मंगलोरचा विमान अपघात

नुकत्याच मंगलोरला झालेल्या विमान अपघाताबद्दल एक वेगळी माहिती मला मिळाली.

एकंदर हे माहित आहे की विमान उतरले ते नेहमीच्यापेक्षा ६०० मीटर पुढे धावपट्टीला टेकले. नंतर वेग नियंत्रण न करता आल्याने धावपट्टी संपली व त्यानंतरच्या दरीत कोसळले.
लगेचच दरी असल्याने इतक्या जवळ विमान कोसळून देखिल मदत कार्य सुरु करण्यास एक तास लागला. एकंदर १५८ प्रवासी मेले.

माझ्या माहितीत या धावपट्टीच्या अपुरेपणाचा वाद होता. http://www.esgindia.org/campaigns/bajpe/press/Press_Release_Mangalore_Ai...
ही धावपट्टी आंतराष्ट्रीय नियमानुसार नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. यापूर्वी असाच एक अपघात मंगलोरला झला होता. या अपघातात विमान पुढील दरीत कोसळण्या आधी कसेबसे थांबले होते. वीरप्पा मोईली हे यातून बचावले.

न्यायालयाने पर्यावरणवाद्यांची याचिका निकाली काढताना म्हटले की सरकारी यंत्रणा सर्व नियमावलींचे पालन करील आणि ते तसे करावे.

वैमानिकाचा दोष, नियंत्रणकक्षाचा दोष, विमानातील दोष यासोबत/ऐवजी हा दोष एवढी जीवित हानी होण्यास कारणीभूत होऊ शकते.

प्रमोद

लेखनविषय: दुवे:

Comments

दु:खद घटनेतून सुधारणा व्हावी

दु:खद घटनेमधून ज्ञानही मिळालेले आहे.

यातून विमानतळाबाबत नियम बदलावेत - धोकादायक असल्याचे समजल्यास मोठ्या विमानांना उतरण्याची अनुमती रद्द करावी. ईएसजी दुव्याकरिता धन्यवाद.

भविष्यातली सुरक्षितता तरी सुधारावी.

+१

दुर्घटने नंतर याला जबाबदार कोण याप्रश्नाबरोबरच (किंबहूना यापेक्षा) हे पुन्हा कसे होणार नाहि हे पाहणे महत्त्वाचे

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर