उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मराठीची आवश्यकता आहे की नाही ?.............................
विकि
May 2, 2007 - 9:47 am
नमस्कार,
आपल्याला मराठीची आवश्यकता काय कारण मराठी भाषा आपल्याला दोन वेळचे अन्न देऊ शकत नाही.हे खरे की खोटे ते ठरवा. याबाबत आपणास काय वाटते.
आपला
कॉ.विकि
दुवे:
Comments
उदाहरणे
आपल्याला मराठीची आवश्यकता काय कारण मराठी भाषा आपल्याला दोन वेळचे अन्न देऊ शकत नाही. हे कसे काय बुवा? कळले नाही. कृपया उदाहरण द्या. जसे, मराठीमुळे हे हे लोक अन्न न खाता बळी गेले.. आकडेवारी शिवाय बोलण्यात काहीच अर्थ नाही...
हे काय एका वाक्यात प्रश्न लिहा अन बाकिच्यांनी निबंध लिहा असे आहे कि काय?
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
उदा. इंग्रजी भाषा
चाणक्यसाहेब, उदा.इंग्रजी भाषा.
आपला
कॉ.विकि
आपल्याला
मराठी भाषा "आपल्याला" २ वेळचे अन्न देत नसली तरी मराठी लेखक,मराठी वृत्तपत्रासाठी बातम्या लिहून देणारे वार्ताहर,मराठी प्रकाशक, मराठी टंकलेखक यांना २ वेळचे अन्न देते असे वाटते.आणि '२ वेळचे अन्न देत नाहीत त्या समूळ गोष्टींची आवश्यकता नाही' असे म्हणणे असेल तर मोबाईल, टीव्ही, वाहने, कपडे,दागिने, साबण, प्रसाधने,चष्मा, बूट हे सर्व अनावश्यक म्हणून वापरणे बंद करावे काय?
संदर्भासहीत स्पष्टीकरण
अहो... आपल्या वाक्याचे संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या. क्षमा करा पण आपल्याला नक्कि काय म्हणायचे आहे ते कळत नाही.
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
मराठी भाषा ...........
चाणक्य साहेब ,हल्ली नोकर्या इंग्रजी वर प्रभुत्व असल्याशिवाय मिळत नाही. मराठी भाषा फक्त राज्याचा कारभार,पोलिस व पालिका प्रशासन,लेखक,कवी,नाटक ,चित्रपट ,इ.चालवण्यासाठी होतो. व यांच्यातही बहुतेककरून वरच्या पातळीवर इंग्रजीचाच उपयोग होतो. इत्यादीजण सोडल्यास बाकिच्या किती जणांना मातृभाषा मराठी आहे म्हणून रोजगार मिळतो.
आपला
कॉ.विकि
असे कसे?
विकि साहेब,
आपण असे कसे म्हणता? दोन वेळचे अन्न काय फक्त चार भिंतींच्या आत बसून करायच्या कामांच्या नोकरीनेच मिळते का? आपल्या अनेक उदाहरणे देता येतील. त्यातील काही वर दिली आहेत देखील. इंग्रजीला जास्त महत्व आहे म्हणा हवे तर. ते जगभर आहे. जी अवस्था मराठीची आहे तिच जगातल्या अनेक भाषांची आहे. पण अनेक भाषा टिकुन आहेत.
मी काही उदाहरणे देतो..
१. मायक्रोसॉफ्ट, याहू, गुगल या कंपन्यांमध्ये मराठीसाठी काम होत नाही का? तिथे तर कदाचित काही कामांसाठी खास मराठीचे तज्ञ लोक असतील.
२. दुकानांची नावे हल्ली मराठी भाषेत सुद्धा असणे अनिवार्य आहे. हि नावे लिहायचे काम जे करतात, ते आपले अन्न आपल्या कलेसोबत मराठीमुळे सुद्धा मिळवत नाहीत काय?
आपले म्हणणे आत्ता तरी थोडे फक्त एका वर्गा पुरतेच वाटते. भाषा हि कोणत्याच वर्गाची मक्तेदारी नाही. स्पष्टच सांगायच झालं तर आपले म्हणणे पटत नाही.
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
चाणक्य साहेब
आपण फक्त मराठी भाषेविषयी चर्चा करू. तस पहायला गेल्यास आपलही म्हणण योग्य आहे पण या विषयाच्या अनुषंगाने नविन मराठी पिढीबाबत आपले काय मत आहे.
आपला
कॉ.विकि
नवीन पिढी
नवीन पिढी नेहमीच जास्त समर्थ असते. ज्ञानाची जागतिक भाषा इंग्रजी आहे आणि ते शिकणे सोयीचे नक्किच ठरते. जगतिकीकरण हा एक मुद्दा. पण मराठी शिकल्याने आणि इंग्रजी न शिकल्याने नोकरी मिळणारच नाही असे नाही. जो पर्यंत आपण विचार आपल्या मातृभाषेत करतो तो पर्यंत ती भाषा जिवंत असणारच. अनेक अशिक्षीत लोक पटकन प्रश्न विचारतात - टाइम/टेम काय झाला? आता त्यांना याचे स्पेलिंग नव्हे, तर धड मराठी लिहायला सुद्धा येत नसते. पण म्हणून काही अडते का? मुद्दा इतकाच आहे कि, मराठीमुळे दोन वेळचे अन्न मिळते. आनंद मिळतो. कधी कधी तर सुरक्षीतता सुद्धा मिळते. भारता बाहेर गेल्यावर जवळ जवळ आपले घर मिळते. आपली माती मिळाल्याचा आनंद मिळतो.
नव्या पिढी बद्दल सांगायचे तर, मनोगत, उपक्रम अन इतर सर्व ... याच सोबत, गमभन, त्याचा शुद्धिचिकित्सक हे सर्व तयार करणारे मराठी आणि नव्या पिढीचेच तर आहेत. अलिकडेच आपल्यातल्या एकाने माझेशब्द हे संकेतस्थळ तयार करून अर्थार्जन केले. नवी पिढी मराठीला समृद्ध बनवते आहे आणि आजच्या युगात वापरायला सोपी सुद्धा.
मी स्वतः एका जर्मनीमध्ये दुकानात एका जर्मन स्त्री सोबत मराठी बोललो आहे. भाषाकडे फक्त अर्थार्जनाचे साधन म्हणून पाहणे कितपत योग्य आहे? आपल्या आजुबाजूला होत असलेल्या बद्दलांना आपण सकारात्मक घ्यायला नको का?
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
आमचं अमूल्य मत!
आपल्याला मराठीची आवश्यकता काय कारण मराठी भाषा आपल्याला दोन वेळचे अन्न देऊ शकत नाही.हे खरे की खोटे ते ठरवा.
ज्या गोष्टी आपल्याला दोन वेळचे अन्न देऊ शकत नाहीत, त्यांची आपल्याला काहीच आवश्यकता नसते का? हे आधी सांगा विकीराव. म्हणजे खरेखोटे काय ते ठरवता येईल. विचार करून उतर द्या हो! कारण आपली अंतर्वस्त्रदेखील आपल्याला दोन वेळचे अन्न देऊ शकत नाहीत, पण म्हणून त्याची आपल्याला आवश्यकता नसते का? ;)
बरं का विकीराव, दोन वेळचे अन्न हे इतर प्राणिमात्रांप्रमाणे आपल्यालाही तेवढेच आवश्यक आहे. पण मनुष्यप्राण्याने फक्त दोन वेळचे अन्न, याच्याही पुढे जाऊन थोडंफार डोकावून पाहावं असा कदाचित आपल्याला मनुष्यप्राण्याच्या जन्माला घालण्यामागे नियतीचा संकेत असावा!
माझ्या कल्पनेप्रमाणे मीही मनुष्यप्राणी आहे आणि माझ्या भुका या दोन वेळच्या अन्नापेक्षा अधिक आहेत. मला कुसुमाग्रजांची, गदिमांची भूक आहे. मराठीतल्या उत्तम कविता, लेख वाचण्याची माझी भूक आहे, आणि ती भूक फक्त मराठी भाषाच भागवते. स्वतः काही मांडण्याची, बोलण्याची, लिहिण्याची माझी भूक आहे आणि ती भूकही फक्त मराठी भाषाच पुरवते.
आता अगदी व्यक्तिशः माझ्याबद्दल बोलू. मी भारतीय आयुर्विमा महामंडळाचा दलाल आहे. पुष्कळश्या मराठी माणसांना मी 'अमूक अमूक पॉलिसी घ्या' हे मराठीतूनच सांगतो, पटवून देतो. त्यामुळे मला धंदा मिळतो आणि भा आ महामंडळाकडून दलालीचा धनादेश मिळतो. तोच धनादेश वटवून माझा दोन वेळचा आमटीभात सुटतो ही वस्तुस्थिती आहे! ;) आता बोला...!!
बाय द वे विकीराव, ही चर्चा टाकण्यामागचा आपला हेतू लक्षात आला नाही.
"हे काय एका वाक्यात प्रश्न लिहा अन बाकिच्यांनी निबंध लिहा असे आहे कि काय?" ह्या आर्यांच्या मताशी मी सहमत आहे! ;)
(मजकूर संपादित)
तात्या.
आमटीभात
तात्या, हे झाले आमटी भाताचे. भैय्याकडची पाणीपुरी, मामलेदारची मिसळ, मालवणी मटण वडे आणि टिचर्सचे दोन पेग ह्याचे श्रेय इंग्रजीला का?
बिझी..
तात्या, हे झाले आमटी भाताचे. भैय्याकडची पाणीपुरी, मामलेदारची मिसळ, मालवणी मटण वडे आणि टिचर्सचे दोन पेग ह्याचे श्रेय इंग्रजीला का?
अरे वरूण, आत्ता जरा मी बिझी आहे. हा विषय आपण नंतर बोलू! ;)
आपला,
(मटणखाऊ!) तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
तात्यानू....
चर्चेमागील हेतु आपल्यासारख्या विद्वानाच्या लक्षात आला नाही आश्चर्य वाटले. आपल्यासारखे काही अपवाद सोडल्यास मराठी भाषेत किती असे व्यवहार चालतात की त्या व्यवहारातून मराठी माणुस आपले पोट भरू शकतो. हल्ली सगळीकडे इंग्रजी .आपण पहात असालच. नोकरीसाठी मुलाखत बोला इंग्रजी . मराठी भाषेतून व्यवहार चालतात का(अपवाद सोडून) पहा विचार करून. उपक्रमावरिल किती जणांना मराठी भाषा दोन वेळचे अन्न देते(व्यवहारातून) .
आपला
कॉ.विकि
विनोद सोडा ...
विनोदाचा भाग सोडा, भारतात (महाराष्ट्रात) असे अनेक लोक मिळतील जे दोन वेळच्या अन्नासाठी नक्किच मराठी लिहिण्या-बोलण्याचा फायदा करून घेतील...
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
विनोद
ह्या प्रतिसादातला विनोद कुठे आहे?
(मजकूर संपादित)
सर्किटदादा..
कादंबरी लिहायला संपादक? अहवाल लिहीताय की काय. अहर्ता काय आहे .
आपला
कॉ.विकि
सर्किट दादा..
चूक झाली लिहीण्यात. पण कादंबरी लिहायला संपादक हा काय प्रकार आहे कळेल का?
आपला
कॉ.विकि
व्यावहारीक दृष्ट्या..
चर्चेमागील हेतु आपल्यासारख्या विद्वानाच्या लक्षात आला नाही आश्चर्य वाटले.
काय म्हणालात? मी आणि विद्वान?? बरं बरं! मी हलकेच घेतो.. ;)
आपल्यासारखे काही अपवाद सोडल्यास मराठी भाषेत किती असे व्यवहार चालतात की त्या व्यवहारातून मराठी माणुस आपले पोट भरू शकतो.
तुलनेने खूपच कमी.
मराठी भाषेतून व्यवहार चालतात का(अपवाद सोडून) पहा विचार करून.
खरं आहे आपलं म्हणणं. व्यवहारांचं म्हणत असाल तर खूपच कमी. कॉर्पोरेट जगतात तर सगळीकडे इंग्रजीच चालते. मुंबईत तर मराठीला आणि मराठी माणसांना काळा कुत्रा विचारत नाही हे मी मागे एकदा विस्तृतपणे मांडले होते.
उपक्रमावरिल किती जणांना मराठी भाषा दोन वेळचे अन्न देते(व्यवहारातून)
कल्पना नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे उपक्रमींकरतादेखील रोजीरोटीच्या बाबतीत मराठी भाषेचा वापर/उपयोग फारसा होत नसावा. आणि अहो अर्धेअधिक उपक्रमी तर आपल्या मायभूमीत देखील राहात नाहीत असा माझा अंदाज आहे. ते पोटापाण्याच्या उद्योगाकरता, संपन्नतेकरता, समृद्धीकरता, आणि अश्या अनेक कारणांकरता मातृभूमी सोडून गेलेले आहेत. मग त्यांचा रोजीरोटीकरता मराठी भाषेचा वापर करण्याचा/उपयोग करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. मराठी लिहिण्याची, वाचण्याची त्यांची भूक ते उपक्रम, मनोगत, मायबोली, यांसारख्या संकेतस्थळांच्या माध्यमातून भागवतात/भागवत असावेत असे वाटते.
असो, आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे आत्ता स्पष्ट झालं. पण चर्चा मांडताना हा मुद्दा माझ्यापुरता तरी स्पष्ट झाला नव्हता.
तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
गोंधळ
मराठी भाषेतून व्यवहार चालणे व पोट भरणे याचा काय संबंध आहे? आंतरराष्ट्रीय व्यवहाराची भाषा जी की इंग्रजी त्याचा स्वीकार आता सर्वत्र होत आहे. मराठी माणसांनीही जास्त गोंधळ न घालता मोठ्या मनाने(!) शिक्षणासाठी, नोकरीसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी इंग्रजीचा स्वीकार केलाच पाहिजे. नाहीतर परत बिहारी लोक आमच्या नोकर्या घेतात, यंडूगुंडू डोक्यावर बसून मिर्या वाटतात असे वर्षानुवर्षे चालत राहील.
मात्र मायमराठीस वार्यावर न सोडता तिचा कटाक्षाने वापर करावा. स्थानिक व्यवहारांसाठी मराठी + आंतरराज्यीय/आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी इंग्रजी असे तत्त्व अंगिकारावे.
सहमत
तेच तर आम्ही म्हणत आहोत्...
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
सही बोला भिडू..
मराठी माणसांनीही जास्त गोंधळ न घालता मोठ्या मनाने(!) शिक्षणासाठी, नोकरीसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी इंग्रजीचा स्वीकार केलाच पाहिजे.
नव्हे, त्यांना तो करावाच लागेल! आणि गोंधळ घालून सांगणार कुणाला अन् ऐकणार कोण? ;)
मात्र मायमराठीस वार्यावर न सोडता तिचा कटाक्षाने वापर करावा. स्थानिक व्यवहारांसाठी मराठी + आंतरराज्यीय/आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी इंग्रजी असे तत्त्व अंगिकारावे.
सही बोला भिडू!
तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
इंग्रजी शिकवा
आमची मातृभाषा आम्हाला दोन वेळचे अन्न देऊ शकत नसल्याने कोणि मला इंग्रजी भाषा शिकवता का?
आपला
कॉ.विकि
इंग्रजी
शाळेत (मराठी माध्यम) पाचवी पासून इंग्रजी शिकवतात... तेव्हा का शिकले नाहित?
वरुण साहेब
मी तर इयत्ता चौथीपर्यंतच शिकलेलो आहे.
शिकवावे
कॉ.विकि
विकिसाहेब..
तसे असेल तर रितसर शाळेत प्रवेश घेऊन आधी शिक्षण पुर्ण करा.. नुसतं इंग्रजी शिकून आपल्या अपेक्षीत असलेली नोकरी मिळणे कठीण आहे.. (केवळ दोन वेळचे अन्न मिळवणे इतकाच प्रश्न असेल तर इंग्रजीच काय मराठी सुधा नाही आली तरी चालेल!)
-वरूण
वरुण साहेब
आम्हाला मग कल्पना धाकी दोन वेळेचे अन्न कसे मिळावायचे ते.कोणत्या शाळेत जाऊ मी त्यापेक्षा तुम्हीच शिकवाकी इंग्रजी.
इंग्रजी शिका नविन समुह स्थापन करा .
आपला(निरक्षर)
कॉ.विकि
अन्न कसे मिळवायचे..??
तस बघा विकि साहेब.. जवळच्या कुठल्याही उपाहारगॄहात जाऊन .. मस्त पैकी राइसप्लेट ऑर्डर केली की पोटभर अन्न मिळते बघा.. बाकी चौथी पर्यंत शिक्षण घेऊन देखिल जर तुम्ही निरक्षर असाल तर आवघड आहे!! :-)
वरुण साहेब
पैसा नाही आहे राईस प्लेट खायला. त्यामुळेउगाचच उपदेश करु नका राव.त्यापेक्षा इंग्रजी शिकवा
आपला
कॉ.विकि
विकि साहेब
पैसा मिळवायचा आहे हि खरी समस्या आहे.. तेव्हा उगीचच 'दोन वेळचं अन्न' वगैरे स्वरूप आणू नका.. इंग्रजी भाषेचा गंध देखिल नसलेले हजारो लोक एकट्या मुंबईत सापडतील ते सगळेच्या सगळे काय उपासमारीने दगावत चालले आहेत का?.. तुम्ही आधि उगाचच प्रश्न विचारता आणि मग 'उगाचच' उपदेश करू नका देखिल म्हणता राव!!
वरुण साहेब
आपण इंग्रजी शिका हा समुदाय स्थापन करत आहात की नाही तेवढेच लिहा.इथे बरेच विषयांतर होतेय.
आपला(मराठी भाषिक)
कॉ.विकि
विषयांतर
अहो मग चर्चा प्रस्तावात तेवढेच विचारा ना.. "सध्याच्या स्पर्धात्मक युगात चांगली संधी मिळण्यासाठी इंग्रजी शिकणे गरजेचे आहे का? असल्यास तसा समुदाय स्थापन करून मार्गदर्शन करावे" असा साधा सरळ सुटसुटीत प्रस्ताव ठेवा ना ..कशाला करेल कोण विषयांतर? " मराठी भाषा दोन वेळचे अन्न देते का?" असा प्रस्ताव ठेवलात तर - "इंग्रजी भाषेचा गंध देखिल नसलेले हजारो लोक एकट्या मुंबईत सापडतील ते सगळेच्या सगळे काय उपासमारीने दगावत चालले आहेत का?".. असेच प्रश्न येणार त्याला उत्तर का देत नाही?
वरुण साहेब
तुमच्या लक्षात विषय अजुनही आला नाही .आश्चर्य वाटल. विद्वान तात्या यांचे प्रतिसाद वाचा तुम्हास कळेल.
आपला(इंग्रजी शिका या समुदायाच्या प्रतिक्षेत असणारा)
कॉ.विकि
रागवीन हं! ;)
विद्वान तात्या यांचे प्रतिसाद वाचा तुम्हास कळेल.
आता मी खरोखरच रागवीन हं !
हलकं तरी किती वेळा घ्यायचं? ;)
आपला,
(विद्वान या शब्दाला घाबरणारा!) तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
वरुण साहेब
पैसा हाती असल्याशिवाय दोन वेळंचे अन्न मिळत नाही हे आपल्याला माहीत नाही . आश्चर्य् आहे.
आपला
कॉ.विकि
मग खर आहे का???
मराठी भाषा आपल्याला दोन वेळचे अन्न देऊ शकत नाही . मला तर वाटत हे खर आहे.
विद्वान तात्या यांनी याबाबत सविस्तरपणे लिहीलेले आहे.
आपला
कॉ.विकि
हलकेच..
विद्वान तात्या यांनी याबाबत सविस्तरपणे लिहीलेले आहे.
विद्वान तात्या??
पुन्हा एकदा हलकेच घेतो! ;))
तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
अजून काय हवे !
नमस्कार,
मलातर मराठीने दोन वेळेची भाकरी दिली त्या पेक्षा जास्तच दिले :) (माझे शब्द) व त्या पेक्षा जास्त सुख दीले...
मराठी संगणक जगतामध्ये नाव कमावले (चांगले / वाईट दोन्ही)
सद्या मराठीच्या जोरावरच एक व्यवसायीक काम करण्याचा प्रयत्न करीत आहे मला वाटते की तोटा झाला तरी हरकत नाही... पण प्रयत जरुर करेन.
गेली १२-१५ वर्षे मी दिल्ली येथे राहत आहे पण गेली दोन वर्षे मराठी संकेतस्थळानी मला माझी ओळख तयार करुन दीली.
अजून काय हवे !
राज जैन
माझे शब्द
आपला प्रतिसाद वाचला त्यात आपण अपवादामध्ये मोडता. बाकिच्यांच काय.
अहो विकि राव..
अहो विकि साहेब, तुम्ही म्हणता त्या प्रमाणे मराठी भाषा तुम्हाला दोन वेळचं जेवण देत नाही त्याचं कारण तुम्ही जेवण मिळवण्यासाठी इंग्लिशचा वापर करता. आज जपान मधील लोक म्हणे त्यांचे सर्व व्यवहार जपानी भाषेतुनच करतात. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना जपानीभाषेवरच अवलंबून रहावं लागतं. तुम्ही सुद्धा तुमच्या मराठी भाषेचा एवढा वापर करा की बिहार मधुन येणार्या भैयाला पोट भरण्यासाठी मराठीच शिकावं लागेल.
मराठी भाषेला एवढं प्रगल्भ करा की या भाषेतुन फक्त साहित्यच काय विविध तंत्रज्ञान विषयक माहीतीही येऊ द्या. मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दोन वेळचंच काय चार वेळचं जेवण सुद्धा तुम्हाला ही मराठी भाषा देऊ शकेल.
असं काय करता राव? तुम्हीच तुमच्या गायीला चारा घालू नका आणी तिने दुध नाही दिलं कि तिचा पोट भरण्यासाठी उपयोग होत नाही म्हणून उर बडवा?
(जय महाराष्ट्र्! जय मराठी ) रम्या