटकळ) प्रयत्न ;)
अंधळ्याची बायको
यातील आंधळ्याची बायको म्हणताना, लग्न करताना नवरा कसा आंधळा होतो हे गृहीत धरलेले आहे.
बहिर्याने पळवली
एकदा का लग्न झाले की बायकोचे ऐकतो असे दाखवायचे पण कान बंद करून, अर्थात बहीरे होयचे...नवरा मुकाट्याने "ऐकतो" आहे हे समजल्यावर बायको खूष! अर्थात नवर्यातील बहीरेपणाने त्या बायकोला पळवले!
ते पाहीले मुक्याने,
नवर्याला बोलायला संधी कुठे मिळते? तो बिचारा लग्नानंतर मुकाच झालेला असतो.
मुका अंधळ्याला कसा सांगेल की, तुझी बायको बहिर्याने पळवली!
थोडक्यात आंधळा पण नवराच, मुके राहून बघणारा पण नवराच आणि बहीरे राहून बायकोला खूष ठेवणारा अर्थात पळवणारा पण नवराच... लग्नानंतर अद्वैत यापेक्षा काही वेगळे नसावे. ;)
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
सोप्प आहे !
मुका हे सगळ एका कागदावर लिहेल. तो कागद एका डोळस व बोलक्या व्यक्तीला वाचायला देयील. तो व्यक्ती आन्धळ्याला वाचुन दाखवेन.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
आन्धळ्याला वाचुन दाखवेन.?
आंधळ्याला काहीही दाखवले तरी त्याला ते पाहणे शक्य नाही असे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
ब्रेल लिपी
मुका व आंधळा दोघांनाही ब्रेल लिपी येत असल्यास तो पर्याय उपलब्ध आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सदोष
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"कोडे अर्धवट वाटते; काहीतरी "मिसिंग" आहे का?"... प्रियाली.
..मिसिंग नसेल. पण अनवधानाने काही चुकीचे टंकित केले असावे.आंधळा,मुका,बहिरा यांतील एकाची बायको दुसर्याने पळवली ते तिसर्याने पाहिले.ते त्याने एकाला कसे सांगावे असा ढांचा ठीक दिसतो.
पाचवा मनुष्य
मला वाटते कोड्यात पाचवा मनुष्य उपलब्ध नसावा. हेच मूळ कोड्यात न सांगितल्याने "मिस" झाले असावे असे वाटते.
हा ढांचा ठीक असला तरी मुक्याने लिहून डोळसाला सांगावे आणि डोळसाने स्वमुखे आंधळ्याला सांगावे असे सोपे उत्तर नसावे असे वाटते.
आश्चर्य