वैवाहीक् जिवन् व् रक्त गट.

लग्न करते वेळी वधु वरांचा रक्तगट जुळतो का हे पाहतात.
रक्तगट जुळणे म्हणजे काय? तो जर जुळत नसताना विवाह केला तर काही परिणाम होतात का? संतति विषयी काही प्रोब्लेम होतात का?

विवाहासाठी साधारणतः कुठ्ल्या रक्तगटाचे कुठ्ल्या रक्तगटाशी जुळते / जुळत नाही याचा तक्ता देण्याचा प्रयत्न करावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

र्‍हिसस

Rh प्रतिद्रव्यजनक पदार्थ (ऍन्टिजेन) आईच्या रक्तात नसतील तर आईचे रक्त 'आर एच मायनस' प्रकारचे ठरते. वडिलांकडे Rh प्रतिद्रव्यजनक पदार्थ बनविणारे एक जनुक असेल तर बाळाच्या रक्तात Rh प्रतिद्रव्यजनक पदार्थ बनण्याची शक्यता ५०% असते. वडिलांकडे Rh प्रतिद्रव्यजनक पदार्थ बनविणारी दोन जनुके असतील तर बाळाच्या रक्तात Rh प्रतिद्रव्यजनक पदार्थ नक्कीच असतात. हे पदार्थ नाळेतून->वारेतून आईच्या शरिरात जातात. प्रसूतीदरम्यान त्याचा दर वाढतो. या पदार्थांमुळे आईच्या रक्तात Rh प्रतिद्रव्य (ऍन्टिबॉडी) बनते आणि पुढील सर्व गर्भारपणांदरम्यान बाळांच्या रक्तपेशींना नष्ट करते.
हे टाळण्यासाठी आधीच्या गर्भारपणात काळजी घ्यावी लागते म्हणून अशा जोड्यांचे विवाह टाळले जातात.
अ, ब, या रक्तगटांची जोडी जुळली नाही तरी असा धोका होत असल्याचे (म्हणजे ओ रक्तगटाच्या आईच्या बाळांच्या रक्तपेशी नष्ट होणे, इ.) वाचनात नाही.

उपयुक्त माहिती

उपयुक्त माहिती. धन्यवाद !

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

दूवे

या बाबतीत
लोकसत्ता तसेच आरोग्य.कॉम

येथील माहिती उपयुक्त आहे.

हूर्रे...इन्सर्ट लिंक जमले. नितिन थत्ते व Admin यांना धन्यवाद.

 
^ वर